Рет қаралды 2,908
#मेथीचेधिरडे #मेथीचेघावन #धिरडे #घावन #नाश्ता #डब्याचेपदार्थ #शाळेचाडबा #लीनाजसुगरणकट्टा #लीनाजोशी
मेथीचे धिरडे/घावन
स्वच्छ धुवून बारीक चिरलेली मेथी २ वाटी
स्वच्छ धुवून बारीक चिरलेली कोथिंबीर २ वाटी
ज्वारीचे पीठ दीड वाटी
तांदळाचे पीठ १ वाटी
बेसन पाव वाटी
आलं लसूण मिरची जिरे पेस्ट १ टेबलस्पून
मीठ चवीनुसार
हळद १ चमचा
तिखट १ चमचा
ओवा अर्धा चमचा
तीळ अर्धी वाटी ( यातले अर्धे तीळ बाजूला ठेवावे.)
तेल
प्रथम एका भांड्यात तेल सोडून वरील सर्व जिन्नस एकत्रित करून घ्यावे. थोडे थोडे पाणी घालून पीठ सरभरीत भिजवून घ्यावे.
तवा गरम करून त्याला तेल लावून घ्यावे. मग त्यावर भिजवलेले पीठ २ डाव घालावे. थोडे जाडसरच घालावे. वरुन तीळ भुरभुरावे. झाकण ठेवून एका बाजूने छान भाजून घ्यावे. खालून शिजले की झाकण काढून धिरडे उलटवावे. परत तेल सोडून दुसऱ्या बाजूनेही खमंग भाजून घ्यावे.
आपले खमंग आणि पौष्टिक असे मेथीचे धिरडे तयार आहे. गरमागरम धिरडे दही किंवा हिरव्या चटणीबरोबर सर्व्ह करावे.
सखी लवाटे
+91 8149212975
Video shooting & editing:
Varun Damle
+91 95459 08040