पपई लागवड संपूर्ण माहिती | papai lagwad mahiti in marathi

  Рет қаралды 23,531

BharatAgri Marathi

BharatAgri Marathi

Күн бұрын

▶️ व्हिडीओमध्ये दिलेली कृषी उत्पादने खरेदी करण्यासाठी आता खाली दिलेल्या 👇🏼 लिंकवर क्लिक करा आणि 🥳 100% कॅशबॅकसह उत्पादन घरपोच मिळवा! 📢 कॅश ऑन डिलिव्हरी सुविधादेखील उपलब्ध!
👉लिंक - krushidukan.bh...
====================================================================
👨‍🌾नमस्कार शेतकरी बांधवांनो! 🙏
🌱 भारतअ‍ॅग्री मध्ये आपले स्वागत आहे.
✅आजचा विषय - 🌱पपई लागवड संपूर्ण माहिती | papai lagwad mahiti in marathi👍
पपईची लागवड महाराष्ट्रात जळगाव, धुळे, नंदुरबार, अमरावती, जालना, नाशिक, अहमदनगर, पुणे, सोलापूर व सातारा या जिल्ह्यात पपई पिकाची लागवड केली जाते.
1. हवामान: - पपईच्या वाढीसाठी हवामान हे उष्ण व दमट आवश्‍यक असते. पपई 15ºC-30ºC तापमानाच्या श्रेणीत चांगले वाढते. जर तापमान 9 ते 13 अंश सेल्सिअसपेक्षा कमी असेल तर फळे पक्व होण्याची क्रिया थांबते. तसेच झाडाची वाढ व फळधारणा होत नाही, जोरदार वारे, अति थंडी पपई पिकाला मानवात नाही.
2. पपई लागवडीसाठी हंगाम: - पपई लागवड वर्षभर करता येते. जून - जुलै, सप्टेंबर - ऑक्टोंबर आणि जानेवारी - फेब्रुवारी या तीन हंगामात करतात. महाराष्ट्रात जास्त प्रमाणामध्ये लागवड जुन-ऑक्टोबर या महिन्यापर्यंत केली जाते.
3. पपई लागवड कशी करावी ? - पपई लागवड बियांपासून रोपे तयार केली जाते. एकरी 2 ते 3 पाकिटे (10 ग्रॅमची ) बी पुरेसे होते. बियांपासून रोपे तयार होण्यासाठी दीड ते दोन महिने लागतात. रेड लेडी बियाणाच्या 10 ग्रॅमच्या पॅकेटमध्ये सुमारे 600 बिया असतात आणि हे बियाणे नर्सरीमध्ये तंत्र शुध्द पद्धतीने उगवले तर सुमारे 90 टक्के अंकुरित होतात.
4. पपईचे रेड लेडी 786 का वापरावे ? - हायब्रिड प्रकारांमध्ये त्याचा समावेश होतो. या वाणाचे सर्वात मोठे वैशिष्ट्य म्हणजे रेड लेडीच्या सर्व वनस्पती फळ देतात कारण ही झाडे उभयलिंगी म्हणजेच नर मादी फुले एकाच झाडावर लागतात म्हणून त्याचे एकाच ठिकाणी एकच रोप लावावे लागते. लागवडीनंतर केवळ 9 महिन्यांनी वनस्पतींना फळे दिसू लागतात. या प्रकारच्या फळांची साठवण क्षमता इतर जातींपेक्षा जास्त आहे.
5. पपई रोपवाटिका तयार करणे - पपई रोपवाटिका माध्यम तयार करण्यासाठी 5 किलो कोकोपिट + 2.5 किलो पोयटा माती + कुजलेल शेणखत + 100 ग्रॅम ट्रायकोडर्मा + 100 ग्रॅम. 19:19:19 खत या प्रमाणात मिश्रण तयार करून ते ट्रे किंवा पॉलीथीन बॅगमध्ये भरून द्यावे. तसेच यामध्ये बिया 1.5 सें.मी खोलीवर टोकाव्यात. बियाणे टाकल्यानंतर अलगत झाकून टाकावे व झारीच्या सहाय्याने पाणी द्यावे. तसेच पॉलीथीन बॅगमधील किंवा ट्रे मधील रोपे शेडनेट मध्ये ठेवावेत.
