नासा चे शास्त्रज्ञ हैराण !!! आध्यात्मिक शक्ती शिवथरघळ येथे GPS सुद्धा चालत नाही | दासबोधचे जन्मस्थान

  Рет қаралды 51,098

Mi Vatsaru  मी वाटसरू

Mi Vatsaru मी वाटसरू

Күн бұрын

निसर्गाचा अनोखा अविष्कार - शिवथरघळ
शिवकाळात प्रसिद्ध असलेला जांभळीचा माळ, मठाचा माळ, बोरीचा माळ, उंबराचा माळ, फणशीचा माळ आदी समर्थसाहित्याशी संबंधित ठिकाणं आहेत. या दोन्ही घळींना पर्यटकांनी आवर्जून भेट दिली पाहिजे
दोन्ही बाजूंना डोंगरांचे कडे आणि मध्येच असलेली अरुंद दरी, म्हणजेच घळ. सह्याद्रीच्या डोंगररांगांमध्ये अशा अनेक घळी आहेत. अनेक घळींना इतिहास आहे आणि त्या प्रसिद्ध आहेत. परंतु सर्वांत प्रसिद्धीला आली, ती समर्थ रामदासस्वामींची शिवथर घळ. शिवथर घळ ही तिथल्या निसर्गसौंदर्यामुळं, पावसाळ्यात तिथं कोसळणाऱ्या धबधब्यामुळं पर्यटकांना आकर्षित करते.
#जय_जय_रघुवीर_समर्थ #श्रीराम_जय_राम_जय_जय_राम #समर्थ_रामदास_स्वामी #शिवथरघळ #दासबोध #छत्रपती_शिवाजी_महाराज #जावळी_खोरे #वरंदा_घाट #महाड #श्री_समर्थ_समर्थाचे_स्मरण_हेच_महाराष्ट्राचे_जीवन #कल्याण_स्वामी #सुंदरमठ #काळ_नदी #अध्यात्मिक_ठिकाण #अद्भुत_जागा #दासबोधचे_जन्मस्थान #जांब #जालना #नारायण #Samarth_Ramdas_Swami #Jay_Jay_Raghuvir_Samarth #shivtharghal #dasbodh #Chhatrapati_Shivaji_Maharaj #mahad #Varanda_Ghat #Shri_Ram_Jay_Ram_Jay_Jay_Ram #Samarth_Ramdas_Swami #happy_teachers_day #sarvepalli_radhakrishnan #Jawan_review #free_fire_india #krishna_janmashtami #g20_summit_2023_date #onlin_games #iphone_15 #bank_holiday_yoday #rishab_instruments_ipo_gmp #ibomma_kushi #rohit_sharma #India_world_Cup_squad_2023 #bharat_mandapam #gadar_2_box_office_collection #iarry_Sinclair
रामदासस्वामी १६४९मध्ये या प्रदेशातील घळीत वास्तव्यास आले. त्यांनी १६६०पर्यंतचा काळ इथं व्यतीत केला आणि त्या काळात त्यांनी दासबोध आणि इतर ग्रंथसाहित्याची निर्मिती केली. दक्षिण दिग्विजयासाठी जाण्यापूर्वी छत्रपती शिवाजी महाराजांनी शिवथर घळीत येऊन समर्थांचा आशीर्वाद घेतला होता. पर्यटकांना आकर्षित करणारी शिवथर घळ ही वरंध घाट उतरल्यानंतर लागणाऱ्या बिरवाडी गावाजवळ आहे. घळीच्या पायथ्यापर्यंत वाहनं जाऊ शकतात. सह्याद्रीच्या डोंगरांमध्ये वाघजाईदेवीच्या कुशीत हे ठिकाण आहे. काळ नदीचा उगम याच परिसरात होतो. ही पश्‍चिमवाहिनी नदी पुढं सावित्री नदीला जाऊन मिळते. काळ नदीच्या तीरावर कुंभे, कसबे आणि आंबे अशी तीन छोटी गावं आहेत. पार्किंगच्या ठिकाणापासून पायऱ्या चढून वर आल्यानंतर शिवथर घळ दिसते. घळीच्या शेजारीच धीरगंभीर आवाजात कोसळणारा धबधबा आहे. घळीच्या वरच्या डोंगरावर चंद्रराव मोऱ्यांच्या वाड्याचे भग्नावशेष आहेत. इथून राजगड, रायगड, तोरणा आणि प्रतापगड साधारण समान अंतरावर आहेत. शिवथर घळीतल्या गुहेत रामदासस्वामी आणि कल्याणस्वामींच्या मूर्ती आहेत. समर्थांच्या साहित्याचं लेखन कल्याणस्वामींनी केलं होतं.
