घरगुती भात घिरट Domestic Rice Huller of Stone

  Рет қаралды 50,921

Farm Of Happiness Agro Tourism Home stay

Farm Of Happiness Agro Tourism Home stay

Күн бұрын

Пікірлер: 324
@madhuriahirrao9075
@madhuriahirrao9075 3 жыл бұрын
खऱ्या शेतीचा खजिनाच उलगडून दाखवता आहात तुम्ही.त्यासाठी तुम्ही घेत असलेल्या कष्टांना सलाम !
@TheShashin
@TheShashin 3 жыл бұрын
हे सर्व पाहून भारतीय बुद्धी प्रसरणाचे विशेष कौतुक वाटले. मी शहरी माणूस आहे पण सहज म्हणून पहायला घेतलेला हा व्हिडिओ पूर्ण पाहिला. ह्यातच तुमच्या प्रयत्नांचे फलित आहे.
@jayashreeyadav6025
@jayashreeyadav6025 3 жыл бұрын
व्वा, किती सुंदर माहिती दिली तुम्ही घिरटं ( जातं ) या उपकरणाबद्दल , हे फक्त शेतपिकांबद्दलच उपयुक्त नाही तर मानवी शरीर तंदुरुस्त ठेवण्यासाठी ही उपयोगी आहे, सर्व अवयवांना आपोआप व्यायाम घडतो यामुळे , शरीरात लवचिकता येते असो, तुमच्या मुळे जे या गोष्टी पासुन अनभिज्ञ आहेत त्यांना उपयुक्त माहिती झाली, धन्यवाद 🙏👍🌹🌹
@shubhashripathak2348
@shubhashripathak2348 4 жыл бұрын
मला जात्यावर दळायला खूप आवडतं पण नोकरी मुळे सगळं मागे पडलं. आपला व्हिडिओ पाहून आपली विषमुक्त शेती विषयातील आत्मियता व कळकळ तसेच विषयाच्पा मुळापर्यंत जाण्याची मनापासुन धडपड मनाला खूपच भावली. देव करो आणि आपल्या प्रत्येक प्रयत्नाला भरभरून यश मिळो.
@sonalilanjekar4762
@sonalilanjekar4762 3 жыл бұрын
जबरदस्त काम...... मी रत्नागिरीत राहून ही मला घिरटा बद्दल आज प्रथमच माहिती मिळाली. आमच्या घरी जाते फक्त भाजलेले कुळीथ भरङायला वापरले जाते.... हा वहिङीओ पाहून खूप आनंद झाला. आपल्या पूर्वजांनी दिलेल्या देणग्या आपण च जपायला हवयात. तुम्ही खूप जबरदस्त काम करत आहात सर... तुम्हाला खूप खूप शुभेच्छा. असेच छान छान विविध विषयांवर काम करत रहा. आम्हाला तुमचा फार अभिमान आहे.
@greenplanetsunil
@greenplanetsunil 3 жыл бұрын
फारच सुंदर लुप्त झालेली यंत्रणा पुन्हा नव्याने विकसित केली
@parineetakokate6014
@parineetakokate6014 3 жыл бұрын
खूप सुंदर. आपले पुर्वज किती हुशार होते. असे यंत्र बनवणारे कारागिर होते. अशा किती तरी जुन्या वस्तू काळाच्या ओघात बाजुला पडल्या. पण आता त्याचे महत्व व उपयोगिता सगळयांना कळू लागली आहे. निवेदक खुपच छान व मनापासून बोलतात. व्हिडीओ बद्दल तुमचे खूप खूप आभार. अजून असा खजीना बघायला आवडेल.
