मुरुड - जंजिरा खरंतर राम पाटलांनी... । Murud Janjira killa। मुरुड जंजिरा । gadkille

  Рет қаралды 768,482

RoadWheel Rane

RoadWheel Rane

Күн бұрын

किल्ले मुरुड जंजिरा अकराव्या शतकात एका मुस्लीम राज्यकर्त्याने बांधला असं तेथील काही स्थानिक सांगतात. मात्र राम पाटलांनी मोठ्या हिमतीने मेंढेकोट उभारला जो पुढे जाऊन जजिरा ए मेहरुब झाला. किल्ल्यावर ५७२ तोफा आहेत. कलाल बांगडी त्यापैकी एक. किल्ल्यावर एक भुयारी मार्ग आहे मात्र त्याबद्दल फार कमी लोकांना माहितीय. हा व्लॉग त्या सर्व गोष्टी उलगडेल..
#roadwheelrane #gadkille
---
Follow Us -
Twitter - / rwrane
Instagram - / roadwheelrane
Facebook - / roadwheelrane
KZbin - / @roadwheelrane
-----
Join this channel to get access to perks:
/ @roadwheelrane

Пікірлер: 1 500
@dvd3322
@dvd3322 10 ай бұрын
मी विव्हस बघितले फक्त २२८k आहेत जवळपास १०m विव्हस गेले पाहिजेल या व्हिडीओ ला खूप छान माहिती दिली आहे…❤
@arunhirlekar4516
@arunhirlekar4516 10 ай бұрын
O❤
@KashinathP-zn4fh
@KashinathP-zn4fh 10 ай бұрын
​@@arunhirlekar4516ok I will send you the link to the 😊
@mohanDevkule-xb6nr
@mohanDevkule-xb6nr 10 ай бұрын
Khup chan
@ankushtawade1188
@ankushtawade1188 10 ай бұрын
खूप छान माहिती धन्यवाद
@mangeshraikar6058
@mangeshraikar6058 10 ай бұрын
​@@arunhirlekar4516😊mo 1:16
@rahuldeshpande4938
@rahuldeshpande4938 7 ай бұрын
अप्रतिम!!! इतक्या तळमळीने तूच हे करू शकतोस मित्रा. इतक्या सुंदर रीतीने तूच ह्या किल्य्याची सफर घडवू शकतोस . बाकी पाण्याच्या प्लास्टिक बाटल्यांबद्दल आपल्या पर्यटकांना धन्यवाद द्यायला हवे आहेत. जातील तिथे स्वतःच्या खुणा सोडायला अभिमान वाटतो ह्यांना. वेरूळ लेण्यांमध्ये जागोजागी पाट्या लावल्या आहेत कि मूर्ती आणि कोरीव कामावर चढू नका . तिथे काही महान लोक स्वतःच्या बायका पोरांना बसवून फोटो काढत होते. त्यांना सांगायला गेले तर उलट उत्तर द्यायला मागे पुढे पाहत नाहीत.
@sadashivjinde6207
@sadashivjinde6207 7 ай бұрын
खूप छान वाटलं तुम्ही जी माहिती दिलात. पहिल्यांदा मला जंजीर्यावर न जाता पाहता आला. भविष्यात नक्कीच फ्लान करू जंजीरा पाहण्याचा .❤
@Allu6576
@Allu6576 6 ай бұрын
पोरा, तुझी किल्ला दाखवायची ओढ पाहिली. खरच खुप मेहनत आणी कष्ट घेतलेस. तुझी दमछाक होत असूनही तू फिरून किल्ला जवळपास सर्व दाखवलास. आम्ही तुझे खुप खुप ऋणी आहोत.
@arunayadav4356
@arunayadav4356 Ай бұрын
मी किल्ला फक्त पाहिला पण तुम्हि जिवंत करुन दाखवला तुमच्या मोहिमेला लाखलाख शुभेच्छा रामकृष्ण हरि
@gunvantgaikwad7221
@gunvantgaikwad7221 4 ай бұрын
प्रत्येक्ष जाऊन सुधा आम्हाला एवढं बघता आलं नसतं तुझ्यामुळे ते पूर्ण बघता आलं धन्यवाद भावा 🙏फार चांगले काम आहे तुझे all the best
@ShekharDomale
@ShekharDomale 10 ай бұрын
मी ६ वेळेस गेलो, पण आज मित्रा फक्त तुझा मुळे संपूर्ण किल्ला माहित झाला मनापासून आभार धन्यवाद
@vishaldaberao3615
@vishaldaberao3615 6 ай бұрын
Ekda gela ki punha jayla awdat nahi
@MalvaniLife
@MalvaniLife 11 ай бұрын
खूप सुंदर व्हिडीओ ....... ५० मिनिटे कधी संपली कळली नाहीत. खरच कौतुक तुझं 👍👍👍
@RoadWheelRane
@RoadWheelRane 11 ай бұрын
मनापासून आभार दादा!❤💪🏻 अशीच साथ रव्हांदे. देव बरे करो. जय शिवराय.. जय कोकण🔥
@dattatraykondhalkar5125
@dattatraykondhalkar5125 7 ай бұрын
अतिशय सुंदर खरा आणि सोपा इतिहास सांगत आहात जय
@seemapatil7555
@seemapatil7555 7 ай бұрын
खूप छान माहिती दिली सर्व प्रथम तुम्हाला व तुमच्या टीमला मनापासून धन्यवाद हा किल्ला मी बाहेरून पाहीलाय किल्ला चे संपूर्ण दर्शन आज झाले धन्यवाद 🎉
@swapnapatil717
@swapnapatil717 9 ай бұрын
मी दोन दा जंजिरा किल्ला बघितला पण आपण जसा बारकाव्यानी दाखवलात तसा नाही फार छान पध्दतीने दाखवलात व माहिती दिलीत
@ganeshgawale09
@ganeshgawale09 11 ай бұрын
खरच गडांची येवढी Deep माहिती आतापर्यंत कोणीच नाही दिली आणि असा इतिहास आतापर्यंत तुमच्या शिवाय कोणिही समजाउन सांगितला नाही ❤ खूप खूप धन्यवाद ❤❤ Good job 👍 💝
@RoadWheelRane
@RoadWheelRane 11 ай бұрын
खूप खूप आभार!❤🙏🏻 आपल्या मित्रपरिवारासोबत व्हिडीओ आवर्जून शेअर करा. जय शिवराय..
