Atheism । God । Raju Parulekar आस्तिक-नास्तिकांबद्दल मनातलं

  Рет қаралды 73,222

The Insider

The Insider

Күн бұрын

नास्तिक म्हणजे कोण? 'मनातलं'च्या पुढच्या भागात असा प्रश्न विचारताना ज्येष्ठ पत्रकार आणि लेखक राजू परुळेकर यांनी नास्तिकांच्या संमेलनाबाबत आपली मते परखडपणे मांडली आहेत. नास्तिक माणसांचे संमेलन होऊ शकत नाही असं म्हणताना त्यांनी यामागची कारणेही विषद केली आहे. आस्तिक-नास्तिक असा नवा वर्ग उदयास आला आहे अशी मार्मिक नोंदही राजू परुळेकर यांनी केली आहे.
राजू परुळेकर यांचे मनातलं हे व्हिडीओ सदर अत्यंत लोकप्रिय होऊ लागले असून. The Insider च्या सगळ्या व्हिडीओंना प्रचंड प्रतिसाद मिळू लागला आहे. पारंपरीक माध्यमे आणि सोशल मीडियातून होत असलेल्या बातम्यांच्या आणि मजकुराच्या उष्ण भडीमारात राजू परुळेकर यांचे विचारी, विवेकी व्हिडीओ हे सावलीत मिळणाऱ्या थंडाव्याप्रमाणे आहेत. हे व्हिडीओ अधिकाधिक लोकांपर्यंत पोहचावेत यासाठी आपण हातभार लावावा ही आपल्याला विनंती. व्हिडीओ आवडल्यास तो लाईक करा, आपली प्रतिक्रिया कमेंट बॉक्समध्ये नोंदवा आणि इतरांनाही व्हिडीओ पाहता यावा यासाठी तो शेअर करा ही आपल्याला नम्र विनंती. आपण आम्हाला आपली प्रतिक्रिया insiderthe4@gmail.com या ईमेल आयडीवरही कळवू शकता.

Пікірлер: 407
@samk90
@samk90 2 жыл бұрын
नास्तिक माणूस कधीही अतिरेकी होत नाही, पण जे अतिरेकी आहेत ते कट्टर आस्तिक आहेत... कट्टर धर्मांध आहेत...
@ashishpatil7133
@ashishpatil7133 2 жыл бұрын
Very True…
@Vish0410
@Vish0410 2 жыл бұрын
Perfect!
@dromkar
@dromkar 2 жыл бұрын
Joseph Stalin नाव ऐकलं असेल आपण. अस्सल नास्तिक, पण अतिरेकी हा शब्द खूपच खुजा ठरेल अशी कृत्य केलेत त्याने. नास्तिक असणे म्हणजे मानवतावादी असणे असे बिलकुल नव्हे. 🙏
@dnyaneshwarsanas5719
@dnyaneshwarsanas5719 2 жыл бұрын
महाशय जा गोष्टीला आपण धर्मांधता म्हणता वस्तविक ती एक वैचारिक कट्टरता आहे परंतु ती केवळ धर्माच्याच माथी मारली जाते.वैचारीक कट्टरता ही दुराग्रह,स्वमतांधता एककल्ली पणा, हेकेखोरपणा या द्वारे प्रगट होते.ही प्रवृत्ती डाव्या विचारसरणीच्या लोकांमध्ये ही प्रकर्षाने विशेष प्रकारे जाणवते.जेवढ्या हत्या धर्माच्या नावाखाली झाल्या त्यांच्या पेक्षा जास्त हत्या कम्युनिस्टांनी फक्त सत्तर वर्षात केल्या लेनिन ते स्टॅलीन पर्यंत व माओ ते चेग्वेरा पर्यंत सगळे क्रुरकर्मे नास्तिकच होते...
@DarkShadow-gc5ut
@DarkShadow-gc5ut 2 жыл бұрын
@@Vish0410 *तुम्ही नास्तिक आहात का?*
@Vish0410
@Vish0410 2 жыл бұрын
नास्तिक असणं वेगळं आणि समूहप्रिय व्यक्ती असणं वेगळं! नास्तिक म्हणजे काही माणूसघाणेपणा नव्हे!
@Vish0410
@Vish0410 2 жыл бұрын
@@VijayDChauhaan Exactly!!