@shubhamberde5396
@shubhamberde5396 3 жыл бұрын
जाता आणि घिरट आमच्या घरात असुनही त्यातील फरक व उपयोग आज मला कळला तुमच्या व्हिडीओतुन खुप चांगली माहीती मिळाली👍
@gajosh11
@gajosh11 3 жыл бұрын
मी जातं, उखळ,व्हायन, घीरट पाहीले आहे.वापर सुध्दा केला आहे.. खूप छान माहितीपुर्ण आहे.तुमच्या परीश्रमांना सलाम . 🙏🙏💐💐
@pramodshetye8065
@pramodshetye8065 11 ай бұрын
घरगुती भात घिरट ची छान माहिती मिळाली मी जात्याचा वापर माझ्या गावी घरी पाहीला आहे पण भात घिरट चा नाही. आपल्या प्रयत्नांना सलाम.
@kiransawant2427
@kiransawant2427 3 жыл бұрын
आत्ता मला पूर्ण खात्री झाली की शेतकर्याला तितकाच सन्मान मिळेल जितका उच्च विद्ाविभूषित लोकांना मिळतो. खुप सुंदर आणि छान काम करतात साहेब आपण. आपले कौतुक करावं तेवढं कमीच आहे.
@rutujashinde564
@rutujashinde564 3 жыл бұрын
' घिरट ' पहिल्यांदाच पाहिलं . खुप सुंदर माहिती मिळाली . कोकणी जीवनाचं आकर्षण आहे ते आणखी वाढलं . 😃 धन्यवाद ! 🙏
@vibhavarikulkarni8996
@vibhavarikulkarni8996 3 жыл бұрын
हे सगळं अदभुत आहे... तुमचा प्रत्येक व्हिडिओ पाहून हेवा वाटायला लागला आहे आपल्या जुन्या जीवन शैलीचा... तुम्ही करत असलेल्या प्रयत्नांना मनापासून सलाम .🙏
@suryakantgadade803
@suryakantgadade803 3 жыл бұрын
धन्यवाद ही पद्धत तुमच्याकडून पुन्हा सुरू होत आहे त्यामुळे, गेले ते दिवस राहिल्या त्या आठवणी असे म्हणावयास जागा राहणार नाहीत.
@sandeepj5908
@sandeepj5908 3 жыл бұрын
खूपच छान माहिती दिलीत. तांत्रिक व किचकट गोष्टी खूपच सोप्या पद्धतीने समजावून सांगितले. नष्ट होत चाललेला हा अनमोल खजिना तुम्ही नव्या पिढी साठी जतन करून ठेवला.
@Woodartdentist
@Woodartdentist 3 жыл бұрын
वाह छानच... माझ्याकडे अशीच एक वस्तू होती, जुनं घर सोडताना आजीनं कुणाकडे ठेवायला दिली....राम जाणे..त्याला आज्जी *जातीण* असा शब्द वापरायची.. तुम्ही केलेला व्हिडिओ फारच छान झाला आहे.. कांडण, दळण यावरती बेतलेले व्हिडिओ, डॉक्युमेंटेशन करता करण्यासारखे आहेत.. तसेच पारंपरिक शेती मधल्या बऱ्याच गोष्टी, शब्दप्रयोग... नव्या पिढीला दाखवण्यासाठी केलेत, तर पहायला आवडेल.... शुभेच्छा 🙏
@pallavikulkarni6850
@pallavikulkarni6850 3 жыл бұрын
काsssssय भारी ..खजीनाच आहे हा आपल्या पारंपारिक वस्तुंचा...अतिशय उपयुक्त आणि व्यवस्थित माहीतीचा व्हीडिओ केलाय सर आपण..खुsssssssssप कौतुक आपणा उभयतांचे...
