Рет қаралды 44,564
#BolBhidu #PawanKalyan #Mahayuti
राज्यात या नेत्याचा एकही उमेदवार उभा नसतो. तरी सुद्धा गर्दी तुफान होते. गाड्यांचा ताफा येतो, झेंडे उंचावले जातात आणि सभा असू दे किंवा रॅली, या नेत्याच्या नुसत्या येण्यानं पब्लिक उसळतं, जय जय जनसेना असा जयघोष केला जातो, ज्याला या नेत्याकडून उत्तर येतं जय भवानी, जय शिवाजी. महाराष्ट्रातल्या एका नाही, तर ११ विधानसभा मतदारसंघात दिसलेलं हे चित्र, असे मतदारसंघ जिथे मविआ जोरात चालेल अशी चर्चा होती, पण इथलं वातावरण फिरलं, कारण ठरलं हा नेता, या नेत्याच्या सभा, या नेत्याच्या रॅलीज... या नेत्याचं नाव... पवन कल्याण.
आंध्र प्रदेशमध्ये विधानसभा निवडणुकीत पवन कल्याणच्या जनसेना पक्षानं १०० टक्के स्ट्राईक रेट ठेवला. त्याच्यामुळं चंद्राबाबू नायडू जिंकले, केंद्रात मोदींचं सरकार स्थापन होण्यात किंगमेकर ठरले. पवन कल्याणच्या त्या विजयानं देशाचं राजकारण बदललं, पण याच पवन कल्याणमुळं महाराष्ट्रात गेम कसा फिरला ? महायुतीला अवघड वाटणाऱ्या जागा जिंकण्यात पवन कल्याण फॅक्टर किती महत्त्वाचा होता ? पाहुयात या व्हिडीओमधून.
चॅनेलला सबस्क्राईब करायला विसरू नका. नोटिफिकेशन चालू ठेवा म्हणजे लेटेस्ट व्हिडीओचे नोटिफिकेशन तुम्हाला मिळत राहतील.
bit.ly/Subscrib...
✒️ आपणही आपले लेख, विषय व इतर माहिती आम्हाला bolbhidu1@gmail.com या मेल आयडीवर पाठवू शकता.
Connect With Us On🔎
➡️ Facebook : / bolbhiducom
➡️ Twitter : / bolbhidu
➡️ Instagram : / bolbhidu.com
➡️Website: bolbhidu.com/