किती प्रामाणिक , आणि मनमोकळी आहे राधा ! All the best wishes for your future plans ! We love you !
@Curious81-b4k11 ай бұрын
फार एकांगी मुलाखत झाली.. राधा मंगेशकर यांच्या painpoints ना highlight करणारे प्रश्न विचारले असं वाटलं.. त्यांच्या personality che इतर पैलू उलगडण्याचा प्रयत्न झाला नाही.. असो ! त्यांना ऐकून बरे वाटले.. she has made peace with the pros and cons of being from a very respected musical family म्हणून त्यांचे अभिनंदन 🙏👏 अनेकदा लोकं public personalities judge करताना त्यांच्या मनावर काय परिणाम होत असेल असा विचार करत नाहीत .. पुढील प्रवासासाठी त्यांना खूप शुभेच्छा !!
@prajaktakulkarni11 ай бұрын
Agreed! Ajun changale prashna asu shakale asate.
@RajanigandhaWankhede23 күн бұрын
असंच नाही आशा भोसले च्या मुलीने आत्महत्या केलेली नाही.. मुलगा पण मेलेला आहे.. बाकीचे लोकांचे कुठेच काही नाही. लता किंवा आशा ने सुद्धा कुठे च काही राधा बद्दल ही काही बोललेलं नाही.. म्हूणन ती एकटीच आहे..😮
@suvarnavelankar735711 ай бұрын
अप्रतिम मुलाखत.त्यासाठी धन्यवाद 🙏 कोणताही कडवटपणा न ठेवता संयमाने बोलल्यायत राधा मंगेशकर.खंबीर मुलगी आहे.
@smitajoshi602311 ай бұрын
😊😊
@sandhyakapadi411211 ай бұрын
खरंच संयमाची पराकाष्ठा !! किती सोसलं आहे. किती आतमध्ये लपवलंय !!!
@shrikantmujumdar986011 ай бұрын
खूप मनमुराद न मोकळ्या बोललात आपण डॉ. राधा मंगेशकर. मनाला खूप भावलं.🎉
@mamtadivekar943111 ай бұрын
खूप छान मुलाकात झालीराधा मंगेशकर खूप शांत व संयमी वाटतात
@sumankurade309311 ай бұрын
@@smitajoshi6023⁰ff
@alaknandapadhye291111 ай бұрын
अत्यंत तटस्थपणे वस्तुस्थिती स्वीकारणाऱ्या आणि त्याहीपेक्षा संयमपूर्वक त्याचे विश्लेषण करून दाखवणाऱ्या राधा मंगेशकरांचे कौतुक..!🙏 अभिनंदन
@vaishalithakare77411 ай бұрын
मोठ्या वृक्षाखाली दुसरे झाड वाढत नाही😢.. हीची खरेच वेगळी ट्रॅजेडी आहे...तिला स्वतंत्र जगायला च भेटले नाहीय याचे किती दुःख वाटतेय आता मला 😢😢😢
@monikanaik869311 ай бұрын
राधाजींचा सच्चेपणा मनाला भावला❤ आणि हाच त्यांच्या स्वरांतूनही अनुभवतो आहे आम्हाला हेच अपेक्षित आहे आपल्याला मनःपूर्वक शुभेच्छा अश्याच निर्मळ गात रहा
@gargeejoshi998011 ай бұрын
God bless u radha
@subhashmutha267311 ай бұрын
Greatness of Radha is she is simple and ground to earth
@anujaphadke30825 ай бұрын
अप्रतिम
@bhagyashreebubne64711 ай бұрын
सुरेख मुलाखत! किती तो समजुतदार पणा!राधा hats off you
@chandrashekharakerkar824111 ай бұрын
ही मुलाखत ही मुलाखत न वाटता आपण आपल्या जवळच्यांशी संवाद साधतो असे वाटतं. राधा मंगेशकर ह्या उच्च शिक्षित आहेत. संगीताच्या अभ्यासक आहेत. त्यांचे सर्व विचार अतिशय प्रामाणिक व स्पष्ट वाटले. सौमित्र आपण राधाताईंना उत्स्फूर्तपणे बोलतं केलं. ही मुलाखत फार आवडली. त्यांना त्यांच्या पुढील सांगितीक आणि साहित्यिक वाटचालीसाठी मनोमन हार्दिक शुभेच्छा.💐💐💐🙏💐💐💐
@ShrihariVaze11 ай бұрын
स्पष्ट वक्ते पणा बद्दल मी आपल्याला सलाम करतो..... मी आपलं गाणं कधी लाईव्ह अयिकलेलं नही...1-2वेळा मुलाखती दरम्यान माझा कट्टावर ऐकले आहे.पंडित हृदयनाथ जी च्या मुलाखतीत आपण छान गाईल्या होतात.... आपल्या आवाजाला आणि पट्टीला जर नवीन गाणं रेकॉर्ड झालं तर निश्चित छान गाणं होऊ शकत..... मुळात निष्पाप मन जे कलावंतासाठी वरदान असत... तुम्ही अजूनही उत्तम गाणं गाऊ शकता..... 🙏🏼
@yuvrajdeshmukh792011 ай бұрын
खुप छान
@amitawalavalkar29211 ай бұрын
खूप छान बोलली
@swatikarve2511 ай бұрын
न क्कीच पुन्हा प्रयत्न करून बघायला हवा त्यांनी. रेकॉर्डेड गाणी एरवीही ऐकता येतात. त्या दृष्टीने त्या rigid वाटतात. मीही प्रत्यक्ष गाणं फार पूर्वी ऐकलं आहे. सफरनामा विषयी आणखी ऐकायला खूप आवडलं असतं.