@anuradhaprabhu8676
@anuradhaprabhu8676 3 жыл бұрын
व्वा मस्त विडिओ..पर्यावरण पूरक आणि परंपरागत उपयुक्त यंत्र शोधून ते कार्यान्वीत करण्यासाठी तूम्ही केलेले प्रयत्न व कष्ट कौतुकास्पद.. ही जुनी यंत्र उपयुक्त तर आहेतच पण पुर्ण शरीराला व्यायाम देणारी आहेत..शुभम् भवतु सर्वत्र सर्वदा..सदा सुखी सम्पन्न प्रसन्नचित भवl..👍👍
@smitasobalkar4895
@smitasobalkar4895 3 жыл бұрын
खूप छान!तुमचं शेत बघायला यायचय.संपदा ताईंच्या कविता ऐकायला यायचय.दिल के करीब मधली...भाताची शेतातातली लोंबी पेलणारी झाडं अाणि स्टँडिंग ओवेशन...कल्पना खूप भावली
@mahendrachachad6302
@mahendrachachad6302 3 жыл бұрын
हे इतके सविस्तर सांगितले त्याबद्दल धन्यवाद. घिरट्याबद्दल आधी ऐकले नव्हते ते आज कळाले. तुम्ही अगदी सविस्तर गणित मांडलेत.
@satishloke
@satishloke 4 жыл бұрын
खूप स्तुत्य उपक्रम यू ट्यूब वर टाकल्या बद्दल आभारी आहे
@उज्ज्वलाजोशी
@उज्ज्वलाजोशी 3 жыл бұрын
खूप छान काम करीत अहात तुम्ही. जुन्या वैशिष्ट्यपूर्ण जीवन साधनांना असं उजेडात आणत अहात. नवीन पिढीसाठी हे खरोखरच उपयुक्त आहे. तुम्हाला शुभेच्छा!!
@smitavaidya6898
@smitavaidya6898 3 жыл бұрын
घिरटाचा शोध आणि वापर खूपच नावीन्यपूर्ण आहे पण अभिमानास्पद ही आहे. आपण प्रयत्न न सोडता, चिकाटीने तो घिराट चालू केलात हे खूपच छान झाले. शहरी लोकांना तर घिराट माहित नाहीच पण गावाकडच्यांनाही माहित असेल असे वाटत नाही
@ushataichaware8790
@ushataichaware8790 3 жыл бұрын
खुप आवडले लहानपणी आईने जात्यावर गायलेल्या ओव्यांची आठवण झाली जात्यावर दळलेले बाजरी ची चुलीवर भाजलेली भाकरी आणि सडलेल्या तांदळाचा भात वा मस्तच पण सध्या बाजारात उपलब्ध असलेला तांदूळ नकली मिळतोय
@kirteerahatekar1821
@kirteerahatekar1821 3 жыл бұрын
जुनी पण माहीत नसलेली अगदी सविस्तर माहिती मिळाली. खूप छान वाटत होते पहातांना. अश्या प्रकारचा व्हिडीओ टाकल्याबद्दल खूप धन्यवाद.
@archanaindalkar2520
@archanaindalkar2520 3 жыл бұрын
Masta junya गोष्टींना उजाळा अगदी अडगळीत गेलेल्या वस्तूंचा वापर उल्लेखनीय आहे. liziqui चिनी मुलगी जुन्या ट्रॅडिशनल गोष्टींचा वापर करताना दिसते.छान नवी पिढी हे पाहू शकते तुमच्या माध्यमातून congrats
@smitachavande4171
@smitachavande4171 3 жыл бұрын
जात्यावर दळण करणे हा व्यायाम आहे👍
@sunilkadam8475
@sunilkadam8475 2 жыл бұрын
खूपच सुंदर. जुन्या काळात सुध्दा आधुनिकता होती. धन्यवाद सर
@anjalikudtarkar9917
@anjalikudtarkar9917 3 жыл бұрын
खूप च छान. माझ्या लहानपणी मी हे घिरटं माझ्या मामाच्या घरी संगमेश्वर ला पाहिले आहे.
