गोंदण' शांताबाईंच्या शब्दांचं I भाग तेरावा I मंगला खाडिलकर

  Рет қаралды 13,756

Smrutigandha स्मृतिगंध

Smrutigandha स्मृतिगंध

Күн бұрын

स्मृतिगंध प्रस्तुत 'गोंदण' शांताबाईंच्या शब्दांचं..
भाग तेरावा !
सुप्रसिद्ध कवयित्री शांता शेळके यांच्या जन्मशताब्दीवर्षानिमित्त, त्यांच्या साहित्यातील वेगवेगळ्या पैलूंचा मागोवा घेण्याचा प्रयत्न करीत आहोत. या वेबसिरीजमधील प्रत्येक भाग विशिष्ठ संकल्पनेने बांधला आहे. हा भाग शेवटचा असून, १२ ऑक्टोबर २०२२ रोजी शांताबाईचे जन्म शताब्दी वर्ष संपन्न झाले...
संकल्पना आणि दिग्दर्शन : वीणा गोखले
सृजन सहाय्य : मिलिंद जोशी
निर्मिती : अजय गोखले
विशेष सहभाग : मंगला खाडिलकर

Пікірлер: 51
@anaghalondhe9850
@anaghalondhe9850 2 жыл бұрын
त्रिवेणी , गुलजार, शांताबाई आणि मंगलाताई खाडिलकर यांचे भक्त असणार्‍या प्रत्येकाने जरूर पहावा ऐकावा असा सुंदर रसाळ एपिसोड... 'गोंदण' मालिकेचा कळसाध्याय ... या मालिकेतून तुम्ही सर्वांनीच शांताबाईंच्या सुंदर ओघवत्या साहित्याची तसेच त्यांच्या गोड, निरागस तितक्याच बुद्धिमान व्यक्तिमत्त्वाच्या पैलूंची, आठवांची वर्षभर चालवलेली ही दिंडी आम्हा समस्त वारकर्‍यांसाठी अनमोल भेट आहे... गर्भरेशमी पैठणीसारखीच! वीणा, अजयदा, स्मृतिगंध आणि संपूर्ण team तसेच सहभागी सर्व निवेदक, साहित्यिक, कलाकार यांना मनापासून धन्यवाद आणि अभिनंदन 💐💐💐💐🙏🙏🙏😊
@mangalabaliga1633
@mangalabaliga1633 9 ай бұрын
शांताबाईना साष्टांग नमस्कार ( दंडवत) आणि मंगलाताईंना त्यांच्या ओजस्वी वाणीने त्यांचे विश्लेषण ऐकताना शांताबाई हृदयात जाऊन भिडल्या .
@amrutagangakhedkar3126
@amrutagangakhedkar3126 2 жыл бұрын
स्मृतीगंध च्या संपूर्ण टीम चे मनपूर्वक आभार. वर्षभर शांताबाईंच्या शब्दांची ही मेजवानी आमच्यासाठी उपलब्ध करवून दिल्या बद्दल. प्रत्येक भाग अप्रतिम, त्यामागील गाढ अभ्यास, निवेदन, प्रत्येक मान्यवर, शब्दांची उधळण, थेट काळजाला भिडणारा शांत सुसंवाद आणि संपूर्ण "गोंदण" ही संकल्पना .... सगळेच अप्रतिम आणि सांगता म्हणून मंगलाजी नी सादर केलेला हा सुंदर त्रिवेणी संगम.... केवळ अतुलनीय .. Thank you everyone who has been a part of "गोंदण"
@sunandapawar3582
@sunandapawar3582 Жыл бұрын
फारच सुंदर व औचित्य पूर्ण ❤️🙏🏽
@aparnachiplunkar
@aparnachiplunkar 2 жыл бұрын
मंगलाताई खूप सुंदर program ❤
@mashwini
@mashwini 2 жыл бұрын
Shanta baainaa shatash: namaskaar aaNi Mangala tai,tumche khoop khoop aabhaar!
@pradeeppandit4193
@pradeeppandit4193 Жыл бұрын
शांताबाई आपल्या मराठी साहित्यातील साक्षात सरस्वतीचं ! पण प्राख्यात सुत्रनिवेदका मंगलाताई खाडिलकर यांनी या शेवटच्या भावाला चार चांद लावले हे मात्र निश्चित ! नुसतं ऐकत रहावं.इतक्या त्या व्यक्त झाल्या.शब्द अतिशय मखमली.मला स्वतःला एका कार्यशाळेत त्यांचा सहवास लाभला हे माझं भाग्य ! पण काय सामर्थ्यवान ताई लाभल्या महाराष्ट्राला.शांताबाई आणि मंगलाताई दोघीं साहित्य प्रभू शब्दप्रभूनां मनःपुर्वक वंदन 😊👏❤🙏
@neelamkarmalkar7158
@neelamkarmalkar7158 10 ай бұрын
संकल्पनाच अतिशय सुरेख! त्याबद्दल सर्वांचे मनापासून आभार!