@diptivaidya32611 ай бұрын
अप्रतिम मुलाखत. Hats off to Radha Mangeshkar 👍
@deepajoshi56811 ай бұрын
❤ Radha ... A Lovely Person .. A Balanced Personality ... A Learned Person ... An Excellent Artist ... A Beautiful, Soft & Grounded Human Being ❤ This Conversation Has Really Helped To Know What Is Radha, How Is Radha, Her Struggles, Her Efforts, Her Hustles In Life Inspite Of Being Born A Mangeshkar. Ty So Much For This Lovely Interview ! 😊🌸❣️
@kalaspanda11 ай бұрын
अप्रतिम, अतिशय पारदर्शी , हृदयस्पर्शी मुलाखत! मनाचा सच्चेपणा भावला. पुढील वाटचालीसाठी शुभेच्छा🌹❤
@vrushalic338911 ай бұрын
राधा खुप छान मुलाखत . तु माणुस म्हणुन खुप चांगली आहेस .आणी तुझा आवाज आवङतो आम्हाला .दिल के करीब सुलेखा ला दिलेली मुलाखत पण आवडली . तुला खुप खुप शुभेच्छा.❤
@anaghapabalkar594411 ай бұрын
राधा मंगेशकर चीं दिल के क़रीब मधली मुलाखत फारच छान आहे,अतिशय matured मुलगी आहे. व खूप हुशार
@mitramhane11 ай бұрын
🤣🤣🤣
@Dr.Plutoo11 ай бұрын
@@mitramhaneWhy this emoji? She is fabulous!
@anaghapabalkar594411 ай бұрын
may be by mistake
@anaghapabalkar594411 ай бұрын
तसेच बैजू ची मुलाखत पण दिल के करीब में आहे,ऐकण्यासारखी आहे, he is also amazing artist
@sanketdhere270211 ай бұрын
@@anaghapabalkar5944 mala vatta ki tya emoji mage kahitari between the line asel.
@vinayaoak158011 ай бұрын
अप्रतिम मुलाखत,मनाला भावली,राधा जी बोलताना त्यांच्या प्रत्येक शब्दातला सच्चेपणा मनाला खूप स्पर्शून गेला❤
@vilasinichitnis178911 ай бұрын
Khoop chaan, matured aahat. It's great u r not depressed. God's blessings are there with you. U will succeed my sincere wishes with you.
@viveksavarikar391711 ай бұрын
Loads of love to Radhaji...हे सगळं ऐकून मंगेशकर कुटुंबियांचे अनेक नवे पैलू कळले.आत खूप काहीतरी टोचले.
@nishaogale484111 ай бұрын
खुप मोकळेपणाने मुलाखत दिली ! पुढील आयुष्यात आनंद असाच मिळत राहो ! अतिशय खंबीर व्यक्ती अहे ! खुप शुभेच्छा !
@GuruNandgaonkarVlogs11 ай бұрын
अतिशय छान झाली मुलाखत... ऐकून खूप छान वाटल. विचार छान आहेत. सौमित्र तू मस्तच मुलाखत घेतोस यात वाद नाही. कालबाह्य चा हसरा पंच आवडला. मला अस वाटत राधा मॅडम नी खुप न्यूनगंड निर्माण करुन घेतला आहे त्यातून त्यांनी बाहेर पडल पाहिजे. लता दीदी, आशा ताई सारखं आपण काय कोणीच होवू शकत नाही हे कालातीत सत्य आहे. असे खूप कलाकार आहेत ज्यांना संधी सुद्धा मिळत नाही आहे. त्याउलट तूम्ही संगीत प्रवाहात आहात commercial shows करता आहात याचा आनंद आहे. तूम्ही playback साठी प्रयत्न करायला हवेत, मला अस आवडत नाही तस आवडत नाही अस म्हणून पाठी पाय घेऊ नका. तुमच्या आवाजाची जादू दिसू दे लोकांना यासाठी social media वर या तो ही महत्वाचा भाग आहे. सगळेच यशस्वी होतात असं नाही पण तुम्ही अयशस्वी आहात अस समजू नका. Negative ness काढून टाका be positive तुम्हाला fans नक्किच साथ देतील. हे माझं वैयक्तिक मत आहे कृपया राग नसावा, लोभ असावा. खूप साऱ्या शुभेच्छा तुम्हाला 🌹👍🎉
@tejaswinikulkarni906211 ай бұрын
सहमत ❤
@deepakhadilkar658517 күн бұрын
बरोबर आहे...जे झाले त्या बद्दल बोलत राहण्या पेक्षा काय वेगळे करता येईल ह्याचा विचार करायला हवा...राधा जी चे विचार ऐकून कोणाला ह्यात लता दीदी ची चूक वाटू शकते...राधा जी नी तेहवाँ च वेगळी काही वाट निवडायला हवी होती...किंवा कालाय तस्मै नमः अर्थात हे बोलायला सोपे आहे...ज्याच्या वर वेळ येते तोच जाणे
@kokancashew24711 ай бұрын
अप्रतिम मुलाखत... अतिशय संयमी प्रश्न आणि मन उलघडून टाकणारे प्रश्न...
