No video

सुपारीच्या फुलांनी पालटले जीवन | पिंगाऱ्याचे फुल | वसई | Lives changed by Pingara flowers | Vasai

  Рет қаралды 275,259

Sunil D'Mello

Sunil D'Mello

Ай бұрын

सुपारीच्या फुलांनी पालटले जीवन | पिंगाऱ्याचे फुल | वसई | Lives changed by Pingara flowers | Vasai
दक्षिण भारतीय पूजेसाठी सुपारीची फुले मोठ्या वापरतात. किरकोळ बाजारात तब्बल ₹१०० ला एक फुल या दराने ही फुले विकली जातात. वसईत सुपारीची झाडे विपुल प्रमाणात आहेत आणि ही संधी हेरून अनिल दादांनी आपला सुपारीची फुले झाडावरून उतरवून मुंबईला पाठवण्याचा व्यवसाय सुरू केला. आज त्यांच्या व्यवसायाच्या माध्यमातून अनेकांना रोजगार तर मिळाला आहेच पण शेतकऱ्यांनाही त्यांचा माल विकला जाण्याची जणू हमी मिळालेली आहे.
या व्हिडिओच्या माध्यमातून आपण या व्यवसायाविषयी जाणून घेताना अनिल दादांचा संघर्षमय जीवनप्रवास देखील उलगडायचा प्रयत्न करणार आहोत.
विशेष आभार:
अनिल दादा, धोबितलाव - आगाशी
९८२२४ ४०५३९
चार्ल्स दादा डिमेलो, आगाशी
छायांकन व संकलन: अनिशा डि'मेलो
अजूनही आमच्या चॅनलला सबस्क्राईब केलं नसेल तर आत्ताच सबस्क्राईब करा व घंटीचे बटणदेखील दाबा.
धन्यवाद!
नविन व्हिडीओजच्या अपडेट्ससाठी आमचं फेसबुक व इन्स्टाग्राम पेज लाईक/फॉलो करा.
फेसबुक
/ sunildmellovideos
इन्स्टाग्राम
/ sunil_d_mello
पारंपरिक व्यवसाय
• Traditional trades पार...
वसईच्या शेतीबाबत व्हिडिओचा संच
• Vasai Farming वसईची शेती
व्हॉट्सॲप चॅनल लिंक
whatsapp.com/channel/0029VaBg...
#betelnutfarming #areca #pingara #pingaraflower #pingaragarland #hombale #hombalegarland #arecaflower #betelnutflower #arecanut #vasaifarming #betelnut #vasai #supari #suparifarming #vasaisupari #farming #sunildmello #sunildmellovasai #vasaifarmingvideos #sunildmellovideos

Пікірлер: 703
@sunildmello
@sunildmello Ай бұрын
सुपारीच्या फुलांनी पालटले जीवन | पिंगाऱ्याचे फुल | वसई | Lives changed by Pingara flowers | Vasai दक्षिण भारतीय पूजेसाठी सुपारीची फुले मोठ्या वापरतात. किरकोळ बाजारात तब्बल ₹१०० ला एक फुल या दराने ही फुले विकली जातात. वसईत सुपारीची झाडे विपुल प्रमाणात आहेत आणि ही संधी हेरून अनिल दादांनी आपला सुपारीची फुले झाडावरून उतरवून मुंबईला पाठवण्याचा व्यवसाय सुरू केला. आज त्यांच्या व्यवसायाच्या माध्यमातून अनेकांना रोजगार तर मिळाला आहेच पण शेतकऱ्यांनाही त्यांचा माल विकला जाण्याची जणू हमी मिळालेली आहे. या व्हिडिओच्या माध्यमातून आपण या व्यवसायाविषयी जाणून घेताना अनिल दादांचा संघर्षमय जीवनप्रवास देखील उलगडायचा प्रयत्न करणार आहोत. विशेष आभार: अनिल दादा, धोबितलाव - आगाशी ९८२२४ ४०५३९ चार्ल्स दादा डिमेलो, आगाशी छायांकन व संकलन: अनिशा डि'मेलो अजूनही आमच्या चॅनलला सबस्क्राईब केलं नसेल तर आत्ताच सबस्क्राईब करा व घंटीचे बटणदेखील दाबा. धन्यवाद! नविन व्हिडीओजच्या अपडेट्ससाठी आमचं फेसबुक व इन्स्टाग्राम पेज लाईक/फॉलो करा. फेसबुक m.facebook.com/SunilDmellovideos इन्स्टाग्राम instagram.com/sunil_d_mello पारंपरिक व्यवसाय kzbin.info/aero/PLUhzZJjqdjmN2X3tQ8G8tKEUjaoEQXCaw&feature=shared वसईच्या शेतीबाबत व्हिडिओचा संच kzbin.info/aero/PLUhzZJjqdjmOZ5wpHFFBUGYab0eRBzfES व्हॉट्सॲप चॅनल लिंक whatsapp.com/channel/0029VaBgbkzKbYMWbRwhpL3p #betelnutfarming #areca #pingara #pingaraflower #pingaragarland #hombale #hombalegarland #arecaflower #betelnutflower #arecanut #vasaifarming #betelnut #vasai #supari #suparifarming #vasaisupari #farming #sunildmello #sunildmellovasai #vasaifarmingvideos #sunildmellovideos
@manishakalingade5717
@manishakalingade5717 Ай бұрын
निसर्ग जपा, तो देताना तुम्हाला भरभरून देईन. हे सांगणारा एकमेव आदिवासी. आम्हा आदिवासीं ना हे कोणत्या शाळेत नाही शिकविले ते आमच्या रक्तात च आहे. देण्यास सागितलं तर वेळेस जीव देणारा माझा आदिवासी बांधव,,,, खूप खूप छान अनिल दादा, आणि सुनील दादाचे तर प्रत्येक video अप्रतिम छान काम,,😊
@sunildmello
@sunildmello Ай бұрын
