Рет қаралды 37,266
#BolBhidu #DelhiElectionResult #Congress
शनिवारी दिल्ली विधानसभेचा निकाल जाहीर झाला. भाजपनं ७० पैकी ४८ जागा जिंकत दिल्ली काबिज केली. भाजपसाठी हा विजय ऐतिहासिक आहे, कारण पक्षानं तब्बल २७ वर्षांनंतर राजधानीत सत्ता मिळवलीये. मात्र कालपासून भाजपच्या विजयापेक्षा जास्त चर्चा होतीये ती अरविंद केजरीवाल यांच्या पराभवाची. केजरीवालांचा आम आदमी पक्ष दिल्लीत ६२ जागांवरून डायरेक्ट २२ वर आलाय. गेल्या दोन निवडणुकांत ६० प्लस जागा जिंकणारा आप या निवडणुकीत २५ जागांचा आकडाही गाठू शकला नाही. आपच्या या दारुण पराभवाची अनेक कारणं सांगितली जातायेत, परंतु त्यापैकी एक मोठं कारण आहे ते म्हणजे काँग्रेस पक्ष.
अरविंद केजरीवाल, मनीष सिसोदिया, सोमनाथ भारती. आपचे मोठमोठे नेते निवडणूक हरले, याला जबाबदार काँग्रेस असल्याचं बोललं जातंय. २०१५ मध्ये शून्य, २०२० मध्ये शून्य अन् २०२५ मध्येही शून्यच. हा आकडा आहे काँग्रेस पक्षानं गेल्या १० वर्षांत दिल्लीत जिंकलेल्या जागांचा. राजधानीत गेल्या ३ विधानसभा निवडणुकांमध्ये काँग्रेस आपलं खातंही उघडू शकला नाही, पण या निवडणुकीत पक्षानं आम आदमी पार्टीचा मात्र पराभव केलाय. आता तुम्ही म्हणाल, असं कसं ? दिल्लीत एकही सीट न जिंकता काँग्रेसनं आपचा पराभव कसा केला ? दिल्लीतील आपच्या पराभवासाठी काँग्रेस जबाबदार कसं ? भाजप नाही, तर काँग्रेसच केजरीवालांना कसं संपवतंय? पाहुयात या व्हिडिओमधून.
चॅनेलला सबस्क्राईब करायला विसरू नका. नोटिफिकेशन चालू ठेवा म्हणजे लेटेस्ट व्हिडीओचे नोटिफिकेशन तुम्हाला मिळत राहतील.
bit.ly/Subscrib...
✒️ आपणही आपले लेख, विषय व इतर माहिती आम्हाला bolbhidu1@gmail.com या मेल आयडीवर पाठवू शकता.
Connect With Us On🔎
➡️ Facebook : / bolbhiducom
➡️ Twitter : / bolbhidu
➡️ Instagram : / bolbhidu.com
➡️Website: bolbhidu.com/