Рет қаралды 155,018
#BBCMarathi #pikvimayadimaharashtra #पीकविमा2023
प्रधानमंत्री पीक विमा योजना पुढच्या 3 वर्षांसाठी राज्यात राबवण्याचा राज्य सरकारचा निर्णय घेतला आहे. पण, या योजनेत काही बदल करण्यात आले आहेत. राज्य सरकारनं 2023 पासून ‘सर्वसमावेशक पीक विमा योजना’ राबवण्याचा निर्णय घेतला आहे. त्यानुसार, शेतकऱ्यांना केवळ 1 रुपयात पीक विम्यासाठी अर्ज करता येणार आहे.
याआधी या योजनेअंतर्गत शेतकऱ्यांनी भरावयाचा विमा हप्ता खरिप हंगामासाठी विमा संरक्षित रकमेच्या 2 %, रबीसाठी 1.5%. तर दोन्ही हंगामातील नगदी पिकांसाठी विमा संरक्षित रकमेच्या 5 % होता.
आता नवीन बदलांनुसार, या योजनेसाठी कोण पात्र असणार आहे, कोणत्या पिकांना विम्याचं संरक्षण मिळेल आणि तुम्ही स्वत: पीक विम्यासाठी ऑनलाईन अर्ज कसा करू शकता, याची माहिती आपण या व्हीडिओत पाहणार आहे.
ही आहे बीबीसी मराठीची गावाकडची गोष्ट क्रमांक ९७.
लेखन, निवदेन - श्रीकांत बंगाळे
एडिटिंग - राहुल रणसुभे
___________
ऐका 'गोष्ट दुनियेची' - जागतिक घडामोडींचं विश्लेषण करणारं मराठी पॉडकास्ट इथे -
www.bbc.com/ma...
-------------------
अधिक माहितीसाठी आमच्या वेबसाईट आणि सोशल हॅंडल्सला नक्की भेट द्या :
www.bbc.com/ma...
/ bbcnewsmarathi
/ bbcnewsmarathi