@Arunbansodekhubikarmumbai11 ай бұрын
अतिशय सुंदर मुलाखत आज ऐकनियात आली. राधावर खुप अन्याय झालाय पण ती सक्षम आहे. ती तिझ्या क्षेत्रात पुन्हा भरभरून येतील अशी मला आशा वाटते. माझ्या आयुष्यात मला त्या कुटूंबातील प्रत्येकाकडून खुपसा सहवास आणि प्रेम मिळालं आहे. राधा दिदी स्वणंप्रकाशित आहेत त्यांना त्यांच्या आयुष्याची दिशा उमगली असुन त्या स्वतः प्रतिभावंत नक्कीच होतील. साध आणि भोळ जीवलग व्यक्तिमत्व जेंव्हा उच्च कुटुंबात जन्मले जाते तेंव्हा अशाच वेदना सहन कराव्या लागतात त्याचेच हे ज्वलंत उदाहरण म्हणजे राधा मंगेशकर यांचेवर केलेला तुम्ही आणि आम्ही केलेला नकारात्मक अन्याय. राधाजी यांना आपण सर्वजण साथ देऊया. ❤️🙏🙏
@vatsalapai409911 ай бұрын
Wonderful....Nice personality. Felt bad that sometimes being born in a particular family can create so many hurdles for a creative person to cut a niche for themselves. Lot of respect for you Radha Mangeshkar... Keep going...pray that you get your due... With regards and lot of respect🙏🙏
@kirankunte592511 ай бұрын
Well said
@salunkearvind7611 ай бұрын
That's a struggle for people born in all professions not just creative world
@kirankunte592511 ай бұрын
@@salunkearvind76 Well said
@meenazmusic944211 ай бұрын
छान अप्रतिम मुलाखत.. कौतुक किंवा टीका या पली कडे जाऊन कलाकाराने आपल्यास्वतः साठी,"कला" जपली पाहिजे, जमेल तशी वाढवलीही पाहिजे... ईश्वराचं देणं आहे आपणास.. खूप सदिच्छा राधाजी..
@anujashetty173811 ай бұрын
खूप नकारात्मकता आणि स्ट्रगल यावर मुलाखत गेली.. फक्त एकच गोष्ट..she was very honest! खरं तर राधा आमची लाडकी. खूप खूप कौतुक वाटे जेव्हा ती बाबांबरोबर गात असे! हृदयनाथजींचा पहाटे 4 वाजेपर्यंत चा कार्यक्रम ४० वर्षापूर्वी प्रत्यक्ष अनुभवला आहे! आजही तो जसाच्या तसा स्मरणात आहे! प्रत्येकाच वेगळं talent आणि ओळख असते. Wish her the best!!!
@sunitaratnaparkhi326210 ай бұрын
Rejection che दुःख व अपमान लता दीदी ना पन भोगावा. लागला त्या वयानि लहान होत्या व एकत्या होत्या व मेहनत आनी struggle केला होता .
@medhakamble382811 ай бұрын
साध्या गोष्टीसाठी केव्हढा संघर्ष करावा लागला आहे. मला तरी वाईटच वाटले. किती मोकळेपणाने सांगितले तिने!पारदर्शीपणे. .. सौमत्रजी ही मुलाखत घेणे म्हणजे कस लागेल असे काम होते.खुप मस्त घेतली. कुठेही तिला वाईट वाटू न देता छान बोलते केले. एक छान मुलाखत ऐकविल्याबद्दल धन्यवाद 🎉
@bhaktinaik24511 ай бұрын
अतिशय उत्तम, सच्चे व्यक्त होणारी व्यक्ति, कमाल पारदर्शक विचार, नितळ, अश्या व्यक्ति फार कमी असतात, अश्याच निर्मळ रहा ❤
@sangitabhalerao988911 ай бұрын
अप्रतिम मुलाखत 🙏🏻राधा जी तुमच्या बोलण्यातला सच्चे पणा मनाला खूप खूप भावला. तुम्ही खूप great आहात. खूप शिकण्या सारखे आहे तुमच्या कडून. तुमच्या पुढील वाटचाली साठी मनापासुन खूप खूप शुभेच्छा 💐गात राहा. 👍GBU 🌹
@sanas301111 ай бұрын
माझ्या जीवनातील सर्वात STRONG PERSONALITY वाटली.फार अवघड आहे असा विचार करून शांतपणे जगणे. लोक छोट्या छोट्या गोष्टीत depression madhe जातात.Hatts of 👍
@rajeshjangam754011 ай бұрын
खूप सुंदर मुलाखत , राधा आणि बैजू ला त्यांच्या क्षेत्रात उत्तुंग यश मिळावं ही सदिच्छा !
@supriya-gg4mz9 ай бұрын
राधा तुला जे मनापासून आवडतं तेच कर. लोकांचा विचार करू नको. आणि खूष रहा. आयुष्यात तेच तर महत्वाचं असतं. बाकी काय सगळं खरंच फसवं जग आहे. तुझ्याच म्हणण्याप्रमाणे.❤
@ranjanapandit799411 ай бұрын
सौमित्रजी आपण अप्रतिम मुलाखत घेतलीत,त्यामुळे राधाताईंविषयी खूप सुंदर माहिती मिळाली आणि त्यांनीही अतिशय पारदर्शकपणे गप्पा मारल्या त्यांचा सच्चेपणा खूपच भावला. दिलखुलासपणे बोलल्या आपण अशाच आनंदी रहा...आपण कालबाह्य नाहीत.प्रथमच आपल्याला पाहिले खूप छान वाटले.खूप खूप शुभेच्छा आपल्या पुढील वाटचालीसाठी ❤❤❤
@pramilakadam387111 ай бұрын
छान मुलाखत....... मुलाखत घेणारे पण छान प्रश्न विचारत होते आणि राधाजी पण छान बोलल्या..... मनात साठलेलं त्यांनी मोकळं केलं.....😊
@SandeepB260311 ай бұрын
Really a great interview. Radha ji is sorted and balanced. There is a lot of grief behind the smiling face. Its her destiny to be born amongst such legends and yet be so depressed... a lesson to learn is that if you try to live to please others, you will invite misery...
@yogeshnimkar378411 ай бұрын
What do you want to say?? trying to please others? It is bound to happen that the more someone becomes successful in your family, the other person in your family will get depressed.
