Рет қаралды 200,793
#Get_Inspired with Satyajeet Tambe या सिरीजच्या सातव्या एपिसोडमध्ये तुम्हा सर्वांचं स्वागत आहे. या एपिसोडची खूप वेळ वाट तुम्ही पाहिली, मला माहित आहे. आजचा हा एपिसोड खास असण्यामागचे कारण म्हणजे माझ्या जिव्हाळ्याचा विषय अर्थातच 'आर्थिक साक्षरता' याबद्दल महाराष्ट्रातील सुप्रसिद्ध आर्थिक सल्लागार CA रचना रानडे यांच्याशी मी मनसोक्त गप्पा केल्या आहेत.
'जेव्हा आपल्याकडं पैसे असतील तेव्हा गुंतवणूक करू' असं तुम्ही बऱ्याच लोकांकडून ऐकलं असेल. परंतु गुंतवणूक करण्याचे वय काय असलं पाहिजे? गुंतवणूक केलेली फायदेशीर केव्हा असेल, याबद्दल आपण कितीवेळा विचार करतो? असा प्रश्न मला तुम्हा सर्वांना विचारावासा वाटतो. पैसा म्हणजे सर्व काही असं नसलं तरी आपल्या आयुष्यात पैशाचं किती महत्त्व आहे, हे आपल्याला कळायला पाहिजे.
आर्थिक नियोजन करण्यापासून ते गुंतवणूक कशी आणि कोणत्या वयात करावी या अत्यंत महत्त्वाच्या मुद्द्यांवर @CARachanaRanade यांच्याशी केलेली ही चर्चा, तुम्हाला नक्कीच विचार करायला लावणारी आहे. आपली आर्थिक बाजू भक्कम करून भविष्य सुखकर होण्यासाठी प्रत्येकाने आर्थिक साक्षर असणे अत्यंत गरजेचं आहे! आपणा सर्वांना हा एपिसोड नक्की आवडेल, असा मला विश्वास आहे