Old couple Marriage: आजोबांनी आजीला Valentine's Day ला प्रपोज केलं आणि लग्न झालं (BBC Marathi)

  Рет қаралды 1,348,309

BBC News Marathi

BBC News Marathi

Жыл бұрын

#BBCMarathi #Marriage #valentinesday #Elderly
कोल्हापूर जिल्ह्यातील घोसरवाड गावाच्या 75 वर्षांचे बाबुराव पाटील आणि 70 वर्षांच्या अनुसया शिंदे यांनी लग्नाचा निर्णय घेतला.
हे दोघेही जानकी वृद्धाश्रमात राहतात. लग्न करण्यासाठीचा निर्णय घेणं त्यांच्यासाठी सोपा नव्हता. त्यांना अनेकदा द्विधा मनस्थितीतून जावं लागलं. दोघांचंही पूर्वायुष्य चढउताराचं राहिलं होतं, त्यातून मार्ग काढत त्यांनी इथपर्यंतचा पल्ला कसा गाठला याची हृदयस्पर्शी कहाणी.
रिपोर्ट आणि शूट- सरफराज सनदी
___________
ऐका 'गोष्ट दुनियेची' - जागतिक घडामोडींचं विश्लेषण करणारं मराठी पॉडकास्ट इथे -
www.bbc.com/marathi/podcasts/...
-------------------
अधिक माहितीसाठी आमच्या वेबसाईट आणि सोशल हॅंडल्सला नक्की भेट द्या :
www.bbc.com/marathi
/ bbcnewsmarathi
/ bbcnewsmarathi

Пікірлер: 809
@Think-in-Truth
@Think-in-Truth Жыл бұрын
आश्रम चलाकाचे हार्दिक अभिनंदन. कोणत्याही Social Stigma ला बळी न पडता धाडसाने निर्णय घेतला. आजोबा आज्जीना पुढील जीवनासाठी खूप खूप शुभेच्छा.
@user-wi3yz3lp8q
@user-wi3yz3lp8q Жыл бұрын
"लोकं काय म्हणतील"या वाक्याला फाट्यावर मारत लोकं आता जगू लागलेत प्रत्येकाला आपल्या आयुष्याची किंमत कळू लागली आहें.... दोघांना ही या क्रांतिकारी घेतलेल्या निर्णयाबद्दल खूप शुभेच्छा
@sonalkadam9308
@sonalkadam9308 Жыл бұрын
आजी आजोबांना..पुढील वाटचालीसाठी मनापासून शुभेच्छा 🌹🌹
@adityap4312
@adityap4312 Жыл бұрын
Murkhpana....liberlism chya navakhali
@alkaSalunkheKeni
@alkaSalunkheKeni Жыл бұрын
खूपदा " लोकं काय म्हणतील" या भितीने योग्य अयोग्य कळत असूनही मनासारखं जगायचंच राहून जातं.... बरं झालं, आज्जी आजोबांनी त्यांना योग्य वाटला तोच निर्णय घेतला. दोघानाही खूप शुभेच्छा 🙏
@Amit1789love
@Amit1789love Жыл бұрын
माणसाचा एकटेपणा खूपच भयावह असत. आजी आजोबा यांनी जो निर्णय घेतला तो खूपच छान आहे.. कोणीतरी आपलसं म्हणणार पाहिजे ....God bless you . आजी आजोबा. So much Love.
@preetilondhe1284
@preetilondhe1284 Жыл бұрын
हया आजी आजोबा ना खुश बघुन वाटले, की, Human psychology "किती महत्वाची आहे. "नकारे, आपल्या लोकाना असे वारया वर सोडू. प्रेम द्या त्याना." God bless you आजी आजोबा ❤️🌹🌴🌲🌿☘️
@suchitrapatne4048
@suchitrapatne4048 Жыл бұрын
आजी तुम्ही अजिबात रडू नका आणि कुठेही अपराधी वाटून घेऊ नका. तुमचं आयुष्य तुमचं आहे. आता छान जगा दोघेही एकमेकांसोबत. खूप शुभेच्छा 🙏
@nareshsidam346
@nareshsidam346 Жыл бұрын
हीच तर खरी गंमत आहे ज्या गोष्टीत आपण आधार शोधत असतो त्याच गोष्टीला इतर लोक गरजे च नाव देतात..
@simpkn947
@simpkn947 Жыл бұрын
आजी रडू नका, काही नालायक लोकांना लग्नाचा खरा अर्थच कळला नाही, त्यांच्यासाठी लग्न म्हणजे फक्त शरीरसंबंध अशा गलिच्छ लोकांच्या मनात असेच घाणेरडे विचार मनात येणार...लग्न म्हणजे एखाद्या व्यक्तीची साथ मिळणे, मनातलं शेअर करण्यासाठी कोणीतरी हवं असतं हे या लोकांना कळणार नाही.. तुम्ही जे केलं ते बरोबर केलंत तुम्ही बाबांसोबत खुश रहा...