@upendrakulkarni248611 ай бұрын
फार सुंदर मुलाखत! 👌🏽एवढ्या मोठ्या घराण्यात जन्माला येऊन सुध्दा किती साधी, सरळ आणि स्पष्ट व्यक्ती. राधा मंगेशकरांना पुढील वाटचालीत भरपुर यश मिळो हीच सदिच्छा! 🙏🏽🙏🏽
@mrinalinijoshi183911 ай бұрын
एक सुंदर मुलाखत...राधाताई, तुमचं गाणं मला खूप आवडतं....तुमचं गाणं सर्व दृष्टीने matured असतं...तुमचं बोलणंही मनाला भावून गेलं....खूप खूप गात रहा..आनंद वाटंत रहा....धन्यवाद...💐🙏🏼🌹
@viveksavarikar391711 ай бұрын
राधाजीं चे बोलणे ऐकताना मन भरुन आले.कुठे तरी त्यांच्या आवाजातील कारूण्याची झाक जाणवत होती. मुलाखत संपल्यावरही तो स्वर माझ्या आत कुठेतरी घुमतोय.❤❤
@sharmilaapte932211 ай бұрын
किती वेदना आहे आवाजात राधाच्या, खूप surrender केलेय हे तिच्या बोलण्यावरून जाणवते! मुलाखतीत त्यांच्या गाण्याच्या बाजू व्यतिरिक्त बाकीच्या गुणांविषयी प्रश्न विचारणे अपेक्षित होते.
@mitramhane10 ай бұрын
💛
@drsachin24611 күн бұрын
@@mitramhane she is pretentious. feared of getting exposed full with sense of entitlement.. whatever she has earned is from this audiance only. still ungrateful. This is the problem of kids from famous stars family. and actually she is lazy and not motivated at all.. these kind of people are negative influencers
@anujadamle152113 күн бұрын
खूप आवडली मुलाखत. आणि खूप प्रामाणिक होती. बऱ्याच लोकांचे हॆ खरे अनुभव आहेत जे कुणालाच समजत नाहीत. धन्यवाद ताई 🙏🏻🙏🏻
@anjalipatil327411 ай бұрын
Wow! Great, I can understand reading in between line,the emotions behind. We always see glamorous side but after watching this video I can understand the see the other side of glamour of other family members.
@savitadhanu10 ай бұрын
खूप सुंदर मुलाखत. राधा, तुमचा प्रत्येक शब्द मनाला भिडला. तुम्ही जी वेगळी वाट निवडली आहे त्यात आणि तुम्ही जे काही कराल त्यात तुम्हाला भरभरून यश लाभो. लोक सगळीकडून बोलतच राहणार.तुम्ही अत्यंत प्रामाणिक आहात, तशाच रहा. सौमित्र, नेहमीप्रमाणे अतिशय सुंदर मुलाखत
@balasahebpatekar62022 ай бұрын
एक नंबर मुलाखत.संपुच नये असे वाटत होते.खुपच नम्र,शांत,आत्मनिर्भर ,स्वाभिमानी,जिद्दि,मोकळ्या मनाची मुलगी आहे.राधाजींना त्यांच्या भावी आयुष्यासाठी अनंत अनंत शुभेच्छा.😊🎉
@meenakshidangle336211 ай бұрын
मला खूपच आवडले सर्व विचार प्रतेक विषयावर एकदम खरे खरे व सत्य सांगितलेव आज काल तेच चालले आहे जलियस पणा व जलकूकडे पणा दुसऱ्याचे चांगले बघवत नाही व एकमेकाला पुढेही जाऊ दिले जात पाय धरून मागे खेचने म्हणून आपला महाराष्ट्र देश मागे पडत चालला आहे व दुसरा महत्वाचा मुद्धा जाती भेद वर्ण भेद
@maheshkalawar8742Ай бұрын
Very well expressed by Radha in this interview w/ o naming or hurting anyone [ wittyingly ] but she has chosen her words so meticulously which speaks volumes of her inner feelings in which she stands out to day loud n.clear that inspite of she been sidelined she has no regrets in Life & stands tall n proud of where she,has reached today Surprisingly she has not commented anything about her maternal support ,but hv praised her father very much in the interview
@VanitaDeepak-l9f11 ай бұрын
खूप सुंदर मुलाखत झाली, राधा मंगेशकर स्पष्ट बोलल्या ते आवडले. त्यांच्या बद्दल ची जी वाईट प्रतिमा आहे ती आता राहणार नाही. त्यांच्या पुढील प्रवासासाठी त्यांना खूप खूप शुभेच्छा🙏🙏
@mitramhane11 ай бұрын
🙏🏼🙏🏼
@harshadmane210311 ай бұрын
खूप धन्यवाद सौमित्र, राधा मंगेशकरांना भेटवल्याबद्दल इतक्या वर्षांनी. भावसरगममध्ये आल्यानंतर ज्यांना त्यांचं गाणं आवडलं नाही, त्यात मीही होतो. अर्थात् दीदींच्या आवाजाशी तुलना कधीच केली नाही. पण, तुम्ही मनातले मुद्दे मांडलेत. २० वर्षांपूर्वी बनलेली ती इमेज.. आज त्या कशा गातात माहीत नाही. त्यामुळे पुन्हा ऐकायला निश्चित आवडेल. त्यांनी सोशल मीडियावर येणं नितांत गरजेचं आहे. काय चाललंय हे लगेच कळेल. बाकी, रिजेक्शनने येणारं दर्द त्यांच्या मनात साठलेलं आहे हे त्यांच्या हसऱ्या चेहऱ्याआडूनही दिसतं. तो हस्क त्यातूनच आला असावा. पण जे आहे समोर ठेवलंय. लपण्याचा प्रयत्न नाही. अगदी अकाली पिकलेले केसही लपविण्याचा प्रयत्न नाही. त्यांनी म्हटलं ते चुकीचं नाही. अशी माणसं असतात ज्यांना वाईट झालेलं पाहण्यात आनंद मिळतो, आणि यशस्वी लोकांच्या बाबतीत अश्लाघ्य कमेंट करणारी जमात फक्त ट्रोलिंग मध्येच जन्माला नाही आली. या सगळ्यांवर पाय रोवून पुढें गेलं पाहिजे. अतिशय प्रॅक्टिकल आहेत. कमर्शियल इज व्हॉट वर्ल्ड वॉन्ट म्हणून त्यांनी एक सेफ मार्ग निवडलाय. पण, त्यांना हेही कळू दे, की त्यांचा इंटरव्ह्यू ऐकून वीस वर्षांपूर्वीची इमेज पुसण्यासाठी उत्सुक आम्ही मराठी श्रोतेही आहोत. अभिजात आणि प्रयोगशील अशी कला आवडणारेही अनेक आहेत. तसे प्रयोग होत आहेत. अमृता राव सारख्या हस्की आवाजावर जीव ओतणारेही आहेत. World never ends!