6. पपई लागवड पद्धत - पपई लागवडीपूर्वी जमिनीची आडवी उभी नांगरणी करावी. कुळवाने वखरपाळी देऊन ढेकळे फोडून घ्यावीत व जमीन सपाट करून घ्यावी. पपई लागवड 8 x 6 फुट अंतरावर पपईची लागवड केली तर एकरी सुमारे 930 रोपे लागतील.
7. खत व्यवस्थापन : - पपई लागवड करताना एकरी ५ टन शेणखत व प्रति झाड १०० ग्राम युरिया + १०० ग्राम डी.ए.पी + ८० ग्राम एम.ओ.पी. द्यावे. नंतर लागवडी नंतर तिसऱ्या, पाचव्या आणि सातव्या महिन्यामध्येहि प्रति झाड १०० ग्राम युरिया + १०० ग्राम डी.ए.पी + ८० ग्राम एम.ओ.पी. द्यावे. जमिनीमधील अन्नद्रव्ये आणि मातीपरीक्षणानुसार खतांची मात्र कमी जास्त होऊ शकते.
8. पाणी व्यवस्थापन : -
पाटपाणी : 7 - 10 दिवसाच्या अंतराने
ठिबक : 2 - 3 दिवसाच्या अंतराने पक्वता जवळ येत असताना झाडाला खूप दिवसाच्या अंतराने पाणी द्यावे. मातीचा प्रकार आणि हवामानाच्या परिस्थितीनुसार सिंचनाचे वेळापत्रक निश्चित करावे.
9. आंतरपिके : - पपईत आंतरपिके घेण्यासाठी घेवडा, चवळी, कांदा, मुळा, भूईमूग, वाटाणा या पिकांची आंतरपिके म्हणून लागवड करता येते.
10. कीड रोग नियोजन : -
पपई पिकांमध्ये मावा, अळी, लाला कोळी, निमॅटोड ह्या किडींचा व मर रोग, करपा, भुरी, डावानी मिल्ड्यू, फळ सड इ. रोगाचा प्रधुरभाव होतो.
11. काढणी : - पपई काढणी हि पपईची लागवड केल्या पासून दहा ते बारा महिन्यामध्ये पपई काढणीस येते. फळ काढणीसाठी तयार झाल्यावर पपई वर पिवळे डाग पडतो आणि फळातून निघणारा चीक पातळ पाण्यासारखा बाहेर निघतो तेव्हा समजायचे कि पपई हे फळ काढणीसाठी तयार झाले आहे.
12. उत्पादन : -
१. एका झाडापासून एका वर्षी 70 ते 100 फळे मिळतात.
२. या फळांचे वजन साधारणतः 700 ग्रॅम ते 2-3 किलो पर्यंत असते.
३. दरवर्षीं सरासरी 40 ते 50 टन पर्यंत उत्पादन मिळते.