@vijaymaske8023
@vijaymaske8023 Жыл бұрын
Right tai
@sudarshanwadekar5286
@sudarshanwadekar5286 Жыл бұрын
True ✅🥺 Emotional Mann Asat Pretekala Asat 🥺
@kamalnikam6962
@kamalnikam6962 Жыл бұрын
जय जय उच्च तंत्र उच्च ही
@urmilajadhav8483
@urmilajadhav8483 Жыл бұрын
@@vijaymaske8023 right
@dipakdhage2867
@dipakdhage2867 Жыл бұрын
खुप छान आहे लेख
@Chhatrapati_Shivaji_Maharaaj
@Chhatrapati_Shivaji_Maharaaj Жыл бұрын
रडू नका आजी, आपल्याला निरोगी आयुष्य लाभो व आपण कायम आनंदी असो हीच ईश्वर चरणी प्रार्थना
@homekirti
@homekirti Жыл бұрын
👍
@veenapatil7388
@veenapatil7388 Жыл бұрын
श्री स्वामी समर्थ 🙏🙏
@vikramtembhurne9510
@vikramtembhurne9510 Жыл бұрын
फारच छान
@sachinwalwatkar6020
@sachinwalwatkar6020 Жыл бұрын
Ju
@SumanSuman-do1qf
@SumanSuman-do1qf Жыл бұрын
​@@homekirti कककककककककककककककक
@sachinjadhav3453
@sachinjadhav3453 4 ай бұрын
खरचं उतार वयात कुणाचा तरी आधार हवा व लागतोच खूप खूप छान केलं दोघांनी तुम्हाला खूप खूप शुभेच्छा 👌🙏
@bharatjadhav2309
@bharatjadhav2309 Жыл бұрын
आजी आजोबा आपला निर्णय हा योग्य आहे, आपल पुढील आयुष्य सुखकर आनंदी जाओ हिच शुभेच्छा, समाज भाऊबंधकी फक्त बोलता वेळ आली कि पहिले ते पळ काढता त्यांचा विचार न केलेलाच बरा, शेवटी आपल आयुष्य सुखकर आनंदी कस जगता येईल ते जास्त म्हत्वाचे ,
@rahulraj4845
@rahulraj4845 Жыл бұрын
पुढील वाटचालीसाठी हार्दिक शुभेच्छा 👍👍👍👍
@chand2324
@chand2324 Жыл бұрын
खुप छान काम केलेत ,,,डोळ्यात पाणी आले माझ्या😢😢😢,,आजी आजोबा तुम्ही जे केलत ते योग्यच केलत,जग फक्त नावं ठेवायला असत ,जगाकडे नका लक्ष देऊ🙏,तुम्हांला आधाराची गरज होती तेव्हा तुमचा आधार कोणी बनलं नाही ऐवढेच लक्षात ठेवा व आंयुष्यात पुढे चालत रहा,तुमच्या आंयुष्याच्या पुढच्या वाटचाली साठी लाख लाख शुभेच्छा 💐💐असेच नेहमी ऐकमेका सोबत रहा व खुश रहा ,देव तुम्हाला जगातलं संगळ सुख देवो🙏
@yashrajshindefilmproductio9286
@yashrajshindefilmproductio9286 Жыл бұрын
छान
@rishilokhande8472
@rishilokhande8472 Жыл бұрын
आपल्या दुःखात जर आपला समाज आपला होत नसेल तर त्या समाजाची पर्वा करणेच निरर्थक.... वेळाने का होईना पण प्रेमाला प्रेम मिळालं 💐♥️ अभिनंदन आजी आणि आजोबा ♥️💐
@rutu49gaming
@rutu49gaming Жыл бұрын
मी माझ्या साठी आणि मॉम साठी पप्पा शोधणार आता पण आई नाही म्हणते पण मला पण पप्पा पाहिजेत 😞
@shradhakamble6666
@shradhakamble6666 Жыл бұрын
@@rutu49gaming very good👍 best wishes for you
@sritapatil198
@sritapatil198 Жыл бұрын
@@rutu49gaming ho tai khushal shodh
@sntellaringart7841
@sntellaringart7841 Жыл бұрын
सहमत
@rutu49gaming
@rutu49gaming Жыл бұрын
मम्मा नाही म्हणते दोन बहिणी आहोत आम्ही आणि लोकं चांगली नसतात अस म्हणून ती लग्न नाही करत आहे , खूप टेन्शन मध्ये असते ती , तीला वाटत जस आपल्याला कुणी फॅमिली हवी तशी च समोरच्याला पण वाटत असेल तर ठीक
@user-of3rs9nv5e
@user-of3rs9nv5e Жыл бұрын
जीवनात घेतलेला अप्रतिम निर्णय आहे हा !!!!!जग काय काहिही म्हणणार पण ज्या मानसिक गोष्टींची गरज असते त्या गोष्टी कोणी देत नाही. पोटाला जेवण कोणी देत नाही. त्यामुळे अशी अनेक लग्न व्हायला हवीत ,कोणाचाच विचार न करता आजी आजोबा पुढील आयुष्य जगत राहा,शुभेच्छा💐💐
@meghabahirgaonkar9240
@meghabahirgaonkar9240 Жыл бұрын