@artisardesai3782
@artisardesai3782 3 жыл бұрын
फारच सुंदर आणि स्तुत्य शोध लावलाय. सलाम
@MAJAGAONKARVIVEK
@MAJAGAONKARVIVEK 4 жыл бұрын
खूपच छान माहिती। असं काही असतं हेच आम्हाला माहिती नव्हतं. आमच्या आत्त्याच्या आणि मावशीच्या गावी पीठ दळायचं जातं तेवढं होतं. लहानपणी मोठया हौसेने त्यात पीठ दळायचा प्रयत्न केल्याचं तेवढं आठवतंय. भात कांडणी साठी गावातील लोकं शेतात खळ करायचे असं ऐकून आहे. तेंव्हा बहुतेक अजून मोठ्या आकाराची दोन दगडे एकमेकांवर बसवलेली असत आणि ते फिरवण्यासाठी बैल जोडलेला असे, असं ऐकून आहे. पण कधी पाहिलं नाही. भविष्यात म्हणजे आत्ता त्याबद्दलची माहिती मिळणार नाही, अशी अक्कल असण्याचं वयही नव्हतं. आत्ता त्याची माहिती मिळणं शक्य आहे पण त्यासाठी साधारण ७५-८० वयाची खेडेगावातील व्यक्ती शोधावी लागेल. तुमचा हा व्हिडीओ पाहून खूपच आनंद झाला. खूप खूप खूप आभारी आहे. 🙂🙏🏻
@farmofhappinessagrotourism
@farmofhappinessagrotourism 4 жыл бұрын
धन्यवाद
@sameerapednekar3961
@sameerapednekar3961 3 жыл бұрын
छान....घिरटाच पुनर्जीवन !...यत्न देवाची अशी scientific mechanical आराधना का नाही बर घिरट पुनर्जीवीत होणार...
@sawantvilas5277
@sawantvilas5277 3 жыл бұрын
खुपच छान विडिओ. कोकणात अजूनही अशाप्रकारची वापरात नसलेली जाती पहायला मिळतात परंतु त्याची जागा मात्र कुठेतरी आड बाजूस असते. पूर्वी हि जाती महिला तांदूळ/भात दळण्यासाठी करत असत. आपण जात्याविषई खुप मोलाची व interesting माहिती दाखवल्या बद्दल खुप खुप धन्यवाद. पुढे पण असेच माहिती पूर्ण विडिओ अपलोड करीत रहा. 👌👌👌👌👌
@rajashreebhatkhande1706
@rajashreebhatkhande1706 3 жыл бұрын
छान माहिती आवडली माझ्या लहानपणी भात घिरट बघितलं अनुभवलं धन्यवाद
@sharadsatam2306
@sharadsatam2306 3 жыл бұрын
Wav kya baat hai khoop chhan , Ghirataaaa
@saiprasadsawant9037
@saiprasadsawant9037 3 жыл бұрын
दादा.. उत्तम चित्रफित, सुरेख असे नियोजन, पुर्वी लोक किती मेहनती होते.. त्याचे व्यवस्थापन किती छान, किती कष्टाळू होते... त्याचे विषेश कौतुक... दादा तुमची भाषा शैली ही अगदी उत्कृष्ट.. मला ही चित्रफित खुप आवडली.