खूप खूप धन्यवाद, मनीषा जी
@kanchankotwal6634
@kanchankotwal6634 Ай бұрын
सुपारीचे फुल देवाला अर्पित करण्यासाठी ते मेहनतीने प्राप्त करून देणाऱ्या कष्टकरी जीवांना आणि सुपारीच्या फुलांचे आणि आणि अनिल दादा न मधील असामान्यत्वाचे आणि माणुसकीचे दर्शन घडविणाऱ्या सुनील दादान सारख्या साच्य्या कलाकाराचे खूप आभार 🙏🙏
@sunildmello
@sunildmello Ай бұрын
या सुंदर प्रतिक्रियेसाठी खूप खूप धन्यवाद, कांचन जी
@manoharbhovad
@manoharbhovad Ай бұрын
छान व्हिडीओ...👍🏻पहिल्यांदाच सुपारीच्या फुलांनबद्दल छान माहिती मिळाली.. आणि एक जीवनाची संघर्षमय कहाणी सुद्धा ऐकली....धन्यवाद सुनिलजी. 💐
@sunildmello
@sunildmello Ай бұрын
खूप खूप धन्यवाद, मनोहर जी
@namitaupadhye4182
@namitaupadhye4182 Ай бұрын
पहिल्यांदा सुपारीच्या फुला बद्दल माहिती मिळाली.. खूप सुंदर .. दादांचे विचार खूप छान आहेत.. मस्त व्हिडिओ
@sunildmello
@sunildmello Ай бұрын
खूप खूप धन्यवाद, नमिता जी
@sujatasail1751
@sujatasail1751 Ай бұрын
निर्मळ मनाचा माणूस...खूप सुंदर विचार.. अशीच प्रगती होवू या दादाची🙏
@sunildmello
@sunildmello Ай бұрын
अगदी बरोबर बोललात, सुजाता जी. धन्यवाद
@vidyapathak300
@vidyapathak300 Ай бұрын
मी माझ्या ६५ वर्षांच्या आयुष्यात प्रथमच सुपारीच्या झाडां बद्दल ऐकले, पाहिले. निसर्ग आपल्याला काय काय देतं पाहून थक्क झाले. संघर्षमय जीवनाची कहाणी ही तेवढीच थक्क करून सोडते. 🙏👌👍 धन्यवाद
@sunildmello
@sunildmello Ай бұрын
या सुंदर प्रतिक्रियेसाठी खूप खूप धन्यवाद, विद्या जी
@marineerconquer34ofdworld74
@marineerconquer34ofdworld74 Ай бұрын
खूप च सुंदर माहिती अनिल दादा ची motivational जर्नी मनाला भावली भावूक झालो ❤❤ निसर्ग हाच देव निसर्गाला जपा खूप छान संदेश
@sunildmello
@sunildmello Ай бұрын
अगदी बरोबर बोललात. खूप खूप धन्यवाद
@sarojcookingworld4762
@sarojcookingworld4762 Ай бұрын
सुनील जी हे साऊथला पुजेसाठी शुभकार्यात मोठ्या प्रमाणात वापरतात खुप शुभ मानल जाते
@sunildmello
@sunildmello Ай бұрын
या महत्वपूर्ण माहितीसाठी खूप खूप धन्यवाद, सरोज जी
@sandipchavan4678
@sandipchavan4678 Ай бұрын
सुनील, व्हिडीओ प्रदर्शित झाल्यावर मी आज चार दिवसांनी पाहिला पण एकदम हटके 👌 देर आये दुरुस्त आये म्हणतात ना अगदी तस्संच 😄 दक्षिणात्या लोक देवपूजेत याचा विशेष उपयोग करतात. अनिल दादांच्या जीवन संघर्षाला सलाम आणि विनंती वजा आज्ञा त्या गरीब कष्टकरी कामगारांचा विमा काढावा. वेळ काळ सांगून येत नाही म्हणून. खरंच आजचा ब्लॉग निसर्गातल्या किमयेचा होता. निळ्याशार आभाळाखाली हिरव्यागार वनश्रीने नटलेला 👌 ♥️ 👍
@sunildmello
@sunildmello Ай бұрын
या सुंदर प्रतिक्रियेसाठी खूप खूप धन्यवाद, संदीप जी
@digambarpadwal5028
@digambarpadwal5028 Ай бұрын
दादा फारच प्रमाणिक, निसर्गावर प्रेम करणारे आहेत .
@sunildmello
@sunildmello Ай бұрын
अगदी बरोबर बोललात, दिगंबर जी. धन्यवाद
@savitajade9824
@savitajade9824 Ай бұрын
सुनिल जी म्हणजे कांहींतरी खास अद्भुत आश्चर्यजनक आणि पूर्णतः नावीन्याचा शोध घेणारं सर्जनशील असं व्यक्तिमत्त्व. आणि म्हणूनच ते आपल्या समोर घेऊन येऊ शकतात "सुपारीची फुलं" ती झाडावरून काढू शकणारी ती"खास माणसं". सुनिल जी तुम्हा सर्वांना खूप खूप शुभेच्छा आणि मन:पूर्वक धन्यवाद.🎉
@sunildmello
@sunildmello Ай бұрын
या सुंदर व प्रोत्साहनपर प्रतिक्रियेसाठी खूप खूप धन्यवाद, सविता जी
@vaishaliupadhye2767
@vaishaliupadhye2767 7 күн бұрын
मराठी अगदी शुद्ध बोलता खूपच छान
@sunildmello
@sunildmello 5 күн бұрын
धन्यवाद, वैशाली जी
@abhayjoshi507
@abhayjoshi507 Ай бұрын
अनिल भाऊ ना त्यांच्या आयुष्यातील पुढील प्रवासासाठी लाख लाख शुभेच्छा व सुनील भाऊ तुम्हाला पण असेच माहितीपूर्ण व मनोरंजक video बनविण्यासाठी शुभेच्छा.
@sunildmello
@sunildmello Ай бұрын
खूप खूप धन्यवाद, अभय जी
@user-fi3jr8qg9h
@user-fi3jr8qg9h Ай бұрын
अनिलला साष्टांग दंडवत आणि सुनील तुला धन्यवाद... अशी माणसे आमच्यापर्यंत पोचवतोस म्हणून.. अशी माणसे आयुष्यात लढण्याची जिद्द देतात..