@Salvisujita6611 ай бұрын
😮
@vaishalisandim398019 күн бұрын
अतिशय छान व्यक्तिमत्व आहे, सत्य सहजपणे स्वीकारणं सोपं नसतं, ते स्वीकारून, कृतज्ञतेने जगणं खरंच अप्रतिम. खूप छान मुलाखत झाली.
@SanjeevBorse-vw1kj9 ай бұрын
राधाताई तुमचे तुमच्या स्वतःच्या विषयीचे विचार फार आवडले अगदी संय्यमित आणि विवेकी विचार जसे की माझे जीवन गाणे गाणे व्यथा असो आनंद असो दे प्रकाश किंवा तिमिर असुदे कधी वार्याचे कधी तार्यांचे झुळ झुळतात तराणे गाणे माझे जीवन गाणे खुप सुंदर स्वभाव आणि अंतरमुख होऊन स्वतः कडे बघणे हेच तर खरं खरं स्वच्छ जीवन आहे.
@urmilamahadik565111 ай бұрын
मुलाखत संपूच नये असं वाटतं, राधा मंगेशकर एक कणखर मुलगी आहे तिच्या व्यक्तिमत्त्वात अनेक सुंदर पैलू आहेत एक खूप छान हुशार, बुद्धिमान मुलगी कुठलाही garva नसलेली नितळ मनाची म्हणून माझी आवडती आहे ती.सौमित्र खूप धन्यवाद तुम्हाला. 😊
@SHRIVI3611 ай бұрын
खूप छान मुलाखत. राधा मधे खूपच बदल झाला आहे . त्यांचा सुरवातीचा भाव सरगम कार्यक्रम बघितला आहे. तेंव्हाही त्या छानच गात होत्या. आता त्यानी सोशल मीडिया कार याव . ही काळाची गरज आहे. कितीतरी अगदी सुमार गाणारे पुढे येत आहेत.त्यांच्यापेक्षा तुम्ही तर किती सुंदर गाता हे लोकाना कळू द्या इतक्या निगेटिव्ह होवू नका,पुढे या गात रहा
@mangeshabhyankar932311 ай бұрын
फार सुरेख मुलाखत... राधा मंगेशकरांचे चांगले आणि स्पष्ट विचार ऐकायला मिळाले. धन्यवाद आणि सौमित्रजी तुम्हाला पण साष्टांग दंडवत. फारंच छान प्रश्न विचारलेत... तुम्हाला आणि राधाजींना एकदा भेटायला आवडेल. बघू कधी योग येतोय ते.
@neenaneena620511 ай бұрын
अतिशय सुंदर आणि मनमोकळी मुलाखत होती. राधा मंगेशकरांचा पहिला भावसरगम मी पाहिला आहे. मोगरा फुलला.... माऊलींची ही रचना सादर केली होती. त्यांनी आपला मार्ग अगदी डोळसपणे निवडला आणि 'स्वीकारला' आहे हे जाणवते. खूप छान... तुम्ही सुध्धा त्यांना बोलायला जास्तीतजास्त वाव दिलात. अर्थात हे तुमचे स्किल च आहे. आपल्या अचूक आणि कमीतकमी प्रश्नातून दुसर्याला बोलते करणे, It's an art... All The Best to both of you.. राधा मंगेशकरांपर्यंत पोहोचवा. 🙏
@rajupatil46111 ай бұрын
नाशिकमध्ये झालेले जवळ जवळ सर्वच भाव सरगम चे कार्यक्रम मी आवर्जून पाहिलेले आहेत. हृदय नाथांनी गाणं गावं आणि पुढे आठवडाभर ते कानात गुंजत राहावं, प्रत्यक्ष कार्यक्रमात तर आनंदाची अत्युच्च अनुभूती असायची. राधाजी, जे सांगताहेत, ते बरोबर आहे.
@sandhyachoudhari718211 ай бұрын
अतीशय प्रामाणिक आणि सच्चा भाव जाणवला राधा मंगेशकरांच्या बोलण्यात.मुलाखतकार सौमित्र यांनी पण तितक्याच ताकदीने सादरीकरण केले .खुप शुभेच्छा
@prabhakarjoshi660510 ай бұрын
भाव सरगम हा उकृष्ठ कार्यक्रम आहे. लोकांनां काय पडलय, तुम्हाला जे मनापासून आवडत तेच करा. कारण राधा मंगेशकर हे एक वेगळं व्यक्तिमत्व आहे.🎉🎉🎉
@jyotichincholi681611 ай бұрын
Admire the honesty and approach towards adversities of life ! Ms Radha mangeshkar you rock..🎉
@geetajoshi782Ай бұрын
खुप छान मुलाखत..धन्यवाद Dr.Radha मंगेशकर you are really honest and intelligent. Don't underestimate yourself. Every flower has it's own fragrance and colour. Be as you are.nice personality..sweet smile. God bless you. Wish you all the best.
@anujakothare505011 ай бұрын
राधा तू एक आत्मविश्वासाने वागणारी मुलगी आहेस. मला तुझा आवाज तूझ्या पहिल्या अल्बम पासूनच आवडतोय. तू कुठेही कमी नाही पडत. तुझी खरं तर तुलना करणं मुर्खपणा आहे. अशीच आत्मविश्वासाने पुढे जात रहा.