तुम्हाला हा व्हिडीओ 📱 आणि दिलेली माहिती कशी वाटली हे आम्हाला कमेंट मध्ये सांगायला 💁‍♂️ विसरू नका ! तसेच हा विडियो तुमच्या इतर शेतकरी मित्रांना देखील शेयर करा 👍
✅आमची इतर सोशल मीडिया पेजेस -
👉भारतअ‍ॅग्री ऍप - bit.ly/2ZyV2yl
👉फेसबुक हिन्दी - bit.ly/36KuGOe
👉फ़ेसबुक मराठी - bit.ly/36KuGOe
👉इंस्टाग्राम - bit.ly/3B9Ny8G
👉वेबसाइट - www.bharatagri.com
👉लिंक्ड इन - bit.ly/3TWtK0Z
👉भारतअ‍ॅग्री मराठी यूट्यूब चैनल - bit.ly/3Ryf3zt
👉भारतअ‍ॅग्री हिन्दी यूट्यूब चैनल - bit.ly/3L2cRxF
#bharatagri #agriculture #hindi #farming #bharatagrihindi #kisan #kheti #fasal

Пікірлер: 67
@madhukarkothawade1664
@madhukarkothawade1664 Жыл бұрын
उत्कृष्ट माहिती
@dilipruggi8826
@dilipruggi8826 Жыл бұрын
Super information
@HanumantMote-b4u
@HanumantMote-b4u 2 ай бұрын
छान माहिती
@bharatagrimarathi
@bharatagrimarathi 2 ай бұрын
नमस्कार सर, आपण आमच्या सोबत आहेत हे ऐकून खूप छान वाटले त्याबद्दल आपले मनापासून आभार..! आपली यापुढे देखील अशीच साथ आमच्यासोबत राहू द्या. धन्यवाद...!
@prakashghugeagrimarathi9046
@prakashghugeagrimarathi9046 Жыл бұрын
नमस्कार सर आम्हाला तन नाशक आणि फळ लागल्यावर कोणती ट्रीटमेंट करावी हे सांगा सर आणि आजची माहिती खूप छान प्रकारे होती धन्यवाद
@vijutelgote9574
@vijutelgote9574 Жыл бұрын
Sir dragon fruit vishay sampun mahiti dya konti व्हरायटी लावायची
@shahrukhziriya161
@shahrukhziriya161 Жыл бұрын
Leaf curl ani yellow mosac vrti video bnva sir
@bharatagrimarathi
@bharatagrimarathi Жыл бұрын
ठीक आहे.
@ShivkumarPushpulwar-p9y
@ShivkumarPushpulwar-p9y Жыл бұрын
Super
@mayurgaikwad1648
@mayurgaikwad1648 Жыл бұрын
पपई पिकातील व्हायरस साठी काय औषध घ्यावे? तसेच डाऊनी रोगावर कोणते औषध घ्यावे?
@bhagwanpatil9730
@bhagwanpatil9730 Ай бұрын
डावणी या रोगा वरती उपचार कळवा
@bhimraopunjarwad6477
@bhimraopunjarwad6477 Жыл бұрын
आपण पपई लागवड बाबत अतिशय चांगल मार्गदर्शन केजे पण त्यास मार्किट कोठे आहेत व भाव काय मिळतो या बाबत आणि या वर कोण ते रोग येतात वत्यावरीळ नियंतन क शा पद्धतीन कराव या बाबत माहो ती द्यावी
@premranvir8572
@premranvir8572 11 ай бұрын
सर, माझे शेत नदी शेजारी आहे, तर मला पपई चे पीक घेता येईल का
@SanskarChondhe
@SanskarChondhe Жыл бұрын
छान
@bharatagrimarathi
@bharatagrimarathi Жыл бұрын
धन्यवाद
@shrirammalunjkar1906
@shrirammalunjkar1906 Жыл бұрын
सर 12×6 वर 5 म्हहीनयचे आंबा लागवड आहे त्या मधे पपई लावता येईल का
@ankushsonawane7390
@ankushsonawane7390 Жыл бұрын
वायरस वर्ती उपाय सांगा
@pradipmukemuke8263
@pradipmukemuke8263 Жыл бұрын
15no ची रोपे मिळतील का
@PunamDhole-t8n
@PunamDhole-t8n Жыл бұрын
किती दिवसात येते
@mukundubhad9064
@mukundubhad9064 6 ай бұрын
Chan
@bharatagrimarathi
@bharatagrimarathi 6 ай бұрын
नमस्कार सर, भारतॲग्री मध्ये आपले स्वागत आहे.आपण दिलेला अभिप्राय आमच्यासाठी खूप महत्वाचा आहे.धन्यवाद सर !
