Рет қаралды 324,712
कोकणातील एक अद्भुत स्थान आणि रहस्यमय गुहा। शिव गुंफा । 90 जगतगुरू इथे आले होते,देवभूमी,आंब्रड-कुडाळ
कोकणातील आंब्रड हे कुडाळ तालुक्यातील आणि सिंधुदुर्ग जिल्यातील एक गाव. सुंदर निसर्ग आणि स्वच्छ परिसर .
कोकणात खूप काही गोष्टी अश्या आहेत ज्यांची उत्तर कोण देऊ शकत नाही. परंपरा ,प्रथा ,कला आणि खूप काही ....
आजपर्यंत मी खूप गुहा पाहिल्या, तुमच्या समोर मी वलॉग मधून घेऊन पण आलो.आणि अश्याच एक गुहेच्या शोधत मी आंब्रड गावी पोहचलो . या गावातील ही शिव गुंफा अतिशय सुंदर , स्वछ ,अध्यात्मिक , ऐतिहासिक . राऊळ महाराज यांच इथे वास्तव होत. राऊळ महाराज याच गावचे . राऊळ महाराजांनी या गुहेची जागा दाखवली पण त्यावेळी ही गुहा जमिनी खाली मातीच्या मोठ्या थरापाठी लपलेली होती. परबकाका आणि गावातील इतर सदस्य, अनेक गावकरी यांनी दिवस रात्र मेहनत घेऊन राऊळ महाराज्यांच्या उपस्थितीत ही गुहा साफ केली माती बाहेर काढली आणि ही भव्य गुहा जगासमोर आली . शिवगुंफा या गुहे मध्ये आत कोरीवकाम केलेलं आपल्याला पाहायला मिळत,नंदी , नागदेवता , शिवलिंग अश्या कलाकृती आपल्याला गुहेच्या आत भिंतींवर आहेत . ही गुहा खूप सुंदर, आणि मोठी आहे . तसं प्रत्येक गुहे प्रमाणे इथे पण वटवाघळे आहेत पण इथे गुहेत लाईट ची सुविधा आहे त्यामुळे प्रकाशाचा प्रश्नच येत नाही , गुहा आठवड्यातून एकदा साफ केली जाते . साफसफाई करत असल्यामुळे इकडे स्वछ परिसर आहे. 2006 मध्ये इथे मोठा कार्यक्रम झाला होता त्यावेळी 90 जगतगुरू इथे आले होते. शंकराचार्य हे पण इथे आले होते,अशी माहिती समिती अध्यक्ष परब काका यांनी मला दिली .
अतिशय पवित्र अस हे स्थान आहे आणि तेवढीच सुंदर ही गुहा आहे . गुहा खोदण्यापासून ते त्या गुहेची निगाराखणे या सर्व कामात खूप मेहनत आहे आणि तिकडे ती मेहनत घेतली जाते .
नक्की एकदा या स्थानाला भेट द्या , या गुहेला भेट द्या तुम्हाला नक्कीच आवडेल ☺️ आणि तुमच्या गावात अश्या गुहा असतील तर नक्कीच मला कळवा , जमल्यास जतन करण्याचा प्रयत्न करा☺️
विडिओ संपूर्ण पहा खूप माहिती परब काकांनी आम्हाला दिली आहे . विडिओ पहा आणि सर्वांना पाठवा☺️☺️
आणि हो कोण कोकणात असेल तर नक्की या 21 जानेवारी ला गोंधळाला ☺️💐
don't forget to like , share and subscribe
address - shiv gumfa , ambrad tal- kudal dist - sindhudurg
map location. - Shiv Cave
maps.app.goo.g...
Follow us -
Email - sanchitthakurvlogs@gmail.com
Instagram
/ sanchitthakurvlogs__
Facebook - / sanchitthakurvlogs
SnapChat -
/ sanchit_vlog
Telegram -
t.me/Sanchit_T...
#kokan #कोकण #kokanvlog #आंब्रड #शिवगुंफा #आंब्रडगुहा