तुमच्या निर्णयाला आमचा 100%पाठिंबा आजी आजोबा🙏🙏
@Sheela1000
@Sheela1000 Жыл бұрын
खूप छान वाटते 🎸 खरे प्रेम हेचं आणि ह्याच वयात. 💓
@yashwantpardeshi3806
@yashwantpardeshi3806 Жыл бұрын
यात चुकीच काही नाही दोघे ही खुश रहा
@adityap4312
@adityap4312 Жыл бұрын
Mg tarun pan lagn karu naka....old age madhe kara
@someshwarkirwale532
@someshwarkirwale532 Жыл бұрын
आजी आजोबा एक लक्ष्यात घ्या कि ज्या आपले म्हणता त्या आपल्या लोकांनी आश्रमात राहन्याची टाईम आनली त्यांचा काय विचार करायचा छान पैकी जीवन जगायचे
@bhikajigalande2555
@bhikajigalande2555 4 ай бұрын
छान छान आहे दोघांनी आनंद रहाव
@bhikajigalande2555
@bhikajigalande2555 4 ай бұрын
शिलाजी ज्यांना वर्ध असरमात सोडले त्यांनी,,स्वपनात विचार केला नशेल की आमचे ,,आई वडील वर्ध असरमात लग्न करतील म्हणून,, शिलाजी मला सुद्धा खुपच छान वाटले,, दोघांनी गुनगोविंद संसार करावा,, हे अगदी बरोबर आहे
@amolmusale8432
@amolmusale8432 Жыл бұрын
खुपचं सुंदर आपलं आयुष्य असेच सुख-समृद्धी ने आरोग्य संपन्न होहो
@NK-ly3cp
@NK-ly3cp Жыл бұрын
वयाने आमचा पेक्षा दुप्पट मोठे आहात, आशीर्वाद देऊ शकत नाही पण सदिच्छा नक्कीच देवू शकतो.
@anilmhaske9392
@anilmhaske9392 2 ай бұрын
@Momnson777
@Momnson777 Жыл бұрын
सर तुम्ही खुप छान काम केले आहे. या वयात जोडीदाराच्या सोबतीची उणीव भासते. 👍👍👍
@pradeepgadhepatil1192
@pradeepgadhepatil1192 Жыл бұрын
खूप छान निर्णय.. तुम्हा दोघांना आवडल तुम्ही केल या मध्ये बाकी लोकांचं पोट दुखायच कारण नाही. आधार 👍
@muktapathak4964
@muktapathak4964 4 ай бұрын
ज्या दिर जावांनी आणि भावांनी तुम्हाला इथे ठेवलं, त्यांचा विचार कशाला करता आजी? खूप छान निर्णय घेतला तुम्ही.
@Rapheal119
@Rapheal119 Жыл бұрын
खुश रहा,देव तुमच्या पाठीशी कायम राहो.हीच ईश्वचरणी प्रार्थना.
@subhash.g.2869
@subhash.g.2869 Жыл бұрын
देव पाठीशी असता तर वृध्द आश्रमात कसे काय...
@ranjananikam7390
@ranjananikam7390 Жыл бұрын
Dev devi danav he purviche lok hote. Ishwar ha ek aatma ahe. Ugach ishwaracha apman karu naka ? Arth kalat nadel tar lihu naka
@subhash.g.2869
@subhash.g.2869 Жыл бұрын
@@ranjananikam7390 ईश्वर आहे...मग आश्रमात हे जिवंत आत्मा कसे.
@ranjananikam7390
@ranjananikam7390 Жыл бұрын
@@subhash.g.2869 Barobar, Ishwar ha nirman karta aatma ahe. Manushyacha aatma ha nirmiti aatma ahe. Donhi ek nahi
@subhash.g.2869
@subhash.g.2869 Жыл бұрын
@@ranjananikam7390 वृद्ध दाम्पत्य कोणाचे "आत्मा "आहेत..,...,..,...,..
@MJ-mh2lb
@MJ-mh2lb Жыл бұрын
This is called real marriage.. No dowry, no gold, no showoff, No business... just pure two souls ❤️❤️
@kalpanakhilari6769
@kalpanakhilari6769 Жыл бұрын
नझंझझझझझंझझझझ
@ashishthosar1740
@ashishthosar1740 Жыл бұрын
Yedzav
@rudhfdisidurudi
@rudhfdisidurudi 4 ай бұрын
Prtekl lokni tri apla la jiv lavnara hv ast. Jena family ahe te nahi smjt skt. Lgn fkt sex yevda ch nst. Nav tevanare fkt lgnala sex ch smjata. Lokcay vicar cukiche ahe.
@maheshs6238
@maheshs6238 Жыл бұрын
वा!! खूप छान आणि स्तुत्य निर्णय,या जोडीला उर्वरीत वैवाहीक जीवनाच्या खूप शुभेच्छा!! या वृद्घाश्रम चालकालाही सादर प्रणाम.त्यांनी एक नवा आदर्श घालून दिला व या दोघी दुःखी जीवांचे जगणे सुसह्य केले.अभिनंदन.
