Рет қаралды 137,153
#BolBhidu #GurugramMotherandSon #covid19
गुरुग्रामच्या सेक्टर २९ मधली मारुती विहार सोसायटी. तसा दाटीवाटीचा भाग, इथं अचानक पोलिसांची एक टीम पोहोचली. त्यांच्या सोबत आरोग्य विभागाची, चाईल्ड वेलफेअरची टीमही होती. त्यांनी एका घराचं दार बराच वेळ वाजवलं, मात्र दार उघडून पोलिसांना घरात प्रवेश द्यायला मात्र विरोध होत होता. शेवटी पोलिसांनी घरात प्रवेश मिळवलाच आणि समोर जे दिसलं ते बघून पोलिस, सोबतच्या टीम्स आणि त्या घराचा मालक सगळ्यांनाच धक्का बसला. घरात सगळीकडे कचऱ्याचं साम्राज्य होतं, कागदाचे तुकडे, रिकामी फूड पॅकेट्स, क्लिनिंग लिक्विडच्या किमान डझनभर बाटल्या, अस्ताव्यस्त पसरलेले कपडे अशी सगळी परिस्थिती. हे घर उघडलं गेलं होतं तब्बल ३ वर्षांनी आणि या घरात राहत होती दोन माणसं. एक जवळपास ४० वर्षांची महिला आणि तिचा १० वर्षांचा मुलगा. आपल्या मुलासकट स्वतःला कोंडून घेण्याचा निर्णय या महिलेनं का घेतला असावा ? यामागचं नेमकं कारण काय होतं ? जाणून घेऊ या व्हिडिओमधून.
Subscribe to BolBhidu here: bit.ly/SubscribeBolbhidu.com
Connect With Us On:
→ Facebook: / bolbhiducom
→ Twitter: / bolbhidu
→ Instagram: / bolbhidu.com
→ Website: bolbhidu.com/