@vijayprabhakar2016
@vijayprabhakar2016 7 ай бұрын
खरच खुप छान प्रकारे माहिती दिलित तुम्ही तुमच्या सारखे धाडसी जे कोणत्या ही प्रकार ची भीति न बाळगता किल्ल्याची आगदी बरकाई ने माहिती देतात खरच तुमच्या मुळेच आम्हाला घर बसल्या किल्ल्या चे दर्शन घडते पण एक सल्ला आहे हे सर्व जिवाला सांभाळून करत जा ही विनंती जय भवानी जय शिवजी ......!
@reshmabhoir7226
@reshmabhoir7226 4 ай бұрын
Mhanunch killyancha abhyas pahije mhanje maharajanchi ajun jast mahati Ani kirti kalel
@ushasardar367
@ushasardar367 9 күн бұрын
खरोखर खूपच छान प्रकारे किल्ला फिरून दाखवलात. किल्ल्याची माहिती करून दिलीत. खूप खूप धन्यवाद. पण एका गोष्टीच वाईट वाटते पूर्वीच्या काळी माणसानी डोकं वापरून इतके छान बांधकाम केलं. त्याची पडझड आपण अजूनही सुधारू शकलो नाहीं. वाईट वाटते. पुन्हा एकदा धन्यवाद तुम्हाला. 🌹👍💐👍💐🙏🌹🙏
@surendraberad3465
@surendraberad3465 10 ай бұрын
खूपच सुंदर,बारकावे चित्रित करून आपण विडिओ तयार केला आहे,बघून मन समाधान झाले।thanks
@hanumantkale6190
@hanumantkale6190 11 ай бұрын
मी 2,3 वेळा किल्ला पहिला आहे ,मात्र असे दर्शन आणि अशी सखोल माहिती प्रतक्ष भेटीत सुद्धा मिळाली नाही,आपला हा एक उत्तम प्रयत्न आहे.नक्कीच तो यशस्वी झाला आहे, खूप खूप धन्यवाद,पुढील कार्यास शभेच्छा .
@pradiphandge1441
@pradiphandge1441 10 ай бұрын
बोट वाले चुकीचा इतिहास सांगतात मुळात हा किल्ला नक्की सिद्धी ने बनवला नसेलच, म्हणे दर्गा मुळे हा किल्ला बांधला असं सांगतात बोल वाले
@ManikraoKunte
@ManikraoKunte 8 ай бұрын
खूप छान सुंदर आहे आपली हिंडिओ पोस्ट आवडली अभिनंदन करतो आपले खूप छान आपण आपल्या हिंडिओ मधील आश्चर्यकारक गोष्ट म्हणजे कोपरा न कोपरा आपण जंजिरा किल्ल्याचा इतिहास आणि संस्कृती जतन सुंदर आहे आपली हिंडिओ पोस्ट आवडली अभिनंदन करतो आपले
@gajanandate8799
@gajanandate8799 11 ай бұрын
फारच छान व महिती पूर्ण होत सफर घरबसल्या घडवून आणली आहे. धन्यवाद.
@VijayaSelukar-k8y
@VijayaSelukar-k8y 7 ай бұрын
मुरुड जन्जिरा किल्ला बघण्याची खुप इच्छा होती पण तुम्ही दाखवताना असे वाटले की मो स्वता फिरुन संपुर्ण किल्ला बघत आहे खुप छान महीती दिली धन्यवाद🙏🙏👌👌
@vishwasdhankar1985
@vishwasdhankar1985 10 ай бұрын
फार फार आभार समोरचा किल्ला दाखवा जो पाहणे जवळ पास सर्वांना शक्य नाही पुनः आभार
@RoadWheelRane
@RoadWheelRane 10 ай бұрын
याठिकाणी kzbin.info/www/bejne/Z56zaoKsaseFp6csi=IDbGC_kXH62XqBhh पद्मदुर्ग पाहता येईल..
@dipakagre5584
@dipakagre5584 8 ай бұрын
खूप छान पद्धतीने आपण या किल्ल्यामागील झालेला इतिहास सांगितला आहे जय भवानी जय शिवराय 🚩🚩🚩
@abhijitgavankar5657
@abhijitgavankar5657 11 ай бұрын
एकदम जबरदस्त माहिती दिली तुम्ही. बरीचजण किल्ला फक्त वरवर फिरतात पण तुम्ही त्या गोष्टी दाखवल्या जिथे लोकं जायला घाबरतात. अप्रतिम माहिती दिली. धन्यवाद 🙏
@manishawagh4749
@manishawagh4749 11 ай бұрын
खरंच खूप आनंद दिला छान वाटलं ❤❤
@sureshpradhan1997
@sureshpradhan1997 11 ай бұрын
@@manishawagh4749 एकदम मस्त झाली सफर Suresh pradhan Thane
@satishjadhav3376
@satishjadhav3376 11 ай бұрын
Very nice discription of Janjira.when i visited i just saw it without knowing what is what.Thanks for the detailrd info.
