लातूर मुंबई वंदे भारत रेल्वे लवकरच सुरू होणार - खा. सुधाकर शृंगारे

  Рет қаралды 1,475

Pratham Post

Pratham Post

5 ай бұрын

लातूर शैक्षणिक शहर म्हणून याची ओळख निर्माण झाली असून राज्यभरातील विद्यार्थी व पालकांचा लातूर पॅटर्नकडे ओढा वाढतो आहे. यामुळे इथे दिवसेंदिवस दळणवळणाची साधने वाढावी त्यासाठी रेल्वे रस्ते व इतर साधनांचा वापर होतो. लातूर मुंबई रेल्वे बिदर पर्यंत वाढवल्यामुळे लातूर व परिसरातील प्रवाशांची तारांबळ उडाली होती. हे लक्षात घेऊन लातूर पुणे इंटरसिटी एक्सप्रेस ची मागणी करून ते चालू करून घेतले यामुळे लातूर मुंबई या रेल्वेवरील ताण कमी झाला आहे. तीन महिन्याच्या प्रायोगिक तत्त्वावर चालू झालेली लातूर पुणे इंटरसिटी एक्सप्रेस ही अशी चालू ठेवावी अशी मागणी रेल्वेमंत्री अश्विनी वैष्णव यांच्याकडे केली आहे. पुणे इंटरसिटी ही रेल्वे सध्या प्रायोगिक तत्त्वावर चालू आहे पण ती अशीच चालू राहावी यासाठी प्रयत्नशील आहे व या रेल्वेचा प्रवाशांची उत्तम प्रतिसाद मिळतो आहे. अशी माहिती खासदार सुधाकर शृगारे यांनी दिली.
लातूर येथे पीटलाईन साठी 28 कोटींचा निधी...
लातूर येथे मराठवाडा रेल्वे कोच फॅक्टरी निर्माण झाली आहे यामुळे लातूरला पीट लाईनसाठी सुमारे 28 कोटी रुपयांचा निधी मंजूर झाला आहे. यामुळे अनेक मोठ्या रेल्वे स्थानकाशी लातूर जोडले जाणार आहे. अनेक रेल्वेच्या छोट्या दुरुस्त्या या ठिकाणी होतील ज्यामुळे लांब पल्ल्याच्याही गाड्या चालू होण्यास मदत होणार आहे.
मुंबई लातूर वंदे भारत रेल्वे लवकरच सुरू होणार...
लातूर हे शैक्षणिक व औद्योगिक शहर म्हणून ओळखले जाते. या शहरांमध्ये उद्योगासाठी व शिक्षणासाठी अनेक लोक येत असतात ही गरज लक्षात घेऊन मुंबई लातूर वंदे भारत रेल्वे लवकरात लवकर सुरू करावी अशी मागणी मागील काळामध्ये खासदार सुधाकर शृंगारे यांच्यामार्फत करण्यात आली होती या मागणीला आता हिरवा कंदील मिळाला असल्याची माहिती समोर येते आहे. यामुळे लातूर बिदर या रेल्वे वरील ताण कमी होईल असे खासदार सुधाकर शृंगारे म्हणाले.

Пікірлер: 4
@shravanbagbande5897
@shravanbagbande5897 5 ай бұрын
साहेब उदगीर च्या लोकांना वंदे भारत
@afjalmaniyar6254
@afjalmaniyar6254 5 ай бұрын
हरंगुळ रेल्वे स्टेशन वर प्लाटफाम नंबर २ व ३ चे बांधकाम करण्यात यावे
@sachintelangcriketpractice8430
@sachintelangcriketpractice8430 Ай бұрын
बंधन ते लातूर रोड चं काय झालं
@Msffoujimaharashtra
@Msffoujimaharashtra Ай бұрын
Udgir parynt kel pahije karnatk nka
Super gymnastics 😍🫣
00:15
Lexa_Merin
Рет қаралды 107 МЛН
Watermelon Cat?! 🙀 #cat #cute #kitten
00:56
Stocat
Рет қаралды 54 МЛН