@Vijaykmr11
@Vijaykmr11 Жыл бұрын
वाह! सुंदर निर्णय!!! साथ देणारा हात शेवटपर्यंत असायलाच हवा!!!
@avinashshinde8400
@avinashshinde8400 Жыл бұрын
समाज काय म्हणेल, नातेवाईक काय म्हणतील या भीतीने लाखो जीव कुढत जिवंत पणी मेल्याच आयुष्य जगत आहेत... इतरांसाठी स्वतः च्या इच्छा मारून जगण्याला अर्थ उरतच नाही.. आयुष्य तुमचं आहे.. काय योग्य काय आयोग्य तुमचं तुम्हाला कळतं असतच... मग समाजाचा माज समाजात राहूद्या, तुमचं आयुष्य तुम्ही जगा.. आजी आजोबा दोघांना ईश्वराने दिलेलं आयुष्य जगून या जगात जायचं आहे.. जो पर्यंत जिवन्त आहेत तो पर्यंत एकमेकांचे सुखी सांगाती...
@pandharinathmadval7292
@pandharinathmadval7292 Жыл бұрын
काका/काकी आपण उत्तम आरोग्य जपा,,,,,,आपला आदर्श वंदनीय आहे,, श्री स्वामी समर्थ जय जय स्वामी समर्थ 👍👍👍👍🙏🙏👍👍👍👍
@daulatbansode3147
@daulatbansode3147 Жыл бұрын
खुप छान 👌👌
@LekKrushichiVlog
@LekKrushichiVlog Жыл бұрын
खुप छान निर्णय 👌👍 पुढील वाटचालीस हार्दिक शुभेच्छा
@jaythorat3467
@jaythorat3467 Жыл бұрын
आजी खूप छान केलं....😍😍😍proud of you both🙏🏻🙏🏻🙏🏻🙏🏻🙏🏻🙏🏻
@kundangaikwad13
@kundangaikwad13 Жыл бұрын
आजी खूप छान अशा वेळेस एकमेकांना एकमेकांची गरज असते तरुणपणी तर कुणी कुणाला साथ देईल पण म्हातारपण एकमेकांना गरज मनातले दुःख एकमेकाला सांगता येते अशा प्रकारे आपण लग्न करून
@akshaybankar6180
@akshaybankar6180 Жыл бұрын
Happiness is everything... Be happy and keep smiling 👍👍
@sharadsohoni
@sharadsohoni Жыл бұрын
ऋणानुबंध हे असे असतात. ❤❤आजी आजोबांना एकमेकांचा आधार मिळाला. त्यांना सुख/शांती व समाधान मिळाले आहे. त्यांचे अभिनंदन आणि हार्दिक शुभेच्छा 🌹🌹🌹🌹🌹
@bharatbhosale4244
@bharatbhosale4244 4 ай бұрын
आजी आणि आजोबाना माझा सलाम........ लोकांच्या बोलण्यावर जाऊ नका आणि इथून पुढे नातेवाईकांचा विचार करू नका आश्रम आणि तेथील अध्यक्षाना माझे कोटी कोटी प्रणाम
@ajitatatake5903
@ajitatatake5903 Жыл бұрын
अगदी योग्य निर्णय आहे आज्जी तुमचा ,अभिमान वाटतो पोरे आपल्या वाटेला निघुन जातात ,मागे वळुन बघणारे असे किती आहेत ,अगदी बरोबर केलेत तुम्ही
@nandkishorwalke
@nandkishorwalke Жыл бұрын
*७५ वर्षाचे आजोबा व ७० वर्षाची आजीबाई विवाहबंधनात!!* अनाथ आश्रमात खुलल्या लग्नाच्या रेशीमगाठी अन साजरा झाला व्हँलेनटाईन डे!!!!! एक सामाजिक आधाराचे वास्तव व अनोखा विवाह
@lalitaburse3346
@lalitaburse3346 Жыл бұрын
आजी ,आजोबा गोड जोडी. आरोग्य पूर्ण शुभेच्छा पुढील प्रवासस. 💐💐💐💐💐💐💐💐💐💐💐
@jaspreetprada2944
@jaspreetprada2944 Жыл бұрын
प्रत्येकाला आपलं आयुष्य सुखाने जगण्याचा अधिकार आहे, आयुष्य हे एकदाच मिळते आणि ते आनंदी होऊन जगावं, आपल्या रीती परंपरा तेच सांगतात, तुम्हाला पुढच्या वाटचालीसाठी हार्दिक शुभेच्या..ही एक सुंदर प्रेमकथा आहे, लेखक असतो तर नक्की एक कथा लिहिली असती यांच्या जीवनावर
@sandipchavan4678
@sandipchavan4678 Жыл бұрын
Hat's Off 👍वैवाहिक जीवनातील तारुण्य हे कौटुंबिक सुखं शांती, वैयक्तिक आवडी निवडी आणि अपत्य संगोपनात जातं. पण सांसारिक जीवनाची खरी गाथा ही उतार वयात सुरु होते. आणि त्यावेळी जोडीदाराचं असणं हे अत्यंत महत्वाचे असते. आजोबांनी घेतलेला निर्णय अभिमानास्पद आणि स्वागतार्ह आहे. आजी आजोबांना मनःपूर्वक शुभेच्छा.. 💐💐
@subhashpophale474
@subhashpophale474 Жыл бұрын
अगदी बरोबर🙏
@user-wg5tx2wk4f
@user-wg5tx2wk4f 2 ай бұрын
आजी-आजोबांना मनःपूर्वक शुभेच्छा 💐💐
@madhavipawar5901
@madhavipawar5901 Жыл бұрын
खुप खुप खुपच सुंदरररररररररररर प्रेम महणजे शरीर च नाही तर आयुष्यात मिळणारी साथ😍💐
@lokeshjadhav7879
@lokeshjadhav7879 Жыл бұрын
Progressive thought (in benifit of healthy society) are always welcome. wishing this couple prosperous married life ahead .