@Bestisnext1947
@Bestisnext1947 11 ай бұрын
तुमच्या डोळ्याने जंजिरा पाहिला एक वेगळा अनुभव पण मेहनत जाम केलीस यार मानाचा मुजरा❤
@vijaybandekar1530
@vijaybandekar1530 11 ай бұрын
प्रत्यक्षात जागेवर जाऊन बघीतल्याचा आनंद मीळाला
@digambarsathe8026
@digambarsathe8026 10 ай бұрын
अतीशय उत्तम माहिती दिली फारच आवडली किल्ल्यावर न जाता किल्ला पाहीला धन्यवाद
@rameshjavir2435
@rameshjavir2435 10 ай бұрын
खूप चांगलं निवेदन उत्तम दुर्ग भ्रमंती योग्य प्रकारे मार्गदर्शन एक दुर्गम गड किल्ला पाहिल्याचा खूप आनंद झाला धन्यवाद खूप खूप आभारी
@prakashbhosle7391
@prakashbhosle7391 9 ай бұрын
अतिशय कष्ट करून, मेहनत घेऊन तुम्ही आम्हाला जंजिरा किल्ला दाखविलात, तिथे जाऊन सुध्दा आम्ही एवढी माहिती घेवू शकलो नसतो, धन्यवाद भाऊ. 🙏🙏🙏
@pratapmali906
@pratapmali906 11 ай бұрын
🙏🙏नमस्कार. भाऊ. 🙏🙏 जंजिरा.. किल्लाची, माहिती. छान. समजून. दिली. आपण... किल्ला. बदल. किती. गोष्टी. दाखल.. जे. बर्याच. लोकांना.जाऊन.सुध्दा.माहीती.. नाही. जसे की. भुयारी. मार्ग. .. महादेव.. मदीर.. 🙏🙏. गडावर.. महादेव.. मंदीर... आहे... हे. आजपर्यंत.. कोणिही.. आपल्या. व्हिडिओ. त. दाखल. नाही... त्या. बद्दल. आपले.. खुप खुप.... धन्यवाद.. 🙏🙏 भाऊ... आपल्या... सर्व टिम ला. पुटील. वाटचाली करीता. शुभेच्छा. 🙏❤🙏.
@kirtichopade4553
@kirtichopade4553 7 ай бұрын
जय शिवराय जय शंभुराजे.🎉🎉 खूप मेहनत घेत पण किल्ला दाखवलात खूप खूप आभार आणि धन्यवादजी🎉
@aneshmokal8263
@aneshmokal8263 11 ай бұрын
सर्व माहिती व्यवस्थित सांगितली आहे आणि विडीओ देखिल मस्त बनवला आहे .
@avinashkarode5243
@avinashkarode5243 7 ай бұрын
खूप छान, सविस्तर माहिती दिलीत. इतिहास देखील समजला. धन्यवाद.
@sunilsonawane7171
@sunilsonawane7171 8 ай бұрын
अतिशय सुंदर माहिती पण खूप छान प्रत्यक्ष किल्ला पाहिल्याचा अनुभव आला
@tanajishivale6058
@tanajishivale6058 10 ай бұрын
जबरदस्त effort घेतलेत, त्याबद्दल अभिनंदन पूर्ण जंजिरा दाखवल्या बद्दल आभार जंजिरा ची भव्यता व महत्व आज लक्षात आणून दिले, महाराज या किल्ला घेण्यासाठी का आतूर होते हे लक्षात आलं खूप छान वाटलं, धन्यवाद
@baliramkoigade7296
@baliramkoigade7296 11 ай бұрын
छान माहिती दिलीत त्याबद्दल आम्ही आपले आभारी आहोत अशी माहिती पद्मदुर्ग ची मिळावी
@nitinjoshirao6038
@nitinjoshirao6038 8 ай бұрын
५ ते ६ वर्षांपुर्वी मी माझ्या परिवारा बरोबर हा अभेद्य किल्ला पहायला गेलो होतो, पण समुद्री तुफाना मुळे, त्या दिवशी बोटि बंद होत्या. अर्थातच किल्ला पाहता आला नाही. तुझे उत्तम सादरीकरण, इतीहासाचा अभ्यास आणि तुझ्या माहिती प्रदान ब्लॉग रुपाने प्रत्येक्ष किल्ला पहायला मिळाला. तुझे आणि तुझ्या संपूर्ण टिमचे आभार आणि अभिनंदन. 🙏
@CNKadam
@CNKadam 10 ай бұрын
अप्रतिम चित्रफीत सादर केलीत...⛳ लक्षवेधी नमन...🙏 💪
@govindbote9279
@govindbote9279 2 ай бұрын
महादेवाची पींड आहे किंवा नाही हे दाखविले नाही. गर्वसे कहो हम हिंदु है म्हणणाऱ्यांची दोनही ठिकाणी सत्ता असताना व पुरातत्त्व खाते ही त्यांचेच हाताखाली असताना अशा ऐतिहासिक ठिकाणांचा त्यांना जिर्णोद्वार करता येऊ नये ही भारतासाठी आणि सर्व भारतिय राज्य कर्त्यांसाठी लाजिरवाणी बाब आहे... हर हर महादेव, जय शिवराय... सुंदर माहीती दिल्याबद्दल धन्यवाद.