@nanditakulkarni30672 ай бұрын
हि खरोखरच खूप सुंदर मुलाखत आहे. एक सच्ची परिपक्व अशा सुसंस्कृत मराठी मुलीची मुलाखत आहे. चांगल्या मुली अशाच असतात. राधा मंगेशकर तुला खुप खुप शुभेच्छा आणि तू छान आहेस अशीच रहा म्हणजे तू जीवनातला निखळ आनंद अनुभवशील❤
@shirishshanbhag643110 ай бұрын
हि मुलाखत ऐकल्यावर तुमच्या बद्दल आदर अजून वाढला तुम्ही असेच कामं करत रहा तुम्ही एक व्यक्ती म्हणून थोर आहात तुम्हाला पुढच्या कारकीर्द साठी माझ्या शुभेच्छा
@shabdali2699 ай бұрын
किती संयतपणे, कुठेही regression न बाळगता जी परिस्थिती आहे ती स्वीकारलीत तुम्ही...ख-या योद्धा आहात..जे आहे ते सहज स्वीकारणं आणि ते समोरच्याला सांगणं सोप्पं नाही,.. राधाजी ही तुमची बाजू माहित नव्हती ..,सौमित्र जी तुमच्या या पाॅडकास्टला सलाम....( वर्षा पतके थोटे शब्दाली नागपूर)
@mitramhane9 ай бұрын
🙏🏼🙏🏼💛
@pprajwade11 ай бұрын
राधाजींचा आयुष्याकडे बघण्याचा दृष्टिकोन फारच भावला 👌 सच्चेपणा मनाला भिडला ! सुंदर मुलाखत !
@saeepatil257011 ай бұрын
खूपच सुंदर मुलाखत.राधा मंगेशकर ही मला माझ्या मनाच्या खूपच जवळची वाटली...
@aditisalvi99352 ай бұрын
खुप छान मुलाखत झाली . खुप गोड व साधी मुलगी आहे.तिचं एकटीचा सफरनामा हे पुस्तक मी वाचलं आहे.खुप छान लिहीलंय त्या पुस्तकावर सही घ्यायची खुप इच्छा आहे.बघुया कधी पूर्ण होते.❤
@madhavipendse580110 ай бұрын
खूप छान.Simplly Gret.Radha is very honest person.hats off Radha. किती शांत आहेस. खूप छान राधा. Gr8 personality.
@archii.b11 ай бұрын
खूप छान राधा ❤️ तुम्ही फार सुंदर आहात, मनाने आणि एक परिपूर्ण व्यक्ती म्हणून ❤️ आपण एकाचे वयाचे आहोत. तुमची मुलाखत पाहताना माझ्या मैत्रिणीशी हितगुज करतेय असं मला वाटलं. म्हणून तुम्हाला प्रेमाने राधा म्हणावंसं वाटलं मला ❤️🙏
@alkadeshpande662810 күн бұрын
चाळीशीच्या म्हणजे लहानच आहेत राधाजी!तत्वज्ञानासारखा विषय!आणि त्यात डाँक्टरेट!तुमचे मोठेपण व वारसा यातच दिसून येतो.अशी माणसं नाही भारुड भरतीत दिसणार.आजच्या जगाला अशा व्यक्तीमत्वांची खुप जरुर आहे.तुम्ही ध्रुव तारा बनुन रहा.आँल द बेस्ट!
@snehalmanduskar360411 ай бұрын
निखळ निरागस सच्ची मुलाखत.. राधा हे नाव सार्थ करणारी राधा.. कृष्णा शिवाय पण नेहमीच त्याच्या बरोबर.. म्हणजेच काहीशी एकाकी पण तरीही सर्वांना माहीत असलेली.. माझ्या मते त्या एक काॅर्पोरेट लेव्हल च्या निवेदक होऊ शकतात.. कारण सकस वाचन , बाबांचा खंबीर सपोर्ट, ह्या गोष्टींमुळे त्यांचा आत्मविश्वास खुप उच्च दर्जाचा आहे.. कुठेही न अडखळता इतकी सुंदर मुलाखत.. मला राधा बद्दल खुप आदर आहे.. तिला अनेक उत्तम आशिर्वाद 😊👌🌹🙏
@AtrangiAadish10 ай бұрын
खुप छान.. झालेल्या प्रसंगाचा छोट्या छोट्या गोष्टी त्यांनी सांगितल्या त्या खरच गरजेचा होत्या. ते सगळे symptoms आता लक्षात राहतील. बऱ्याचदा आपल्याला माहितच नसते की काय होत नक्की. Thank you 🙏🏻 गुणी कलाकार..
@pramodgopale88774 ай бұрын
मुलाकात खूप एकांगी झाली .मुलाखत आणखी. विविध अंगानी फुलवता आली असती असो पण राधाजी तुमच्या बद्दल खूप आदर वाटतोय.❤❤❤❤
@vrindashahasane194311 ай бұрын
अतिशय सुंदर मुलाखत! राधाताईंना खूप खुबीने बोलते केलेत. व त्यांनीही अतिशय प्रांजळपणे प्रतिसाद दिला. दोघांनाही शुभेच्छा!
@bhagyashridixit106211 ай бұрын
Dr
@bhagyashridixit106211 ай бұрын
अप्रतिम मुलाखत राधा ताई तू मला आवडतेस
@hemantketkar35809 ай бұрын
राधा तुम्ही माझ्या मुलीच्या वयाच्या आहात. तुमचा विचार योग्य आहे. जग कसे याची योग्य अनुभूती आहे तुम्हाला. वडील महान आहेत तर ते खूप महान गोष्टी मुलांना देतात पण वडील ज्या क्षेत्रात महान असतील त्यातच आपण महान बनू हे आवश्यक नाही. आपल्याला योग्य क्षेत्र मिळण्याची वाट पहावी लागते. तो क्षण केव्हा येईल हे सांगता येत नाही. त्याची प्रतीक्षा करावी. जे स्वतःशी प्रामाणिक असतात त्यांना कधी तरी ईश्वरी दान मिळतेच मिळते. शुभेच्छा!
