Рет қаралды 124,926
माझं गाव ते मंडणगड पावसातील प्रवास 😍 | मंडणगडचा किल्ला - Mandangad Fort (Konkan) माझ्या गावापासून मंडणगड किल्ला जवळपास तीस किलोमीटर आहे. माझं आंबवली हे गाव मंडणगड तालुक्यात भारजा नदीच्या किनारी वसलेलं गाव आहे. आम्ही कोणतीही शॉपिंग किंवा घरासाठी साहित्य खरेदी करायचं असेल तर मंडणगड येथे जातो. केळशी, देव्हारे सोडल्यावर आम्हाला मंडणगड हे बाजारपेठेचे ठीकण आहे. मंडणगड तालुक्याला नाव मंडणगड या किल्ल्यामुळे दिले आहे. मंडणगड किल्ला हा डोंगराळ किल्ला आहे. यावर आता तटबंदी बुरुज तेवढे दिसत नाहीत. एक तोफ, गणपतीचं मंदिर, विहिर, दोन तलाव, पीर दर्गा आणि सुंदर विलोभनीय असे नजारे आपल्याला येथुन बघायला मिळतात. हा किल्ला राजा भोज याने बांधला. स्वराज्यात शिवाजी महाराज पन्हाळगडावरून दाभोळ कोकणात येत आहेत हे समजल्यावर आदीलशहाकडून लढाई न करताच किल्ला महाराजांना मिळाला. किल्ला बघायचा आहे म्हणून आम्ही घरातून लवकर निघालो होतो. काकांच्या घरी जाऊन भेट द्यायची होती. आम्ही प्रथम जावळे गावात जाऊन काका काकी यांना सोबत घेऊन निघालो. माझ्या गावापासून मंडणगड येथे जाताना तीस किलोमीटर प्रवास आम्ही केला. पाऊस सुरु असल्यामुळे हवेत गारवा होता. रस्त्याला हिरवाई, मधेच पावसाच्या सरी, डोंगरात दिसणारे धुके असा नजारा बघत बघत आम्ही मंडणगड येथे कधी पोहचलो समजलेच नाही. आम्ही मंडणगडमध्ये येऊन शॉपिंग केली. भाजी, फळे, सुकट मुलाना खाऊ घेतला. मंडणगड मधील फेमस वडापाववाले याच्यायेथून वडापाव पार्सल घेऊन गडावर गेलो. दुपारनंतर खूप पाऊस लागत होता. या व्हिडिओमध्ये तुम्हाला आमचा गावापासून ते मंडणगड पर्यंत गाडीने केलेला प्रवास दाखवला आहे, मंडणगडमधील आमची शॉपिंग नंतर मंडणगड किल्ला दाखवला आहे. हा व्हिडीओ तुम्हाला आवडल्यास लाईक, शेअर आणि कमेंट करायला विसरु नका. #MazaGavTeMandangadPavsatilPravas #MandangadFort #MyVillageToMandangadTraveling #sforsatish
मला संपर्क करण्यासाठी फेसबुक आणि इन्स्टाग्रामवर फॉलो करा.
/ koknatlamumbaikar
/ koknatlamumbaikar