@atulbhagat9874
@atulbhagat9874 11 ай бұрын
अनिता अतुल भगत खूपच छान माहिती दिली आहे. जय शिवराय जय शंभूराजे जय महाराष्ट्र
@DattaPatankar-k5g
@DattaPatankar-k5g Ай бұрын
तुमची किल्ला दाखवण्याची पद्धत खूपच आवडली.त्यामुळे शेवट पर्यंत उत्सुकता वाढतंच गेली.धन्यवाद बेटा .खरंतर हा पाटलाचा वाडाच म्हणायला पाहिजे. पूर्वीचा वाडा नंतर झालेला किल्ला....I ❤ patlaca vadha.
@pundlikpawar4201
@pundlikpawar4201 10 ай бұрын
सर्वप्रथम आपले व आपल्या सर्व सहकाऱ्यांचे मन : पूर्वक आभार ❤ . आपण व आपल्या सह सर्वांनीच फारच विस्तृत पण सोप्या शब्दांत आम्हाला घरबसल्या हा मुरुड _ जंजिरा किल्ला अत्यंत मनापासून परिश्रम घेऊन मनापासून समजावून " दाखविला " ' अगदी आपणास बरेच चालून चालून धाप व तहान लागून सुद्धा आपण मध्ये कोठेही विश्रांती न घेता व बराच वेळ पर्यंत पाणी सुद्धा न पीता आम्हाला तन्मयतेने ही ऐतिहासिक सहल " घरबसल्या " घडवून आपली . भविष्यात आपणा सर्वांकडून असेच उदात्त कार्य घडो ; ह्याच आपणा सर्वांना हार्दिक अभिनंदन शुभेच्छा !!!!! अमरावती . महाराष्ट्र . पुंडलीक पवार. 65 .
@anitagokhale8722
@anitagokhale8722 10 ай бұрын
खूप छान आणि परिपूर्ण माहिती दिल्याबद्दल तुमचे आणि तुमच्या चे मनपूर्वक आभार... खर तर माझं हे native place आहे. हे माझं माहेर आहे Murud Janjira तरीसुद्धा मी हा पूर्ण किल्ला पाहिला नाही. मस्त माहिती मिळाली. 👌👌
@arunchandan9948
@arunchandan9948 10 ай бұрын
खूपच भारी माहिती दिली सर आपण आपल्या हिमतीला दाद द्यावी तेवढी थोडीच. अशीच ऐतिहासिक महत्वपूर्ण व्हिडियो बनवावे वा आम्हा म्हातारच डोळ्याचं पारणं फिटलं आपणास व आपल्या सहकारी यांना खूप खूप शुभेच्छा व धन्यवाद
@wadekarsinfonews212
@wadekarsinfonews212 10 ай бұрын
अतिशय सुंदर अप्रतिम वर्णन आपण या ब्लॉगमध्ये केलेले आहे. खरोखर यापूर्वी कोणी बघितलेले नसेल किंवा कोणत्याही लॉग मध्ये त्याचा उल्लेख नसेल असे भुयारी मार्ग बारीक-सारीक गोष्टी शौचालय त्याचबरोबर हमाम खाना त्याच्यासोबत कारागृह महादेवाचे मंदिर बालेकिल्ला या सर्व गोष्टींचा अप्रतिम वर्णन आपण केलेला आहे. खुप खुप धन्यवाद आणि शुभेच्छा
@khushalpatil2155
@khushalpatil2155 7 ай бұрын
🙏🏻तुमच्या सारख्या मावळे मुळे आज इतिहास जिवंत आहे ♥️
@harishandrabhadke2048
@harishandrabhadke2048 7 ай бұрын
मी पण जाऊन आलो पण इतकं काही पहावयास नाही मिळाले.आपण खूप छान माहिती दिली.आणि किल्ला पण दाखवला .खूपच सुंदर.
@honest0007
@honest0007 10 ай бұрын
तुम्ही खुप चांगली माहिती दिली !! १५ वर्षां पूर्वी आम्ही आलो होतो त्यावेळी चुकीचे माहिती दिली होती लोकल गाईड ने !! धन्यवाद दादा !!
@captrock1169
@captrock1169 7 ай бұрын
तीन वेळा भेट दिली आहे इथे पण प्रथम एवढी माहिती मिळाली सलाम आहे तुला काय सांगू तुला परत झुकून मुजरा
@ravimengal9618
@ravimengal9618 11 ай бұрын
मित्रा तु किल्ल्या चा मागचा बाजूला नाही गेला... तिकडे बघण्या सारखं खूप आहे.... एक खूप मोठा दरवाजा आहे किल्ल्याचा... खूप छान आहे तो दरवाजा तिथे खूप काही आहे बघण्या सारखं ❤
@mission687
@mission687 4 ай бұрын
😢
@jaiwantthakur7292
@jaiwantthakur7292 Ай бұрын
खरोखर राणे तुम्ही या गड किल्यांची माहिती खूप छान आणि समजावून सांगता फारच छान 👍👍
@भारतमाताकीजय-थ3म
@भारतमाताकीजय-थ3म 11 ай бұрын
मी दोन वेळा हा किल्ला पाहिला आहे पण इतकी इत्यंभूत माहिती फक्त तुम्हीच दिलात.....तुम्ही हा व्हिडिओ बनविण्यासाठी तुम्ही आणि तुमचे जोडीदार मित्र ( जाधव) यांनी अपार कष्ट घेतले त्या बद्दल समस्त शिवप्रेमी महाराष्ट्रीयन जनता आपली खूप आभारी आहोत ❤❤🎉🎉🎉
@hemantraje387
@hemantraje387 Ай бұрын
शाब्बास बाळ! इतक्या सराईतपणे तुझा किल्ल्यावरचा वावर बघितल्यावर माझी खात्री पटली की,पुर्वजन्मी तूं नक्कीच ह्या किल्ल्याचा रहिवासी असणार! तुम्ही गाइड म्हणून फार महत्त्वाचं काम करत आहात! धन्यवाद!
