खुपच सुंदर आणि अप्रतिम ऐतिहासिक पुराव्यानिशी माहितीचे सादरीकरण. खरच रोमांचकारी इतिहासाची अनुभूती झाली. खुपच माहितीपूर्ण असा हा आपला व्हिडिओ. आपणांस सलाम साहेब . आता आतुरता दुसर्या भागाची. 🌹जय भवानी 👃जय शिवाजी !🌹
@sahyadrinaturetrails5 ай бұрын
अतिशय आपुलकीने आपण जी छानशी प्रतिक्रिया व्यक्त केली त्यासाठी आम्ही सर्व टीम आपले आभारी आहोत सर☺️ आपल्यासारख्या इतिहासप्रेमींना तथ्य व पुराव्यांवर आधारित इतिहासाच्या माहितीसोबत गडदुर्गांचे स्थलदर्शन देखील घडवावे हे च आमच्या चॅनेल चे उद्दिष्ट आहे. रायगडाचे सर्व भाग नक्की बघा व आपली प्रतिक्रिया नक्की कळवा.
@uttamraojadhav15613 жыл бұрын
छान माहीति देता खुप अंभ्यास आहे इतिहासामधील थँक्यू
@sahyadrinaturetrails3 жыл бұрын
आम्ही तर केवळ इतिहासाचे विद्यार्थी आहोत, जी माहिती मिळते ती लोकांपर्यंत पोहोचवतो इतकेच.
@anilkamlajkar90493 жыл бұрын
मला जसा वेळ मिळतो मी तुमचे सगळे विडिओ पाहत असतो आणि इतिहास विषयी गोडी निर्माण करून माझ्या आकलनात भर करत असतो.
@sahyadrinaturetrails3 жыл бұрын
रायगडाचे चारही भाग बघून आपली प्रतिक्रिया नक्की कळवा सर. इतिहासप्रेमी रसिक प्रेक्षकांकडून मिळणाऱ्या योग्य प्रतिक्रियांमुळेच आम्हाला नवनवीन व्हिडियो तयार करायचे बळ मिळते.
@vinodsalvi28963 жыл бұрын
आपण खूपच छान माहिती दिलीत त्या बद्दल धन्यवाद
@sahyadrinaturetrails3 жыл бұрын
आमच्या टीमचा व्हिडीओ पाहून दिलेल्या तुमच्या सुंदर प्रतिक्रियेबद्दल आम्ही खूप खूप आभारी आहोत😊!! रायगड किल्ल्याच्या पूर्ण माहितीसाठी इतर तीन भाग सुद्धा नक्की बघा शिवरायांचा त्यांच्या मावळ्यांचा इतिहास लोकांपर्यंत पोहोचवण्यात काहीच मेहनत नाही दादा, उलट आनंदच आहे. तुमच्यासारखे रसिक जेव्हा आमचे सादरीकरण अवडल्याची प्रतिक्रिया देतात तेव्हा छत्रपतींच्या चरणी आमची सेवा रुजू झाली असेच आम्ही समजतो. महाराष्ट्रातील किल्ल्यांच्या व ऐतिहासिक स्थळांच्या माहितीसाठी आमचे चॅनेल subscribe करा ही विनंती🙏
@udaygurav46624 жыл бұрын
छत्रपती शिवाजी महाराज की जय
@sahyadrinaturetrails4 жыл бұрын
छत्रपती शिवाजी महाराजांचा विजय असो धर्मवीर संभाजीमहाराजांचा विजय असो 🚩🚩🚩
@santoshchavan7857 Жыл бұрын
लय भारी साहेब.अप्रतिम माहिती.
@sahyadrinaturetrails Жыл бұрын
आपल्या मस्त प्रतिक्रियेसाठी खूप खूप धन्यवाद सर😊!! सामान्य माणसाला आपल्या मराठा इतिहासाबद्दल गोडी निर्माण व्हावी,लोकांनी येथले किल्ले , सुंदर लेणी पहावेत हाच आमच्या ग्रुप चा हे व्हिडीओ तयार करण्यामागे उद्देश आहे. म्हणून शक्य होईल तितका अभ्यास करून, ऐतिहासिक पुस्तकातून संदर्भ गोळा करूनच जास्तीजास्त अचूक माहिती सर्वांपर्यंत पोहोचविण्याचा आमचा प्रयत्न असतो.
@joyrider84233 жыл бұрын
अतिशय उत्कृष्ट माहिती सांगितली तुम्ही रायगड किल्ल्याची एवढी माहिती ती पण व्यवस्थित आणि सुटसूटित सांगणेकरिता खुपच मेहनत घेतली असणार तुम्ही ह्यात काय शंका नाही तुमच्या ह्या पवित्र कार्यास माझा प्रणाम 🙏🙏🙏🙏
@sahyadrinaturetrails3 жыл бұрын
आमच्या टीमचा व्हिडीओ पाहून दिलेल्या तुमच्या सुंदर प्रतिक्रियेबद्दल आम्ही खूप खूप आभारी आहोत😊!! रायगड किल्ल्याच्या पूर्ण माहितीसाठी इतर तीन भाग सुद्धा नक्की बघा शिवरायांचा त्यांच्या मावळ्यांचा इतिहास लोकांपर्यंत पोहोचवण्यात काहीच मेहनत नाही दादा, उलट आनंदच आहे. तुमच्यासारखे रसिक जेव्हा आमचे सादरीकरण अवडल्याची प्रतिक्रिया देतात तेव्हा छत्रपतींच्या चरणी आमची सेवा रुजू झाली असेच आम्ही समजतो. महाराष्ट्रातील किल्ल्यांच्या व ऐतिहासिक स्थळांच्या माहितीसाठी आमचे चॅनेल subscribe करा ही विनंती🙏
@rameshpatil53743 жыл бұрын
@@sahyadrinaturetrails सुंदर फोटो आहेत
@spupadhye88423 жыл бұрын
★अप्रतिम , खूपच छान पाठांतर करून अनमोल माहिती आपण सांगितली. धन्यवाद सर 🙏🏻★
@sahyadrinaturetrails3 жыл бұрын
आमचा व्हिडीओ पाहून छानशी प्रतिक्रिया व्यक्त केल्याबद्दल आम्ही सर्व टीम आपले खूप खूप आभारी आहोत😊!! रायगडाचे चारही भाग पाहून आपली प्रतिक्रिया नक्की कळवावी ही विनंती
@sarikadesai67223 жыл бұрын
Khup khup chan mahiti dili
@sahyadrinaturetrails3 жыл бұрын
आमच्या टीमचा व्हिडीओ पाहून दिलेल्या तुमच्या सुंदर प्रतिक्रियेबद्दल आम्ही खूप खूप आभारी आहोत😊!! रायगड किल्ल्याच्या पूर्ण माहितीसाठी इतर तीन भाग सुद्धा नक्की बघा. महाराष्ट्रातील किल्ल्यांच्या व ऐतिहासिक स्थळांच्या माहितीसाठी आमचे चॅनेल subscribe करा ही विनंती.🙏
@somnathwabale25262 жыл бұрын
Khup khup abhar ya tirthashetrache atishay vishtrut ani khup chan ani sakhol mahiti dili raygadavari sarvottam mahitipar asa tumcha video ahe khup khup dhanyavad sir jay shivray jay shambhuraje Jay jiju
@sahyadrinaturetrails2 жыл бұрын
सर आपल्या आपुलकीने व्यक्त केलेल्या ह्या प्रतिक्रियेसाठी आम्ही सर्व टीम खूप खूप आभारी आहोत. आम्ही सर्वोत्तम तर नाही पण जितका शक्य होईल तितका जास्तीतजास्त संदर्भ , पुराव्यासह माहिती देण्याचा छोटासा प्रयत्न केला आहे. आपल्या सारख्या शिवप्रेमी रसिकांच्या पसंतीची प्रतिक्रिया हेच आमचे यश आले आम्ही मानतो छत्रपती शिवाजी महाराजांचा विजय असो🚩🚩
@kiranzade78154 жыл бұрын
तुम्ही किल्ला दाखवताना तेंव्हाचा पूर्ण इतिहास उभा करता. खूपच छान
@sahyadrinaturetrails4 жыл бұрын
तुमच्या छान प्रतिक्रियेसाठी खूप खूप आभारी आहोत😊!!