@shubhampadhye7263
@shubhampadhye7263 2 жыл бұрын
मंगला खाडिलकर म्हणजे उच्च प्रतीचे निवेदन असणारच !
@ketakibhalerao9356
@ketakibhalerao9356 2 жыл бұрын
Very true
@vinitachitre6805
@vinitachitre6805 2 жыл бұрын
@@ketakibhalerao9356 ⁿ
@Kalyanii
@Kalyanii 2 жыл бұрын
Seriously🙌🙌🙌
@adityasurve8106
@adityasurve8106 2 жыл бұрын
गोंदण... शांताबाईंंच्या शब्दांच. मराठीतील सर्वश्रेष्ठ लेखिका, कवियत्री, गीतकार शांताबाई शेळके यांच्या जन्मशताब्दीनिमित्त स्मृतीगंधची ही मालिका अविस्मरणीय अशी स्वर्गीय अनुभूती झाली. शांताबाई शेळके यांच्या जन्मशताब्दीनिमित्त त्यांच्या साहित्याचा, व्यासंगाचा, शब्द भंडाराचा मागोवा घेण्याचा हा उपक्रम अतिशय स्तुत्य आहे. आजचा हा भाग विशेष होता. शांताबाई शेळके आणि गुलजार साहेब ह्या दोन अथांग नद्यांचे संगम घडवून आणण्याच्या त्रिवेणी झाल्या मंगलताई खाडीलकर. आजचा हा भाग विशेष होता, अतिशय वेगळ्याच विश्वात घेऊन गेला. गोंदण... शांताबाईंच्या शब्दांचं‌, ह्या मराठीतील सर्वश्रेष्ठ लेखिका, कवियत्री, गीतकार शांताबाई शेळके यांच्या जन्मशताब्दीनिमित्त स्मृतीगंधची ह्या मालिकेचा अविस्मरणीय असा अनुभव संपन्न, ज्ञानपुर्ण, आनंददायी असा समारोप झाला. वीणा गोखले यांची दर्जेदार, अभ्यासपूर्ण,‌ आणि आल्हाददायक संकल्पना. ह्या मालिकेमुळे प्रतिभासंपन्न कवीयत्री, लेखिका, गीतकार शांताबाई शेळके यांच्या साहित्याचा आणि व्याक्तीमत्वाचा खुपचं नीतळ, दर्जेदार, ज्ञानपुर्ण असा रस्वाद घेता आला. एखाद्या प्रतिभासंपन्न व्यक्तीचा जन्मशताब्दी साजरी करण्याचा हा उपक्रम अतिशय स्तुत्य आहे. स्मृतीगंधच्या संपूर्ण संचाचे शतशः मनःपुर्वक आभार. 🙏🏻🙏🏻🙏🏻
@SanjeevBorse-vw1kj
@SanjeevBorse-vw1kj 10 ай бұрын
शेवटी ही वाट दूर जाते स्वप्नामधील गावा माझ्या मनातल्या त्या जेथे असेल रावा त्याचा एका गुढ अलौकिक आणि अती प्रिय असणार्या सहवास कमीत कमी मला तिथे तरी मिळेल हा विश्वास केवळ आणि केवळ शांता बाई शेळकेच देऊ शकतात आणि तो त्यांना नक्कीच मिळाला असेल हे त्यांच्या प्रतिभे इतकच स्वच्छ सुंदर निर्मळ निरागस सत्य आहे त्या गातच शांती निरंतर आहे हे साक्षात श्री कृष्णाने सांगितले आहे हे अगदी खरं आहे
@sunetranamjoshi2632
@sunetranamjoshi2632 2 жыл бұрын
हा भाग सांगते चा म्हणाला तरी.शोध इथेच सुरू झाला खूप छान
@namratarane2706
@namratarane2706 10 ай бұрын
Veenatai khup khup aabhar
@vinitagupte
@vinitagupte 2 жыл бұрын
काय बोलायचं...शब्दच नाहीत....एकेक त्रिवेणी मनाला भिडत होती.खरं तर मी त्रिवेणी कधीच घेतलंय पण तुम्ही सांगताना परत एकदा नव्याने कळली....अप्रतिम....
