Рет қаралды 653
कोकणातील रहस्यमयी राजापूरची गंगा | रहस्यमय 14 कुंड शिवाजी महाराजांनी येथे भेट दिल्याचे सांगितले जाते
उन्हाळे येथील गंगा (राजापूरची गंगा)
कोकणात राजापूर जवळ उन्हाळे या गावात राजापूरची 'गंगा' प्रसिद्ध आहे. जांभ्या दगडाच्या तटबंदीच्या आत एकूण चौदा कुंड आहेत. त्यातील काशी कुंड हे मुख्य आहे. ह्या सर्व कुंडांतून पाणी वाहू लागले, की ‘राजापूरची गंगा आली’ असे म्हणतात. तटबंदीच्या प्रवेशद्वारातून आतमध्ये गेल्यावर दीपमाळ दिसतो. समोरच काशीकुंड व गोमुख आहे. बाजूला वडाच्या झाडाखाली कुंड आहे त्याला 'मूळ गंगा' कुंड म्हटले जाते. या मूळ कुडांतूनच गंगेचे पाणी वाहत असताना दिसते. यातून प्यायला पाणी घ्यावयास हरकत नाही. स्वच्छ, नितळ पाणी प्यावयास मिळते. आणि नंतर इतर कुंडातून या पाण्याचा प्रवास सुरू होतो. जमिनीतील हालचालींमुळे किंवा जमिनीतील पाण्याच्या प्रवाहाच्या हालचालींमुळे हे कुंडातील पाणी प्रवाहित होत असावे, असे म्हटले जाते. या ठिकाणी जाण्याची ही दुसरी वेळ. पहिल्या वेळेची छायाचित्रे नाहीयेत.
शिवाजी महाराजांनी या ठिकाणी भेट दिल्याचे सांगितले जाते. राजापूरच्या मुक्कामात महाराजांनी बहुधा श्री गंगेचे दर्शन घेतले असावे. रानडे हे महाराजांचे तेथील तिर्थोपाध्याय होते, असे उल्लेख आढळतात.
राजापूरची गंगा हा अनेक संशोधकांसाठी अभ्यासाचा विषय आहे. प्राचीन काळापासून येथे गंगा अचानक उगवते आणि वाहू लागते म्हणून हे ठिकाण भूवैज्ञानिक आश्चर्य मानले जाते. त्यात 14 कुंडे आहेत. 1. सूर्य कुंड 2. बंदी कुंड 3. यमुना कुंड 4. सरस्वती कुंड 5. नर्मदा कुंड 6. चंद्र कुंड 7. गोदावरी कुंड 8. कावेरी कुंड 9. कृष्ण कुंड 10. अग्निकुंड 11. भीमा कुंड 12. चंद्रभागा कुंड 13. मूल गंगा कुंड 14. काशी कुंड प्रत्येक कुंडातील पाण्याची प्रत्येक नदीची गुणधर्म आहे ज्यासाठी तिला नाव दिले आहे, ज्यात तिची चव आणि तापमान समाविष्ट आहे. प्रत्येक कुंडातील पाण्याची पातळीही वेगळी असते. मंदिराच्या मध्यभागी काशी कुंड आहे.
Kokan vlog and receptie
#rajapurganga2024 #rajapur #rajapurganga #water #freshwater #mahadev #maharashtra #sahyadrimountains #kokanacha_nisarga #kokan #ratnagiri #mahadev #ganga #kashi #banaras #holi #holispecial #safarWithSwapnil
#tv9marathilive #lokmat #news