@sanketgahandule3905
@sanketgahandule3905 28 күн бұрын
डोकं खोलून ठेवणारा अवलिया आहे हा माणूस.... ग्रेट personality मिस्टर राजू सर...thanks एवढे परखड आणि शास्त्रशुध्द विश्लेषण आमच्यासमोर मांडल्याबद्दल
@rationalmarathi4027
@rationalmarathi4027 2 жыл бұрын
सर, नास्तिक होणं खूप धाडसाचं काम आहे ! किती सुंदर बोलता, राजू सर आपण ! 🙏🙏🙏
@milindpawar7394
@milindpawar7394 2 жыл бұрын
नास्तिक होणं फायदेशीर आहे
@ekanathbarhe2757
@ekanathbarhe2757 Жыл бұрын
देव,ही एक संकल्पना आहे.आणि, ही संकल्पने वर ऐतखाऊ जगतात.
@satd2024
@satd2024 2 жыл бұрын
नास्तिक कशालाच घाबरत नाहीत असं म्हणणं पटत नाही . एकत्र येऊन विचार निमिमय करून विचार पक्के होऊ शकतात शिवाय एखादा आस्तिक सुध्दा नास्तिक बनू शकतो
@ravighule2248
@ravighule2248 2 жыл бұрын
Right
@Mambo05-f5k
@Mambo05-f5k 2 жыл бұрын
10 mansa talwari gheun mage lagle ki aastik nastik aani aatikat+nastik time anusar saglech ghabrtat 😅😅
@harshusuniverse4283
@harshusuniverse4283 5 ай бұрын
नास्तिक स्वतःला ओळखतो सामाजिक कार्य कारण भाव जाणतो त्यामुळे, त्याच्याकडे घाबरण्यासारखे काहीही उरत नाही. भगत सिंग म्हणून सरांनी उदाहरण घेतले. विपश्यना केलीत तर भीतीवर सविस्तर जाणून घेता येईल.
@prashantpatil3350
@prashantpatil3350 Жыл бұрын
अगदी माझ्या मनातल किती दिवस शब्दात आणू शकलो नाही...हेच ते conversation मी नेहमी माझ्या आप्तेष्ट लोकांना सांगायचा प्रयत्न करत असतो ...मला वाटतं हा video ते काम सोप्प करेल....हाच तर निव्वळ फरक आहे... भाषेवरील प्रभुत्व आणि विद्वत्तेचा... खूपच छान!
@prakashkute6416
@prakashkute6416 Жыл бұрын
मला तुमचे सुधारणावादी विचार नेहमी भावतात. तसे तुम्ही नास्तिक आहात असं वाटते, पण नस्तिकांचे संमेलन किंवा संघटन असू नये हे थोडं कळण्यासारखं नाही.असो.. नास्तिकता ही एक अवस्था आहे. पण त्यांचं संमेलन होऊ शकत नाही. हा विचार काही पटण्यासारखा नाही. कारण जगात नस्तिकांची संख्या फारच कमी आहे. गाव पातळीवर तर अगदी नगण्य. नास्तिकांची टर उडविली जाते कारण ते संख्येने कमी असतात; म्हणूनच नाही, तर त्याला पहिला विरोध हा त्याच्या घरातूनच होतो. माणूस तसा समाजशील प्राणी आहे; भले मग तो आस्तिक असो की नास्तिक. त्यालाही वाटते, माझ्या विचाराचे चार जण मिळाले तर ते काय वाईट? तुकाराम महाराज म्हणतात तसं, की... माझिया जातीचे मज भेटो कोणी. त्यातून विचारांचे अधिक आदानप्रदान होऊ शकते. ही बाब फारशी कुणाला पटणार नाही पण नास्तिकता अखिल मानव जातीसाठी आवश्यक बाब आहे. नास्तिक माणसाचा कुणालाही त्रास होत नाही, पण त्याला मात्र तो होतो.