@kirandabholkar91174 жыл бұрын
खुप छान माहिती दिलीस मित्रा. 🚩🚩🚩🚩🚩🚩🚩🚩🚩
@sahyadrinaturetrails4 жыл бұрын
धन्यवाद 😊!! रायगडावर आम्ही चार भागात माहितीपट घेऊन येत आहोत सर्व भाग जरूर बघा
@chitralwarv.b.9214 жыл бұрын
सर तुम्ही खुप चांगल्या प्रकारे प्रत्येक किल्ल्यांची माहिती सांगता. खुप खुप धन्यवाद. आम्हाला माहिती ऐकताना असं वाटतं की,आम्ही तुमच्या सोबत किल्ला पाहत आहोत....
@yashodutt2 жыл бұрын
वाह क्या बात है इतिहास का golden chapter जान कर मैं तो धन्य हो गया. जय हो 🙏 🙏
@sahyadrinaturetrails2 жыл бұрын
धन्यवाद यशोदत्त जी 🙏 रायगड किले की पुरी चार भागो की सिरीज जरूर देखीये
@yashodutt2 жыл бұрын
@@sahyadrinaturetrails आपके चैनल के सभी वीडियो देख रहा हूँ, अभी Mi का 4K tv भी 50'' लिया है ताकि भव्य किले देख सकूं.. जाना न जाने कब नसीब होगा ☺
@sahyadrinaturetrails2 жыл бұрын
@@yashodutt आपके मन मे सच्ची इच्छा हे इसलीये एक दिन आप जरूर जा पाओगे सर। यशोदत्त जी आप काहा रहते हो ?
@yashodutt2 жыл бұрын
@@sahyadrinaturetrails भाई मैं Delhi रहता हूं 🙏
@sahyadrinaturetrails2 жыл бұрын
@@yashodutt वाह बोहोत बढिया हे , आप भारत के दिल मे रहते हो ।
@shivraj-yr1kg4 жыл бұрын
खूपच सुंदर .... आज पहिल्यांदाच एवढी चांगली माहिती मला मिळाली पहिला भाग खूप खुप खुप खुप छान जय शिवशंभू
@sahyadrinaturetrails4 жыл бұрын
आमचा रायगड किल्ल्यावरील प्रथम भाग पाहून केलेल्या छान प्रतिक्रियेबद्दल आम्ही खूप खूप आभारी आहोत😊!! रायगड किल्याचे इतर तीन भाग देखील नक्की बघा ही विनंती 🙏
@vashishthakatare6774 жыл бұрын
छत्रपती शिवाजी महाराज जयंती निमित्त हार्दिक शुभेच्छा खूप छान माहिती दिली तेजस सर
@sahyadrinaturetrails4 жыл бұрын
तुम्हाला सुद्धा शिवरायांच्या जयंतीनिमित्त हार्दिक शुभेच्छा !!
@alkaSalunkheKeni4 жыл бұрын
खूप छान माहिती दिलीत सर ..thanks
@sahyadrinaturetrails4 жыл бұрын
आम्ही केवळ इतिहासाचे विद्यार्थी व शिवरायांचे भक्त आहोत कृपया सर म्हणू नये, आमची एव्हडी पात्रता नाही. मराठयांचा इतिहास लोकांना दाखवणे हेच उद्दिष्ट डोळ्यासमोर ठेवून आम्ही ह्या चॅनेलची निर्मिती केली आहे.
महाराष्ट्रातील सर्व किल्ल्यांचा आणि ह्या मातीचा पराक्रमी इतिहास सर्वांसमोर आणणे हेच आम्ही आमच्या चॅनेलचे उद्दिष्ट ठेवले आहे. कुठलाही किल्ला, मंदिर,लेणे हे त्याच्या संपूर्ण माहिती व वास्तुवैभवासह सादर करणे, इतिहासप्रेमी शिव-शंभू प्रेमी प्रेक्षकांना दाखवणे हीच आम्ही छत्रपती शिवरायांची सेवा आहे असे मानतो. आपल्यासारखे इतिहासप्रेमी जेंव्हा छान प्रतिक्रिया देतात तेव्हा छत्रपतींच्या चरणी आमची सेवाच जणू रुजू होते. आमचा व्हिडीओ पाहून छानशी प्रतिक्रिया व्यक्त केल्याबद्दल आम्ही सर्व टीम आपले आभारी आहोत😊!! रायगड किल्ल्याचे चारही भाग नक्की बघा ही विनंती🙏
@kirtibhosale27973 жыл бұрын
अप्रतिम माहित पुरविण्याचे काम करून आपण पुण्यच प्राप्त करत आहात... keep it up👍
@sahyadrinaturetrails3 жыл бұрын
आमचा व्हिडियो पाहून छानशी प्रतिक्रिया व्यक्त केल्याबद्दल आम्ही सर्व टीम आपले आभारी आहोत 😀!! आपल्या प्रोत्साहना मुळेच आम्हाला नवनवीन किल्ले, लेणी, मंदिरांवर व्हिडीओ तयार करण्याचे बळ मिळते. आपला पाठिंबा नेहमी असाच आमच्या सोबत राहू दे आपल्या मित्रांना, नातेवाईकांना हा व्हिडीओ नक्की शेयर करा ही विनंती🙏 ।
@kirtibhosale27973 жыл бұрын
@@sahyadrinaturetrails नक्कीच.. जिजामातांचा आशीर्वाद, छ.शिवाजी महाराज आणि छ. शंभू महाराजांचे खंबीर पाठबळ आपल्यासोबत राहो🙏
@sahyadrinaturetrails3 жыл бұрын
@@kirtibhosale2797 जय जिजाऊ जय शिवराय जय शंभुराजे 🚩🚩🚩
@pappukarande15743 жыл бұрын
भन्नाट माहिती सांगता राव आसे वाठते आपण शिवकाळात जगत आहोत
@sahyadrinaturetrails3 жыл бұрын
व्हिडिओ पाहून छानशी प्रतिक्रिया व्यक्त केल्याबद्दल आपले खूप खूप आभार सर😊!! आम्ही सादर केलेली माहिती आपल्यासारख्या शिवप्रेमींना आवडली की आमची सेवा छत्रपतींच्या चरणी रुजू झाली असे आम्ही समजतो आमचे प्रतापगड, विशाळगड, कुलाबा, पद्मदुर्ग असे इतर व्हिडीओ देखील पहावेत व आपल्या प्रतिक्रिया कळवाव्यात ही विनंती🙏🙏
@harshwardhanpatil19444 жыл бұрын
Thanks you for this wonderful video. जय शिवशंभू
@sahyadrinaturetrails4 жыл бұрын
धन्यवाद 😊!!