@vishwasphatak8793
@vishwasphatak8793 4 жыл бұрын
आपल्या सुबुध्दिला प्रणाम आपण करत असलेल्या पर्यावरण पूरक यंत्रांच्या पुनरुज्जीवना करता धन्यवाद नमो नमः
@madhavisawant3003
@madhavisawant3003 3 жыл бұрын
खूप छान प्रयत्न केला...घिरट चालू करण्यासाठी उत्तम विचार,तशीच सर्व वस्तूंची जमवाजमव मेहनत याने घिरट फिरताना पाहून खूप आनंद झाला.... धन्यवाद... राहुल दादा 👍👍
@nitinathavale3746
@nitinathavale3746 3 жыл бұрын
तुम्हाला प्रणाम!! अतिशय मोलाचे काम तुम्ही केलंय!! तुमच्या चिकाटी ला सुद्धा प्रणाम !👍👌
@anilkadam6854
@anilkadam6854 4 жыл бұрын
माझ्या लहानपणी आमच्या गावी मी घीरटावर भात भरताना पाहील्याचं चांगलं आठवतंय कारण माझ्यासाठी ती एक गंमत होती अर्थात मी लहान हैतो तेव्हा पण मी पाहिले ते दोघे जण हाताने भरताना आणि चांगले आठवते चर्या घीरटाखाली घीरटाच्या आकाराचा वितभर उंचीचे पाय असलेला घीरटाचा पाठ म्हणुया हवं तर आणि दोघेजण आळीपाळीने हात बदलून भात भरताना ची चीत्रफीत अजून ही माझ्या आठवणीत आहे.तुमचा प्रयत्न (भगिरथ)स्तुत्य आहे खरंच मला सुद्धा असे मातीशी जोडुन रहायला आवडतं तुमचं हे नंदनवन अनुभवायला आवडेल मला परवानगी असल्यास.
@rashmidalvi4635
@rashmidalvi4635 2 жыл бұрын
खूप छान माहिती. माझ्या कडे आहे, मी तो छान जतन करून हॉल मधे शो साठी ठेवला आहे. मी वापरही पूर्वी केला आहे
@meenakshighosalkar5593
@meenakshighosalkar5593 3 жыл бұрын
खूप छान माहीती मिळाली.मस्त👌👌
@sangitabhosale2333
@sangitabhosale2333 3 жыл бұрын
खूप छान व्हिडिओ.खूप छान यशस्वी प्रयत्न.अश्या प्रकारचे पौष्टिक अन्न जुनी पाढी खात होती म्हणून त्यांचे आरोग्य चांगले होते.म्हणून ते दिर्घायुषी होते.आमच्याकडे जाते ,मुसळ अजूनही आहे .
@chhayashetage6747
@chhayashetage6747 4 жыл бұрын
फार छान माहिती पुन्हा निसर्गाकडे जाण्याची सुरुवात #backtonature
@pragikeskar6140
@pragikeskar6140 3 жыл бұрын
निव्वळ अप्रतिम. असेच घिरटे आमच्या इथे ही आहे
@neelamrajagopalan4793
@neelamrajagopalan4793 3 жыл бұрын
खूपच चांगला व्हिडिओ आहे. मला सिंगल पॉलिश तांदूळ आवडतो. मुबई ग्राहक पंचायतचे वाण सामान ह्यात हा तांदूळ मिळतो. लहानपणी तांदळाची भाकरी करण्यासाठी माझी आई जात्यावर दळण करायची ते आठवल
@shubhangikarav2372
@shubhangikarav2372 3 жыл бұрын
खुप छान, आम्ही तर हे पहिल्यांदा च पाहतोय, धन्यवाद
@sadhanakakirde3694
@sadhanakakirde3694 3 жыл бұрын
खुपच सुंदर.माझ्या आजोळी असा घिरट होता.मी त्याच्यावर आवड म्हणुन बाकिच्या माणसांबरोबर घिरटण्याचा अर्थात भात, प्रयत्न केला आहे.माझ आजोळ रत्नागिरी जिल्हा पानवळ आहे खेडेगाव आहे.खुप छान आठवणी लहानपणच्या आल्या. तुमच्या सारख एकच घर आमच आजोळच आहे.वाडीसमाज लांब आहे.खुप सुंदर घर.निसर्गाच्या कुशीतल.खुप आवडत.
@vinyakvele6730
@vinyakvele6730 Жыл бұрын
उत्तम माहिती काळाची गरज
@dnyaneshpakhare
@dnyaneshpakhare 3 жыл бұрын
खूप छान माहिती दिली,जुनं ते सोनं.👌
@justanagha3040
@justanagha3040 3 жыл бұрын
सुरेख माहिती दिलीत. Design oriented task.. Not simple as it seems..