@prachikate7951
@prachikate7951 Жыл бұрын
Khup chhan!!!!..... Abhinandan.... Aani pudhil aayushya sathi manapsun shubeccha 🙏💐
@samuelsp204
@samuelsp204 Жыл бұрын
Kya baat...♥️ No matter who is with you aaji but all good hearted people are with you. I will definitely visit you in kolhapur.
@yashwantsakat7929
@yashwantsakat7929 Жыл бұрын
क्रांतिकारी विचार चांगला प्रतिसाद भावी जीवनात यशस्वी होण्यासाठी हार्दिक शुभेच्छा
@jijabaibhosale1951
@jijabaibhosale1951 Жыл бұрын
Lai bhari
@geetaparamban9961
@geetaparamban9961 Ай бұрын
H
@sangitakeware6332
@sangitakeware6332 Жыл бұрын
भावनिक गरज ,आधारासाठी अगदी योग्य आहे
@shitalingavale5993
@shitalingavale5993 Жыл бұрын
आजी, आजोबा तुम्ही खूप लकी आहात.ह्या वयात जे नात निर्माण होत ना ते कधीही न तुटणार असत.तुम्ही दोघे ही एकमेकांना आधार देत रहा.तुम्हाला चांगले आरोग्य मिळू दे ही स्वामी समर्थ चरणी प्रार्थना....तुम्ही दोघे एकमेांच्या साठी आहेत हे लक्षात ठेव...श्री स्वामी समर्थ...🙏🙏
@user-mt6gr9eq9k
@user-mt6gr9eq9k Жыл бұрын
आजी आजोबा सर्व प्रथम तुम्हला खूप खूप शुभेच्छा💐💐 ह्या वयात पण अतिशय योग्य निर्णय तुम्ही घेतला खरंच खूप अभिमानाची गोष्ट आहे.👌👌 आणि एकच सांगेन तुम्हला पुढील निरोगी आयुष्यसाठी खूप खूप शुभेच्छा.💐🙏🙏श्री स्वामी समर्थ🙏🙏
@shobhasantoshkitchen
@shobhasantoshkitchen Жыл бұрын
आपण कायम आनंदी असो हीच ईश्वर चरणी प्रार्थना🙏
@sudhagangolli186
@sudhagangolli186 Жыл бұрын
खुपच छान, खरच आहे, हया वयात कोणीतरी सोबत हवीच, आपल्या सुखदुःख ात साथ हवीच, देव तुम्हांला सुखी समाधानी आणि आरोग्यदायी आयुष्य देवो ही प्रार्थना,
@Pardeshi1990
@Pardeshi1990 Жыл бұрын
खुपच छान। खर बघायला गेले तर आपले नातेवाईक आपल्याला नाव ठेवण्यात पुढे असतात। आधार म्हणून सोबत जोडीदार पाहीजेच। ज्या वेळी त्याची गरज पाहीजे त्या वेळी ते सोबत नसतात। ही वेळ जेव्हा त्यांच्यावर येईल तेव्हा ते सुद्धा हेच करतील। ज्या नातेवाईक ला दुख लागत असेल त्याला म्हणाव जा चुल्यात घूस।
@ishwarikedar
@ishwarikedar Жыл бұрын
पण वय झालं आहे दोघांचं पण ते अजून बरेच वर्ष सोबत रहुदेत देवा पण एक ना एक दिवस दोघांपैकी एक जणाला जावं लागेल राहणारा जो कोणी असेल त्याला पुन्हा हे दुःख पेलावल की नाही माहीत नाही😭 मुल मुली असल्या तरी आयुष्याच्या शेवट पर्यंत नवरा बायको च एकमेकांचे आधार असतात बाकी मुल सुद्धा नाही
@sachinmahamuni5139
@sachinmahamuni5139 Жыл бұрын
काळाच्या पुढचा घेतलेला निर्णय. खुप खुप मनःपूर्वक शुभेच्छा!🌺🌺🌺🙏🙏🙏🌹🌹🙏🙏
@hemangiwelling3102
@hemangiwelling3102 Жыл бұрын
अगदी छान केले आजी आजोबानी या उतार वयात खरी गरज असते आपल्या माणसाची लोकांना किंमत द्यायची नाही आपल्या मानलं पटेल तेच करायचे
@prakashsakhare6985
@prakashsakhare6985 Жыл бұрын
आजी आजोबा तुम्हाला निरोगी आरोग्य लाभो तसेच तुम्ही आयुष्यभर आनंदी जीवन जगा.
