Рет қаралды 471
मराठ्यांच्या पराक्रमाच्या दक्षिणेतील पाऊलखुणा शोधत आता आपण जिंजी च्या विशाल बलाढ्य अश्या किल्ल्यात येऊन पोहोचलो आहोत. छत्रपती शिवाजी महाराजांच्या दक्षिणदिग्विजय मोहिमेचा मेरुमणी म्हणजे किल्ले जिंजी.हा किल्ला नक्की आहे तरी कसा, मराठ्यांच्या इतिहासात ह्याला इतका मान का आहे?? ह्या किल्ल्यावर असे काय खास घडले ज्यामुळे दक्खन च्या इतिहासाच्या प्रवाहच बदलून गेला??? आणि सर्वात महत्वाचे म्हणजे छत्रपती शिवाजी महाराजांनी मनात योजलेली ह्या किल्ल्यासाठीची भूमिका ह्या किल्ल्याने छत्रपती शिवरायानंतर देखील पार पडली का ?? ह्या सर्वांचा आपण सह्याद्रीनेचर ट्रेल्स च्या येणाऱ्या जिंजी मालिकेत वेध घेणार आहोत.
आजच्या ह्या जिंजी सिरीजच्या आठव्या भागात आपण कृष्णगिरी किल्ल्याचे चोर दरवाजे, तटबंदीची अनोखी रचना, गोदामे वगैरे ऐतिहासिक वास्तूंची सफर ह्या किल्ल्याचा इतिहास जाणून घेत घेत करणार आहोत.
======================================================
संदर्भ
1) किल्ले जिंजी - श्री महेश तेंडूलकर
2) मासिर इ आलमगिरी - साकी मुस्तेद खान - रोहित सहस्त्रबुद्धे
3) जेधे शकावली
4) सभासद बखर
5) हिंदुस्थान चा अर्वाचीन इतिहास भाग दुसरा - मराठी रियासत पूर्वार्ध - गोविंद सखाराम सरदेसाई
6) मराठ्यांचे स्वातंत्र्यसमर (उत्तरार्ध) छत्रपती राजाराम व ताराबाई (1689- 1707)
प्राध्यापक श श्री पुराणिक
7) History of Gingee and it's Rulers
Sir C R Reddy
8) Madras District Gazetteers - South Arcot district volume l
9) राजा शिवछत्रपती - शिवशाहीर बाबा साहेब पुरंदरे
10) मोगल दरबारची बतमीपत्रे
========================================================
Music Credits -
Song : SOUTH INDIAN LOVE TABLA BELLS - By Flute
/ by-flute
Music Promoted By Music Restored - Music For Content Creators
• ( No Copyright Music) ...