@anitakarandikar3182
@anitakarandikar3182 2 жыл бұрын
🙏🏼🙏🏼 खूप खूप धन्यवाद सर्व टीमचे सर्व भाग परत परत ऐकावे असे आहेत शेवटचा भाग मंगलाताईंनी कळसाध्याय म्हणावा असा रंगवला आहे गुलजार साहेब व शांताबाई क्या बात है खूप आवडला
@neelamkarmalkar7158
@neelamkarmalkar7158 10 ай бұрын
मंगला खाडिलकर यांना त्रिवार वंदन
@sunitaharchirkar2755
@sunitaharchirkar2755 10 ай бұрын
Farh sundarkhoopchaanthanks😊
@uttaradeshmukh1101
@uttaradeshmukh1101 10 ай бұрын
खूप सुंदर सादर केल.
@musicmad52
@musicmad52 Жыл бұрын
केवळ अप्रतिम
@gaurisahasrabudhe7193
@gaurisahasrabudhe7193 2 жыл бұрын
शांताबाईना साष्टांग दंडवत!स्मृतीगंध आणि विणाजी तुमची टीम ,तुम्हाला किती धन्यवाद देऊ? सगळे एपिसोड मस्त...प्रत्येकाचे बोलणे आणि त्यातून दिसलेल्या शांताबाई सगळ झिरपत होतं मनात....डोळे तर कितीदा वाहिले त्यांनाच ठाऊक!मनापासून आवडले सगळे आणि सगळ्यात महत्वाचे म्हणजे शांताबाई बोट स्पीकर वर ऐकत माझा दिवाळी फराळ तयार करून झाला...😊
@आनंदघन-ड1ह
@आनंदघन-ड1ह 2 жыл бұрын
स्मृतीगंध च्या सगळ्या टिमचे मनापासून धन्यवाद. तुमच्या मुळे शान्ताबाई पुन्हा नव्याने सापडल्या. आजचा एपिसोड केवळ निशब्द करणारा असा भाग होता. मनात सुनेपणाची हलकीशी सर येवून जावी तसंही वाटलं. मंगला ताई सुध्दा त्यांच्याही क्षेत्रात शान्ताबाईंच आहेत. केवढ सुंदर बोलून गेल्या त्या आज. खरं तर शान्ताबाईंची असंख्य पुस्तक माझ्या संग्रही आहेत पैकी त्रिवेणी हा छोटासा पुस्तक सुद्धा माझ्या जवळ आहे. या आधी सुद्धा मी त्रिवेणी काव्य संग्रह वाचला आहे. पण आज खर्या अर्थाने मला तो उलगडला आहे असं सांगायला मला काहीच संकोच वाटत नाही. एखाद्या आठवडाभर चालणार्‍या किर्तीरूपी सोहळ्याची सांगताना मन जसं भरून येत तीच अवस्था आज गोंदण शान्ताबाईंच्या शब्दांच या कार्यक्रमाच्या सांगता सोहळ्याची होत आहे ❤️❤️❤️
@M2khadilkar
@M2khadilkar 2 жыл бұрын
🙏
@4444pramodini
@4444pramodini 2 жыл бұрын
वर्षभर शांता ज्ञानाचा,ज्ञानामृताचा रतीब स्मृतिगंध ने घातला त्या बद्दल स्मृतिगंध चे अनेकानेक आभार. बाई सव्यसाची होत्या, साहित्याच्या सर्व क्षेत्रात त्यानी आपली प्रतिभा प्रभावी रित्या व्यक्त केली आणि विभिन्न प्रज्ञा वंत्यांच्या माध्यमातुन आम्हाला ते स्मृति गंध ने उपलब्ध करून दिले.
@sujatalimaye6814
@sujatalimaye6814 2 жыл бұрын
खूपच सुंदर
@sshedde
@sshedde 2 жыл бұрын
फारच सुंदर सांगता!धन्यवाद मंगलाताई!!
@anjalibhavthankar6415
@anjalibhavthankar6415 Жыл бұрын
खुप सुंदर.
@madhavivaidya2524
@madhavivaidya2524 2 жыл бұрын
अभ्यास पूर्ण इतकं आवडलं ...मस्तच
@madhavipatankar8947
@madhavipatankar8947 2 жыл бұрын
अती सुंदर ! शब्दांच्या पलीकडले!
@seemagadre5260
@seemagadre5260 2 жыл бұрын
नमस्कार शांताबाईंचं साधं रूप व अतिशय खोल ज्ञान आम्हाला अक्षरशः वेड लावतं .शांताबाई 👌👌
@meghachandorkar2611
@meghachandorkar2611 2 жыл бұрын
अप्रतिम
@namratarane2706
@namratarane2706 10 ай бұрын
Mangaltai triwar salam!
