Рет қаралды 314
पातोळे - कोकण नागपंचमी विशेष l Paatole - Kokan Nagpanchami Special l #patoli #patole #nagpanchmi
श्रावणातला पहिला सण म्हणजे नागपंचमी. विशेषतः तळकोकणात नागपंचमीला पातोळ्या करतात. तांदळाचे पीठ भागवून, त्यात खोबऱ्याचे चुन भरून हळदीच्या पानाच्या आवरणात वाफेवर शिजवला जाणारा पदार्थ.
हळदीच्या पानांचा सुगंध, खोबऱ्याच्या चुनात घातलेल्या वेलची आणि जायफळाचा गोडपणा आणि तांदळाच्या पिठाचा मऊपणा असं हे जबरदस्त चवीचं कॉम्बिनेशन म्हणजे पातोळे.
साहित्य -
तांदळाचे पीठ १ कप
पाणी १ कप
ओलं किसलेलं खोबर १ वाटी
किसलेला गुळ अर्धा वाटी
मीठ चवीनुसार
तेल आवश्यकतेनुसार
वेलची पावडर १ छोटा चमचा
जायफळ पावडर १ चिमूटभर
कृती -
खोबऱ्याचं चुन
प्रथम एका कढईत एक वाटी खोबर आणि अर्धा वाटी किसलेला गुळ घ्या.
त्यानंतर गॅस सुरु करा.
जोपर्यंत गुळ पूर्ण वितळत नाही आणि खोबर व गुळ एकजीव होत नाही तोपर्यंत ढवळत रहा.
खोबर व्यवस्थित शिजल्यानंतर गॅस बंद करा व त्यात एक छोटा चमचा वेलची पावडर आणि किंचीत जायफळ पावडर घाला व व्यवस्थित ढवळून थोडा वेळ मिश्रण थंड होण्यासाठी ठेवा.
पीठ भागवणे -
एका टोपात एक कप पाणी उकळण्यासाठी ठेवा
पाणी थोडं गरम झालं कि त्यात चवीनुसार मीठ घाला.
पाणी पूर्ण उकळलं कि गॅस बंद करा व त्यात एक कप तांदळाचे पीठ घाला.
लगेच लाटनी किंवा लाकडी चमच्याने पाणी आणि पीठ मिक्स करा व ५-१० मिनिटांसाठी झाकून ठेवा.
पातोळे बनवणे
हळदीच्या पानांना तेल लावा व त्यावर भाकरी प्रमाणे एक छोटा पिठाचा गोळा घेऊन पानावर थापा.
त्यात खोबऱ्याचं चुन घालून पाटोळी सर्व बाजूनी बंद करा
एका कढईत पाणी गरम करण्यासाठी ठेवा व त्यावर एक चाळण ठेवा.
चाळणीमध्ये पातोळ्या ठेवा व ७-८ मिनिटांसाठी झाकण ठेवून वाफेवर शिजू द्या.
७-८ मिनिटांनी गॅस बंद केल्यानंतर तसाच १० मिनिटांसाठी तसाच झाकून ठेवा.
१० मिनिटानंतर पातोळ्या खाण्यासाठी तयार
Follow Our Socials -
KZbin - / kunalbandekarsfoodjourney
Facebook - / kunalbandekarsfoodjourney
Instagram - / kunalbandekarsfoodjourney
Twitter - / kunalsfoodblog
Pinterest - / kunalsfoodjourney
Website - kunalsfoodjour...
#shorts #ytshorts #youtubeshorts #youtube #youtuber
#kunalbandekarsfoodblog #malvan #malvanifood #seafood #healthyfoodbykunal #malvanicooking #cooking
#prawns #prawn #prawnrecipe #prawnmasala #कोळंबी
#malvaniseafood #kolambi #malvaniprawns
#malvaniprawnmasala #malvanikolambimasala
#malvanicurry #malvanimasala #kokanicuisine #malvanicuisine #bandekarmasala #bandekarfoodproductsandspices #malvanifoodblogger #malvanifoodlover #marathifood #traditionalfood #malvanitraditionalfood #kokanifoodblogger #healthyfood #iamchef