Рет қаралды 1,418
मूळ गीतकार- विलासजी अटक,रामानंद उगले
गायक - शाहीर विलासजी अटक व रामानंद उगले आहेत
( मी माझ्या आवाजात गाण्याचा प्रयत्न केला आहे)
स्वरगुंज मराठी
लगबग लगबग माझ्या रायाची गड जेजुरी जायाची
गाडी घुंगराची आली थोरल्या भायाची
सासू ग सासरे घरी आई बापावाणी
घरामध्ये सुखी मी ग राजाची ग राणी
घरी ननंद माझी मोठी मायेची गड जेजुरी जायाची
गाडी घुंगराची आली थोरल्या...
करुनी तयारी बाई बांधल गठूड
धाकला हा धीर गाडी हाक तो या पुढे
हौस मला मोठी गड पायाची गड जेजुरी जायाची
गाडी घुंगराची आली थोरल्या...
जाऊनी राऊळी धरीन मल्हारीची पायी
गळ्यामध्ये भंडारी विलास गाणं गायी
आवड मल्हारीच गीत गायाची गड जेजुरी जायाची
गाडी घुंगराची आली....
#लोकगीत
#हार्मोनियम