Рет қаралды 99,638
#BolBhidu #BangladeshMPCase #BangladeshMPMurder
बांग्लादेशचा एक खासदार, तेही साधासुधा नाही तर ३ टर्म निवडणूक जिंकलेला, सत्ताधारी पक्षाचा खासदार भारतात येतो. कोलकात्यात मित्राकडे राहतो, त्याचा पाहुणचार घेऊन डॉक्टरकडे जायचंय सांगून घरातून निघतो. पण संध्याकाळी परत येतो हे सांगून निघालेले खासदार साहेब मित्राच्या घरी पोहोचतंच नाहीत, एक रात्र जाते, दुसरी, तिसरी आणि चौथीही रात्र जाते मग सहाव्या दिवशी पोलिस तक्रारी नोंदवल्या जातात, खासदार बेपत्ता असल्याची, एक बांग्लादेशमध्ये आणि दुसरी कोलकात्यात.
पोलिस तपासाची चक्र फिरवतात आणि यातून समोर येतं, एक हत्याकांड. बांग्लादेशच्या खासदाराला प्लॅनिंग करुन भारतात आणलं जातं, त्याची थंड डोक्यानं हत्या होते आणि सापडतात ते त्याच्या शरीराचे तुकडे, शहरातल्या कित्येक भागांमध्ये विखुरलेले. अन्वारुल अझीम यांच्यासोबत नेमकं काय झालं ? त्यांच्या खून प्रकरणात आतापर्यंत काय काय समोर आलंय ? आणि मित्रानं दिलेला धोका, ५ कोटींची सुपारी ते हनीट्रॅप, असं नेमकं घडलं तरी काय ? तेच सांगणारा हा व्हिडीओ.
चॅनेलला सबस्क्राईब करायला विसरू नका. नोटिफिकेशन चालू ठेवा म्हणजे लेटेस्ट व्हिडीओचे नोटिफिकेशन तुम्हाला मिळत राहतील.
bit.ly/SubscribeBolbhidu.com
✒️ आपणही आपले लेख, विषय व इतर माहिती आम्हाला bolbhidu1@gmail.com या मेल आयडीवर पाठवू शकता.
Connect With Us On🔎
➡️ Facebook : / bolbhiducom
➡️ Twitter : / bolbhidu
➡️ Instagram : / bolbhidu.com
➡️Website: bolbhidu.com/