@sunildmello
@sunildmello Ай бұрын
या सुंदर प्रतिक्रियेसाठी खूप खूप धन्यवाद
@tejalferreira5815
@tejalferreira5815 Ай бұрын
सुनिल जी खूप छान माहितीपूर्ण व्हिडिओ..."पिंगारा"विषयी नवीन माहिती मिळाली *अनिलदादा नी प्रेरणादायी विचार मांडले* ✨अनिलदादाच्या वाटचालीसाठी खूप हार्दिक शुभेच्छा ✨ धन्यवाद सुनिल जी
@sunildmello
@sunildmello Ай бұрын
खूप खूप धन्यवाद, तेजल जी
@Nitin-xh1km
@Nitin-xh1km Ай бұрын
Anil sir tumchya sangarshala lakh lakh Pranam.
@sunildmello
@sunildmello Ай бұрын
खूप खूप धन्यवाद, नितीन जी
@shraddhashetye2387
@shraddhashetye2387 Ай бұрын
एका झाडावरून दुसऱ्या झाडावर जातोय!! काळजाचा ठोका चुकतो बघताना!! 😮सलाम आहे तुमच्या कष्टाला. 🙏🙏🙏🙏🙏🙏🙏🙏🙏🙏🙏🙏🙏🙏🙏🙏🙏🙏🙏
@sunildmello
@sunildmello Ай бұрын
अगदी बरोबर बोललात, श्रद्धा जी. खूप खूप धन्यवाद
@shubhangiyelve3589
@shubhangiyelve3589 Ай бұрын
M😮
@vaishaliupadhye2767
@vaishaliupadhye2767 7 күн бұрын
वसईतील शेती बघायला खूप छान वाटतं हा व्हिडिओ खूपच छान आहे
@sunildmello
@sunildmello 5 күн бұрын
खूप खूप धन्यवाद, वैशाली जी
@tanayashedge2482
@tanayashedge2482 Ай бұрын
खुपच छान दादा, तुझ्या सारखी माणसं या जगात खूप कमी आहेत .
@sunildmello
@sunildmello Ай бұрын
अगदी बरोबर बोललात, तनया जी. धन्यवाद
@supriyachavan4037
@supriyachavan4037 Ай бұрын
खूप छान माहिती देता नेहमीच 👍🏻👍🏻👍🏻👍🏻🙏🏻🙏🏻👏🏻👏🏻👏🏻👏🏻👏🏻👏🏻 किती संघर्ष केला आहे त्यांनी बापरे 😢😢😢😢😢😢😢खूप चांगले आहेत मनाने...// उलट जास्त शिकलेले लोक अडाणी असतात संस्कार नसतात /
@ashabhogan1912
@ashabhogan1912 Ай бұрын
खरय
@sunildmello
@sunildmello Ай бұрын
खूप खूप धन्यवाद, सुप्रिया जी आणि आशा जी
@ashabowlekar8853
@ashabowlekar8853 Ай бұрын
छानच व्हिडिओ आहे. किती कष्ट आणि संघर्षमय जीवन ...!!!,आणि ही धरती माता किती देते आपल्याला ...!!!
@sunildmello
@sunildmello Ай бұрын
अगदी बरोबर बोललात, आशा जी. खूप खूप धन्यवाद
@bhagyashreepawar6009
@bhagyashreepawar6009 Ай бұрын
सुपारी खाण्यासाठी वापरतात हि वाईट सवई पण फुलाचा ऊपयोग करतात हे फार छान चांगला उपयोग ..
@latamehta9241
@latamehta9241 Ай бұрын
सुपारी मध्ये औषधी गुण आहेत. ती जास्त प्रमाणात खाल्ली तर हानिकारक
@nileshghadage4830
@nileshghadage4830 Ай бұрын
सुपारी.खाण्याची.सवय.वाईट.नाहि.जेवल्यावर.एक.तुकडा.खाऊ.शकता.पण.सुपारित.तंबाखु.सुगंधि.द्रव्ये.मिसळुन.मोठ्या.प्रमाणात.खाणे.हानिकारक.आहे
@sunildmello
@sunildmello Ай бұрын
खूप खूप धन्यवाद, भाग्यश्री जी, लता जी व निलेश जी
@snehaphadte8438
@snehaphadte8438 Ай бұрын
सलाम तुमच्या संघर्षाला आणि कर्तृत्वाला 🙏बघितला आहे कांतारा सिनेमा !मेहनत पण खूप आहे मेहनती शिवाय काही नाही!💪
@sunildmello
@sunildmello Ай бұрын
अगदी बरोबर बोललात, स्नेहा जी. धन्यवाद
@aparnajadhav530
@aparnajadhav530 Ай бұрын
हे मला माहीत होत की,ही सुपारीची फुल आहेत.पण त्या मागची कहानी त्या भाऊंकडे ऐकली तेव्हा अंगावर काटा उभा राहिला.त्या बद्दल धडपड, संघर्ष, मेहनत या सगळ्यातून आपण शिकल पाहिजे.तेच तर आपण काय नाही.सुनिल जी तुम्ही हिरे शोधून काढता.त्यासाठीच मी तुमची फॅन आहे.धन्यवाद ❤❤🙏🙏
@sunildmello
@sunildmello Ай бұрын
या सुंदर प्रतिक्रियेसाठी व अविरत पाठिंब्यासाठी खूप खूप धन्यवाद , अपर्णा जी
@virendravaidya7714
@virendravaidya7714 Ай бұрын
सुनील एक वेगळाच विषय आणि सुपारी फुलांची महती व माहिती आज पहील्यानेच मला कळली केवळ तुझ्या मुळेच त्या बद्दल तुझे आभार, आता तुझी मुलगी अनिषा सुद्धा तयार होते आहे, तुला मदत करते आहे ,पाहून समाधान वाटलं.