@nikhil1992sable
@nikhil1992sable Жыл бұрын
सर तुमच्या या मतांशी मी असहमत आहे असं म्हणेन, अर्थातच मी तुमच्या इतका मोठा अभ्यासक अजिबातच नाहीये पण भारताला नस्तिकतेच्या संमेलनाची फार जुनी परंपरा आहे. चार्वाक, गौतम बुद्ध, संत कबीर, तुकाराम महाराज, गाडगे बाबा, फुले, शाहू, आंबेडकर यांचं वाचन करताना सातत्याने जाणवतं की यांनी फक्त सामाजिक वैचारिक असमानता यावर भाष्य केलंय असं नाहीये जवळ जवळ नस्तिकांच संघटन आणि वेगवेगळ्या नस्तिकांना एकत्र आणण्याचं काम केलं आहे. बुद्धोत्तर काळात वार्षिक धम्मचक्र प्रवर्तन होत होती जेणेकरून फक्त बुद्ध धम्मातच नव्हे तर समाजात आलेल्या किव्वा रूढ झालेल्या चुकीच्या चालीरीती यांवर भाष्य करून त्या मुळापासून खोडून काढत होते. तशीच पद्धत संत कबीर, संत तुकाराम, दैनंदिन स्तरावर आपल्या वाणीतून लोकांची जनजागृती केली ती ही एक प्रकारची नास्तिक संमेलन आणि संघटनाच होती फक्त ती अघोषित होती. त्याला आपण फक्त सामाजिक विचारसरणीची क्रांती आसाच फक्त पाहत आलो आहोत. परंतु ती एक नास्तिक संघटनसुद्धा होतीच, किंबहुना आहे. आणि म्हणूनच या महापुरुषांच्या विचारसरणीला मानणाऱ्या व्यक्तीला किंवा समूहाला प्रत्येक आस्थिक आणि धार्मिक लोकं हे द्वेशानेच पाहत असतात. तुम्ही म्हणाले तसा यांना सुद्धा आत्मपरीक्षण करून अगणित अभ्यास करून नास्तिकता प्राप्त केली होती परंतु या सर्व महापुरुषांनी ती फक्त स्वतःपुरती मर्यादित न ठेवता पसरवली. कारण तेच गरजेचं आहे. काही चुकीचं बोललो असेल तर कृपया दुरुस्त करा. वाईट वाटण्यासारखं काही असेल तर माफ करा. 🙏
@wamanmore6641
@wamanmore6641 2 жыл бұрын
राजू सर खुप छान सांगितले आहे. खरे तर धर्म ही संकल्पना कालबाह्य आहे तथापि काल्पनिक कल्पनाच भिती चे अस्तित्व पोटी आस्तिक होतात.
@rohitkambli4765
@rohitkambli4765 Жыл бұрын
मानुस नास्तिक असो या आस्तिक असो मानसाने हमेशा सत्य काय आहे याचा शोध घेतलाच पाहीजे नाही तर मानसाच जिवन वेर्थ आहे खरा मार्ग बुध्दाच्या साधनेत आहे
@MrShukra2000
@MrShukra2000 Жыл бұрын
सत्य शोधनाच्या मार्ग बुद्धाचा आहे, बुध्द साधनेने काही मिळणार नाही .. हे बुद्धानी सांगितल आहे...बुध्द मार्गाने जाणे हे योग्य होईल..
@kishorwajge8255
@kishorwajge8255 2 жыл бұрын
नास्तिकांचे संमेलन होऊ शकत नाही हे काही मला पटत नाही. बाकी विचार छान.
@ashoklad5075
@ashoklad5075 2 жыл бұрын
सहमत आहे .
@moharshshinde275
@moharshshinde275 7 ай бұрын
राजु सर तुमची आवाजाची ट्युनिंग चांगली आहेच पण जे ज्ञानाची वाटणी सढळ हाताने तुम्ही करता आणी ते आम्हाला फुकट मिळते खुप धन्यवाद सर
@vidyadeshmukh7840
@vidyadeshmukh7840 2 жыл бұрын
👌👌 मार्क्सवादाच उदाहरण लक्षात घेतल की सगळ्या गोष्टी क्लिअर होतात. खरय नास्तिकाना समेलनाची गरज नाही. धन्यवाद 🙏
@datspats1
@datspats1 2 жыл бұрын
खरच ...काही गोष्टी खूप गुंतागुंतीच्या आहेत. वयाची ४०-५० ओलांडून पण सोडवता येत नाही. पण त्या बद्दल काही मनातले सांगण्याचा एक उत्तम प्रयोग.
@datspats1
@datspats1 2 жыл бұрын
तुम्हाला प्रत्यक्षात भेटण्यासाठी उत्सुक आहोत.
