Рет қаралды 377,478
ही युगायुगांची नाती, हळव्या प्रेमाची महती
सागर ही थांबे तेव्हा त्या एका थेंबासाठी
अधिऱ्या लहरी तालावरी नाचती
मेघांच्याही मनी कसे सातरंग हासती
वारा हळवा झुळूझुळू वाहतो
मोहरून पाण्यामध्ये प्रतिबिंब पाहतो
लाटा सागराला साद देती
रुपेरी वाळूवरी सोनियाचा बंगला
बांधताना प्रीतीमध्ये जीव माझा गुंतला
सागरी तळाशी एक वेडा शिंपला
घरकुल मोतियांनी सजवाया थांबला
दे ना प्रेमधारा तूच स्वाती
गीतकार : , गायक : अनुराधा पौडवाल - सुरेश वाडकर, संगीतकार : अशोक पत्की, गीत संग्रह / चित्रपट : वाजवा रे वाजवा