वरंध-कुंभारकोंडमार्गे २० किलोमीटरवर रामदासपठार डोंगररांगेत खरी शिवथर घळ आहे. याच घळीला समर्थांनी ‘सुंदरमठ’ असं नाव दिलं होतं. रामदासपठारावर समर्थ मठाची जागा आहे. इथं १९५७ मध्ये समर्थांचं मंदिर बांधण्यात आलं. या मठापासून अवघ्या अर्ध्या किलोमीटरवर ही घळ आहे. मठाच्या माळापर्यंत वाहनं जाऊ शकतात. घळीच्या मुखाशी दगड आणि मातीच्या साह्यानं बांधलेला उघडा दरवाजा आहे. गुहेच्या समोरच समर्थांच्या बसण्याची जागा दिसते. साधारण एक हजार चौरस फूट क्षेत्र असलेल्या या गुहेत दगड आणि मातीचं बांधकाम केलेल्या तीन भिंती आहेत. हवा खेळती राहण्यासाठी खिडक्यासदृश पोकळ्या आहेत. गुहेच्या समोरच्या भिंतीमध्ये समर्थांच्या बसण्याची जागा खोदून काढली आहे. त्याला सिंहासन म्हणतात. त्याशिवाय देवघर आणि सात कोनाडे आहेत. घळीपासून अर्ध्या किलोमीटरवर गोविंदमाची आहे. दहा फुटांवर रामगंगा नावाचा धबधबा आहे. सुमारे ३० फुटांवर गुप्तगंगा आहे. जवळच शिवकाळात प्रसिद्ध असलेला जांभळीचा माळ, मठाचा माळ, बोरीचा माळ, उंबराचा माळ, फणशीचा माळ आदी समर्थसाहित्याशी संबंधित ठिकाणं आहेत. या दोन्ही घळींना पर्यटकांनी आवर्जून भेट दिली पाहिजे, इतका हा प्रदेश देखणा आहे. शिवथर घळीचा समुद्रसपाटीपासूनची उंची सुमारे २९८५ फूट आहे.
कसे जाल? -
पुण्याहून भोर-वरंध-बिरवाडीमार्गे शिवथर घळ सुमारे १०५ किलोमीटर.
मुंबईहून गोवा महामार्गानं माणगाव-लोणेरे-महाड-बिरवाडीमार्गे २०५ किमी
साहसी पर्यटकांसाठी दुसरा मार्ग राजगड-भुतोंडे-बेळवंडी नदी-कुंबळ्याचा डोंगर-गोप्याघाटमार्गे कसबे शिवथरपर्यंत पोचता येतं. तथापि, हा मार्ग काहीसा अवघड आणि वेळ खाणारा आहे.
शिवथरघळ श्री सुंदरमठ सेवा समितीच्या इमारतीमध्ये पूर्वपरवानगी घेऊन निवासाची सोय होऊ शकते. स्वत-चा शिधा दिल्यास भोजनाचीही सोय होते. पायथ्याच्या गावांमध्येही भोजनाची सोय होऊ शकते. शिवथर घळीपर्यंत एसटी बसचीही सोय आहे.
क्षमस्व : व्हिडिओ मध्ये एका ठिकाणी समर्थ रामदास स्वामी ऐवजी स्वामी समर्थ असा उल्लेख झाला आहे. ‪@Mivatsaru‬

Пікірлер: 128
pumpkins #shorts
00:39
Mr DegrEE
Рет қаралды 108 МЛН
Зу-зу Күлпаш 2. Интернет мошенник
40:13
ASTANATV Movie
Рет қаралды 601 М.
哈哈大家为了进去也是想尽办法!#火影忍者 #佐助 #家庭
00:33
火影忍者一家
Рет қаралды 125 МЛН
Inside Out 2: ENVY & DISGUST STOLE JOY's DRINKS!!
00:32
AnythingAlexia
Рет қаралды 18 МЛН
घोडा पाय धरून उचलणाऱ्या एका वीराचा दुर्दैवी अंत
18:47
मराठेशाही-प्रवीण भोसले
Рет қаралды 2,7 МЛН
pumpkins #shorts
00:39
Mr DegrEE
Рет қаралды 108 МЛН