@Shubham-qp6rm
@Shubham-qp6rm 7 ай бұрын
नास्तिक माणूस आपले विचार आणि प्रबोधन करण्यासाठी एकत्र येऊन योजना ठरवू शकत नाही का
@rangnathlahane
@rangnathlahane 3 ай бұрын
सर आपण अतिशय विज्ञाननिष्ठ विवेकी आणि पुरोगामी विचारांची ही मालिका सुरू केली असून केली असून समाजाला ती अत्यंत उपयुक्त आहे याबद्दल मनःपूर्वक शुभेच्छा प्राध्यापक लहाने
@ravighule2248
@ravighule2248 2 жыл бұрын
पण सर येणाऱ्या पिढीला नास्तिक तेची ओळख कशी होणार जर आपण आपली विचाराची देवाण घेवाण करणार नाही तर हे विचे नेमके आहेत कसे हे समाजाला समजेल कस
@SagarMadhukarAsgolkar
@SagarMadhukarAsgolkar 7 ай бұрын
Sir आत्तापर्यंत मला आयुष्यात आलेला अनुभव हा तुमच्या विश्लेषना मधल्या एकूण एक शब्दातून जाणवला. आणि नास्तिकचे समूह होऊ शकत नाही हे 💯% खरं आहे. धन्यवाद sir 🙏🏻
@luckypatilbhosle007
@luckypatilbhosle007 2 жыл бұрын
सर, तुम्ही अगदी माझ्या मनातलं बोलता. आ ह साळुंखे यांची मुलाखत उत्तम होती.
@vikaspawar-y1x
@vikaspawar-y1x Ай бұрын
ना आस्तिक ना नास्तिक फक्त "वास्तविक" यावर माझा विश्वास आहे !
@Smita1223
@Smita1223 7 ай бұрын
I'm an atheist. I take all good & bad responsibilities on own shoulders.
@rushikeshwagh6826
@rushikeshwagh6826 2 жыл бұрын
आपल्या पुण्यातील एका व्याख्यानात, तुम्ही, "माझा तिरुपती च्या बालाजी वर विश्वास आहे", असं विधान केले होते, त्याचा अर्थ काय आहे?
@dhamankarhospital7669
@dhamankarhospital7669 2 жыл бұрын
अत्यंत सुयोग्य शब्दांकन मी आपल्याकडून शिकण्यासारखे अशा अनेक मालीकांची अपेक्षा करतो
@shashikantjoshi7662
@shashikantjoshi7662 8 ай бұрын
एक चांगला विचार. एक चांगला विषय. आनंद वाटला.
@prafullshinde2759
@prafullshinde2759 2 ай бұрын
तुमचे विचार अगदी शुद्ध निर्मल आणि स्पष्ट आहेत. विद्या विन येन शोभते.
@mayawadgaonkar5400
@mayawadgaonkar5400 Жыл бұрын
अत्यंत सुंदर विवेचन
@manoharkhairnar2247
@manoharkhairnar2247 2 жыл бұрын
बुद्ध पौर्णिमेच्या हार्दिक शुभेच्छा सर 🙏
@decentagencies6563
@decentagencies6563 10 күн бұрын
नास्तिक आस्तिक वास्तविक धर्म चिकित्सक अभ्यासक शिवश्री राजू परुळेकर सादर प्रणाम,,,जीवनप्रवास आपली साथ आणि विचार आनंद देतात,,,सर नास्तिकतेत भरपूर धैर्य आहे साहेब हे मात्र खरं
@suyashsalunkhe1890
@suyashsalunkhe1890 8 ай бұрын
हा पण एक दृष्टिकोन असू शकतो मला वाटतं नास्तिक लोकांचे संमेलन भरले तर खूपच फलदायी ठरेल वैचारिक मंथन होईल वैज्ञानिक दृष्टिकोन प्रसार होईल समाजहिताचे धोरण तयार होईल सगळ्यात महत्वाचे म्हणजे बरेच आस्तिक लोक देवाला का मानतात तर बहुसंख्य लोक मानतात म्हणून त्यांना पण कळू दे देव न मानणारे पण बरेच आहेत.
@SS-dz2ol
@SS-dz2ol 2 жыл бұрын
Aethist is fearless person. Most of the satyashodhak in Maharshtra were Aethist. Unfortunately Aastik silence their voice like they did it with Dabholkar Sir. Thank you Sir. I liked yr analysis.
@balwantyejare5203
@balwantyejare5203 Жыл бұрын
अति सुंदर विचार सर! काही लोक (सामाजिक ज्ञाना अभावी) आपल्या विचारांशी सहमत नसतात! But don't worry,go ahead Sir. Your thoughts are very powerful.
@shubhadathakare6958
@shubhadathakare6958 3 ай бұрын
पाप करणारी व्यक्ती ही आस्तिक असत नाही . ती दांभिक असते . एकवेळ नास्तिक व्यक्ती ही पारदर्शक आणि पापभिरू असू शकते .