@poonamkumbhare3144 жыл бұрын
छत्रपती शिवरायांच्या इतिहास पुन्हा जीवंत केला, धन्यवाद
@sahyadrinaturetrails4 жыл бұрын
तुमच्या छान प्रतिक्रियेबद्दल खूप खूप आभारी आहोत😊!!
@MS-gw2kp4 жыл бұрын
जय शिवराय मन भरून आले सर खूप छान माहिती दिली आपण खूप खुप धन्यवाद
@sahyadrinaturetrails4 жыл бұрын
छत्रपती शिवरायांच्या इतिहासाने कोणाही मराठी माणसाचे मन भरून आलेच पाहिजे कारण आपल्याला पराक्रमाचा वारसा आहे. शिवरायांच्या त्यागामुळे व त्यांच्या मावळ्यांनी केलेल्या बलिदानामुळे आपण आज गर्वाने महाराष्ट्रात राहू शकतो छत्रपती शिवाजी महाराजांचा विजय असो !!⛳⛳
@jaydipsakhalkar863 жыл бұрын
तुम्ही माहिती खुप चांगली देताय हर हर महादेव
@sahyadrinaturetrails3 жыл бұрын
महाराष्ट्रातील सर्व किल्ल्यांचा आणि ह्या मातीचा पराक्रमी इतिहास सर्वांसमोर आणणे हेच आम्ही आमच्या चॅनेलचे उद्दिष्ट ठेवले आहे. कुठलाही किल्ला, मंदिर,लेणे हे त्याच्या संपूर्ण माहिती व वास्तुवैभवासह सादर करणे, इतिहासप्रेमी शिव-शंभू प्रेमी प्रेक्षकांना दाखवणे हीच आम्ही छत्रपती शिवरायांची सेवा आहे असे मानतो. आपल्यासारखे इतिहासप्रेमी जेंव्हा छान प्रतिक्रिया देतात तेव्हा छत्रपतींच्या चरणी आमची सेवाच जणू रुजू होते. आमचा व्हिडीओ पाहून छानशी प्रतिक्रिया व्यक्त केल्याबद्दल आम्ही सर्व टीम आपले आभारी आहोत😊!!
@maheshkadam57563 жыл бұрын
Very nice and deep information
@sahyadrinaturetrails3 жыл бұрын
Thank-you for your appreciation 😊!!
@maheshkadam57563 жыл бұрын
I belongs to Nizampur village (nearTakmak wadi and Raigad wadi) which is in the base of Raigad ..though I am local guy.. I didnt have such deep information.. Good work.. Carry on
@sahyadrinaturetrails3 жыл бұрын
@Mahesh Kadam Thank-you for your admiration.This kind of support gives us strength to create more videos.
@anilmanjare788210 ай бұрын
Excellent!!!
@sahyadrinaturetrails10 ай бұрын
Thank you for watching and Appreciating our videos !! Request you to please watch our entire video series of Raigad Fort in order to get complete history knowledge of this powerful capital of Maratha Empire.
@sairajballal91134 жыл бұрын
मस्त...,
@sahyadrinaturetrails4 жыл бұрын
धन्यवाद सर😊!!
@rajanidivekar68284 жыл бұрын
फार छान वाटले. नेहमी प्रमाणे ऐतिहासिक पुराव्यानिशी माहिती मिळाली
@sahyadrinaturetrails4 жыл бұрын
आपल्या प्रतिक्रियेसाठी आमची पूर्ण टीम खूप खूप आभारी आहे😊!! इतिहास हे शास्त्र आहे आणि पुराव्यांआधारेच जे जे सत्याच्या कसोटीवर खरे ठरते तेच लोकांसमोर ठेवणे हे आमच्या चॅनेलचे उद्दिष्ट आहे.अधिकाधिक ऐतिहासिक माहितीसाठी आमचे चॅनेल नक्की subscribe करा ही विनंती 🙏
@asmitalandge39674 жыл бұрын
छत्रपती शिवाजी महाराजांना आदरपूर्वक जयभीम.
@sahyadrinaturetrails4 жыл бұрын
शिवरायांचा विजय असो !!
@anilkavankar5223 Жыл бұрын
खूप छान
@sahyadrinaturetrails Жыл бұрын
आमचा व्हिडियो पाहून छानशी प्रतिक्रिया व्यक्त केल्याबद्दल आम्ही सर्व टीम आपले आभारी आहोत 😀!! आपल्या प्रोत्साहना मुळेच आम्हाला नवनवीन किल्ले, लेणी, मंदिरांवर व्हिडीओ तयार करण्याचे बळ मिळते. आपला पाठिंबा नेहमी असाच आमच्या सोबत राहू दे आपल्या मित्रांना, नातेवाईकांना हा व्हिडीओ नक्की शेयर करा ही विनंती🙏
@vandanaborkar54434 жыл бұрын
Sir This much of detailed explanation I have never watched thank you Soo much for your detailed explanation
@sahyadrinaturetrails4 жыл бұрын
Thank-you for appreciation 😊!! Our team have decided to show all the historical places related to Maratha history with actual proof mentioned in old bakhars , royal letters etc. Also we always check the references in the best history books written by well-known authors in order to provide you real history without any myth. Please subscribe our channel to get more and more detailed historical information about Maratha History. Also please forward our video to your friends.
@vandanaborkar54434 жыл бұрын
@@sahyadrinaturetrails absolutely sir keep continue this Great work
@suhasshorts62983 жыл бұрын
खुप छान sir
@sahyadrinaturetrails3 жыл бұрын
आमचा व्हिडीओ पाहून छानशी प्रतिक्रिया दिल्याबद्दल आम्ही खूप खूप आभारी आहोत दादा😊!! आम्ही सर्व अगदी सामान्य माणसे आहोत, आमच्याकडे इतिहासाची कुठल्याही विद्यापीठाची अधिकृत पदवी नाही. त्यामुळे आम्हाला सर म्हणू नये तितकी आमची पात्रता नाही. आम्ही केवळ आमच्या अल्पबुद्धीने जसे जमेल तसे मोठ्या इतिहासकारांनी केलेलं संशोधन संकलित करून आपल्यासमोर चलचित्र माध्यमातून मांडण्याचा प्रयत्न केला आहे. आपल्यासारख्या इतिहासप्रेमींना हा प्रयत्न आवडला की आमची सेवा छत्रपती स्वामींच्या चरणी रुजू झाली असे आम्ही मानतो. रायगडाचे इतर तीन भाग देखील नक्की बघावे व आपली प्रतिक्रिया कळवावी ही विनंती🙏🙏 अधिकाधिक किल्ल्यांच्या लेण्यांच्या व इतर संस्क्रुतीक स्थळांच्या माहितीसाठी आमचे चॅनेल नक्की subscribe करा.