@sangramgosavi3401
@sangramgosavi3401 Ай бұрын
दादा, अनिषा या त्यांच्या मिसेस आहेत😊
@sunildmello
@sunildmello Ай бұрын
खूप खूप धन्यवाद, वीरेंद्र जी.
@sunildmello
@sunildmello Ай бұрын
धन्यवाद, संग्राम जी
@neetaavhad4796
@neetaavhad4796 Ай бұрын
खूप छान व्हिडिओ. अनिल दादा आणि सुनिल दादांना 🙏🙏💐
@sunildmello
@sunildmello Ай бұрын
खूप खूप धन्यवाद, निता जी
@sujataloke5186
@sujataloke5186 Ай бұрын
सुनील जी प्रत्येकवेळी हटके शेती विषयक माहिती आणि शेतकऱ्याची यशोगाथा तुम्ही सांगत आलात. आधी अभिनंदन तुमचे 🙏🏻
@sunildmello
@sunildmello Ай бұрын
खूप खूप धन्यवाद, सुजाता जी
@deepaksarode3764
@deepaksarode3764 Ай бұрын
कोंकणात व कर्नाटक मध्ये सुपारी च्या मोठ मोठ्या बागा आहेत तिथं सुपारी काढणारे कामगारांचं कौशल्य पाहिले आहे..पण सुपारीच्या फुलाची एवढी महंती सुनिल जी तुमच्या मुळे आम्हाला समजली मनःपूर्वक धन्यवाद तुम्हचे... सुपारी च्या झाडाच्या सुपारी पानां फरल पासून द्रोण , पत्रावळी, प्लेट बनवतात कोकणात...दादाची संघर्ष कथा ऐकून निशब्द झालो. फारच प्रेरणादायी व्यक्तव्य केले 😊😊😊😊😊❤
@sunildmello
@sunildmello Ай бұрын
या सुंदर प्रतिक्रियेसाठी खूप खूप धन्यवाद, दीपक जी
@vg7500
@vg7500 Ай бұрын
मस्त छान झाला विडिओ , चांगली माहिती मिळाली आम्हाला आणि दादा तर भारीच व्यवहारज्ञान चांगलेच आहे तयाचे😊
@sunildmello
@sunildmello Ай бұрын
खूप खूप धन्यवाद
@arunapatil7255
@arunapatil7255 Ай бұрын
अप्रतिम व्हिडिओ
@sunildmello
@sunildmello Ай бұрын
धन्यवाद, अरुणा जी
@omnamasshivaye3282
@omnamasshivaye3282 Ай бұрын
Nice Sharing 👍 Extremely new and nice information given by Anil dada .👌 Very positive spread by Anil dada ❤ Thank for Sharing ❤
@sunildmello
@sunildmello Ай бұрын
Thanks a lot
@ratnaprabhachavan2601
@ratnaprabhachavan2601 Ай бұрын
मी लहानपणी ही फुल डोक्यात घालतं असे. बोरीवलीत (पुर्व) नॅन्सी काॅलनीत एक देवी मंदिर आहे. तीथं पुजारी शुक्रवारी ही फुलं प्रसाद म्हणून द्यायचे. खुपच मस्त.
@sunildmello
@sunildmello Ай бұрын
ही सुंदर आठवण सांगितल्याबद्दल खूप खूप धन्यवाद, रत्नप्रभा जी
@mangeshkhot1785
@mangeshkhot1785 Ай бұрын
सुनील जी प्रेरणादायी व्हिडिओ आहे.आपले खुप खुप आभारी आहे. अंतर्मनात द्वंद्व चालते या दुनियेत मी किती खुजा आहे. आपले व्यक्तिमत्व विलोभनीय आहे, काहीतरी करण्याची ऊर्जा मिळते,जरी माझे वय 64 वर्ष असले तरी. परमेश्वर आपणांस सुखसमृद्धी आणि निरामय आरोग्य लाभो हीच सदिच्छा.असेच प्रेरणादायी व्हिडिओ पाठवा हि विनंती.❤ नमस्कार.
@sunildmello
@sunildmello Ай бұрын
या सुंदर प्रतिक्रियेसाठी खूप खूप धन्यवाद, मंगेश जी
@durgeshaparadkar5160
@durgeshaparadkar5160 Ай бұрын
भाऊ ची कहाणीच सर्व अनमोल गोष्टींचा पुस्तक आहे. जीवन प्रवास करत मजल गाठलेली आहे. खूप खूप कौतुक! तुमचेही आभार कारण अश्या वल्ली तुम्ही शोधून काढून तयांचा परिचय करून दिल्याबद्दल! फार छान 👌 मार्गदर्शक म्हणून काम करीत आहात 👍👏👏👏असेच नवनवीन शोध घेत रहा व आम्हास माहित करून द्या 🙏
@sunildmello
@sunildmello Ай бұрын
अगदी बरोबर बोललात, दुर्गेश जी. खूप खूप धन्यवाद
@meenalpandit4204
@meenalpandit4204 Ай бұрын
अतिशय माहितीपूर्ण आणि सुंदर व्हिडिओ... धन्यवाद 🙏
@sunildmello
@sunildmello Ай бұрын
खूप खूप धन्यवाद, मीनल जी
@manishapotdar7665
@manishapotdar7665 Ай бұрын
अप्रतिम व्हिडिओ सुनील पहिल्यांदाच सुपारी चे फुले पहिली👌👌👌👍🙏
@sunildmello
@sunildmello Ай бұрын
खूप खूप धन्यवाद, मनीषा जी
@madhavinikte2373
@madhavinikte2373 Ай бұрын
Khup छान. हा व्यवसाय पहिल्यांदा ऐकला. 👏🏻 ह्या कामगारांना फुल गोळा करायला पाठीवरची बॅग दिली तर त्यांना फायदा... जास्त फुल गोळा होतील.
@sunildmello
@sunildmello Ай бұрын
या महत्वपूर्ण सुचनेसाठी खूप खूप धन्यवाद, माधवी जी
@abhijitkadam691
@abhijitkadam691 Ай бұрын
आम्ही देव मानत नाही निसर्ग हाच देव आणि निसर्गाला मानतो. हे वाक्य खूप खरं आणि सुंदर आहे.