@tukaramsawant5094
@tukaramsawant5094 11 ай бұрын
असे मोठे व्हिडिओ पाहिजेत अप्रतिम
@KrishnaDeshmukh-i4z
@KrishnaDeshmukh-i4z 5 ай бұрын
एवढ्या बारका इने कोनीही माहिती दिली नाही तुमचे मना पासुन आभार🙏👍
@saurabhp2000
@saurabhp2000 11 ай бұрын
इतके बारकावे पहिल्यांदा कुणीतरी दाखविले . खूप छान पद्धतीने किल्ला दाखविला आणि वर्णन केलं तुम्ही. अतिशय कमी लोकांना हे कौशल्य अवगत असते. पुढील उपक्रमासाठी शुभेच्छा
@VikasVairagal
@VikasVairagal 7 ай бұрын
व्वा...दादा..👌.. मी गेलो होतो जंजिरा किल्ल्यावर पण या तुम्ही दाखवलेल्या गोष्टींमधलं काहीही माहिती नसल्यामुळे पाहता आलं नाही...खूप छान....👌
@max43096
@max43096 6 ай бұрын
गडाचा इतका सखोल अभ्यास करून महिती दिलीस, त्याबाबत तुझे खूप खूप आभार. व्हिडिओ बघताना स्वतः तिथे तुझ्या सोबत आहोत याचा भास होत होता. खूप मस्त काम..
@ashwinidiwekar2227
@ashwinidiwekar2227 24 күн бұрын
आपण या किल्ल्याची माहिती, अगदी छान, आणि अभ्यास पूर्ण दाखवलीय,, त्या बद्दल धन्यवाद,,,
@tukarambhagare8911
@tukarambhagare8911 10 ай бұрын
राणेजी अत्यंत अभ्यासपूर्ण विश्लेषण केले आपणाला राव आवडल
@pushpapawar4422
@pushpapawar4422 8 ай бұрын
एकदम जबरदस्त ,खतरनाक माहिती दिली तुम्ही. मनःपूर्वक धन्यवाद. कारण बऱ्याच वर्षाच माझे स्वप्न होत म्हणून दीड वर्षापूर्वी मी भेट दिली होती . पण आज तुम्ही दिलेल्या माहितीपैकी फार काही अनुभवता आले नव्हते. नावाप्रमाणे भव्य दिव्य अनुभव करता आला नाही. मुढ ऑफ झाला होता. पण आज तुमचा ब्लॉग पाहून मन प्रसन्न झाले. धन्यवाद, धन्यवाद.🙏🙏🙏🙏🙏
@humanity123.
@humanity123. 11 ай бұрын
जय भवानी जय शिवाजी! विचारांपलीकडे कला होती पूर्वीच्या लोकांकडे 🙏🚩
@dipakgorivali1847
@dipakgorivali1847 11 ай бұрын
दादा जय शिवराय. म्हणावं.....शिवाजी नाही
@pramodnimbalkar1097
@pramodnimbalkar1097 11 ай бұрын
Kadak mahiti
@nayanajoshi8616
@nayanajoshi8616 7 ай бұрын
पुष्कळ माहिती मिळाली.खूप तन्मयतेने दाखवली.धन्यवाद
@ganeshkhandge8367
@ganeshkhandge8367 10 ай бұрын
दादा किती रे मेहनत घेतलीस. खूप छान माहिती दिलीस. धन्यवाद असेच नवनवीन गडकिल्ल्यांची माहिती देत रहा😊
@ravindragajalkar1522
@ravindragajalkar1522 7 ай бұрын
❤अतिशय सुंदर दर्शन व वर्णन व उत्तम वर्णन आहे.
@manojjadhav4847
@manojjadhav4847 11 ай бұрын
माहिती खुप लवकर झाली, अशी वाटतं.आपण मुख्य वाडा आहे, त्याला श्रीमान राम पाटील यांच्या आहे म्हणून संबोधले पाहिजे, व महादेव मंदिरात सर्व लोकांना सहज जाता येते येईल या साठी काही केल पाहिजे.
@majidshaikh8284
@majidshaikh8284 9 ай бұрын
Sambodhnya peksha ha killa siddhi Johar nech bandhla aani dusrya konachahi kahihi sambandh nahi ya madhe shivajini sudhha yala ajinkya killa mhanle aahe Kon patil aani Kay sagli dant katha
@swadhintandel5489
@swadhintandel5489 10 ай бұрын
खूप छान माहिती दिलीत आणि त्यातील बारकावेही उलगडून दाखवलेत....धन्यवाद
@AshokGharat-r1f
@AshokGharat-r1f 4 ай бұрын
फारच छान. घरी बसुन जंजिरा गड तु दाखवलास. गडावर जाऊन सुधा येवढी सर्व जागा बघताना आली नसती आणि तु फारच छान माहिती दिलीस. धन्यवाद आभारी आहे. नमस्कार मित्रा.