@balasahebmoze48724 жыл бұрын
खुप छान माहिती दिली आहे.अशी अभ्यास पूर्ण माहिती देत चला
@sahyadrinaturetrails4 жыл бұрын
प्रत्येक ऐतिहासिक स्थळाची ऐतिहासिक पुराव्यानिशी अशीच माहिती आमच्या चॅनेलद्वारे तुम्हास मिळत राहील. अधिकाधिक स्थळांच्या माहितीसाठी आमचे चॅनेल जरूर subscribe करा ही विनंती.
@sanskargaikwad16174 жыл бұрын
टोणगा म्हणजे रेडा..... आपण गडा बद्दल चांगली माहिती सांगितली, एक मराठा म्हणून आपले सविनय आभार. आपल्या ज्या ज्या किल्ल्याच्या विषयी आशी ऐतिहासिक माहिती आसेल ती जरुर आश्या माध्यमातून सामान्य माणसा पर्यंत पोहचवा.. आपण केलेल्या प्रयत्नाने तरूण पिढीला नक्कीच प्रेरणा मिळेल.. आपल्या पुढील वाटचालीसाठी हार्दिक शुभेच्छा .
@sahyadrinaturetrails4 жыл бұрын
तुमच्या मनःपूर्वक दिलेल्या प्रतिक्रियेबद्दल खूप खूप आभारी आहोत😊!! मराठ्यांचा पराक्रमी इतिहास असणारी सर्वच ऐतिहासिक स्थळे दाखवायचे आमचे ध्येय आहे
@anilranage59204 жыл бұрын
तुमचे व्हिडिओ खूप माहितीपूर्ण असतात
@sahyadrinaturetrails4 жыл бұрын
आपल्या छान प्रतिक्रियेबद्दल खूप खूप आभारी आहोत 😊!! महाराष्ट्रातील इतर किल्ल्यांच्या व ऐतिहासिक स्थळांच्या अधिकाधिक माहितीसाठी आमचे चॅनेल जरूर subscribe करा ही विनंती
@amaramravti52754 жыл бұрын
खूप सुंदर माहिती आहे दादा 🚩जय भवानी जय शिवराय 🚩
@sahyadrinaturetrails4 жыл бұрын
तुमच्या छान प्रतिक्रियेबद्दल खूप खूप धन्यवाद 😊!!
@jaydipsakhalkar864 жыл бұрын
माहिती चांगली देताय
@sahyadrinaturetrails4 жыл бұрын
आपल्या ह्या मनःपूर्वक केलेल्या छान प्रतिक्रियेबद्दल खूप खूप आभारी आहोत 😊!! मराठ्यांच्या इतिहासाशी संबंधित सर्व ऐतिहासिक स्थळे त्यांच्या पूर्ण माहितीसह लोकांपुढे आणणे हेच आमच्या टीमचे ध्येय आहे. मराठा इतिहासाच्या माहितीसाठी दुर्गराज रायगडाचे चारही भाग नक्की बघा ही विनंती🙏 अश्या अजून नवनवीन माहितीसाठी आमचे चॅनेल नक्की subscribe करा व आपल्या ओळखीच्या इतिहासप्रेमींना जरूर forward करा
@uttamraojadhav15613 жыл бұрын
सुंदर किल्ला
@sahyadrinaturetrails3 жыл бұрын
छत्रपती शिवाजी महाराजांच्या तख्ताची जागा!! हिंदवी स्वराज्याच्या सार्वभौम सिंव्हासनाची जागा!! म्हणजे आपला दुर्गराज रायगड
@manishmohite55154 жыл бұрын
आजपर्यंत खूप व्लॉग्स पाहिलेत पण इतकी विस्तृत माहिती असलेला व्हीलॉग हा पहिलाच आहे. खूप छान माहिती, रायगडावर राज्याभिषेक दिनी जाऊन आलो आहे परंतु पावसाळ्यामध्ये गड इतका फिरायला मिळाला नाही. श्रीमंत छत्रपती शिवाजी महाराजांना मनाचा मुजरा 🚩. असेच अखंड तुमचं कार्य चालू राहुद्या आणि आम्हाला नवनवीन किल्ल्यांची सफर घडवत रहा. धन्यवाद
@sahyadrinaturetrails4 жыл бұрын
तुमच्या मनःपूर्वक केलेल्या कौतुका बद्दल खूप खूप आभारी आहोत😊!! नक्कीच आमच्या चॅनेलवर अधिकाधिक ऐतिहासिक स्थळे दाखवत रहाण्याचा प्रयत्न करत राहू
@atulthite60424 жыл бұрын
खुपच छान दादा...👌🚩 अगदी एतिहासिक संदर्भासहीत माहिती दिली....
@sahyadrinaturetrails4 жыл бұрын
आपल्या प्रतिक्रियेबद्दल खूप खूप आभारी आहोत😊!! भारतामध्ये बहुतेकदा इतिहास भावनाप्रधान केला जातो, व ऐतिहासिक तथ्य बारकावे बाजूला पडतात तसे न करता जो खरच घडून गेला आहे असा आपला वैभवशाली इतिहास पुराव्यानिशी मांडून लोकांपर्यंत पोहचवणे हेच आमच्या टीमचे उद्दिष्ट आहे.
@pradeepsir78084 жыл бұрын
किल्ल्याची माहिती फिरत फिरत दिलीत तर बरं होईल. खूप छान माहिती. धन्यवाद.
@sahyadrinaturetrails4 жыл бұрын
आपल्या छानश्या प्रतिक्रियेबद्दल खूप खूप आभारी आहोत 😊!! रायगडावरील प्रत्येक स्थळाचे जितके शक्य होईल तेव्हडे दर्शन घडवून आणण्याचा आम्ही प्रयत्न केला आहे दादा, तरीसुद्धा पुढील किल्ल्याच्या चित्रीकरणाच्या वेळी तुमचा मुद्दा नक्की ध्यानात घेऊ. रायगडाचे चारही भाग जरूर बघा. अधिकाधिक किल्ल्यांच्या माहितीसाठी आमचे channel नक्की subscribe करा ही विनंती🙏
@pradeepsir78084 жыл бұрын
@@sahyadrinaturetrails subscribed . 👍
@avinashjoshi16464 жыл бұрын
रायगड बघायची खूप इच्छा आहे.तुम्ही खूप छान माहिती सांगितली.
