चारधाम यात्रा-भाग ३ - ॥ श्री यमुनोत्री दर्शन ॥- सौ. मैत्रेयी भट

  Рет қаралды 299

काव्यरसरंजन

काव्यरसरंजन

Күн бұрын

चारधाम यात्रा-भाग ३
॥ श्री यमुनोत्री दर्शन ॥
जी कल्पनाही नव्हती माझ्या मनी कधीही ।
ते भाग्य पदरी पडले विश्वास बसत नाही ॥
दुर्गम किती ही यात्रा हे सर्व ज्ञात होते ।
सारून दूर शंका मन ओढ घेत होते ॥
तुम्ही ठरविणारे आहात कोण येथे ।
ज्याच्या हातात सूत्र दिसतो न मात्र कोठे ॥
गीता ठसे मनात हृषीकेश साक्षी होता ।
शरणागतास हाती तो धरूनी नेत होता ॥
कितीदा धरून गेले अदृश्य हात त्याचा ।
सांगू कशी तुम्हाला मम तोकडीच वाचा ॥
सारून भय मनीचे निःशंक हो म्हणाला ।
नामस्मरण वाचे देईल शक्ती तुजला ॥
पहाड गगनचुंबी वेगात जाई सरिता ।
साक्षात नजरबंदी रविराज करीत होता ॥
क्षणी सौम्य रूप त्याचे बदले कसे अफाट ।
रूद्रास पाहूनी त्या मनी जाहली पहाट ॥
ती सूर्यपुत्री यमुना भगिनी असे यमाची ।
पाहून उगमस्थान भीती सरे तमाची ॥
आता परिक्रमेची सुरूवात आज झाली ।
तम दूर दूर सरला उजळूनिया मशाली ॥
सौ. मैत्रेयी भट
बंगलोर.
काव्यरसरंजन
*********************

