Рет қаралды 4,972
#vasudevsangeetsabha #shriram #maruti #hanuman #hanumanji
संगीत संयोजन - श्री. राहुल कुलकर्णी.
संगीत आणि गायन - सौ वसुधा भालेराव वैद्य.
सहगायक वृंद - चि. परीक्षित बावडेकर.
चि. नारायणी पात्रीकर.
चि. अद्वैत भालेराव
रेकॉर्डिंग आणि एडिटिंग - अभिलाष राजर्षी , स्वप्निल शिंदे.
स्टुडिओ सर्वोदय - स्वरोदय.चिंचवड पुणे.
साउंड मिक्सिंग ,आणि मास्टरिंग. - श्री. श्रीकांत पिसे.
कोरस रेकॉर्डिंग -नहुष
स्टुडिओ- श्री नहोश बडगे,साऊंड बेस्ट स्टुडिओ,
शिवाजीनगर नागपूर.
वासुदेव दत्त…!
अंजनीचा सुत मारुतपोत....
प.प. श्रीमद् वासुदेवानंद सरस्वती स्वामीमहाराज यांनी केलेले हे भजन - चित्तशोधनाच्या निमित्ताने निर्माण झालेल्या दुर्जयी अश्या अंतर्वैरींच्या भंजनासाठी - त्यांच्याद्वारे गांजलेल्या साधकाच्या साधकत्वाच्या रक्षणासाठी - हे गुणगायन - खळप्रवृत्तीच्या उच्छेदनासाठी.
जो माता अंजनीचा बालक - प्रत्यक्ष वायूपुत्र - महाबळवंत व बुद्धिमानांमध्ये वरिष्ठ असुनही स्वतःला रामदूत म्हणवून घेण्यात धन्य मानतो व ज्याच्या स्मरणाने अंतर्बाह्य अश्या सर्व नकारात्मक भूमिका ध्वस्त होतात व संकटांचे निरसन होते व जो स्वभजकावर प्रसन्न होऊन त्याला बळ व बुद्धीचे वरदान देतो तो मारुतीराया आता माझ्या सर्व इच्छा पूर्ण करो ही या पदाच्या निमित्ताने केलेली प्रार्थना.
वासुदेव संगीत सभा, वेद वासुदेव प्रतिष्ठान, पुणे