@sahyadrinaturetrails4 жыл бұрын
नक्की रायगडाला भेट द्या, फार सुंदर किल्ला आहे.समस्त मराठी लोकांचे स्फूर्तिस्थान आहे हा किल्ला
@mukeshbharsakle37834 жыл бұрын
अती सुंदर माहिती दिली सर तुम्ही , आपण अशीच माहिती पुढे देत राहा मी हा विडिओ पाहून भारावून गेलो इतका की श्री रायगड दर्शनासाठी 1 मार्च ला निघणार आहे , पाचाड च्या म्हसोबाची माहिती दिल्या बद्दल धन्यवाद माझे कुड दैवत आहे ते, पाचाड ला आहे म्हणजे प्राचीन आहे , जय शिवाजी
@sahyadrinaturetrails4 жыл бұрын
तुमच्या मनापासून दिलेल्या ह्या सुंदर प्रतिक्रियेबद्दल खूप खूप आभारी आहे😊!! कुठलाही मराठी माणूस मराठ्यांच्या पराक्रमाची गाथा ऐकताना भारावून जातोच. रायगडावर जाल तेव्हा समस्त मराठी जनांच्या वतीने समाधीला वंदन व सिंव्हासनाला मुजरा नक्की करा. ग्राम दैवत म्हसोबाला सुद्धा दण्डवत घाला अमच्यावतीने श्रीमंत छत्रपती शिवाजी महाराजांचा विजय असो ⛳⛳⛳
@bharatdhabadgaonkar80164 жыл бұрын
फार छान माहिती, असे वाटले तुमच्या सोबत दुर्ग बघत आहो
@sahyadrinaturetrails4 жыл бұрын
आमचा व्हिडीओ पाहून व्यक्त केलेल्या तुमच्या छान प्रतिक्रियेसाठी आम्ही सर्व टीम खूप खूप आभारी आहोत 😊!! अधिकाधिक ऐतिहासिक स्थळांच्या माहितीसाठी आमचे चॅनेल जरूर subscribe करा ही विनंती🙏
@rajendrasurve91742 жыл бұрын
GREAT
@sahyadrinaturetrails2 жыл бұрын
Thank you for watching and appreciating our video😊!!
@kiranmore-rx5cf4 жыл бұрын
छान माहिती पुढची व्हिडीओ लवकर माहितीपुर्ण अपलोड करा वाट पाहतोय
@sahyadrinaturetrails4 жыл бұрын
नक्कीच येत्या शुक्रवारी प्रकाशित करणार आहोत
@suhasjadhav53153 жыл бұрын
Very nice
@sahyadrinaturetrails3 жыл бұрын
Thank-you for watching our video😊!!
@govindkawade9954 жыл бұрын
खुप छान माहीती दिली सर
@sahyadrinaturetrails4 жыл бұрын
धन्यवाद😊!!
@raghunathbhosale4653 жыл бұрын
जय शिवराय ...🙏🙏🙏🚩🚩🚩🚩
@sahyadrinaturetrails3 жыл бұрын
श्रीमंत छत्रपती शिवाजी महाराजांचा विजय असो🚩🚩🚩
@sunilkule414 жыл бұрын
खूप छान माहिती दिली सर, 🚩जय जिजाऊ 🌺 जय शिवराय 🚩
@sahyadrinaturetrails4 жыл бұрын
धन्यवाद😊!!
@anilkamlajkar90493 жыл бұрын
सर तुम्ही जेंव्हा सर्व किल्ल्यांवर जी ब्लॉग बनवता ती इतिहासाचं खूप अभ्यास करून सादरीकरण करता. हे खूप छान वाटते कारण कोण्ही नवखा माणूस तुमचा ब्लॉग बघून इतिहास विषयी गोडी निर्माण करू शकतो
@sahyadrinaturetrails3 жыл бұрын
आपल्या मस्त प्रतिक्रियेसाठी खूप खूप धन्यवाद सर😊!! सामान्य माणसाला आपल्या मराठा इतिहासाबद्दल गोडी निर्माण व्हावी,लोकांनी येथले किल्ले , सुंदर लेणी पहावेत हाच आमच्या ग्रुप चा हे व्हिडीओ तयार करण्यामागे उद्देश आहे. म्हणून शक्य होईल तितका अभ्यास करून, ऐतिहासिक पुस्तकातून संदर्भ गोळा करूनच जास्तीजास्त अचूक माहिती सर्वांपर्यंत पोहोचविण्याचा आमचा प्रयत्न असतो.
@happysoul94244 жыл бұрын
खूप छान अभ्यास करून माहिती दिली आहे तुम्ही!
@sahyadrinaturetrails4 жыл бұрын
खुप खूप धन्यवाद 😊!!
@happysoul94244 жыл бұрын
@@sahyadrinaturetrails eagerly waiting for the next episode
@sahyadrinaturetrails4 жыл бұрын
@@happysoul9424 we will come with part 2 by this Friday
@chavan7894 жыл бұрын
छान माहिती दिली धन्यवाद दादा
@sahyadrinaturetrails4 жыл бұрын
आपल्या छानश्या प्रतिक्रियेबद्दल खूप खूप आभारी आहोत 😊!! अधिकाधिक किल्ल्यांच्या माहितीसाठी आमचे channel नक्की subscribe करा ही विनंती🙏
@Kaka_Patil4 жыл бұрын
खुपचं सुंदर विश्लेषण !! सगळे महत्त्वाचे गड कोट दाखवावे ही विनंती. आम्ही दूर वर्हाडप्रांती राहतो त्यामुळे निवडक किल्ले बघता येतील. मी रायगड तीन वेळा राजगड तीनवेळा प्रतापगड,सिंहगड एवढेच किल्ले बघितले. दुर्ग मध.ये सिंधूदुर.ग, विजयदुर्ग,जंजीरा व अलीबाग बघितलेत....बाकी तुमच्या नजरेने बघतो आता.🙏🌹😅
@sahyadrinaturetrails4 жыл бұрын
शिवरायांचे किल्ले पाहणे हा एक सुंदर अनुभव असतो. तुम्ही एवढ्या दूर राहून देखील महत्वाचे असे किल्ले स्वतः पाहिलेत ही खरच फार छान गोष्ट आहे. जे किल्ले पाहू नाही शकलात ते आम्ही आमच्या चॅनेलच्या माध्यमातून नक्कीच दाखवू येत्या शुक्रवारी रायगड किल्ल्याचा भाग दुसरा घेऊन येत आहोत जरूर बघा आणि आपल्या प्रतिक्रिया कळवा.
@mahadevgaikwad78994 жыл бұрын
खूप छान माहिती दिलीत सर 👌👌👌 जय शिवराय जय जिजाऊ जय शंभू राजे
@sahyadrinaturetrails4 жыл бұрын
जय जिजाऊ जय शिवराय जय शंभूराजे !!⛳⛳
@vinodkumbhar80194 жыл бұрын
अतिशय उत्तम माहिती दीली सर
@sahyadrinaturetrails4 жыл бұрын
मराठा इतिहासाची ही मूल्यवान माहिती सर्वांपर्यंत पोहचविणे हेच आमच्या चॅनेलचे उद्दिष्ट आहे. तुमच्या सारख्या इतिहासप्रेमींकडून मिळालेल्या प्रोत्साहनामूळे आम्हाला नवीन व्हिडीओ तयार करायची उर्जा प्राप्त होते.