@sunildmello
@sunildmello Ай бұрын
खूप खूप धन्यवाद, अभिजित जी
@sanjyotlemos480
@sanjyotlemos480 Ай бұрын
एकदम सुंदर व्हिडिओ होता अनिल दादा ह्यांच्या जीवनाबद्दल दिलेली माहिती अतिशय हृदयस्पर्शी होती.
@sunildmello
@sunildmello Ай бұрын
खूप खूप धन्यवाद, संजय जी
@user-wt9qc3gy7e
@user-wt9qc3gy7e 21 күн бұрын
खूप छान व्हिडिओ.धन्यवाद
@sunildmello
@sunildmello 17 күн бұрын
धन्यवाद
@ricksonkaras5070
@ricksonkaras5070 Ай бұрын
Very Important and Useful Information 👌 Praise The Lord
@sunildmello
@sunildmello Ай бұрын
Thanks a lot, Rickson Ji
@sunilmayekar2573
@sunilmayekar2573 28 күн бұрын
सुनील तुम्ही खूपच छान व्हिडिओ बनवला आहे कोकणातल्या शेतकऱ्यांसाठी खूपच उपयुक्त माहिती आहे
@sunildmello
@sunildmello 28 күн бұрын
खूप खूप धन्यवाद, सुनिल जी
@audumbarnaik7231
@audumbarnaik7231 Ай бұрын
खूपच सुंदर व्हिडीओ🎉 आणि संघर्षमय जीवनातून यश संपादन केले त्याला सलाम🙏🙏🙏
@sunildmello
@sunildmello Ай бұрын
धन्यवाद, औदुंबर जी
@jayapatel3619
@jayapatel3619 Ай бұрын
અતિશય સુંદર સુપાડી ના ફુલ ની જાનકારી, મજા આવી દાદા સરસ વાત કરીએ છે ❤👌👌👌👍🇮🇳💐🤩
@sunildmello
@sunildmello Ай бұрын
खूप खूप धन्यवाद, जया जी
@MadhukarDhuri
@MadhukarDhuri Ай бұрын
अनिलशेटना जादूची झप्पी, त्यांच्यातल्या प्रचंड ईश्वरी ऊर्जेचा आणि माणुसकीचा काही अंश तरी आम्हाला मिळो हीच प्रार्थना.
@sunildmello
@sunildmello Ай бұрын
या सुंदर प्रतिक्रियेसाठी खूप खूप धन्यवाद, मधुकर जी
@asavarichonkar2117
@asavarichonkar2117 Ай бұрын
खूप छान माहिती दादा ना नमस्कार दादा देवापेक्षा कमी नाहीत
@narayanpanavkar1442
@narayanpanavkar1442 Ай бұрын
भाऊ आता पर्यन्त पाहिलेले सगळयात भारी हे विडीओ आहे. मी आवर्जून बघतो आगदी मुंबईचा केलेवला पासून आजपर्यंत सगळे ब्लॉक पाहिले. आगदी स्पीचलेस तुम्हाला शुभेच्छा
@sunildmello
@sunildmello Ай бұрын
या सुंदर प्रतिक्रियेसाठी खूप खूप धन्यवाद, नारायण जी
@gayatrideshpande3659
@gayatrideshpande3659 Ай бұрын
धन्यवाद सुनीलजी पहिल्यांदाच सुपारीच्या फुलांची माहिती मिळाली खुपचं रीस्की काम आहे तुम्ही नेहमी वेगवेगळ्या विषयांवर व्हिडिओ बनवता त्या मुळे नवीन माहिती मिळते हा व्हिडिओ खरंच अद्भुत आहे ह्या सगळ्यांच्या आणि तुमच्या मेहनतीला सलाम
@sunildmello
@sunildmello Ай бұрын
खूप खूप धन्यवाद, गायत्री जी
@sandeshmhatre670
@sandeshmhatre670 Ай бұрын
नेहमी पेक्षा खूपच वेगळा आणि सुंदर एपिसोड..👌
@sunildmello
@sunildmello Ай бұрын
खूप खूप धन्यवाद, संदेश जी
@mugdhakarnik7339
@mugdhakarnik7339 Ай бұрын
खूप छान व्हिडिओ.सुपारीची पोय म्हणतात.ती कशी काढतात ते या व्हिडिओ मधून समजले.सुपारीला जर भाव नसेल तर हे उत्पन्नाचे चांगले साधन आहे.यामुळे शेतकरी सुपारीची बाग लावण्यासाठी उद्युक्त होतील.
@sunildmello
@sunildmello Ай бұрын
या सुंदर प्रतिक्रियेसाठी खूप खूप धन्यवाद, मुग्धा जी
@sanjaymalekar9652
@sanjaymalekar9652 Ай бұрын
सुनील जी फारच छान माहिती दिली धन्यवाद
@sunildmello
@sunildmello Ай бұрын
खूप खूप धन्यवाद, संजय जी
@nehasalvi1793
@nehasalvi1793 Ай бұрын
वा पहिल्यांदा सुपारी फुलांची एवढी छान माहिती पाहिली.धन्यवाद 🙏
@sunildmello
@sunildmello Ай бұрын
खूप खूप धन्यवाद, नेहा जी
@bhavanapatil8335
@bhavanapatil8335 Ай бұрын
Khoopch chhan Sunil dada
@sunildmello
@sunildmello Ай бұрын
धन्यवाद, भावना जी
@KalpanaVispute1086
@KalpanaVispute1086 29 күн бұрын
खूपच सुंदर 👌🏻👌🏻तुमच्या जिद्दीला सलाम. खूप काही तरी घेणाऱ्या सारखं.
@sunildmello
@sunildmello 28 күн бұрын
धन्यवाद, कल्पना जी
@nitinmore623
@nitinmore623 Ай бұрын
नेहमीप्रमाणे अद्भुत आणि दुर्मिळ माहिती. धन्यवाद सुनील भाऊ.