Good morning , Radhaji , I am hearing it for the first time in this interview. Great. You are honest, downright straightforward. Keep it up . God is with you and you are on the right side. That you have a great personality, honesty 🎉 and it will pay you in your life. May god bless you always. Afterall राधा is daughter of pandit हृदयनाथ जी आणि भारती जी.
@deepakdhonde656111 ай бұрын
छान ! प्रमाणिक मुलाखत !👍🌹 दोघांचंही मनापासून कौतुक ! फूल असे प्रत्येक आगळे रंग तयांचे मूळ वेगळे ! गंधही त्यांचे भिन्न जाणावे फूलपण तयांचे जपावे !
@kokancashew24711 ай бұрын
अतिशय सुंदर मुलाखत.. Chang🙏म्हणजे ननिगेटिव्ह आणि फैल म्हणजे काहीच करू शकत नाहीत हे योग्य नाही
@swatip.mungale915310 ай бұрын
खूप छान मुलाखत... प्रिय राधाजी आपण किती छान बोललात! आणि आमच्या सारखे खूप खूप जास्त लोक आहेत जे तुमच्या बरोबर आहेत... जगात सर्वत्र असे नावं ठेवणारे लोक असतात ओ.... पण आपण नेहमी आपल्या बरोबर कोण आहे ना त्यांचा विचार करायला हवा... आणि शेवटी... कुछ तो लोग काहेंगे क्यूँ की.. ...... ...लोगों का काम है.....
@dhanashreeajitmodak564110 ай бұрын
I never miss watching any interview of Dr.Ms.Radha Mangeshkar,a very good, profound personality who also comes across as a true person.Best wishes to her always..💐
@sandeepgulavani638211 ай бұрын
खूपच सुंदर रित्या आपण सगळेच अनुभव मांडले आहेत. सत्य आणि वास्तव. तुमच्यातल्या आत्मविश्वासाला मनापसून सलाम...लोक काय ओ बोलतच असतात. त्यांच्याकडे लक्ष न देणे हेच उत्तम...🙏🙏
@sulbhakeni130311 ай бұрын
खूपच छान मुलाखत दिली आणि घेतली राधाताईंएवढं स्पष्ट आणि खरं बोलणारी माणसं फारच कमी आहेत कुठेही बेगडी पणा जाणवला नाही मनापासून त्यांना शुभेच्छा यशस्वी भव।
@dr.kishore520911 ай бұрын
अप्रतिम मुलाखत.,सौमित्र जी, आपली सहज आणि सोप्पी पद्धत मला खूप भावते. आपण ज्याची मुलाखत घेता त्यांना आणि आम्हा प्रेक्षकांना एकदम आपलेसे करून टाकता. वेळ काढून मी आपले एपिसोड पाहतो. खूप खूप आभार.
@sudhirpotdar53911 ай бұрын
" अशीच आमची आई असती " अतिशय धीर गंभीर.... आपण सर्वच सहमत असाल की खोल खोल समुद्रालाच शांतीच वरदान भुषणावह असतं.... डॉ. राधा यांनाही मानाचा मुजरा..... मुद्दामच 'मंगेशकर' उल्लेख करत नाही.... असो..... मुलाखत कारांस ही धन्यवाद 🙏🚩
@Atikna2125 күн бұрын
अशीच आमची आई असती..... हे कधी बोली राधा, please सांगा
@manishalandage418811 ай бұрын
खूप सुंदर मुलाखत,राधाजी जी सोशल मीडिया तुम्हांला वाईट वाटते आहे त्यातीलच चांगले लोक तुम्हांला साथ देतील तुम्ही सर जसे म्हणाले तसे एकदा try करून बघा. त्याकाळी मोजक्याच लोकांपर्यंत गाणे ऐकणे किंवा शोज पाहणे शक्य होते पण आत्ताच्या काळात सर्वजण तुम्हांला ऐकू शकतील व ह्याचा फायदा तुमच्या live show ला पण होईल It's great to see u after a long time.
@snehakhisti556321 күн бұрын
कधी कधी असं वाटतं राधाजींचा आवाज काळाच्या पुढचा होता की काय.... त्यावेळी लोकांना तो समजलाच नसावा..... कवी ग्रेस, जसे लोकांना उमगले नाहीत.... दुर्बोध वाटले.... त्यांच्या व्यक्तिमत्वlतले आणखीही पैलू उलगडता येतील.... आपल्या नकारात्मक मतांमुळे छोटया राधाच्या अंतःकरणात किती खळबळ माजेल याचा तथाकथित रसिकांनी जराही विचार केला नाही याचं निश्चित वाईट वाटतं..... 🙏🏻♥️
@NaynaUdar11 ай бұрын
खुपच सुंदर मुलकात . स्वभावात सच्चेपणा निरागस मन आहे . तुमचे कार्यक्रम आम्हाला आवडतात. आवाज पण छान आहे .👍👌🌹❤
@sonalikarande2010 ай бұрын
खूपच छान वाटल राधा मंगेशकर यांचं बोलण , संयमी राहणं,कितीही रिजेक्शनस आले तरी मागे हटायच नाही हे फार कमी जणांना जमतं... खूप खूप धन्यवाद राधा जी तुमच्याकडून शिकण्यासारखं खूप आहे...तुम्ही खूप सुंदर गाता...आणि धन्यवाद सौमित्र जी
@aditikulkarni910011 ай бұрын
सक्षम आणि वैचारिक मूलगी राधा चा आम्हाला अभिमान आहे 🎉❤
@madhurakhare316911 ай бұрын
Saumitraji kiti sundar guidance dilat tumhi 😊 Felt like she is in pain 😢 स्वतःला बंद करुन ठेवलंय अस वाटतंय really sad😔
@Bodhi1231210 ай бұрын
...the worst part with such next generation is , they are judged by the people always, but the agony also starts just because these kids also try to experiment within the same areas instead for finding something real worthy for them ..