@sachinpawar-xn7is3 жыл бұрын
छत्रपती शिवाजी महाराज की जय.
@sahyadrinaturetrails3 жыл бұрын
क्षत्रियकुलवंत सिंव्हासनाधिश्वर श्रीमंत छत्रपती शिवाजी महाराजांचा विजय असो.🚩🚩🚩
@sidnikam27254 жыл бұрын
very nice sir ..ekdam samjaun sangtat tumhi 👌👌
@sahyadrinaturetrails4 жыл бұрын
सर्व इतिहासप्रेमीं लोकांपर्यंत इतिहासाची अपरिचित माहिती पोचवणे हेच आमचे ध्येय आहे
@shamlimbore9406 Жыл бұрын
Awesome...
@sahyadrinaturetrails Жыл бұрын
Thank you for your appreciation sir ☺
@shraddhameshram56404 жыл бұрын
दादा धन्यवाद आयुष्यात एकदा तरी रायगढ़ बघण्याची इच्छा आहे. रायगढ़ हा माझा आयुषाचा शेवट असला तरी चालेल. महराजानचा भास झाला तरी मी तृप्त होइल. हा अनुभव माझा साठी माझा देव समोर असल्या सरखा होइल . महराज महराज तुम्ही अमर आहात ....🙏🙏🙏🙏
@sahyadrinaturetrails4 жыл бұрын
एव्हडी तीव्र इच्छा आहे तर तुम्ही एक दिवस स्वतः रायगड नक्की बघाल. मराठ्यांचे हे तीर्थक्षेत्र सर्वांनी एकदातरी नक्कीच दर्शन करावे असे सुंदर व पवित्र आहे. श्री छत्रपती शिवाजी महाराजांचा विजय असो ⛳⛳
@rushikeshbhakare64394 жыл бұрын
खुप छान माहिती,,
@sahyadrinaturetrails4 жыл бұрын
धन्यवाद 😊!!
@suhasakolkar2 жыл бұрын
खुप स्तुत्य उपक्रम आहे... एक सुचना आहे...समालोचन पार्श्वभूमीवर ऐतिहासिक रचना आणि वस्तु, मुर्ती वगैरेचे चित्रिकरण थोडे जास्त वेळेस दाखवावे...ह्या गोष्टीवर नजर फिरवत असताना डोळ्यात साठवायला वेळ लागतो
@sahyadrinaturetrails2 жыл бұрын
आमचा व्हिडीओ पाहून छानशी प्रतिक्रिया दिल्याबद्दल आम्ही सर्व टीम आपले आभारी आहोत सर 😊!! आम्ही तुमच्या सूचनेप्रमाणे चित्रीकरण करण्याचा प्रयत्न आमच्या प्रतापगड सिरीज मध्ये तिसऱ्या भागात केला आहे. आपण नक्की बघा व आपल्या प्रतिक्रिया कळवा ही विनंती.
Sir, thanks for giving very nice and deep information. Please show us Raigad Part 2
@sahyadrinaturetrails4 жыл бұрын
Thank you for appreciating our work 😊!! We will publish part 2 by next week. There are 02 more parts of Raigad fort which we will bring for our viewers. We tried our best to cover entire fort with all the history.
@prashantpatil46394 жыл бұрын
Thank you sir for the detailed history of our ancestors
@sahyadrinaturetrails4 жыл бұрын
Thank you for appreciating our work😊!! Please watch our part 2 and 3 also which we will publish by next week You will get more knowledge about history of Raigad
@ajstyle3614 жыл бұрын
मस्त... share करतो तुमचा चॅनेल माहिती खूप छान सांगता ... Big Fan... जय भावानी...
@sahyadrinaturetrails4 жыл бұрын
प्रतिक्रियेबद्दल आभारी आहोत😊!!
@rameshdhawale86502 жыл бұрын
🚩🚩🙏🙏🙏🙏🙏sar 🙏🙏🙏🙏🙏🙏🙏 jay bhavani jay shivaji..,🚩🚩🚩
@sahyadrinaturetrails2 жыл бұрын
आमचा व्हिडीओ पाहून छानशी प्रतिक्रिया व्यक्त केल्याबद्दल आम्ही सर्व टीम आपले आभारी आहोत सर😊!! छत्रपती शिवाजी महाराजांचा विजय असो जय शिवराय जय महाराष्ट्र🚩🚩
@pradiptodankar38724 жыл бұрын
सेवेसी तत्पर हिराेजी इंदूलकर ! जय शिवराय!
@sahyadrinaturetrails4 жыл бұрын
महाराष्ट्राला लाभलेले उच्च दर्जाचे अभियंते म्हणजे हिरोजी इंदुलकर. शिवरायांनी शोधून काढलेला अमूल्य हिरा म्हणजे हिरोजी. ह्यांच्या प्रतिभेतून साकारलेला श्री दुर्गराज रायगड हा अभियांत्रिकीचा सुंदर नमुना आहे.
@nishikantyadav37624 жыл бұрын
अतिशय सुंदर माहिती 👍
@sahyadrinaturetrails4 жыл бұрын
तुमच्या ह्या मनापासून दिलेल्या प्रतिक्रियेबद्दल खूप खूप आभारी आहोत 😊!!
@adwaitkarajagi14 жыл бұрын
भारी उपक्रम तेजस.
@sahyadrinaturetrails4 жыл бұрын
धन्यवाद अध्वईत भाऊ , अजून भाग दोन व तीन बाकी आहेत, येत्या आठवड्यात प्रकाशित करू. नक्की बघ.
@Deepaksingh-vw4pn3 жыл бұрын
Jai shivrai
@sahyadrinaturetrails3 жыл бұрын
जय जिजाऊ जय शिवराय जय शंभूराजे हर हर महादेव🚩🚩🚩
@tusharwalunjkar14804 жыл бұрын
अतिसुंदर.....अप्रतिम....🌹🌹🌹
@sahyadrinaturetrails4 жыл бұрын
धन्यवाद दादा😊!!
@dileepjadhav61343 жыл бұрын
Jay jiau jay shivray
@sahyadrinaturetrails3 жыл бұрын
जय जिजाऊ जय शिवराय जय शंभूराजे 🚩🚩🚩
@rajendrasaple96414 жыл бұрын
Bhava 1 number video jai shivaji maharaj
@sahyadrinaturetrails4 жыл бұрын
तुमच्या प्रतिक्रियेबद्दल खूप आभारी आहोत 😊!!
@anilbagal5024 жыл бұрын
खूप छान सर. आता आतुरता दुसऱ्या भागाची....👍
@sahyadrinaturetrails4 жыл бұрын
धन्यवाद दादा, पुढील भाग पुढच्या शुक्रवारी घेऊन येऊ
@umakantchaudhari52654 жыл бұрын
खुप छान माहिती दिलीत सर धन्यवाद 🙏 रायगड भाग 2... लवकर विडीओ तयार करा.🚩🚩 जय जिजाऊ, जय शिवराय 🚩🚩
@sahyadrinaturetrails4 жыл бұрын
भाग 2 व 3 देखील आहे, पुढच्याच आठवड्यात दुसरा भाग प्रकाशित करण्याचा प्रयत्न करू. रायगडाचा सर्वच इतिहास लोकांपर्यंत पोहोचवण्याचा आमचा छोटासा प्रयत्न आहे.