@sunildmello
@sunildmello Ай бұрын
खूप खूप धन्यवाद, नितीन जी
@preranakulkarni9751
@preranakulkarni9751 Ай бұрын
चांगल्या माणसा ना नेहमी चांगली माणस भेटतात वाह खूप चांगली माहिती मिळाली आणि चांगले विचार
@sunildmello
@sunildmello Ай бұрын
खूप खूप धन्यवाद, प्रेरणा जी
@ashabhogan1912
@ashabhogan1912 Ай бұрын
अगदी खर चांगल्यासी चांगला भेटे.!!!!!
@manjirisurve7610
@manjirisurve7610 Ай бұрын
दादा, दरवेळेप्रमाणेच आणखी एक सुंदर, अतिशय माहितीपूर्ण आणि नवीन व्यवसायाची ओळख करून देणारा व्हिडीओ. खूप छान. खूप खूप शुभेच्छा.💐💐💐
@sunildmello
@sunildmello Ай бұрын
या सुंदर प्रतिक्रियेसाठी खूप खूप धन्यवाद, मंजिरी जी
@sasodekar
@sasodekar Ай бұрын
सुनील नमस्कार! जेव्हा जेव्हा तुझे व्हिडिओ समोर येतात आणि बघतो त्यावेळी नक्कीच एक नवीन प्रकारची ऊर्जा मिळून जाते मग विषय काहीही असो किंवा व्हिडिओ हा कुठलाही असो. तुझ्या कार्यामध्येच एक प्रकारची विलक्षण शक्ती आहे तुझ्या व्हिडिओमधील तुझे सहकारी, घरची मंडळी, याच्याच बरोबर ज्यांची तू मुलाखत घेतोस ते सुद्धा विलक्षण मंडळी भेटतात. फार नाही सांगत पण काही वेळा अर्ध्या एक तासाचे अध्यात्मिक व्हिडिओ बघितल्यावर जो भाव येतो त्यातून जी ऊर्जा मिळते सकारात्मकता मिळते मन ओले होते तसेच काही व्हिडिओ बघताना असेच वाटते. कारण ते सर्व व्हिडिओ हे केवळ कंटेंट म्हणून बनवलेले नाहीयेत त्यामध्ये तू तुझं सर्व तन-मन आणि धन हे सर्व ओतलेल आहे आणि त्या पाठीमागे निर्व्याज भूमिका आहे अकारण लोकांवरच प्रेम, निसर्गाचा आशिर्वाद आणि त्याच प्रमाणे तुला मिळालेले असंख्य आशीर्वाद ही आहेत असेच तुझे कार्य चालू ठेव-- शैलेंद्र असोदेकर सौदी अरेबिया
@sunildmello
@sunildmello Ай бұрын
आपल्या या सुंदर व प्रोत्साहनपर प्रतिक्रियेसाठी व अविरत पाठिंब्यासाठी खूप खूप धन्यवाद, शैलेंद्र जी आपण नेहमीच खूप छान प्रतिक्रिया देता त्यामुळे आमचा उत्साह वाढतो.
@muktasarpotdar8855
@muktasarpotdar8855 Ай бұрын
अप्रतिम सुपारीची फुले व माहिती विकली कशी जातात.खूप लक्षवेधक आहे .आभारी आहोत सर्वांचे😂😅
@sunildmello
@sunildmello Ай бұрын
@@muktasarpotdar8855 जी, खूप खूप धन्यवाद
@manishazade3545
@manishazade3545 Ай бұрын
अगदी बरोबर आहे
@swatigharat4433
@swatigharat4433 Ай бұрын
खुप छान सुनील दादा अनिल दादाच्या जीवन प्रवासाला सलाम
@sunildmello
@sunildmello Ай бұрын
खूप खूप धन्यवाद, स्वाती जी
@shubhangipillai5934
@shubhangipillai5934 Ай бұрын
Praise the Lord Khup khup Chan vlog aahe Anil la salam🎉❤🎉❤🎉😊
@sunildmello
@sunildmello Ай бұрын
खूप खूप धन्यवाद, शुभांगी जी
@user-mo6df7kk6q
@user-mo6df7kk6q Ай бұрын
खूपच छान व्हिडिओ होता आजचा
@sunildmello
@sunildmello Ай бұрын
खूप खूप धन्यवाद, अलका जी
@user-kh6cw2ko5t
@user-kh6cw2ko5t Ай бұрын
अतिशय सुंदर नवीन माहिती दिली मिळाली
@sunildmello
@sunildmello Ай бұрын
खूप खूप धन्यवाद
@sangeetamondkar8534
@sangeetamondkar8534 Ай бұрын
खरंच खूप भारी आहे हे काम आणि त्या दादा ला सुद्धा नमस्कार
@sunildmello
@sunildmello Ай бұрын
खूप खूप धन्यवाद, संगीता जी
@archanakoyande9382
@archanakoyande9382 Ай бұрын
खूप छान व्हिडिओ आहे व खूप छान माहिती मिळाली आमच्या गावी कारवारला पण देवाला ही फुले वाहतात अनिल दादांचे विचार खूप पॉझिटिव्ह आहेत तुम्हा सर्वांचे खूप खूप आभार
@sunildmello
@sunildmello Ай бұрын
खूप खूप धन्यवाद, अर्चना जी
@arunasawant9078
@arunasawant9078 Ай бұрын
सुनील खूप मस्त व्हिडिओ. पिंजारी सुपारीच्या फुलाबद्दल प्रथमच माहिती ऐकायला मिळाली.
@sunildmello
@sunildmello Ай бұрын
खूप खूप धन्यवाद, अरुणा जी
@vibhutirane7687
@vibhutirane7687 Ай бұрын
Khup sunder mahiti milali tk
@sunildmello
@sunildmello Ай бұрын
धन्यवाद, विभूती जी
@maiamburle4725
@maiamburle4725 Ай бұрын
खूपच सुंदर माहीती.