@Rahulpatil-lk7xh
@Rahulpatil-lk7xh 3 жыл бұрын
अप्रतिम माहिती दिलीत दादा...🙏 तुमच्या मेहनतीला खरोखर मनापासून सलाम...
@Sona-jv7bc
@Sona-jv7bc 3 жыл бұрын
Khup chhan.
@chitrapendse
@chitrapendse 2 ай бұрын
मोठ जातच ते. छान माहितीपूर्ण video
@swapnapurandare1938
@swapnapurandare1938 3 жыл бұрын
Khup chan mahiti dilit Rahul Dada tumhi,amchakadhey lagant muhurtala pahilada (Jaat) madhey sarv prkarchi dhaney ghalun tala ambacha tal lavtat navri Ani ghratil saglani tavar dalachey ta pithala gharpeeth mantat,bhatacha ghirtavrun hey nav tala padal aseyl ,parat yakda manapasun 🙏🙏🙏🙏
@vishalmoon6629
@vishalmoon6629 3 жыл бұрын
Wah sur अप्रतीम महीती दिली आहे...
@sulbhasathe9596
@sulbhasathe9596 3 жыл бұрын
खूप उपयोगी माहिती आणि सांगण्याची पद्धत पण छान
@sujatadeshpande1507
@sujatadeshpande1507 3 жыл бұрын
खूप छान आणि नवीन माहिती
@vk8554
@vk8554 3 жыл бұрын
आपण खूप चांगली माहिती दिलीत घिर्ताच्या जुन्या आठवणींना पुन्हा नव्याने उजाळा दिलात धन्यवाद
@bhandaremeera9348
@bhandaremeera9348 3 жыл бұрын
तुम्ही खरच छान काम केलं आहे आता आणखी एक करु शकता या मध्ये सुधारणा करुन आधुनिक पध्दतीने म्हणजे वीजेवर चालणारे घिरटे तयार करुन ते लोकांन पर्यत पोहचवा सध्या सिमेंट च्या घराला आडे कुठून येणार मना पासून धन्यवाद व्हिडीओ साठी
@shobhabhise6797
@shobhabhise6797 3 жыл бұрын
घिर्ट पहिल्यांदाच पाहिलं, खूप छान माहिती आपण आम्हास पुरवली त्याबद्दल धन्यवाद
@9960314368
@9960314368 3 жыл бұрын
khup chhan mahiti milali...tumche aabhar
@deepashivalkar2586
@deepashivalkar2586 3 жыл бұрын
खूपच अभ्यासपूर्ण आणि मेहनत घेऊन बनविलेला अतिशय उत्कृष्ट व्हीडिओ माझ्या रोहा अष्टमी येथील 100 वर्षं जुन्या घरात सदर घिरट आहे
@anitamahadik1534
@anitamahadik1534 3 жыл бұрын
Khoop sunder maahiti 👌
@meeramohite8808
@meeramohite8808 4 жыл бұрын
तुम्ही माहिती खुप छान सांगता इतकी की ज्याला यातल काही माहित नाहि ती व्यक्ती सुध्दा समजू शकते की हे काय आणि कस वापराय च त्यामुळे प्रभावित होवून मंडळी शेतीकडे वळू शकतात शेतीला कनिष्ठ म्हणण्याच जी पध्दत होवू लागलीय त्याला नक्कीच आळा बसू शकेल खुप मोठ काम करता य तुम्ही आभारी आहोत इतकी छान आणि सुसंगत माहिती दिल्याबद्दल
@smitachavande4171
@smitachavande4171 3 жыл бұрын
खरच तुम्ही जुन्या आठवणींना उजाळा दिला धन्यवाद 🙏👍
@vidyatawde5613
@vidyatawde5613 3 жыл бұрын
स्पष्ट आणि मोजक्या शब्दात वर्णन केले, फारच सुंदर,
@rajkhatu2661
@rajkhatu2661 3 жыл бұрын
Thanks for taking efforts to reintroduce traditional gadget. I have used this when I use to live in Konkan, India. If you make the top ceiling wooden piece hole bigger at the bottom like upside down bucket, it makes bamboo rotation smooth. The 45 degree angle hole makes less friction which is easy on your shoulders. Keep up the great work.
