Рет қаралды 98,958
#BolBhidu #RajeshTopevsHikmatUdhan #GhansawangiVidhanSabha
घनसावंगी मतदारसंघ गेल्या वर्षभरापासून चर्चेत आला तो जरांगे पाटलांच्या आंदोलनामुळे, मनोज जरांगे पाटील यांच्या आंदोलनाचं केंद्रस्थान असलेलं अंतरवली सराटी याच मतदारसंघात येतं.या मतदारसंघाचे आमदार असणारे राजेश टोपे सातत्याने जरांगेंच्या संपर्कात असल्याचं बातम्यांमधून दिसलं, अनेकदा त्यांनीच जरांगेंना उपोषणाला बसवलं असेही आरोप विरोधकांकडून झाले…आता दुसरीकडे समोर आव्हान देणारे हिकमत उढाण हे शिंदेंच्या शिवसेनेचे, याबाबतीत सांगायचं तर शिंदे आणि जरांगे यांच्या संबंधांबाबतली चर्चा राज्यभर गाजली…त्यामुळेचं या मतदारसंघात नेमकं काय होणार याची हे ठरवणारा फॅक्टर आहे तो मनोज जरांगे पाटील…जरागेंच्या आंदोलनात सुरूवातीपासून राजेश टोपे दिसल्याने मतदारसंघातील मराठा समाज राजेश टोपे यांच्या बाजूने असल्याचं बोललं जातयं.
मात्र या मतदारसंघात शिंदे सेनेने उमेदवार दिल्याने गतवेळी कडवी झुंज दिलेले हिकमत उढाण यावेळी टोपेंना जेरीस आणतील अशी चर्चा आहे. त्यात मराठवाड्यात यावर्षी मराठा फॅक्टर चालणार त्यामुळे महायुती कडून देखील याच गोष्टींचा विचार करून हिकमत उढाण यांना उमेदवारी दिली गेलीये. घनसावंगीत मराठा विरूद्ध मराठा असा सामना होतोय पण त्यामध्ये ओबीसी मतंसुद्धा निर्णायक ठरणार आहेत. म्हणूनच पाच वेळा आमदारकी मिळवलेल्या टोपेंना यावर्षी आमदारकी राखता येईल? हिकमत उढाण, सतिश घाटगे हे टोपेंना यंदा पाडू शकतील का ? पाहूया घनसावंगी मतदारसंघाच राजकारण.
चॅनेलला सबस्क्राईब करायला विसरू नका. नोटिफिकेशन चालू ठेवा म्हणजे लेटेस्ट व्हिडीओचे नोटिफिकेशन तुम्हाला मिळत राहतील.
bit.ly/Subscrib...
✒️ आपणही आपले लेख, विषय व इतर माहिती आम्हाला bolbhidu1@gmail.com या मेल आयडीवर पाठवू शकता.
Connect With Us On🔎
➡️ Facebook : / bolbhiducom
➡️ Twitter : / bolbhidu
➡️ Instagram : / bolbhidu.com
➡️Website: bolbhidu.com/