@chikusonivideos5323
@chikusonivideos5323 Жыл бұрын
तुमची जोडी कायम निरोगी आणि आनंदी राहो हीच प्रार्थना ..
@anantdhumak3983
@anantdhumak3983 Жыл бұрын
एकमेकांना खरा आधार मिलाला !अभिनंदन
@welcome2kiran1
@welcome2kiran1 Жыл бұрын
You both are simply great .. have a healthy life together ✨️
@seemakadam2677
@seemakadam2677 4 ай бұрын
हा व्हिडिओ बघितल्यानंतर काय बोलावे खरंच आजोबा आजींच्या या नव्या वाटचालीस खूप खूप शुभेच्छा आणि आश्रमाचे चालक जानी हा छान निर्णय घेतला त्यांचे मनापासून खूप खूप आभार
@sanildevlekar3890
@sanildevlekar3890 Жыл бұрын
लोक कोण मेरे मन को भाया में खुशी में जी गया आजी तुम्ही तुमच्या दोघांचा आनंद बघा या वयात वैगेरे बोलायला लोक आहेतच ते बोलत रहाणार तो पर्यंत जगा तुमच्या खुशी चे महत्व तुम्हीच ठरवा आणि ते केले खूप छान मस्त एन्जॉय लाईफ पार्टनर
@deepmalapatil509
@deepmalapatil509 Жыл бұрын
छान झाले मानसिक आधाराची गरज मूळ असते या वयात कोणी तरी सुख दुःख वाटून घेणारा जोडीदार प्रत्येक एकट्या पडणाऱ्या व्यक्तीला लागते चांगले झाले पण आता ह्यांना राहायला कुठे आश्रमातून काढू नका त्यांना इथेच ठेवा
@simpledrawing247
@simpledrawing247 Жыл бұрын
मानसिक आधार , एकमेकांची सुख दुःख वाटून घेणं, आपलं म्हणणं कोणीतरी ऐकून घ्यावं , भावना समजून घेणारं , आपल्या आवडी निवडी जपणारं ... या गोष्टींची प्रत्येक वयात गरज असते... अगदी ३ वर्षाचे बालक असो वा म्हातारे / वयस्कर ... प्रत्येकाला आपलं असं हक्काचं माणूस असावं....😢
@sanjayparab3160
@sanjayparab3160 Жыл бұрын
आपण माझ्या मनातलं बोललात.संजय परब.
@savitajoshi2234
@savitajoshi2234 Жыл бұрын
आई बाबा तुम्हाला खुप खुप शुभेच्छा भरपूर आयुष्य आणि प्रेमळ सोबत पाहून ऊर अभिमानाने भरून आलंय. तुमच्या सोबत असणाऱ्यांना एव्हढे सुंदर आणि माणुसकीचे दर्शन बघायला मिळाले धन्य आहे आम्ही हे पाहून की इतक्या वाईट अनुभवात ही हिरवळ आहे तुमच्या सुंदर नात्याची
@aratishingare7896
@aratishingare7896 Жыл бұрын
खूपच सुंदर .दोघंही आनंदी राहा. कोणतंही दुःख तुमच्या वाट्याला येऊ नये.हीच ईश्वचरणी प्रार्थना!
@priyankakolhe3414
@priyankakolhe3414 Жыл бұрын
The marriage was well done. As long as the days remain, they will remain happy.....each other's support will remain for the marriage
@komalpol9275
@komalpol9275 Жыл бұрын
Very nice aaji aajoba.... We all r happy for you... And thx to all urs supporter ....lots of love aaji aajoba... Wishing you wonderful life together
@swatinerurkar4770
@swatinerurkar4770 Жыл бұрын
🙏 खरंच आज आपला समाज सुधारत आहे, वृध्दापकाळात ‌एकट राहणं,हे अतिशय कठीण आहे, एकमेकांना मानसिक आधार मिळतो. सामाजिक कार्यकर्ती.❤️
@Lahu.Panman..
@Lahu.Panman.. Жыл бұрын
आजच्या.युगात.कुणीच.कुणाचे.नाही.असेल.जोडी.तरच.जीवनात.गोडी.