@umakantchaudhari52654 жыл бұрын
@@sahyadrinaturetrails Nice... Tejas Sir "किल्ले शिवनेरी" पण विस्तृत explore करा भारी मजा येईल.... आपल्या शुभकार्यास शुभेच्छा 🙏🚩🚩🚩
@sahyadrinaturetrails4 жыл бұрын
@@umakantchaudhari5265 शिवनेरी हा पण समस्त मराठी जनांसाठी एक तीर्थक्षेत्र च आहे. नक्कीच शिवनेरी किल्ल्यावर सुद्धा आम्ही व्हिडीओ तयार करू.
@Abhi-kw7tp3 жыл бұрын
Sir,You have given so much information, but now a day no one is interested in knowing it, please support such a informative channels 🙏🙏🙏🙏
@sahyadrinaturetrails3 жыл бұрын
Thank you for watching our Vlog. We request you to please watch all the 4 parts of Raigad as you are one of the real history enthusiast. Provide real history of Maratha empire is the main goal of our channel. There are people who watch such informative videos. Our team is putting all the efforts for those people who are really interested in history.
@Abhi-kw7tp3 жыл бұрын
@@sahyadrinaturetrails I have already seen all your videos, and regularly visiting it.
@sahyadrinaturetrails3 жыл бұрын
@@Abhi-kw7tp thank-you very much for your support 😊
@ashishgawas66823 жыл бұрын
Hi masta information......maharajana purna Janun ghycha asel tar kuthala book vachava
@sahyadrinaturetrails3 жыл бұрын
आपल्या छानश्या प्रतिक्रियेसाठी आम्ही सर्व टीम आपले आभारी आहोत😊!! शिवाजी महाराजांचा अभ्यास करायचा असेल तर खालील पुस्तके जरूर वाचा. १. शककर्ते शिवराय - विजयराव देशमुख. २. छत्रपती शिवाजी महाराज - वा.सी. बेंद्रे. ३. छत्रपती शिवाजी महाराज - बाबासाहेब पुरंदरे. ४. श्री राजा शिवछत्रपती - डॉ. गजानन भास्कर मेहंदळे. ५. मराठा रियासत - सरदेसाई. ऐतिहासिक बखर, कागदपत्रांचा अभ्यास करायचा असेल तर यांचा करावा. १. श्री शिवभारत - कवींद्र गोविंद परमानंद नेवासकर. ( शिवाजी महाराजांच्या आज्ञेवरून ह्यांनी महाराजांचा संस्कृत मध्ये इतिहास लिहिला आहे.) २. सभासद बखर. ३. शिवदिग्विजय बखर. ४. जेधे शकावली. ५. ९१ कलमी बखर. ६. आज्ञापत्र
@sushantpatilvlogs55894 жыл бұрын
खुप छान माहिती दिलीत👌👌👌
@sahyadrinaturetrails4 жыл бұрын
तुमच्या प्रोत्साहनाबद्दल खूप आभारी आहोत😊!!
@pritamchandgude5134 жыл бұрын
तुमचे वलोग खास असतात...👌
@sahyadrinaturetrails4 жыл бұрын
आमच्या व्हिडिओद्वारे नेहमी इतिहासाची सखोल माहिती सर्वांना व्हावी, मराठा राज्याचा पराक्रमी इतिहास सर्वांना कळावा हेच आमच्या टीमचे ध्येय आहे आमचे व्हिडीओ तुम्हाला आवडले हीच शिवरायांच्या चरणी आमची सेवा सफल झाली असे आम्ही मानतो.
@ankushsawant66774 жыл бұрын
Mast Sir
@sahyadrinaturetrails4 жыл бұрын
Thank you 😊!!
@rupeshmore853 жыл бұрын
Thank you for bringing back our history! I am originally from Mahabaleshwar, currently living in California. Feels good listening to sequence of events. Subscribed to your channel, keep up the good work! God speed!
@sahyadrinaturetrails3 жыл бұрын
Thank you for watching our video on Raigad fort. We request you to watch all 4 parts of Raigad series in order to get full historical information on Raigad. Our target is to show all the forts in maratha empire which was once sprade almost all-over India with their all possible history. Thank you once again for subscribing our channel😊!!
@ProperGAMING23410 ай бұрын
Sirtumhi far sudarmahiti sangt ahat
@SajitGaonkarOfficial4 жыл бұрын
Mast
@sahyadrinaturetrails4 жыл бұрын
धन्यवाद 😊!!
@supriyamohite43563 жыл бұрын
जय शिवराय जय शंभुराजे या दोन राजने मनाचं मुजरा खूप छान माहिती सांगितली
@krishnakshirsagr95994 жыл бұрын
Proper explanation... Deep knowledge bhetle.. Khada n Khada mahiti deta tumhi... Superb. Ty
@sahyadrinaturetrails4 жыл бұрын
इतिहास हा भावनाप्रधान करण्यापेक्षा तो सत्य पुराव्यानुसार तपासून त्यातून धडे घेऊन ते आपल्या भविष्यासाठी वापरता आले तर आपण इतिहासापासून काही शिकलो असे मानता येईल. छत्रपती महाराजांचा, शंभुराजांचा सर्व मराठ्यांचा इतिहास हा पराक्रमानी भरला आहे तो सर्वांपर्यंत पोहचविणे हेच आमच्या टीमचे ध्येय आहे.
@rameshsable75573 жыл бұрын
Explain very nice way with historical truth . Well done please keep it up. I want to know your name please. Thanks.
@sahyadrinaturetrails3 жыл бұрын
Thank-you for watching and appreciating our video 😊!! My name is Tejas Khandalekar, I am the storyteller and our Team leader's name is Abhishek Salgaonkar who is main camera person and editor of our small team.
@ajaykadam63604 жыл бұрын
Khup sundar video ahe 🙏
@sahyadrinaturetrails4 жыл бұрын
धन्यवाद 😊!!
@a.bhosale.67233 жыл бұрын
सर किल्ला सर करण्यासाठी किती वेळ लागतो
@sahyadrinaturetrails3 жыл бұрын
रायगड पायी सर करण्यासाठी साधारण 2 तास लागतात. प्रत्येकाच्या चालण्याच्या, ट्रेकिंगच्या क्षमतेवर अवलंबून आहे. पण सामान्यपणे हळूहळू चढत जायला 2 तास पुरतात. रोपवे ने वर जाण्यास अवघी 4 मिनिटे लागतात, पण रोपवेची रांग जर उशिरा येऊन पकडली तर कधीकधी केवळ रांगेत देखील 2 तास जातात.