@kirandaruwale3269
@kirandaruwale3269 11 ай бұрын
खुप छान प्रकारे माहिती देऊन इतरांना ज्ञानात भर घातली
@dnyandeobansode2837
@dnyandeobansode2837 9 ай бұрын
फार छान माहिती मिळाली. प्रत्यक्ष किल्ला पहिल्याचा आनंद मिळाला. धन्यवाद.
@vaibhavpatil-ec6ws
@vaibhavpatil-ec6ws 11 ай бұрын
अप्रतिम माहीत दिल्याबद्दल मनःपूर्वक आभार तुझे‌ सगळेच गड‌ कोठावरील माहिती जबरदस्त आसते‌
@sarangjadhav3041
@sarangjadhav3041 10 ай бұрын
जंजिरा किल्ला आधी भेट दिली होती,परंतु आपण सांगितलेली माहिती खूप छान आणि सखोल सांगितली,खूप धन्यवाद्.
@bknilesh9663
@bknilesh9663 10 ай бұрын
खुप छान..... तुमच्या धर्माभिमानी स्वभावाला मानाचा मुजरा 🚩🚩🚩🚩🚩🚩
@anantmalusare5982
@anantmalusare5982 9 ай бұрын
फारच छान माहिती सांगितली बसल्या जागी संपूर्ण किल्ला बघितल्याचा आनंद झाला, मस्त जबरदस्त
@DilipYadav-ku7tr
@DilipYadav-ku7tr 10 ай бұрын
मी 2,3 वेळा किल्ला पहिला आहे ,मात्र असे दर्शन आणि अशी सखोल माहिती प्रतक्ष भेटीत सुद्धा मिळाली नाही,किल्ल्याचा इतिहास हा मुस्लीमधारजीना सांगितला जात होता. प्हारथमच खरा इतिहास समोर आला. धन्यवाद भावा. जय भवानी जय शिवाजी!
@vijayasawant147
@vijayasawant147 Ай бұрын
धन्यवाद,किल्ल्यावर प्रत्यक्ष फिरून आल्यासारखे वाटले खूपच छान माहिती दिली आहे तुम्ही तिला पाहिलेला नाही. पण असं वाटलं की मी इयत्ता किल्ला पाहिला. अतिशय महत्त्वाचे महत्त्वपूर्ण माहिती.
@kalyanshukla2173
@kalyanshukla2173 2 ай бұрын
खुप छान माहीती दिल्याबद्दल धन्यवाद तुझ्या सर्व टिमला शुभेच्छा आणी धन्यवाद
@dhananjaypardeshi8803
@dhananjaypardeshi8803 11 ай бұрын
धन्यवाद खरा इतिहास सांगितल्या बदल 🙏
@mohankhadilkar7646
@mohankhadilkar7646 8 ай бұрын
अतिशय सुंदर माहिती दिली त्याबद्दल तुमचे टीम चे आभार व धन्यवाद
@ramkrishnapatil5538
@ramkrishnapatil5538 10 ай бұрын
किल्ल्याची माहिती देण्यासाठी खूप मेहनत व अतिशय जास्त कष्ट घेतले आहेत...फूल्ल मार्कस...❤❤
@govardhankhandagale2914
@govardhankhandagale2914 9 ай бұрын
आपण दाखवलेला हा जजिंरा किल्याचा हिस्सा फार सुंदर रितीने प्रसारीत केला. आपले मनापासून आभार व पुढील वाटचालीस मनपुरवक हार्दिक हार्दिक शुभेच्छा . धन्यवाद 🙏💐 जय जिजाऊ जय शिवराय जय शंभुराजे💐
@motiramshekhare3324
@motiramshekhare3324 11 ай бұрын
सर तुम्ही खूप समजावून सांगता बरेच जण किल्याची माहिती देतात पण तुमच्या सारखे नाही असे समजावून सांगत नाही चांगली माहिती दिल्याबदल खुप खुप आभार जय शिवराय जय शंभूराजे जय जिजाऊ
@rajendrakulkarni2554
@rajendrakulkarni2554 10 ай бұрын
अतिशय अद्भुत, वर्णन करायला शब्द अपुरे पडतील
@babajiwatotejiwatode362
@babajiwatotejiwatode362 10 ай бұрын
मा आदरनिय सर जय छत्रपती शिवाजी महाराज जय छत्रपती संभाजी जय जिजाऊ माँ साहेब फार छान सुंदर अप्रतिम फोटो माहिती जंजिरा किल्ला बाबत मराठ्यांच्या इतिहासातील कलाल बांगडी तोफ ठेवलेली आहे जय छत्रपती शिवाजी महाराज की जय धन्यवाद
@padmajoshi2127
@padmajoshi2127 10 ай бұрын
छान माहिती दिलीत. मी जंजिरा १९६० साली पाहिला तेव्हा त्या राजवाडा मध्ये राज्याचा आरसे महाली शयनकक्ष होता आरसेही ठीक होते मोठा बेड त्याला पडदे होते. जीर्ण होते पण होते. वैभवाची साक्ष देत होते.
@jdjei-4jdjs
@jdjei-4jdjs 7 ай бұрын
तिथ इतर माणसे राहत होती तेंव्हा 😅त्यांच होत ते जून राजाच्या काळामध्ये असणारे बेड आरसे नाही
@santoshkolte6308
@santoshkolte6308 Ай бұрын
नशीबवान आहात!!