@agbansod
@agbansod Жыл бұрын
Great all the best for peaceful life 🎉
@malinigite
@malinigite Жыл бұрын
ताई रडू नका. चांगला निर्णय घेतला. नातलगांचा विचार करु नका. 💐💐🙏🙏
@poornimarokade4750
@poornimarokade4750 Жыл бұрын
खूप छान पण कुणी तरी पुढाकार घेऊन ह्या गोष्टी शक्य तितक्या लवकर व्हायला पाहिजे पुर्न विवाह संस्था उघडल्या पाहिजेत जोडीदार विना पोटची मुलं देखील आई किंवा वडीलांकडे लक्ष देत नाही किंवा त्यांच्या कामाच्या व्यापामुळे व्रुद्ध आई वडिलांकडे लक्ष देणे होत नाही म्हणून त्यांना मानसिक आधार देण्यासाठी त्यांना समाजाणेच एकत्र आणण्याची गरज आहे
@meeta1960
@meeta1960 Жыл бұрын
A old man, from village, not to much educated and poor, and so much progressive thinking, very nice, and hats of to him,In old age one feel lonely, every one needs a partner to sit together and talk about everything about life in general,past happenings, and lot of stuff.many people should come headland please do not give anything to your girls, or boys not even, gold,money,land anything till you guys are alive, and then what so ever you have donate to the place where you guys are livings other can get help, and the people can run their old ag home.God bless them all, and keep both of them happy.-MMR-USA
@rashmipatil5405
@rashmipatil5405 Жыл бұрын
Congratulations Aaji -Ajoba khup chan nirnya ghetla tumhi..👏👏👏💐🎉
@Santosh.1123
@Santosh.1123 Жыл бұрын
कोरोना मधून कळलं समाज, नातेवाईक ह्या फक्त वरवरच्या गोष्टी आहेत वाईट काळात खूप कमी लोक मदत करतात कधी ओळख नसलेली लोक खूप मदत करून जातात पण जवळचे लोक फक्त स्वार्थासाठी येतात. तुम्हाला खूप शुभेच्या. उतार वयात निर्णय घ्यायला धाडस लागत ते तुम्ही दाखवलं.🎉🎉
@ranjanaate5118
@ranjanaate5118 Жыл бұрын
खुप छान एका नविन वाटचालीला सुरूवात झाली ,समाजातील रूढी ,परंपरा झुगारून नविन आयुष्याला सुरुवात केली खुप छान वाटलं हे बघून 👌🙏🌹💐💐
@sidheshwar9483
@sidheshwar9483 3 ай бұрын
खर तर याच वयात आधाराची गरज असते ,चागलं केलं आजी आजोबा
@anilzade8886
@anilzade8886 Жыл бұрын
खरच वृद्धाश्रम संचालकांनी आजी आजोबांचा लग्न लावून खूप पवित्र काम केलं. माझा सलाम त्यांच्या कार्याला. 💐💐🙏🏻
@vinodpawar2662
@vinodpawar2662 4 ай бұрын
Khup chhan kel aaji aajoba doghe sukhane raha hi shubhechha
@vikramtembhurne9510
@vikramtembhurne9510 Жыл бұрын
आजी-आजोबांना मनापासून शुभेच्छा त्या आश्रमात आनंदी रहा
@pavanpatil8802
@pavanpatil8802 Жыл бұрын
This is great 👍 sir after watching this news i feeling very happy. I just wanted to open one old house. In my farm
@suchetapatil4359
@suchetapatil4359 4 ай бұрын
Appreciated step taken to live life.
@ravinakambli9474
@ravinakambli9474 Жыл бұрын
आई बाबा तुमच दोघांचीही अभिनंदन कोणाचा विचार न करता एकमेकासाठी जगा
@mr.kbahire596
@mr.kbahire596 Жыл бұрын
जिंदगी एकाने निघत नही सोबत जोडीदार पाहिजे त्याशिवाय जगण्यात अर्थ नही
@rakeshshinde7
@rakeshshinde7 Жыл бұрын
निरोगी मन प्रत्येकाची गरज आहे हक्क आहे. खूप छान वाटल.❤
@munirapardiwala8659
@munirapardiwala8659 Жыл бұрын
It's so touching.... The lady is crying and one can feel the emotions it's good they married not young but even the old need companionship at least they will b fir each other
@gautamguldhe7478
@gautamguldhe7478 Жыл бұрын
अगदी योग्य निर्णय. डोळ्यांचे पारणे फेडणारे दृश्य. फारच सुंदर. आजी आणि आजोबांना त्यांच्या भावी वैवाहिक जीवनासाठी माझ्याकडून लाख लाख मंगलमय शुभेच्छा 👌👌👌
@swapindian8233
@swapindian8233 Жыл бұрын
खुप मस्त दोघांना पुढच्या वाटचालीसाठी शुभेच्छा
@robinsood8598
@robinsood8598 Жыл бұрын
आता आजी आजोबा सुखी राहोत हिच गणपती कडे प्रार्थना 🙏🏻
@gajananerpsoftwarepatil3113
@gajananerpsoftwarepatil3113 Жыл бұрын
एक छान आदर्श ... आपणास निरोगी आणि समाधानी आयुष्य लाभो हीच सर्वसाक्षी परमेश्र्वराकडे मनोभावे प्रार्थना...!!!