@sunildmello
@sunildmello Ай бұрын
खूप खूप धन्यवाद
@kiranghadi4876
@kiranghadi4876 Ай бұрын
दादा एक नंबर video अनिल दादा तर देवासारखे बोलत होते माणसाने परिस्थितीशी कसा सामना करावा हे त्यांनी हसत हसत सांगितल. त्यांना पुढील वाटचालीसाठी खूप खूप शुभेच्छा.
@sunildmello
@sunildmello Ай бұрын
अगदी बरोबर बोललात, किरण जी. खूप खूप धन्यवाद
@Nitin-xh1km
@Nitin-xh1km Ай бұрын
Sir tumhi khup chan mahitipuran video banavtat Salute ahe tumahala.
@sunildmello
@sunildmello Ай бұрын
खूप खूप धन्यवाद, नितीन जी
@rashmimahalim7038
@rashmimahalim7038 Ай бұрын
खूपच वेगळी माहिती मिळाली 🙏
@sunildmello
@sunildmello Ай бұрын
खूप खूप धन्यवाद, रश्मी जी
@gopinathpatil7555
@gopinathpatil7555 Ай бұрын
खूप छान! V.nice
@sunildmello
@sunildmello Ай бұрын
धन्यवाद, गोपीनाथ जी
@jayshreerewaskar1527
@jayshreerewaskar1527 Ай бұрын
धन्यवाद अनिशा डिमेलो छान ब्लॉग 😊😊
@sunildmello
@sunildmello Ай бұрын
धन्यवाद, जयश्री जी
@user-zz8vd9tl6t
@user-zz8vd9tl6t Ай бұрын
दादा आजचा विडिओ खूपच छान मस्त
@sunildmello
@sunildmello Ай бұрын
खूप खूप धन्यवाद
@nilimakale7650
@nilimakale7650 Ай бұрын
खूपच छान माहिती मिळाली,हे माहीतच नव्हते.तुमच्या मुळे नवीन माहिती मिळाली.
@sunildmello
@sunildmello Ай бұрын
खूप खूप धन्यवाद, नीलिमा जी
@yashashriranadive4213
@yashashriranadive4213 Ай бұрын
फारच सुंदर video ❤❤❤❤❤❤❤
@sunildmello
@sunildmello Ай бұрын
खूप खूप धन्यवाद, यशश्री जी
@dattarambadbe7139
@dattarambadbe7139 Ай бұрын
छान विडिओ मेहनत आणि जिगर दोनीही पाहिजेत
@sunildmello
@sunildmello Ай бұрын
अगदी बरोबर बोललात, दत्ताराम जी. धन्यवाद
@PramodSawwalakhe5978
@PramodSawwalakhe5978 Ай бұрын
अंगावरचे काटे उभे झालेत माझे मी पन निशर्गप्रेमी आहे त्यानी खुप काही निशर्गाकडुन शिकुन घेत आपले जीवन शार्थ केला जंगल तोड करनार्या ऊद्योगपतीना थोडी लाज वाटायला हवे 😢😢😢
@sunildmello
@sunildmello Ай бұрын
खूप खूप धन्यवाद, प्रमोद जी
@anjalimurugan4692
@anjalimurugan4692 3 күн бұрын
Really great 👍 head soft of to that man who's climb on the tree , yes we want these flowers in our pooja pls very nice video 🙏🙏👍
@sunildmello
@sunildmello Күн бұрын
Thank you, Anjali Ji
@user-vs9qc8rw3y
@user-vs9qc8rw3y Ай бұрын
तुमचे फार विडिओ पाहिले पण आजचा विडिओ फार माहीत युक्त आहे धन्यवाद ❤
@sunildmello
@sunildmello Ай бұрын
खूप खूप धन्यवाद, स्नेहा जी
@mumtajmushrif5660
@mumtajmushrif5660 Ай бұрын
सुपारीचे फूल पहिल्यांदा पाहिले छान माहिती मीळाली 🎉🎉🎉
@sunildmello
@sunildmello Ай бұрын
खूप खूप धन्यवाद, मुमताज जी
@sureshmasurekar8212
@sureshmasurekar8212 Ай бұрын
फारच सुंदर फुलाचे झाडे आहेत. त्या व्यक्तीची जिवन गाथा ऐकून फार वाईट वाटले.
@sunildmello
@sunildmello Ай бұрын
धन्यवाद, सुरेश जी
@susheelatuscano7597
@susheelatuscano7597 Ай бұрын
Very inspiring video Hats off to Anil dada
@sunildmello
@sunildmello Ай бұрын
Thank you, Susheela Ji
@jyotichavan38
@jyotichavan38 Ай бұрын
Khup chhan video.
@sunildmello
@sunildmello Ай бұрын
धन्यवाद, ज्योती जी
@usalpaurvi
@usalpaurvi 4 күн бұрын
Greetings from Mckees Rocks - State of Pennsylvania, USA, nicely done
@pooja-fj3dj
@pooja-fj3dj Ай бұрын
खूप छान सुनील माहिती दिल्या बद्दल मला आज समजले हे सुपारी चे फुल आहे ❤
@sunildmello
@sunildmello Ай бұрын
खूप खूप धन्यवाद, पूजा जी
@anjalimurugan4692
@anjalimurugan4692 3 күн бұрын
Anil god bless you really hard wor❤🙏🙏🙏
@sunildmello
@sunildmello Күн бұрын
Thank you, Anjali Ji
@vickymohitemarathi
@vickymohitemarathi Ай бұрын
कोकणात भरपूर सुपरीची झाडे असतात तरी सुद्धा सुपरीच्या फुलाबद्दल कधी ऐकले नव्हते, कारण माझ्या गावात सुपरीची झाडे फार कमी आहेत. तूमच्या विडियोमध्ये नेहमी प्रमाणे नवीन माहिती मिळाली. धन्यवाद सुनील दादा.