@solution1930
@solution1930 3 жыл бұрын
खूप खूप सुंदर. 👍👍👍👍👍👍
@alkatawade8395
@alkatawade8395 3 жыл бұрын
खुपच छान माहिती दिली आहे.
@atulpimple8003
@atulpimple8003 3 жыл бұрын
तुमचे प्रयत्न आणि कळकळ मनास भावली.
@vinitadeshpande7374
@vinitadeshpande7374 3 жыл бұрын
फारच छान...छान माहिती सांगितली...न पाहिलेल्या लोकांना ही समजेल
@vanitakulkarni3569
@vanitakulkarni3569 3 жыл бұрын
आपल्या पारंपारिक वस्तू संग्रहालयातही जे दिसतं कठीण झालं आहे ते प्रयत्नपूर्वक शोधून काढलं त्याचं करावं तितकं कौतुक कमी आहे. आपले शतशः आभार 🙏
@Mujawarjibran
@Mujawarjibran Жыл бұрын
Khoop sundar mahiti dili
@bharatiparanjpe4789
@bharatiparanjpe4789 4 жыл бұрын
जुन्या अवजाराचे पुनरुज्जीवन केलेत...कमाल आहे तुमची ...मनापासून आवडलं...अभिनंदन
@govindfatik606
@govindfatik606 3 жыл бұрын
छान, पुन्हा जुन्या जगात वावरल्या सारखे वाटले
@rohitshembavnekar6437
@rohitshembavnekar6437 3 жыл бұрын
मस्त! खूप छान व उपयुक्त माहिती!!
@pritisawant6947
@pritisawant6947 3 жыл бұрын
राहुल दादा, तुमच्या कल्पक बुध्दीमुळे ते शक्य झाले
@MahadevBandkar
@MahadevBandkar 4 жыл бұрын
खुप छान माहीती दिलीत सर हे जे आम्हच्या नवीन पिढीला माहीत नसलेल्या गोष्टी आहेत. असेच उपयोगी व्हिडिओ आपल्याकडून बघण्यास मिळतील ही आशा
@vaishalideshmukh7810
@vaishalideshmukh7810 3 жыл бұрын
खूपच छान माहिती. आणि घिरटासाठीचा तुमचा ध्यास वाखाणण्याजोगा. आम्हि शेतकरी नाहि पण पहायला आवडेल.👌👌👌gr8 job.👍
@shirishbhagwat6355
@shirishbhagwat6355 4 жыл бұрын
खूप छान व्हिडिओ झाला आहे. भाताचे घिरट पुनरुज्जीवित करण्यासाठी तुम्ही अफाट मेहनत घेतली आहे.
@chinmayilimaye455
@chinmayilimaye455 3 жыл бұрын
फारच सुंदर 👏👏
@veenaparalikar1095
@veenaparalikar1095 3 жыл бұрын
खासच, खूप छान माहिती
@minakshichouthe275
@minakshichouthe275 3 жыл бұрын
Abhinandan Bhau farch chhan kam kelet ghirtala punrujjivn deun. Gava gavat ashi bhat sadun denyachi soy Zali tr bre hoil. Lokanna yogya bhavat ha bhat uplbdh zala tr ha bhat khanaryanchi sankhya vadhel. Baher ha bhat far mhag aslyane fkt paisewale lokch yacha fayda gheu shaktat.
@snehalparsekar5481
@snehalparsekar5481 3 жыл бұрын
खूप छान माहिती 👌👌👍
@vc7850
@vc7850 3 жыл бұрын
Wow khup chan video dwara mahiti 👍👍🙏
@ahaanjadhav5703
@ahaanjadhav5703 3 жыл бұрын
Mala tumchyamadhye isha sadguru distat. Greatman.