@avinashrutuja2727
@avinashrutuja2727 Жыл бұрын
नास्तिकाची नास्तिकतेवर श्रद्धा कशी असू शकेल.
@namratadeshmukh9084
@namratadeshmukh9084 2 жыл бұрын
माझ्या मनातले बरेचं प्रश्न सूटताय...मी सारखं ऐकते तर हेच मनात चाललं असतं पण आपण एक्सपर्ट नसतो...आपल्याला इतकं छान व्यक्त होता येत नाही..पण तूम्हाला छान व्यक्त होता येतं...हे छान आहे...आपल्या आतला आवाज इतक्या छान शब्दामधे ऐकावा यासारखं काय छान असेल..❤️👍
@MrShukra2000
@MrShukra2000 Жыл бұрын
एक नवीन विचार मिळाल्याचा आनंद झाला..अतिशय सुंदर विश्लेषन नास्तिक तेबद्द्दल..पण आस्तिक किंवा नास्तिक हे देखील एक प्रकारचे लेबल लावणे हे कितीपत योग्य आहे ? एक माणूस म्हणुन जगणे शक्य नाही का?
@kraju-mn3bv
@kraju-mn3bv Жыл бұрын
सर नुकताच वारकरी/कीर्तनकारांनी सुषमा अंधारेंवर खालच्या पातळीवर जाऊन जी बीभत्स टिका केली त्यावरून भक्ती संप्रदायाची नव्याने मांडणी झाली आहे. आपण यावर एखादा व्हिडिओ बनवावा
@shelakeba3924
@shelakeba3924 2 жыл бұрын
पटले एकच नंबर sir
@sanjeevtare5396
@sanjeevtare5396 2 жыл бұрын
Very nice supported by good logic👍👍👍👍
@prakashteke4200
@prakashteke4200 Жыл бұрын
राजुजी खूप सुंदर माहिती मिळाली एकटेपणा बद्दल मी osho यांचे विचार ऐकले आहेत यावर एकदा तुम्ही बोलावे ही विनंती
@rajbhushankamble9846
@rajbhushankamble9846 2 жыл бұрын
Why Atheist cannot organize a conference ??? Surely ...they can... How will "exchange of ideas" happen,then ???
@wamangaikwad418
@wamangaikwad418 6 ай бұрын
खूप छान सर..!
@ranjit2025
@ranjit2025 2 жыл бұрын
शब्दांचे खेळ केला आपण परुळेकर जी. आस्तिक असणे वाईट नाही. परंतु, समाजात जो विध्वंस सध्या होत आहे तो आस्तिक प्रवृत्ती मुळे च दिसून येतो. नास्तिकत्व प्रवृत्ती चा प्रचार प्रसार होणे अत्यावश्यक आहे. त्यासाठी संमेलन घेणे काहीच वाईट नाही. किंबहुना ते आवश्यक आहे.🙏🏻
@narendrafulkar7827
@narendrafulkar7827 9 ай бұрын
तुमचं मत मला खुप पटलं आणी समाजात खुप थोतांड पसरलेयत आजच्या युगात सिद्धा.
@subhashgavit1614
@subhashgavit1614 7 ай бұрын
अतिशय सुंदर विवेचन
@bhausahebdeshmukh4615
@bhausahebdeshmukh4615 2 жыл бұрын
खूप छान विचार सांगीतलात सर, मी ही नास्तिक विचारला धरून आहे. पण मला आज समजलं ki नास्तिक वृतीचा बोध kay आहे. 🙏🙏
@sameerpalkar4626
@sameerpalkar4626 2 жыл бұрын
राजू सर, अशा लोकांनी खरेच एकमेकांना भेटले पाहिजे, आणि हे विचार वाढवले पाहिजेत,,,,by the way,,,मागचा पृथ्वीचा गोल कुठे मिळाला , छान आहे, कृपया कळवावे
@ashoklad5075
@ashoklad5075 2 жыл бұрын
सहमत आहे .
@sureshtayade5042
@sureshtayade5042 2 жыл бұрын
आपणच आपल्या जिवनाचा शिल्पकार आहोत दुसरं कोणी ही नाही सर आपण अगदी छान बोलतात
@shivajipatil9233
@shivajipatil9233 9 ай бұрын
U r just Awesome Sir …keep it up…
@blossomchildrenscenter8000
@blossomchildrenscenter8000 Жыл бұрын
खूप सोप्या भाषेत क्लिष्ट विषय समजावून सांगितले. आभार...