@sunildmello
@sunildmello Ай бұрын
या महत्वपूर्ण माहितीसाठी खूप खूप धन्यवाद, विकी जी
@rupalimalvade2233
@rupalimalvade2233 Ай бұрын
Khupch chan video aani suparichya phulancha video 👌🏻👌🏻 Ghari basun sundar video phata aala mahti pan chan sangtli 👍🏻👍🏻
@sunildmello
@sunildmello Ай бұрын
खूप खूप धन्यवाद, रुपाली जी
@pushpabhandary9043
@pushpabhandary9043 Ай бұрын
Aapale sarva vedeo me baghate khup sundar aahe
@sunildmello
@sunildmello Ай бұрын
खूप खूप धन्यवाद, पुष्पा जी
@mayurvartak74
@mayurvartak74 Ай бұрын
खूप छान 👌👌👌 keep it up. #वसईकर
@sunildmello
@sunildmello Ай бұрын
खूप खूप धन्यवाद, मयूर जी
@lucasfdes6481
@lucasfdes6481 Ай бұрын
खूप छान माहिती दिली धन्यवाद 👍👌❤
@sunildmello
@sunildmello Ай бұрын
खूप खूप धन्यवाद, लुकस जी
@sakshikedari7192
@sakshikedari7192 21 күн бұрын
Khup chan .... 👍
@sunildmello
@sunildmello 21 күн бұрын
धन्यवाद, साक्षी जी
@baldevwankhade9866
@baldevwankhade9866 Ай бұрын
आपणास सर्वांकडून अभिनंदन होत आहे हिच आपलि उर्जा आहे धन्यवाद
@sunildmello
@sunildmello Ай бұрын
धन्यवाद, बलदेव जी
@archanabarve7979
@archanabarve7979 Ай бұрын
Khup chan mahiti dada che vichar sangharsh kasht hi khup Ahe 👌👌👍
@sunildmello
@sunildmello Ай бұрын
खूप खूप धन्यवाद, अर्चना जी
@mohinikundgol9103
@mohinikundgol9103 Ай бұрын
सुनिल सर खुपचं छान माहिती दिली धन्यवाद भाऊ नी खुप छान माहिती दिल्याबद्दल त्यांचे सुध्दां धन्यवाद सर तुम्ही मॅडम खुप छान माहिती दिल्याबद्दल धन्यवाद
@sunildmello
@sunildmello Ай бұрын
खूप खूप धन्यवाद, मोहिनी जी
@vaibhavibhatte5755
@vaibhavibhatte5755 Ай бұрын
साऊथ इंडियन लोकांना देवाला , लग्नात आणि प्रत्येक धार्मिक कार्यक्रमात लागताच
@sunildmello
@sunildmello Ай бұрын
या महत्वपूर्ण माहितीसाठी खूप खूप धन्यवाद, वैभवी जी
@rekhachavan1275
@rekhachavan1275 Ай бұрын
धन्यवाद सुनील जी सुपारीच्या फुलाबद्दल आम्हाला अजिबात माहिती नव्हती ती एवढी शुभ आहेत हे पण माहीत नव्हतं आणि त्या अनिल दादांचं बोलणं ऐकून आम्ही खूप भावूक झालो खास करून त्यांचे दोन वाक्य आम्हाला खूप आवडले 1. माझे आई-वडील नसताना मी एवढं केलं तर ज्यांचे आई-वडील असतील त्यांनी केवढ करायचं 2. त्यांनी एक स्पेशल गाडी गरजूंना ठेवली आहे त्यात ते बोलले गाडी खराब झाली तरी चालेल पण मन खराब होता कामा नये खूप छान बोलले आणि सुनील दादा तुमचं काम अप्रतिम आम्ही तुमचे सर्व व्हिडिओ पाहतो असेच छान छान व्हिडिओ बनवत जा
@sunildmello
@sunildmello Ай бұрын
हो, अनिल दादा अप्रतिम बोलतात. या सुंदर प्रतिक्रियेसाठी खूप खूप धन्यवाद, रेखा जी
@nileshghadage4830
@nileshghadage4830 Ай бұрын
अशे.माहितीपुर्ण.व्हिडिओ.खरच.शहरी.लोकांना.निसर्गांचि.कुतुहल.आणि.माहिती.करुण.देतात.बऱ्याच.लोकांना.अर्धवट.कपड्यातिल.न.बघण्यासारखे.व्हिडिओ.टाकावयाचि.सवय.आहे.त्यांनि.खरच.अभ्यासपुर्णं.व्हिडिओ.टाकाणाऱ्या.सहकार्यांचा.आदर्शं.घेऊन.आपल्यात.सुधारणा.करावि.याची.आपल्या.देशाच्या.युवा.पिढिला.गरज.आहे
@sunildmello
@sunildmello Ай бұрын
खूप खूप धन्यवाद, निलेश जी
@dilipbhide7089
@dilipbhide7089 Ай бұрын
अप्रतिम विषय.फार छान माहिती दिलीत.मी नेहहमीच तुमचे हे असे हटके विषयावरील vlogs बघत असतो.खूप आभार.
@sunildmello
@sunildmello Ай бұрын
खूप खूप धन्यवाद, दिलीप जी
@poonamskitchen7579
@poonamskitchen7579 Ай бұрын
Khupach chhan mahiti dilit Sunil sir
@sunildmello
@sunildmello Ай бұрын
खूप खूप धन्यवाद, पूनम जी
НРАВИТСЯ ЭТОТ ФОРМАТ??
00:37
МЯТНАЯ ФАНТА
Рет қаралды 8 МЛН
Каха заблудился в горах
00:57
К-Media
Рет қаралды 10 МЛН
Double Stacked Pizza @Lionfield @ChefRush
00:33
albert_cancook
Рет қаралды 123 МЛН
Llegó al techo 😱
00:37
Juan De Dios Pantoja
Рет қаралды 61 МЛН
नवरा घरी नसतांना दिराचा छळ 😅#मराठीशॉर्टफिल्म
25:10
अर्पिता कुटे कॉमेडी
Рет қаралды 60 М.
khajur sheti maharashtra | khajur sheti | खजूर शेती लागवड | khajur farming | khajur plant |
15:24
उद्योग भरारी Udyog Bharari
Рет қаралды 148 М.
НРАВИТСЯ ЭТОТ ФОРМАТ??
00:37
МЯТНАЯ ФАНТА
Рет қаралды 8 МЛН