Рет қаралды 119,894
#BolBhidu #RBIRepoRate #IndianEconomy
यावर्षीच्या अर्थसंकल्पात मध्यमवर्गाला दिलासा मिळाला, वार्षिक उत्पन्न १२ लाखांपर्यंत असणाऱ्या लोकांना सरकारने नवीन टॅक्स प्रणालीच्या माध्यमातून टॅक्स भरावा लागणार नाही म्हणून मोठी सवलत दिली. मागच्या काही दिवसांपासून महागाईमुळे लोकांची दमछाक होतेय त्यामुळे आर्थिक धोरण, अर्थसंकल्पातून लोकांना दिलासा देणाऱ्या योजना आणल्या पाहिजेत, काही निर्णय घेतले पाहिजेत जेणेकरून लोकांच्या हातात पैसे राहील, अशी मागणी होत होती. त्यानुसार बजेटमध्ये तर सरकारने त्यांच्या परीने निर्णय घेतले. त्यांनतर आरबीआयकडून देखील रेपो रेट कमी होईल, लोकांचे EMI कमी होतील यासाठी निर्णय घेतले जातील असं बोललं जात होत.
त्यानुसार आता आरबीआयने 7 फेब्रुवारीला काही निर्णय जाहीर केले. त्यात रेपो रेट मध्ये २५ बेसिस पॉइंटने कपात केलीय. त्यामुळे आता रेपो रेट ६.५० वरून ६.२५ इतका झालाय. आरबीआयचा हा निर्णय आता सर्वसामान्य लोकांसाठी फायद्याचा ठरणारे. पण रेपो रेट कमी झाल्यामुळे खरंच सर्वसामान्य लोकांना कसा फायदा होणार? रेपो रेट नेमका असतो काय? या निर्णयामुळे व्याजदर कमी होणार का? EMI कमी होणार आणि त्यामुळे लोकांची कर्ज लवकर फिटणार का? अशा सगळ्या प्रश्नाची उत्तर पाहुयात या व्हिडिओमधून.
चॅनेलला सबस्क्राईब करायला विसरू नका. नोटिफिकेशन चालू ठेवा म्हणजे लेटेस्ट व्हिडीओचे नोटिफिकेशन तुम्हाला मिळत राहतील.
bit.ly/Subscrib...
✒️ आपणही आपले लेख, विषय व इतर माहिती आम्हाला bolbhidu1@gmail.com या मेल आयडीवर पाठवू शकता.
Connect With Us On🔎
➡️ Facebook : / bolbhiducom
➡️ Twitter : / bolbhidu
➡️ Instagram : / bolbhidu.com
➡️Website: bolbhidu.com/