Рет қаралды 494,776
तळ कोकणातल्या लोकांनी आज जे पाहिले जे अनुभवले ते खरच मरण होते पण ते कोणी मीडिया मध्ये गाजवणार नाही...एरवी अनियोजित वाढ झालेल्या शहरात पाणी तुंबले की त्याच्या चर्चा दिवस रात्र रंगवणार पण ज्यांनी निसर्गाला कोणताच धोका पोचवला नाही अश्या गरीब साध्या भोळ्या कोकणी लोकांवर जी आज आपत्ती ओढवली त्याला ह्यांच्या मते TRP नाही... अख्ख्या किनारपट्टी ला उध्वस्त केलय...वादळ मुंबईत गेल्यावर बातम्या येतील...पण ७००किमी ची किनारपट्टी माझ्या गरीब शेतकऱ्या च्या जगण्याला ह्या देशात महत्त्व नाही....पण
आज आमचाही आवाज काहीसा मोठा आहे...
भारतीय हवामान खाते हवामान बदलाचा सगळ्यात जास्त फटका सोसणारी कोकण किनारपट्टी तील ग्रामीण भागातील मच्छीमार शेतकरी बागायतदार लोकांना इतक्या भयंकर वादळ माहिती देताना ५०-६० चा वेग सांगते ..आणि प्रत्यक्षातल्या आज वेग गोव्यापासून पुढे १४०km/hr चा होतो ..आजूनही प्रचंड वारे सुरू आहेत... महासत्ता बनू पाहणाऱ्या देशाच्या हवामान खात्याला नैसर्गिक आपत्तीची गांभीर्यता लोकांपर्यंत पोचवता येत नाही ही मोठी शोकांतिका आहे...लोक गाफील होते....तशी वादळे अधून मधून येतच असतात त्यात सध्या कोरोना मुळे मासेमारी बंदच...पण इतके मोठे चक्रीवादळ गोव्यात येऊन पोहोचले तरी आम्हाला २ वाजता पर्यंत सिंधुदुर्गातून पुढे जाईल एवढीच माहिती मिळते ती सुद्धा windy आणि zoom earth मधून...आता ५वाजलेत तरी तीव्रता वाढतेच आहे.. जे आम्ही अनुभवलं ते मरण होत.. ...नशीब आमचे स्थानिक लोक वादळात सुद्धा उडी मारून संसार वाचवतात....पण हाताशी आलेला आंबा फणस कोकम ह्यांचे काय...संपलच ना सगळ...
तरुणांनो आता सरकार च्या मागे लागून नुकसान भरपाई घ्यायची म्हणजे घ्ययचीच....आम्ही सुधा ह्याच देशात येतो मा?? मीडिया सोबत असो किंवा नसो आपलाही आवाज काही कमी नाही