@tusharshedge7487
@tusharshedge7487 6 ай бұрын
खुप खुप सुंदर माहिती भावा👍👍👌👌जय जिजाऊ जय शिवराय जय शंभूराजे🚩🙏
@kalpeshchaudhari6548
@kalpeshchaudhari6548 11 ай бұрын
तुमच्या नजरेतून आम्हाला मुरुड जंजिरा किल्ला बघायला मिळाला खूपच सुंदर दादा असेच मी पूर्ण व्हिडिओ बघेल तुमचे मी आता तुम्हाला जॉईन झालो मला खूप खूप आवडते गड किल्ले फिरायला ❤
@SangeetaKale-lm7gs
@SangeetaKale-lm7gs 7 ай бұрын
खूपच जबरदस्त किल्ला आहे मुरुड जंजिरा 👌🏻👌🏻
@vinodmeshram6865
@vinodmeshram6865 10 ай бұрын
या किल्ल्यावर चे चिन्ह हत्तीवर वाघ सवार आहे आणि हा चिन्ह गोंडवाना राज चिन्ह आहे... माहिती खूप छान सांगितल्याबद्दल धन्यवाद
@rajivghatol5268
@rajivghatol5268 10 ай бұрын
खुप आवडला आम्हाला जुन्या कील्याचींच आवड आहे खर्च करून जाऊ शकत नाही आपल्या नजरेने आम्ही पाहुशकतो खुप छान😊😊
@dipakpatil5989
@dipakpatil5989 10 ай бұрын
अतिशय सुंदर माहिती दिली आपण, मी सात वर्षा पूर्वी गेलो होतो पण एवढी माहिती कोण सांगत नाही. आपले सर्वांचे मनापासून कौतुक व आभार 🙏🏻🙏🏻
@sanjaykadam6092
@sanjaykadam6092 8 ай бұрын
सगळे कील्ले परत जसे होते तसे पुन्हा उभे राहिले तर खरच खूप बरं होईल पण तुम्ही खूप मेहनत घेत आहात जय शिवराय ❤
@shoeswheelsnwings187
@shoeswheelsnwings187 11 ай бұрын
अप्रतिम व्हिडिओ मित्रा..आणि धन्यवाद दाखविल्याबद्दल
@gangadharhalankar7786
@gangadharhalankar7786 Күн бұрын
खरोखरच या प्रकारचे उत्दखनन करुन जुनी पुर्वा श्रमिचा इतिहास आजचे नव पिढीला तन्मयतेने सवर्णन करुन सांगितला , धन्यवाद.🎉
@tanajigaikwad4661
@tanajigaikwad4661 11 ай бұрын
खुप छान आणि सोप्या,ओघवत्या शब्दात सुंदरपणे जंजिरा दुर्गाचं वर्णन केलंत.सविस्तर माहीती मिळाली.व्हीडीओ बघताना आपण स्वतःच तुमच्या बरोबर असल्यासारखं वाटत होतं.मी आतापर्यंत दोनदा हा किल्ला पाहीला आहे.मलाही इतिहास आणि अशा ऐतिहासिक वास्तु,गडकिल्ले यांची आवड असल्याने खुप बारकाईने निरिक्षण करुनच पाहतो.तरीपण खरा जंजिरा तुमचा व्हीडीओ पाहुनच समजला.धन्यवाद आणि शतशः आभार.
@shankarraosalunkhe-patil6489
@shankarraosalunkhe-patil6489 3 ай бұрын
किल्ल्याची संपूर्ण माहिती उत्तम प्रकारे समजली, आभार !
@deepakaher6687
@deepakaher6687 11 ай бұрын
जय भवानी, जय जिजाऊ, जय छत्रपती शिवराय.... आम्ही पण गेलो होतो पण इतक्या बारीक सारीक माहिती आम्हाला मिळाली नाही. धन्यवाद भावा आणि भावी वाटचालीसाठी अनेक अनेक शुभेच्छा....❤ You
@SadananadDhawle
@SadananadDhawle 10 ай бұрын
खूप छान असेच माहिती पद्मदुर्गाच्या किल्ल्याची माहिती
@manoharbhovad
@manoharbhovad 11 ай бұрын
मित्रा...खूपच छान माहिती सांगितलीस 👍आम्ही हा किल्ला पाहिलेला आहे... खरंच खूप सुंदर व अजिंक्य होता हा किल्ला....! आता पद्मदुर्ग किल्ला दाखव व अशीच छानपैकी माहिती दे.... वाट पाहतोय... पुढील व्हिडीओसाठी शुभेच्छा.. 💐मुंबई
@prakashbhise-df6vr
@prakashbhise-df6vr 18 күн бұрын
घर बसल्या जंजिरा दाखवलात खुप छान माहिती दिली धन्यवाद ड्रोन का नेला नाहीत अजून छान दिसलं असतं
@sharadvichare2182
@sharadvichare2182 10 ай бұрын
धन्यवाद एवढ्या कमी वयात चांगल्या कामाने इतिहास जपण्या साठी धडपड मित्रा❤❤❤
@vinodappaligade5149
@vinodappaligade5149 5 ай бұрын
छान मित्रा खुप सुंदर माहीती दिलीस तु त्याबद्दल खुप खुप धन्यवाद ! जय शिवराय ! जय संभाजी राजे !