@chhayag.434
@chhayag.434 3 жыл бұрын
फारच उत्तम
@sumedhasubhash
@sumedhasubhash 3 жыл бұрын
खूप छान
@r.marathe1716
@r.marathe1716 3 жыл бұрын
*.......सादरीकरण व उच्चार अतिशय स्वच्छ.....शुद्ध......* *......अभिनंदन.....*
@manalidate5146
@manalidate5146 3 жыл бұрын
Khupach Sundar video. Aamachyahi dnyanat bhar padali. Manapasun dhanyawad🙏
@prashantmodak9422
@prashantmodak9422 2 жыл бұрын
सर एक नंबर व्हिडिओ बनवला
@sharadhardas5568
@sharadhardas5568 4 жыл бұрын
खुप छान . आपण शेतीसाठी सर्व प्रयत्न करीत आहात. निसर्गाच्या जवळ.
@shailajabharambe9394
@shailajabharambe9394 3 жыл бұрын
wow tumache video pahun mala aamache farm aathavale. aamhi pan barech vegavegalya pikache anubhav ghetalet. falache sarv prakar lavale hote. vayamule ani aajaramule sarv vikun takave lagale. te sarv aathavale..
@manasimandlik72
@manasimandlik72 4 жыл бұрын
खूप छान माहीती ..जुने अवजार परत महितीसकट चालू केले .. Salute to your hard work ..
@nandaambre6460
@nandaambre6460 3 жыл бұрын
Aam chya gari pan girat ahae
@lolitaloke6741
@lolitaloke6741 3 жыл бұрын
तुमचे कौतुक करावे तेवढे थोडेच You are great
@prachiscuisine
@prachiscuisine 3 жыл бұрын
Amazing 🙏🏻🙏🏻🙏🏻 tumche efforts ani te share karnyachya ichhela salaam
@siddhaifoodhealth605
@siddhaifoodhealth605 3 жыл бұрын
खूपच सुदंर माहिती
@aparnagonate9978
@aparnagonate9978 3 жыл бұрын
Apratim video. Aamchya sarkhya Sheti Karu icchinarya pan jasti awareness nasnarya lokan saathi hi parbhanich ahe. Thanks a ton for sharing such meaningful videos
@Rohi033
@Rohi033 Жыл бұрын
हो मी पण पाहीले आनी एक वेली ३ स्त्रीया त्यवर काम करतन पाहीले आहे. khup lucky samjato ki haya goshti अनुभवल्या आहेत.ani mazya mulana pan sangato.
@shitalavachar3359
@shitalavachar3359 3 жыл бұрын
खुप छान माहिती दिली
She'ti' Sadhya Kaay Karte - 5 शे'ती' सध्या काय करते - ५
34:21
Farm Of Happiness Agro Tourism Home stay
Рет қаралды 122 М.
Это было очень близко...
00:10
Аришнев
Рет қаралды 6 МЛН
How it feels when u walk through first class
00:52
Adam W
Рет қаралды 26 МЛН
REAL 3D brush can draw grass Life Hack #shorts #lifehacks
00:42
MrMaximus
Рет қаралды 12 МЛН
How I Turned a Lolipop Into A New One 🤯🍭
00:19
Wian
Рет қаралды 13 МЛН
The Most Mysterious Mountain in The World | Mount Kailash | Harry Sahota
17:09
How can a small farmer earn Rs 15 lakh from multilayer farming?
11:03
Down To Earth
Рет қаралды 3,2 МЛН
शे'ती' सध्या काय करते - ६ (She'ti' Sadhya Kaay Karte - 6)
27:21
Farm Of Happiness Agro Tourism Home stay
Рет қаралды 81 М.
Это было очень близко...
00:10
Аришнев
Рет қаралды 6 МЛН