Daula Vadgoan Gadhi Ani Talghar दौलावडगावची अपरिचित गढी व तळघर GauravshaliEtihas

  Рет қаралды 2,278

Gauravshali Etihas

Gauravshali Etihas

Күн бұрын

Daula Vadgoan Gadhi दौलावडगावची अपरिचित गढी @GauravshaliEtihas
अहमदनगर म्हटलं की आपल्याला आपसूकच निजामशाही आठवते.
साधारणपणे चौदाव्या शतकाच्या शेवटी निजामशाही अहमदनगर शहरात आली आणि शहराचा कायापालट झाला. अनेक विविध प्रकारच्या वस्तूंची निर्मिती निजामशाहीच्या काळात झाली, तर मित्रांनो आज आपण अशाच एका निजामशाही काळातील एका अज्ञात सरदाराच्या गढीला भेट दयायला आलेलो आहोत. अहमदनगर शहरापासून साधारण वीस-पंचवीस किलोमीटर अंतरावर ते असलेलं दौलावडगाव या गावात ही निजामशाही काळातील गढी असून या गढी विषयी ठोस अशी ऐतिहासिक माहिती उपलब्ध नाही.
भातोडी गावातील नरसिंह मंदिर पाहून आम्ही ही वास्तू पाहण्याचे ठरवले आणि साधारणतः दहा ते पंधरा मिनिटांतच आम्ही या गावात येऊन पोहोचलो आणि गावकऱ्यांना माहिती विचारून आम्ही या गढीच्या दारात येऊन पोहोचलो.
सध्या या घडी मध्ये एका मुस्लीम समाजाच्या कुटुंबाचे वास्तव्य आहे आणि विशेष म्हणजे या कुटुंबियांनाही या गढी विषयी ऐतिहासिक माहिती नाही. या कुटुंबियांच्या परवानगीने आम्ही गढी मध्ये प्रवेश केला दरवाजातून आत प्रवेश केल्यानंतर घडी दोन भागात विभागलेली पाहायला मिळाली बहुदा उजवीकडील भागांमध्ये कचेरीचे कामकाज चालत असावे आणि डावीकडील भागामध्ये राहण्याची व्यवस्था असावी.
डावीकडील भागात जाण्यासाठी एका छोट्या वाटेने जिना चढून वरती जायला लागते आणि मग आपण आणखी एका दरवाजा समोर येतो काळाच्या ओघात या दरवाजाची कवाडे मात्र आज उपलब्ध नाही राहिली मात्र त्याला असणारी अडकण आजही या ठिकाणी पाहायला मिळते. पूर्वी दरवाजा लावल्यानंतर त्यामागून अडकण लावली जायची जेणेकरून दरवाजाच्या जोराच्या धक्‍क्‍याने उघडला जाणार नाही अशी व्यवस्था त्‍यामुळे होत होती.
समोरच दोन्ही बाजूला दोन देवरे असून दोन्ही बाजूला वरती जाण्यासाठी चिंचोळ्या आकाराचे जिने बनवलेले आहेत आणि त्यापुढे विस्तीर्ण असा चौक पाहायला मिळतो, आत गेल्यानंतर आतील विटांचे बांधकाम पाहून अतिशय भारावून जाते
मोठ्या प्रमाणात पडझड झालेली असून सुद्धा त्या काळातील बांधकाम शैलीची शिल्लक राहिलेल्या बांधकामावरून प्रचिती येते, गढी मध्ये एक मोठं अस तळघर आहे जे एका कोपऱ्यात असलेल्या खोलीखाली असून त्याचा दरवाजा सहजपणे दिसणार नाही असं बांधकाम केलेलं पाहायला मिळतं. या तळघरात 20 डावीकडे आणि 20 उजवीकडे अशी एकूण 40 खोल्यांची बांधणी केलेली आहे आणि हे तळघर इंग्रजी L आकारात बांधलेलं आहे आतील वर्दळीच्या जागेची उंची 5फूट तर रुंदी 3 फूट असून खोलीची रुंदी 8X10 फूट आहे.
तलघर पाहायला एकटं जाऊ नये कारण आतमध्ये बूजलेल्या वाटा, काळोखा अंधार व वतवाघूळांचे वास्तव्य आहे त्यामुळे श्वसनास त्रास होतो.
तळघर पाहून आम्ही गढीच्या वरच्या भागात पोहचलो, वरून पाच पैकीं चार बुरुजात वसलेला रहिवासी भाग दृष्टीत भरतो. या गढीच्या बाह्यभिंती 10 फूट रुंदीच्या आहेत. ठिकठिकाणी खापरी नलकांडे झग्यांमध्ये लावलेल्या प्रथमच पाहायला मिळाल्या.
चारही बुरुज पाहून मध्यभागी असलेल्या महल वजा खोलीत पोहचलो तेथील रचना पाहून अस वाटलं की ही जागा आतील आणि बाहेरील दोन्ही बाजूंवर लक्ष ठेवण्यासाठी बनवलेली जागा सुरक्षिततेच्या दृष्टीने खुप महत्वाची होती.
गढीचा उर्वरित अर्धा भाग म्हणजे पाचवा बुरुज पाहता आला नाही कारण त्या ठिकाणी एका कुटुंबाचं वास्तव्य आहे त्यामुळे तिकडे जायला परवानगी नाही.
जायचं कसं: अहमदनगर-जामखेड मार्गावरील टाकली काझी या गावातून डाव्या बाजूला दौलावडगाव रास्ता वळतो तो थेट या गावात घेऊन येतो.
#दौलवडगाव
#DaulaVadgoan
#गढी
गौरवशाली इतिहास.

Пікірлер: 6
@kdvlogsofficial2.0
@kdvlogsofficial2.0 7 ай бұрын
तुमचा नंबर मिळेल का ?..
@GauravshaliEtihas
@GauravshaliEtihas 7 ай бұрын
Follow us on Instagram
@lembhefamily7329
@lembhefamily7329 9 ай бұрын
त्या काळात विटा होत्या का
@GauravshaliEtihas
@GauravshaliEtihas 9 ай бұрын
Hoy
@manasijoshi6505
@manasijoshi6505 9 ай бұрын
अरेरे,एवढ्या सुंदर वास्तूची ही अवस्था बघून वाईट वाटले.मालक कोण ते कळले नाही का?
@GauravshaliEtihas
@GauravshaliEtihas 9 ай бұрын
Nahi pan ji avastha ahe ti far dayaniya ahe
How A Poor Boy Built Oberoi Hotels
17:18
Shivanshu Agrawal
Рет қаралды 2,7 МЛН
Worst flight ever
00:55
Adam W
Рет қаралды 30 МЛН
когда не обедаешь в школе // EVA mash
00:57
EVA mash
Рет қаралды 3,7 МЛН
ОТОМСТИЛ МАМЕ ЗА ЧИПСЫ🤯#shorts
00:44
INNA SERG
Рет қаралды 4,8 МЛН
घोडा पाय धरून उचलणाऱ्या एका वीराचा दुर्दैवी अंत
18:47
मराठेशाही-प्रवीण भोसले
Рет қаралды 2,6 МЛН