Пікірлер: 13
@MadhulikaGodbole
@MadhulikaGodbole 2 ай бұрын
अतिशय आशयघन आणि हृदयस्पर्शी कविता. सूर्यपुत्रीच्या दर्शनाचा आनंद, आणि एकूणच चारधाम यात्रेचं साफल्य चेहेऱ्यावरून ओसंडत आहे. ऐकून आम्हालाही धन्यता वाटते आहे.
@ujwalakarve3964
@ujwalakarve3964 2 ай бұрын
किती सुंदर बोलतेस तू ... निसर्ग दृश्य फोटोसह वर्णन खूप छान. शेवटच्या काव्यपंक्ती ऐकताना मन भरून आले.
@sulbhanimbalkar5961
@sulbhanimbalkar5961 2 ай бұрын
सखे, तुझे हे चारीधाम चे सर्व भाग म्हणजे प्रवासाचे एक गाईड आहे. अतिशय अभ्यासपूर्ण लेखन आणि त्याला निवेदनाची जोड. फारच सुंदर❤
@SavitaWagh-i5l
@SavitaWagh-i5l 2 ай бұрын
सुंदर प्रवासवर्णन, प्रथम जाणाऱ्यांसाठी पूर्वतयारीच्या tips मार्गदर्शक. यमनोत्रीचा चढा रस्ता,लहरी निसर्ग यांना सामोरे जात प्रत्यक्ष दर्शनाचा लाभ मनाला किती सुखावणारा होता हे कवितेतून सुरेख व्यक्त झाले आहे
@vaijayantipatki6312
@vaijayantipatki6312 2 ай бұрын
आजच्या भागातील आपले काव्य अतिशय सुरेख ! खरोखरीच कोणीतरी पाठिशी असेल तरच ही कठीण यात्रा पूर्ण होते ...
@smitaapte6623
@smitaapte6623 2 ай бұрын
अतिशय सुंदर वर्णन . ऐकताना पुन्हा चार धाम यात्रा करत आहोत असं वाटत आहे. कविता म्हणजे भक्तीचे, मनातील भावनेचे परिपूर्ण वर्णन. फोटो पण अगदी छान आणि समर्पक.
@NeetaDD
@NeetaDD 2 ай бұрын
मैत्रेयी ताई खूप छान. अगदी छान घरात बसून तुम्ही आम्हाला यमनोत्री चे दर्शन घडवले. अगदी तुमच्या बरोबर आम्ही पण छान प्रवास केला. खूप खूप धन्यवाद.😊 कविता पण खूप छान. आता पुढचा भाग ऐकायला उत्सुक आहोत.
@mandakiniapte3120
@mandakiniapte3120 2 ай бұрын
ताई किती सुंदर वर्णन केले आहे, अगदी परत एकदा सुखद अनुभव लाभला, प्रत्येकाच्या मनातील भाव सुरेख शब्दबद्ध केले म्हणूनच काव्य खूप आवडले.फोटोंची जोड शानदार. . . अर्थात पुढील भागाच्या प्रतिक्षेत आहोत 😊
@shubhangikulkarni4028
@shubhangikulkarni4028 2 ай бұрын
जणूकाही तुमच्याबरोबर आम्ही पण यात्रा करत आहोत, असं वाटलं.सुंदर प्रवास वर्णन ,ओघवती भाषा ,समर्पक फोटो आणि video काव्यरचना आतिशय प्रभावी!
@rohinilimaye5712
@rohinilimaye5712 2 ай бұрын
मी ही यात्रा 2000 मध्ये केली तेंव्हा घोड्यावरून गेलो व येताना घोडा असूनही चालत आलो ..तेंव्हा thrilling experience आणि adventurous असं वाटतं होत ..माझा खचार khachachar म्हणतात त्याला..घोडा व गाढवाचे offspring..त्याचे पाय चढण्यासाठी योग्य असतात..घोड्या पेक्षाही ...अगदी काटकोनात उभ राहिलं म्हणजे एक क्षण स्वर्गच दिसला खरा खरा..पण आले बाई परत जानकी चेट्टीला..खूप छान अनुभव आणि त्या परमात्म्याचे आभार त्याने हे सर्व याची देही याची डोळा दाखवले... nostalgic...😢
@काव्यरसरंजन
@काव्यरसरंजन 2 ай бұрын
हो, बरोबर आहे. खच्चर असंच म्हणतात तिथे…
@kalpanaphase7090
@kalpanaphase7090 2 ай бұрын
प्रवास वर्णन खूपच छान, तुझ्या बरोबर प्रवास करतेय असं वाटत होतं, इतक्या उच्च दर्जाचं काही मिळवायचं तर तेवढी मेहेनत, प्रयास सगळ आलच, पण दर्शना नंतर जो प्रत्यय आला तो त्यामुळे जास्त छान वाटतो, काव्य पण उत्तमच
@vaijayantipatki6312
@vaijayantipatki6312 2 ай бұрын
ओहो ! अप्रतिम सौदंर्य आणि यमनोत्रीचा प्रवास तुम्ही डोळ्यासमोर उभा केला .... सर्वात कठीण यमनोत्री धाम आहे ...इतक्या गर्दीत तुम्हांला दर्शन खूप छान झाले म्हणजे भाग्यच म्हणावे लागेल... आता पुढील गंगोत्री धाम ऐकण्याची उत्सुकता वाढली आहे...तुम्हांला नमस्कार !
“पैस” चा खांब - सौ. मैत्रेयी भट
10:17
काव्यरसरंजन
Рет қаралды 234
啊?就这么水灵灵的穿上了?
00:18
一航1
Рет қаралды 75 МЛН
Seja Gentil com os Pequenos Animais 😿
00:20
Los Wagners
Рет қаралды 42 МЛН
Хасанның өзі эфирге шықты! “Қылмыстық топқа қатысым жоқ” дейді. Талғарда не болды? Халық сене ме?
09:25
Демократиялы Қазақстан / Демократический Казахстан
Рет қаралды 345 М.
Aaj Hamare Yahan gram pradhan Aaye 2024😀😀
10:39
Anuska pahadi vlog
Рет қаралды 100
आपली शाळा - सौ.मैत्रेयी भट.
15:42
काव्यरसरंजन
Рет қаралды 486
啊?就这么水灵灵的穿上了?
00:18
一航1
Рет қаралды 75 МЛН