Рет қаралды 4,017
पाडगावकर काकांनी जसे त्यांच्या बोलगाण्यांमधून त्या वेळचे समाजातले विषय मांडले, मनोवस्था मांडली..त्यावरूनच प्रेरणा घेऊन काही कविता लिहिल्या गेल्या. या कवितांना मी हल्लीची गाणी म्हणते. गप्पागप्पांमधून अनेकदा अनेक विषय कानावर येतात त्यापैकीच एक महत्त्वाचा विषय म्हणजे आजची तरुणाई, करियर, लग्न, मुलगा - मुलगी हा विचारांमधला भेद, संसार, अपेक्षा वगैरे वगैरे. त्यावरूनच हे मनात, मनातून काव्यात उलगडत गेलं. 'सहज सुचलं तेव्हा' या माझ्या काव्यसंग्रहाच्या तिसऱ्या आवृत्तीचं प्रकाशन कल्पना विहार महिला मंडळ मुलुंड पूर्व या संस्थेच्या वर्धापन दिन सोहळ्यात ज्येष्ठ अभिनेत्री इला भाटे आणि ज्येष्ठ संकलक भक्ती मायाळू यांच्या शुभहस्ते झालं. त्यावेळी इला ताईंनी त्यांच्या मनोगतात माझ्या २ कविता वाचल्या, त्यापैकी ही एक - 'करियरवाली बायको हवी'.
आवडली तर अवश्य शेअर करा..
श्रेयसी मंत्रवादी