@smitapatil5983
@smitapatil5983 4 ай бұрын
प्रथम तुमच्या दोघांचे अभिनंदन कारण आयुष्यभर ज्या नालायक मुलांना सांभाळलं त्यांच्या तोंडावर मारलेली ही खूप मोठी चपराक आहे. कळू त्यांना आपल्या आई वडिलांना उशीरा का होईना देवाने त्यांना न्याय दिला. तुमच्या मुलांशी ही त्यांची मुले अशीच वागू देत म्हणजे कळेल त्यांना तुम्हाला किती दुःख झाले असेल तुमच्या वागणूक बद्दल. आजी आजोबा आनंदी जीवनाच्या खूप शुभेच्छा. 💐
@hemangipednekar7547
@hemangipednekar7547 Жыл бұрын
आजी रडू नका . लोक काय बोलतील हयाचा विचार करू नका. तुम्ही खूप छान निर्णय घेतला. पैसा असेल तोपर्यंत च माणूसकी, पैसा संपला माणूसकी संपली. प्रेम मिळायला भाग्य लागते. आजी तुम्ही भाग्यवान आहात तुमचे अश्रू पुसायला आजोबा आले. तुमच्या भावना ज्यांनी समजून घेवून हा धाडसी निर्णय घेतला त्या सर्वांचेच आभार
@vinayakgadhave1835
@vinayakgadhave1835 Жыл бұрын
फारच छान. आजोबा_आजी याचां गोड असा जोडा जमला. दोघांनाही उदंड आयुष्य लाभो हीच ईश्वरचरणी प्रार्थना आहे.
@riyaratnoji-jh6dv
@riyaratnoji-jh6dv Жыл бұрын
may God bless you 🙏🏻
@manishapujari2488
@manishapujari2488 Жыл бұрын
Congratulations both of you .God bless you both always..
@saifhashr3736
@saifhashr3736 Жыл бұрын
Good 👍 what wrong in that nothing. They are most respected, May Allah bless them and give long life good health and live together forever and forever, salute to them.
@raeesamulla6177
@raeesamulla6177 Жыл бұрын
👍👏🎊👏
@sanjayadmane2839
@sanjayadmane2839 Жыл бұрын
आपल्याला उदंड आयुष्य लाभो ही प्रार्थना 🙏🙏
@mimkalp
@mimkalp Жыл бұрын
Very nice. आजोबा. आजी. आयुष्य लाभो एकमेकांना आधार देण्यासाठी.
@vikaschanne3646
@vikaschanne3646 Жыл бұрын
आजी आजोबा खूप चांगला निर्णय घेतला तो म्हणजे तुम्हाला एकमेकांची जास्तच गरज आहे कोणी कोणाचं नसत तुम्हाला देव सर्व सुखा देवाने द्यावे हिचा ईश्वरचरणी प्रार्थना
@pramodchoudhary4509
@pramodchoudhary4509 Жыл бұрын
Very good decision.At this age everyone require mentally support. All the best to both of you.
@sandushachandiwade4764
@sandushachandiwade4764 Жыл бұрын
खुप खुप शुभेच्छा आजी आजोबा.लोक कोण नस्त.आजोबा बरोबर बोलतात . आपल्या शी हक्काचे कोणी तरी बोलणारे पाहिजे च .आणि दादा खुप वर्षा पुर्वी मी हे ऐकले आहे . आश्रमात महिला व पुरुष यांची मीटिंग घेतात आणि त्यांना विचार ल जात .जर तुम्हाला कोणा सोबत राहायचं असेल तर तुम्ही तुमचा जोडीदार निवडून राहु शकता .असं सर्व आश्रम मधे केले पाहिजे.कोणी लांबचे तर राहुदे पण संख्ये पण आपले नसतात. दादा आजी आजोबा च लग्न लाऊन दिलंत आणि त्यांना तिथेच राहाला सांगितले दादा खुप खुप धन्यवाद तुला 🎉💐💐🙏🙏👍👍💯
@pramodadkmol3725
@pramodadkmol3725 Жыл бұрын
खरंच शेवटी छत्रपती शाहू महाराज यांचे कोल्हापूर आहे❤️❤️
@navnathwaghmgre-pf3mg
@navnathwaghmgre-pf3mg Жыл бұрын
21 तोफांची सलामी आजी आजोबा तुमच्या प्रेमाला सल्यूट 🌹🌹🌹🌹🙏🙏🙏🙏🙏🙏
आपलेच पहिले लांब जातात | Jyoti Patait | Josh Talks Marathi
20:37
The child was abused by the clown#Short #Officer Rabbit #angel
00:55
兔子警官
Рет қаралды 16 МЛН
Получилось у Вики?😂 #хабибка
00:14
ХАБИБ
Рет қаралды 6 МЛН
I’m just a kid 🥹🥰 LeoNata family #shorts
00:12
LeoNata Family
Рет қаралды 18 МЛН
आई वडीलांना टाकले वृद्धाश्रम मधे
21:50
गावाकडचा राहडा
Рет қаралды 969 М.