Рет қаралды 24,193
#BolBhidu #AusaVidhanSabhaElection2024 #AbhimanyuPawar
आधी काँग्रेस, मग शिवसेना, मग पुन्हा काँग्रेस अशी आलटून पालटून सत्ता असलेल्या लातूर जिल्ह्यातील औसा विधानसभेत २०१९ ला पहिल्यांदाच कमळ फुललं. २०१९ ला भाजपचे अभिमन्यू पवार या मतदारसंघातून आमदार झाले. यंदाही महायुतीच्या जागावाटपात ही जागा भाजपच्या अभिमन्यू पवार यांनाच सुटण्याची शक्यता आहे. तर महाविकास आघाडीत या जागेवरुन मतभेद असल्याचं दिसून येतंय.
ठाकरे गटाकडून इथे माजी आमदार दिनकर माने यांच्या नावाची चर्चा आहे. तर काँग्रेसमधून श्रीशैल उटगे, शेषराव पाटील यांची नावं चर्चेत आहेत. मराठा आणि लिंगायत समाजाचं प्राबल्य असलेल्या या मतदारसंघात यावेळी मराठा विरुद्ध लिंगायत अशीच फाईट होणार असल्याचं बोललं जातंय. त्यामुळं यंदा सलग दुस-यांदा भाजपच्या अभिमन्यू पवार यांना यश मिळणार का, औसा विधानसभेतलं सध्याचं वातावरण काय, समजून घेऊयात या व्हिडिओमधून.
चॅनेलला सबस्क्राईब करायला विसरू नका. नोटिफिकेशन चालू ठेवा म्हणजे लेटेस्ट व्हिडीओचे नोटिफिकेशन तुम्हाला मिळत राहतील.
bit.ly/Subscrib...
✒️ आपणही आपले लेख, विषय व इतर माहिती आम्हाला bolbhidu1@gmail.com या मेल आयडीवर पाठवू शकता.
Connect With Us On🔎
➡️ Facebook : / bolbhiducom
➡️ Twitter : / bolbhidu
➡️ Instagram : / bolbhidu.com
➡️Website: bolbhidu.com/