@ameyjoshi9034 жыл бұрын
धन्यवाद दादा तुमच्या विडिओ मार्फत त्या गडकिल्ल्याची आधीका आधी माहिती मिळते मस्त असतात तुमचे विडिओ 👍🏼🚩🚩
@sahyadrinaturetrails4 жыл бұрын
मराठा इतिहासाची पराक्रमी गाथा सर्वांपर्यंत पोहोचविणे हेच आमच्या टीमचे उद्दिष्ट आहे तुमच्यासारख्या इतिहास प्रेमींच्या प्रोत्साहनामुळे आम्हाला अजून व्हिडीओ तयार करायला बळ मिळते
@ameyjoshi9034 жыл бұрын
@@sahyadrinaturetrails असेच विडिओ घेऊन येत जावा👍🏼
@sahyadrinaturetrails4 жыл бұрын
@@ameyjoshi903 नक्कीच, मराठ्यांचा हा वैभवशाली इतिहास आम्ही तुम्हाला भविष्यात जमेल तसा दाखवत राहू. व्हिडीओ तयार करण्यास, दौरे आखण्यास कधी कधी कौटुंबिक व कार्यालयीन जबाबदाऱ्यामुळे उशीर होतो, पण आम्ही तुमच्यासारख्या इतिहासप्रेमींसाठी नवनवे किल्ले , लेणी ,मंदिरे, संग्रहालये नक्कीच आणत राहू
@ameyjoshi9034 жыл бұрын
@@sahyadrinaturetrails दादा आम्हाला माहिती आहे की घरची जबाबदारी शिवाय ऑफिसचे काम हे सर्व सांभाळून तुम्ही लोकं विडिओ बनवतात हीच मोठी बाब आहे .
@sahyadrinaturetrails4 жыл бұрын
@@ameyjoshi903 ह्या प्रोत्साहनामुळेच आम्हाला ऊर्जा मिळते. खूप खूप आभारी आहोत.
@adikgurav11584 жыл бұрын
तेजस साहेब तुम्ही खुप छान माहीती सांगता एक विनंती आहे जींजी किल्ला वरती एक विडिओ तयार करा
@sahyadrinaturetrails4 жыл бұрын
प्रतिक्रियेबद्दल आभारी आहोत 😊!! नक्कीच मराठ्यांची तिसरी राजधानी दाखवणे आमच्यासाठी अभिमानाची गोष्ट असेल. आम्ही नक्की प्रयत्न करू
@narmadagawade41814 жыл бұрын
👌👌👌👌👌👍👍🙏💐🌺🌺 हवा शिवाजी संस्कृती साठी जिजाऊ बनशिल का? आम्ही भाव फेरी मध्ये मुलांच्या आईनां करतो! 🌹🌹
@sahyadrinaturetrails4 жыл бұрын
आदर्श समाज निर्मितीचे खूपच छान कार्य तुम्ही करत आहात !!
@Prasadn024 жыл бұрын
मस्त माहिती
@sahyadrinaturetrails4 жыл бұрын
धन्यवाद 😊!!
@sjkale19724 жыл бұрын
अप्रतिम.....👍
@sahyadrinaturetrails4 жыл бұрын
धन्यवाद 😊!!
@Sachin_Chavan4 жыл бұрын
खूप दिवसापासून वाट पहात होतो. मस्त खूप छान
@sahyadrinaturetrails4 жыл бұрын
थोडा वेळ लागला खरा, त्याबद्दल खरच दिलगीर आहोत.
@Sachin_Chavan4 жыл бұрын
खूप छान झालाय व्हिडीओ, दिलगिरी नका व्यक्त करू तुमच्या मुळे खूप माहिती मिळते
@sahyadrinaturetrails4 жыл бұрын
@@Sachin_Chavan तुमच्या प्रतिक्रियेबद्दल खूप आभारी आहोत, अशा छान प्रतिक्रिया मिळाल्या की आम्हास अजून व्हिडीओ करायचे बळ येते.
@narayannandgaonkar28594 жыл бұрын
Mast video
@sahyadrinaturetrails4 жыл бұрын
खूप धन्यवाद 😊!!
@anilketkar1724 жыл бұрын
Raigada var jewellery thevaychi Jaga kithe aahe? Khalbat Khana hi band kholit kasa aahe? Divasahi tithe itka Andhra Asel ki, mashal lavavi lagat Asel ani dhur jayla pan ventilation nahi.tithe basne kase Shakya aahe?
@sahyadrinaturetrails4 жыл бұрын
रायगडावर खजिना ठेवायची जागा ही छत्रपती शिवरायांच्या निवासस्थानाच्या मागे व राणीवसा इमारतींच्या समोर धान्यकोठ्या नावाने प्रसिद्ध असलेली इमारत असावी खुद्द छत्रपती महाराजांच्या निवासस्थाना बाहेर संपूर्ण किल्ल्यावर लागणारे धान्य भरत असतील रोज मजूर मुकादम रांग लावून पोती काढत किंवा भरत असतील हे शक्य वाटत नाही छत्रपती शिवाजी महाराज जेथ्ये रहातात त्याच्या बाजूलाच अष्टप्रधान वाडे आहेत व पाठी राणी वसा/कार्यालयीन इमारती आहेत( आजच्या भाषेत व्ही आई पी विभाग) तेथे कडक पहारे व सुरक्षा चौक्या असणार तर त्या जागी धान्यकोठी असण्यापेक्षा खजिनाकोठी असणे जास्त शक्य वाटते. अर्थात रायगडावर बऱ्याच इमारती समोर लिहिलेल्या पाट्या व त्यांची जागा ह्यांचा मेळ बसत नाही टांकसाळी ची इमारत म्हणून जी जागा दाखवली जाते ती चक्क शिवरायांच्या न्हाणीघराच्या बाजूला आहे हे कसे शक्य आहे?? खलबतखाना म्हणून दाखवली जाणारी इमारत कदाचित गोपनीय कागदपत्रे सुरक्षित राखण्यासाठीची खोली असावी कारण ती फडाच्या ओट्याजवळ (तत्कालीन सचिवालय) आहे. खलबत करण्यासाठी शिवराय व सहकारी गंगासागराच्या किनारी असणाऱ्या मनोऱ्यात सुद्धा जात असतील कारण ते बाकी इमारतीपासून सुटावले आहेत. अर्थात हे सर्व केवळ अंदाज आहेत कारण नक्की कुठली इमारत कशासाठी वापरली जात असे ह्याचा अधिकृत पुरावा दुर्दैवाने आज उपलब्ध नाही. छत्रपती शिवाजी महाराज हे आपण शास्त्रशुद्ध पद्धतीने सामाजिक, राजनैतिक, वास्तुशास्त्रीय, कूटनैतिक, लष्करीदृष्ट्या अभ्यासून त्या घटनांकडे डोळसपणे बघून त्यातून प्रेरणा घेऊन आपला आजचा समाज घडवण्याऐवजी केवळ आजच्या जमान्यातील जीवनपद्धती व प्रथा त्याकाळात नेऊन जबरदस्तीचिकटवणे त्यातून वाद उकरून काढणे, त्यावर स्वार्थाच्या राजनैतिक पोळ्या भाजणे,टिळे लावून दाढ्या ठेवून नारे देण्यातच धन्यता मानतो त्यामुळे त्या इमारतींचे शास्त्रीय उतखनन संवर्धन बाजूलाच रहाते.