@somnathkhilare5039
@somnathkhilare5039 Жыл бұрын
नास्तिकतावाद म्हणजे विचार अनूभवावरून केलेला ईश्वराप्रती अविश्वास होय..नास्तिकतावाद म्हणजे धर्म आणि विश्वास या पासून स्वतःला अलग राखणे..
@sachinrananaware6886
@sachinrananaware6886 2 жыл бұрын
अगदी पटले सर..
@pratibhavishwasrao956
@pratibhavishwasrao956 Жыл бұрын
अगदी खरं, वस्तुनिष्ठ!
@priyankakhandeparkar7540
@priyankakhandeparkar7540 Жыл бұрын
स्वतःची जबाबदारी स्वतः घेणाऱ्याला, देवापुढे सतत याचना न करणाऱ्याला व जग चालवणार्‍या शक्तीवर विश्वास ठेवणार्‍याला काय म्हणावे? बाकी विवेचन सुंदर 😊
@37pratikjadhav29
@37pratikjadhav29 2 жыл бұрын
raju ji mi tumchya matashi sahmat aahe. Mi hi javal pass asach manato. जीतनी तबाही आज तक आस्तिको (in fanatics context) ने मचाई है,शायद ही कोई नास्तिक मचा पाया हो ! प्रतिक जाधव
@Mambo05-f5k
@Mambo05-f5k 2 жыл бұрын
Stalin russia aatacha tewacha soviet sangh to nastik hota tyane laakho loka marli china cha mao yane lakho loka marli donhi nastik hitler ha christan aastik hota tyane laakho loka marli nastik aastik yaat kai farak rahila mag doganhi trasach dilai ki 😅😅
@37pratikjadhav29
@37pratikjadhav29 2 жыл бұрын
@@Mambo05-f5k Mhanun mi 'shayad' ha shabd vaprala, afghanistan madhe aasthikanni kay dhudgus majvala aahe pahil aahe jagane.
@rahulpatil5550
@rahulpatil5550 2 жыл бұрын
नास्तिक मेळावा घेऊन विचारात देवाण घेवाण होतें
@vinayakshevade8924
@vinayakshevade8924 2 жыл бұрын
You r great
@drrssable3863
@drrssable3863 11 ай бұрын
अगदी सध्या सोप्या भाषेत आस्तिक व नास्तिक वर्णन केलेत राजुजी आपण 🙏🏻thank you इतरांकडे बघून आस्तिक झालेल्याना हा व्हिडियो परत परत बघावा
@meenadhumale7484
@meenadhumale7484 8 ай бұрын
Thank u sir important message 🙏🌹🙏
@adsakhare4553
@adsakhare4553 11 ай бұрын
नास्तिक आपला विचार validate करायला एकत्र येऊ शकतो ना...
@officialcritisizer6462
@officialcritisizer6462 8 ай бұрын
हो मला ही हेच म्हणायचे होते, नास्तिक लोक एखाद्या चांगल्या उद्दिष्टसाठी एकत्र येऊ शकतात ना।
@ganeshjagdale8830
@ganeshjagdale8830 2 жыл бұрын
बोध हा विचारामधून होतो आणि विचारांची देवाणघेवाण होऊ शकते...