@geetadeshpande8771
@geetadeshpande8771 2 жыл бұрын
खूप छान
@deepd4810
@deepd4810 2 жыл бұрын
दर्जेदार मराठी,आशयघन असं काही ऐकण्याची इच्छा असेल तर ' गोंदण ' चे सर्व भाग पुन्हा पुन्हा ऐकावेत असे आहेत. शांताबाईंचा हा जीवनपट अतिशय उत्कृष्टपणे उलगडून दाखवणाऱ्या संपूर्ण टीम चे मनःपूर्वक धन्यवाद!! असं काही अजून ऐकायला नक्की आवडेल.
@mukundkhire428
@mukundkhire428 2 жыл бұрын
खूप सुंदर! त्रिवेणी अनुसर्जन अप्रतीम!🙏👍👍
@vrushaligangurde564
@vrushaligangurde564 2 жыл бұрын
Apratim madam
@urmilaapte9853
@urmilaapte9853 2 жыл бұрын
🎶आदरणीय शांताबाईंना शतशः नमन 😌🙏🎵😌🙏🎼😌🙏🎶
@veenaathavale5931
@veenaathavale5931 2 жыл бұрын
वीणाताई ,सगळे भाग खूप छान वैविध्यपूर्ण व माहितीपर आहेत . परतपरत ऐकावे असे आहेत. आज आपण स्वतः सुरवातीला ईंग्रजी शब्दांचा आधार घेतला नसतात तर अधिक भावले असते.
@amitadabir6776
@amitadabir6776 2 жыл бұрын
स्मृतीगंध टीमचे लक्षलक्ष आभार 🙏🏻🙏🏻🙏🏻 या मालिकेतले सारेच कार्यक्रम अप्रतिम आणि हा भाग तर कळस.
@ankitakarle8295
@ankitakarle8295 2 жыл бұрын
खूपच छान !
@SundeepGawande
@SundeepGawande 2 жыл бұрын
ही मालिका आम्हा रसिकांपर्यंत पोहोचवण्यात हातभार लागलेल्या सर्व सुजनांचे खूप खूप धन्यवाद! 👏👏👏 भाग नेहमीसारखाच सुंदर होता. परंतु खेदाची बाब अशी की सांगतेचा हा भाग जरा गुलजारमय होऊन गेला व शांताबाई त्यात अलगद विलिन होऊन गेल्या... धन्यवाद🙏🙂
@pradnyakulkarni7683
@pradnyakulkarni7683 2 жыл бұрын
सुंदर कार्यक्रम ! 👌👌
@shri_kaka24
@shri_kaka24 2 жыл бұрын
Happiness comes back
@abhishekpande6511
@abhishekpande6511 2 жыл бұрын
हृदयनाथ मंगेशकर यांची पण कृपया शांताबाई शेळकेंवर मुलाखत घ्यावी
@manishakale3817
@manishakale3817 2 жыл бұрын
खूप छान सुंदर सांगता.
@padminidivekar254
@padminidivekar254 2 жыл бұрын
कॉम्प्युटरचा पडदा कोरडं वर्तमानपत्र उघडत होता... दारं खिडक्यांच्या फटीतून लॉकडाउनला न जुमानता,तो मात्र आत पाझरत होता.... मृत्यूच्या तांडवाने " की बोर्ड " मात्र चिंब भिजला..
@snpawaskar
@snpawaskar 2 жыл бұрын
चापून चोपून नेसलेली भरजरी पैठणी पाहताना भान हरपले अन् शेवटी हा पदराचा फलकारा हुरहूर लावून गेला
@snpawaskar
@snpawaskar 2 жыл бұрын
साहित्यप्रेमी वीणा गोखले विचार करतांना इंग्रजीमध्ये करतात हे जरा आश्चर्यच आहे पण उपक्रम स्तुत्य आणि नक्कीच संग्राह्य !
@anuradhajewalikar8960
@anuradhajewalikar8960 9 ай бұрын
खूप छान
वन-मॅन कॉन्सर्ट… सत्यजीत प्रभू | Satyajit Prabhu
36:59
Smrutigandha स्मृतिगंध
Рет қаралды 1,1 М.
REAL or FAKE? #beatbox #tiktok
01:03
BeatboxJCOP
Рет қаралды 18 МЛН
When you have a very capricious child 😂😘👍
00:16
Like Asiya
Рет қаралды 18 МЛН
Gondan (गोंदण) | Episode 3  |  Dhanashree Lele
43:30
Smrutigandha स्मृतिगंध
Рет қаралды 78 М.
"Hanuman Janma"  kirtan ... Makarand Buva Ramdasi
53:11
Shri Samarth Seva Mandal ,Sajjangad
Рет қаралды 23 М.
1x3 | Prashant Damle | Purushottam Berde | Sankarshan Karhade | 12500 Show
38:52
Smrutigandha स्मृतिगंध
Рет қаралды 134 М.
प्रवासयात्री.....  राजाभाऊ शेंबेकर |  Rajabhau Shembekar
1:03:43