@fantastic_man248
@fantastic_man248 7 ай бұрын
मी एक जुन्नरकर.. भावा तुझा हा व्हिडीओ पहिला आणि तुझ्या प्रेमात पडलो. मी कधी ही कोणता किल्ला पाहिला नाही. पण तुझ्या नजरेतून तू जे दाखावलस त्यास उत्तर नाही. अस वाटलं की मी स्वतः किल्ला बघतोय. आणि बर का एक ही सेकंद पुढे न करता तुझे व्हिडिओ मी पाहतो. तुझ्या ह्या कार्यास माझ्या सलाम.. तू ज्या पद्धतीने दाखवतोय कदाचित आज पर्यंत कोणी नाही दाखवलं. आई जगदंबा आणि शिवाई तुला शक्ती देवो आणि छत्रपती शिवाजी महाराज यांची महिती अशीच सर्वांना पर्यंत पोहाचावी.
@awjondhale
@awjondhale 6 ай бұрын
एवढी अभ्यासपूर्वक विस्तृत माहिती दिल्याबद्दल आपले व सहकाऱ्याचे मनःपूर्वक धन्यवाद❤❤❤ जय शिवराय
@anilkhalkar5925
@anilkhalkar5925 11 ай бұрын
मला मी स्वतः प्रत्यक्ष किल्ल्याची सफर केली असे वाटले. संपूर्ण व्हिडिओ अतिशय बारकाईने मनापासून बघितला. प्रत्येकाने या वस्तूंच्या सौंदर्यात भर टाकता आली तर प्रयत्न करावा मात्र कोणी कचरा करू नये .नुकसान होईल अशी कृती करू नये. राजस्थानमध्ये किल्ल्यांना किती महत्त्व दिले जात आणि जपलं जातं तसं महाराष्ट्रात झाले तर काही नुकसान होणार नाही भविष्यात आपल्याच अनेक पिढ्यांना या वस्तू वास्तू पाहायला मिळतील आणि आपले पूर्वज आपला इतिहास निश्चितच पुढच्या पिढ्यांना समजेल. पर्यटन विकास हा महत्त्वाची गोष्ट आहे महाराष्ट्र असे राज्य आहे की जिथे पदोपदी आपल्याला किल्ले बघायला मिळतात. मात्र या किल्ल्यांची डागडुजी शासनाकडून ट्रस्ट कडून सर्वांकडून होणे आवश्यक आहे महाराष्ट्र पर्यटनाचा विकास होणे गरजेचे आहे सर्व संबंधितांनी या गोष्टींसाठी प्रयत्न करावा. हीच अपेक्षा. मी माझ्या शाळेची ट्रिप या किल्ल्यावरती आणलेली होती आणि विद्यार्थ्यांना किल्ला दाखवला मात्र त्यावेळेस घाई गर्दीमध्ये वेळेअभावी खूप कमी गोष्टी बघितल्या .आज त्याची कसर पूर्ण झाली.
@sanjanashinde1742
@sanjanashinde1742 8 ай бұрын
हो खरंच आहे, खूप खूप धन्यवाद
@ShrikrishnaDate
@ShrikrishnaDate 10 ай бұрын
तुम्ही खूप सविस्तर भरपूर माहिती सांगितली आहे आणि चित्रिकरण खूप चांगले आहे पुन्हा पुन्हा पाहावेसे वाट्ते प्रत्यक्ष पाहात आहे असेच वाटते खूप खूप धन्यवाद
@ravimengal9618
@ravimengal9618 11 ай бұрын
व्हिडिओ नेहमी प्रमाणे भारी च असते ❤🚩 जय शिवराय 🚩 जय शंभुराजे 🚩
@rajendrasawarkar3573
@rajendrasawarkar3573 4 ай бұрын
खुप परीश्रम घेवून आम्हाला बसल्या जागी किल्ला दाखवला खूप छान माहीती पण सांगीतली त्याबद्दल खुप खुप धन्यवाद🙏😊🙏
@prakashchitnis1284
@prakashchitnis1284 11 ай бұрын
अप्रतिम आहे आता वाट पहातो आहे रायगड किल्ला असेच सगळे किल्ले दाखवत रहा. आम्ही जंजीरा किल्ला बघीतला आणि अलीबाग ला आलो पण किल्ला बघीतला नाही तो तुम्ही छान दाखवला. असे वाटते की आपण खरोखर फिरायला आलो आहे
@MrSundeepJ
@MrSundeepJ 7 ай бұрын
ब्लाॅगर खूप मेहनती आहे असे दिसून येते त्याची लोकांना सगळ्या गोष्टी दाखवण्याची तळमळ सूद्धा दिसून येते... Keep it up 👍
@BabajiKedari
@BabajiKedari 11 ай бұрын
खूपच चांगली वाटली भाऊ जय शिवराय हर हर महादेव अशीच नवीन नवीन माहिती मिळावी आम्हाला हिच इच्छा हर हर महादेव जय शिवराय जय जिजाऊ जय शंभुराजे ❤❤❤❤
REAL 3D brush can draw grass Life Hack #shorts #lifehacks
00:42
MrMaximus
Рет қаралды 11 МЛН
Help Me Celebrate! 😍🙏
00:35
Alan Chikin Chow
Рет қаралды 89 МЛН
pumpkins #shorts
00:39
Mr DegrEE
Рет қаралды 123 МЛН
ही घटना अत्यंत धक्कादायक आहे.
23:22
मराठेशाही-प्रवीण भोसले
Рет қаралды 1,9 МЛН
REAL 3D brush can draw grass Life Hack #shorts #lifehacks
00:42
MrMaximus
Рет қаралды 11 МЛН