@santoshkharat468
@santoshkharat468 8 ай бұрын
नमस्कार सर.. नास्तिक संमेलन असेल तर विचार शेअर करता येतील आणि काही आस्तिक लोक ज्यांची आयुष्याची माती होत आली आहे अशांना मदत करता येईल असे मला वाटते
@sunilPatil-hy4ow
@sunilPatil-hy4ow 2 жыл бұрын
तुमचे विचार पटतातं . 👌
@sudhirpawar1066
@sudhirpawar1066 Жыл бұрын
Sir मी नास्तिक आहे मानवता धर्म आहे
@jagadishlambe9291
@jagadishlambe9291 6 ай бұрын
👍👌✔️निर्गुण,निराकाराचे "संशोधनात्मक" ध्यान,,जप आणि कर्मफल भोगाला "धैर्याने सामोरे" जाणे ही सुद्धा नास्तिकताच आहे,,,, ती जास्त उदात्त आहे⛳⛳
@musichobby3162
@musichobby3162 4 ай бұрын
🔔
@thefooddoc_
@thefooddoc_ 2 жыл бұрын
well concluded
@subhashbiranje3813
@subhashbiranje3813 4 ай бұрын
सर मी तुमचा खूप जुना श्रोता आहे आगदी etv मधील सकाळी असणाऱ्या संवाद प्रतीसंवाद या मालिके पासून. तुमच्या नास्तिक आस्तिक चर्चे मधुन श्रोत्याच स्पष्ट मत तयार होत नाही कारण तुम्ही निर्णय देत नाही तर तेही स्वीकारा अथवा हेही स्वीकारा असाच कल दिसतो तुमच्या स्पष्टीकरनमधून खरं तर प्रत्येक व्यक्तीचे जिवण जगण्याचे हे दोन महत्वपूर्ण मार्ग आहे त्यातील कोणता योग्य व विज्ञान वादी आहे. आणि कोणता थोतांड आहे हे स्पष्ट करतं नाही. कारण या भारत देशाचा वास्तविक वाद हा दैव वाद आणि विज्ञान वाद आणि बुद्धिवाद हाच आहे आणि विज्ञान व बुद्धी वाद हाच मार्ग जिवन जगण्यास योग्य आहे हे सभोवताली दिसत असलेल्या प्रगती ने सिध्द झालं आहे मग आणि उगाच आस्तिक आणि नास्तिक तेच गुराळ लावण्यापेक्षा प्रत्येक व्यक्तीने वास्तववादी होनच गरजेचं आहे त्यासाठी क्रांतिसूर्य महत्मा फुले यांचे गुलामगिरी हे पुस्तक वाचा आणि हा मनातील वाद मिटवा 🙏🙏🙏🙏🙏
@pramodpandey7235
@pramodpandey7235 7 ай бұрын
नास्तिक कोईनहीं होता वह ईश्वर न होने के प्रति आस्तिक होता है.
@vinayakulkarni1389
@vinayakulkarni1389 2 жыл бұрын
Sir nicely explained your view.sincerely appreciated 🙏
@uttamgadkari6170
@uttamgadkari6170 9 ай бұрын
जयभीम सर
@vijayg.k661
@vijayg.k661 2 жыл бұрын
I Am An Atheist.....
@DarkShadow-gc5ut
@DarkShadow-gc5ut 2 жыл бұрын
*Also I'm From Maharashtra.*
@pareshsamjiskar6462
@pareshsamjiskar6462 Жыл бұрын
फार सुंदर विचार
@shriramsakhalkar-blissyog2744
@shriramsakhalkar-blissyog2744 2 жыл бұрын
वा, अतिशय सुरेख.
@knowledgeispowerbyvt
@knowledgeispowerbyvt 5 ай бұрын
Great sir, eye opener
@milindgadkari8879
@milindgadkari8879 2 жыл бұрын
आपले विचार लोकांवर थोपवले पाहिजेच असे थोडीच आहे ?
@kalpanaadangle8307
@kalpanaadangle8307 Жыл бұрын
अप्रतिम sir 💯🙏
@avinashrutuja2727
@avinashrutuja2727 2 жыл бұрын
मुळात माणूस समुहाने राहणारा प्राणी मग तो आस्तिक असो की नास्तिक असो कोणाच्या विचारासाठी कोणी माणसा माणसात भेद करू शकत नाही.
@liladharbhakare1150
@liladharbhakare1150 2 жыл бұрын
Ekdam khar
@vishakha6325
@vishakha6325 2 жыл бұрын
Sir I really appreciate your talks can you pls have some talks in English so that we can circulate among non marathi people.
@rajivjadhav5945
@rajivjadhav5945 2 жыл бұрын
आस्तिक, व भ्रष्टाचार या संकल्पना आपणसा-यानी पुन्हा तपासून घ्ययला हव्यात असे वाटते
@sainathshinde7581
@sainathshinde7581 7 ай бұрын
खूपच छान आणखीन ऐकावे असं वाटतं.मी दोन वेळा ऐकले आहे
@sudhirparab1259
@sudhirparab1259 2 жыл бұрын
Perfect
@keshavdurpade7313
@keshavdurpade7313 Жыл бұрын
फक्त एवढेच म्हणू शकतो .....अप्रतिम.....
@rachanabrid180
@rachanabrid180 8 ай бұрын
Atishay uttam ,sopya bhaset ha gahan wishay sangitalat . Dhanyawad.