@bharatikulkarni796010 ай бұрын
episode अतिशय सुंदर वाटला.अगदी दोन चांगल्या मित्रांमधील मनमोकळ्या गप्पा वाटल्या......
@omkarkulkarni570010 ай бұрын
Accept the reality and move on...life is still wonderful
@vv678011 ай бұрын
राधा मंगेशकरांचा संयम , लढा , नाकारात्मकेतला इतक्या मोठ्या काळजाने सामोरं जाणं भावलं खूप वेगळा एपिसोड आणि आभार
@avijutams1975Ай бұрын
पूर्ण मुलाखत बघायला आवडेल.हा व्हिडिओ अपूर्ण वाटतो.राधा मंगेशकरांचे मनापासून कौतूक वाटते.इतकी नकारात्मकता वाट्याला येऊन सुध्दा सहजपणे त्याचा स्विकार करणे हि सोपी गोष्ट नाही.🙏🏼🙏🏼
@theabstractvlog972911 ай бұрын
भोगले जे दुःख त्याला सुख म्हणावे लागले एवढे मी भोगिले की मज हसावे लागले ठेविले आजन्म डोळे आपुले मी कोरडे पण दुजांच्या आसवांनी मज भिजावे लागले लोक भेटायास आले काढत्या पायासवे अन अखेरी कुशल माझे मज पुसावे लागले गवसला नाहीच मजला चेहरा माझा कधी मी कशी होते मलाही आठवावे लागले एकदा केव्हातरी मी वचन कवितेला दिले राखरांगोळीस माझ्या गुणगुणावे लागले गीत: सुरेश भट गायिका : आशा भोसले संगीत: श्रीधर फडके Tears in eyes, I want to hug her someday❤❤❤
@mitramhane11 ай бұрын
Uff.. Apt. You said it. 🙏🏼
@kedarmoghe11 ай бұрын
Faarach Sundar..sadly the world appreciates only 'perfection and commercial success'...and we don't think twice before passing on hurting comments...this interview is an eye opener for everyone to understand how NOT to be judgemental.. Saumitra, thanks for this episod and your attempt to celebrate some who is honest to her feelings and more importantly keeps a courage to challange, accept and celebrate what comes her way..we need MORE such episodes..you are making a difference Saumitra ..well done
@shriramjoshi827810 ай бұрын
such an honest response to every question, straightforward , no sugar coating... excellent interview
@shilpanigudkar776811 ай бұрын
मला ही मुलाखत खूप काही देऊन गेली. काही लोकप्रिय लोकांच्या मुलांच्या आयुष्यात किती वेगळे रंग असतात. त्याची सर्वथैव गहिरी ओळख राधा मंगेशकर यांनी करून दिली. Appreciate to her.👍
@sjsjsjuxej11 ай бұрын
खूप छान होता इंटरव्हूव. एखाद गाणं व्हायला हवे होते त्यांचे, खुपच सुंदर गातात त्या. आताची पिढीसुद्धा कलेवर प्रेम करणारी आहे फक्त त्यांच्या माध्यमातून त्यांच्या पर्यंत पोहचायला हवे.त्यांना हव्या असणारा वर्ग आता तरी शोषयल मिडियातुनच मिळू शकतो आपले स्वत्व जपत कितीतरी लोक माध्यमाचा वापर करतात आणि यशस्वी होतात. राधा मंगेशकरांनीही तसा प्रयत्न करावा आणि चांगले गायन लोकांपर्यंत पोहोचवावे❤😊
@snehadesai767611 ай бұрын
खूप सुंदर मुलाखत! प्रामाणिक मतं व्यक्त केली आहेत राधादीदीने. विचार खूप चांगले आहेत. मी सहमत आहे , त्यांच्या विचारांशी.
@shridharkulkarni893111 ай бұрын
आडनावाचे ओझ हे न सांगता येणारे आहे. रोहन गावसकर, अर्जुन तेंडुलकर यांनापण याचा त्रास होताना दिसतो. तुलनाचे त्रास हा जीवघेणा असतो. डॉ .राधा मंगेशकरांनी तो नेमक्या शब्दात मांडला. धन्यवाद व पुढिल वाटचालीसाठी शुभेच्छा.
@sampadakulkarni597411 ай бұрын
राधा मंगेशकर यांच्या वेदना समजू शकतो आम्ही.एक व्यक्ती म्हणून त्यांची बाजू अतिशय खरी आहे.अत्यंत सकारात्मक विचारांच्या बळावर त्या उभ्या आहेत.त्यांना खूप शुभेच्छा.सौमित्र तू त्यांच्या विचारांना समीर आणून तेही अतिशय स्पष्ट मुद्दे प्रश्नात घेत घेत...याबद्दल आदर.
@manmohinee11 ай бұрын
राधा मंगेशकरांचं पहिलं टायटल साँग माझ्या अजूनही लक्षात आहे 😊 ' दोन हे आहेत पेले, आपुले नाही जणू कोणता आहे तुझा अन् कोणता माझा म्हणू ? ' या त्या ओळी त्यांचा तो आवाज आज पुन्हा ऐकला. छान वाटलं. मी त्यांना कधीच विसरलेले नाही.😊😊❤
@piyalisingh58366 ай бұрын
Radha, all the circumstances made you a highly spiritual person. Godbless Swati Singh
@india_debates976310 ай бұрын
Excellent thought provoking interview. What a food for thought for those who think that next gen of Celebrities have it easy . Infact Bradman's son changed his surname to Bradsen. Also the Interviewer has a striking similarity to Bollywood Actor Bobby Deol