@shubhashlingade6018
@shubhashlingade6018 2 жыл бұрын
Nice one
@yallappadevkar8225
@yallappadevkar8225 10 ай бұрын
Shyam manav great personality 👍👍
@physics9540
@physics9540 2 жыл бұрын
मि स्वतः नास्तिक आहे ... माझ्या घरात घरकामासाठी येणारी जि बाई आहे तिच्या मुलीला (27 वर्षे) ला कांही तरी त्वचा रोग झालाय व ते कुटुंब हे देवाचं कांही तरी आहे असं समजुन डॉक्टर च्या ट्रिटमेंट ला महत्व न देता देवळ - बाबा - दर्गे - मांत्रिक करत फ़िरताय त त्यांना ..हे करू नका अस सांगणं म्हणजे नास्तिक तेचा प्रसार केल्या सारख नाही का ? नास्तिकता दोन प्रकारची असते ... एक देव हे मानवाने निर्माण केलेले आहेत व त्याच्या अनुषंगाने येणाऱ्या अंधश्रद्धा घालवण्या साठी नास्तिक तेचा प्रसार करण हे गरजेच आहे दुसरं अस्तित्वाच्या प्रश्नांच उत्तर शोधण्या साठी आध्यत्मिक मार्गा पेक्षा वैज्ञानिक मार्ग जास्त सक्षम आहे हे लोकांना सांगायला नको का ...
@Mambo05-f5k
@Mambo05-f5k 2 жыл бұрын
Nastik tar china cha mao hota tyane laakho loka maarli ki 😅 aani aastik hitler tyane pan laakho loka marli farak kai rahila ? Donhi madhe vikrut loka aahetach aani mahit pan tyamule aastik aani nastik donichi garaj aahech andhshradha sodun
@themultiverse7600
@themultiverse7600 5 ай бұрын
तो हातात "धागा" कशाबद्दल बांधला आहे कृपया सांगता का "कम्युनिस्ट परुळेकर जी"
@santoshborude170
@santoshborude170 3 ай бұрын
It has his mothers memories associated with it. That astik ppl destroy within sec
@surendrahiwarale2995
@surendrahiwarale2995 7 ай бұрын
Hi Raju, decode Ayn Rand and her philosophy of Objectivism in the Indian context. Also her idea of an 'IDEAL MAN' I think it is very much needed in the times we are going through as a society...
@baludojad9289
@baludojad9289 4 ай бұрын
Deep Thought........ Seriously Deep thinking this is...... In last 3 hours my brain has released so much dopamaine watching your videos... You are great!!!
@satishpatil9893
@satishpatil9893 2 жыл бұрын
Well articulated and concise!👌
@timesofganesha6249
@timesofganesha6249 2 жыл бұрын
Khup tarkshudd .very nicely explained
@harshusuniverse4283
@harshusuniverse4283 5 ай бұрын
एस एन गोयंका म्हणतात प्रचिती येणे म्हणजे सारखा विचार केला की मन आपल्याला ते प्रत्यक्षात दाखवते स्वप्नात किंवा डोळे बंद केले असताना. तर त्यात चमत्कार नसून ती मनाने केलेली कल्पना असते.
@namdeojumde4964
@namdeojumde4964 4 ай бұрын
जे सत्य असते ते सदा प्रकशित असते न दिसणारा हा कधीही सत्य असू शकत नाही
@samk90
@samk90 2 жыл бұрын
माझे काही प्रश्न आहेत ... १. खरंच बुद्धांनी ते सोन्याचं पात्र जेव्हा नदीत टाकलं तेव्हा ते नदीच्या प्रवाहाच्या उलट्या दिशेने गेलं ? २. खरंच असिथ मुनींनी भविष्यवाणी केली होती ? आणि भविष्यवाणी वर विश्वास कसा ठेवणार ??
@lalitargade
@lalitargade Жыл бұрын
देव जात धर्म मानवनिर्मीत आहे
@vaijinathkhose5357
@vaijinathkhose5357 7 ай бұрын
खूपच छान ....
@sushantkatekar2591
@sushantkatekar2591 Жыл бұрын
देवीक शक्ती आहे हे प्रत्येक नास्तिकाला माहित असते.. पण त्या साठी कुठे जायची गरज नाही ह्याला नास्तिक बोलू शकतो
@sureshjadhav1835
@sureshjadhav1835 7 ай бұрын
खूप छान सांगितलं आपण
Остановили аттракцион из-за дочки!
00:42
Victoria Portfolio
Рет қаралды 3,5 МЛН
哈莉奎因怎么变骷髅了#小丑 #shorts
00:19
好人小丑
Рет қаралды 51 МЛН
The Joker wanted to stand at the front, but unexpectedly was beaten up by Officer Rabbit
00:12