@omkarsathe6885
@omkarsathe6885 Жыл бұрын
Ekri kiti rop lagtat
@hemantfegade575
@hemantfegade575 Жыл бұрын
केळी विषय माहिती व्हिडीओ करा साहेब ❤
@ganeshhasure2769
@ganeshhasure2769 5 ай бұрын
Pandhare mav padle ahe upay sanga
@bharatagrimarathi
@bharatagrimarathi 4 ай бұрын
आपल्या पिकात पांदऱ्या माव्या साठी हमाल 550 - 40 मिली + स्टिकर 2.5 मिली @ 15 लिटर फवारणी करू शकता. धन्यवाद सर !
@gyasuddinshaikh3037
@gyasuddinshaikh3037 10 ай бұрын
@bharatagrimarathi
@bharatagrimarathi 9 ай бұрын
आपण दिलेला अभिप्राय आमच्या साठी खूप महत्वचा आहे , धन्यवाद सर !
@Ganeshtwagh
@Ganeshtwagh Жыл бұрын
सर ,, आम हालांकि बी पाहिजे
@prabhakarwagh317
@prabhakarwagh317 2 ай бұрын
WS papai chi sampurna maritime dya 9:01
@bharatagrimarathi
@bharatagrimarathi 2 ай бұрын
नमस्कार सर, कृपया आपली समस्या विस्तृत स्वरुपात सांगु शकाल का ? म्हणजे आम्हाला आपणास अधिक चांगली सेवा देण्यात मदत होईल .
@prabhakarwagh317
@prabhakarwagh317 2 ай бұрын
@@bharatagrimarathi w s 46 papàichi sampurn maritime dya .
@narayaningolenicesongs7110
@narayaningolenicesongs7110 5 ай бұрын
मिलिबग साठी व्हिडिओ बनवा सर
@bharatagrimarathi
@bharatagrimarathi 5 ай бұрын
नक्कीच सर मिलीबग वरती व्हिडिओ बनवला जाईल. धन्यवाद सर !
@SHUBHAM-FOUJI-27Maharashtra
@SHUBHAM-FOUJI-27Maharashtra 7 ай бұрын
Sir mi krushi diploma kla ahe
@bharatagrimarathi
@bharatagrimarathi 7 ай бұрын
नमस्कार सर, भारतॲग्रीमध्ये आपले स्वागत आहे कृपया नोकरीसंबंधी आपला रिज्युम (बायोडाटा) carrers@bharatagri.com या Gmail वरती पाठवावा, धन्यवाद.
@SantoshJadhav-kb3du
@SantoshJadhav-kb3du Ай бұрын
मी पपईचे बी टाकून त्या बी उगवलेले आहेत त्या मी मागील चार महिन्यापूर्वी टाकलेल्या होत्या आत्ता पपईची झाडं कमीत कमी 4फुट झाल्या आहेत त्या एका ठिकाणी चार चार झाडं आलेली आहेत ती उपटली तर चालेल का त्या सगळ्या पपईला पपई येऊ शकतील का साधारणपणे 50झाडे आहे त
@bharatagrimarathi
@bharatagrimarathi Ай бұрын
सर खूप उशीर झाला आहे पण त्या झाडासोबत आपण खलील माती येत असेल मुळा जवळील तर करा दुसऱ्या ठिकाणी लागवड नाहीतर असुद्या.
@SantoshJadhav-kb3du
@SantoshJadhav-kb3du Ай бұрын
@@bharatagrimarathi okay 👍
@madhukarkhot
@madhukarkhot Жыл бұрын
सर वायरस रोगावर औषध काय
@bharatagrimarathi
@bharatagrimarathi Жыл бұрын
वायरस बद्दल सविस्तर माहिती जाणून घेण्यासाठी आमच्या BharatAgri App ला भेट द्या - bit.ly/2ZyV2yl
@Vijaypatil44227
@Vijaypatil44227 Жыл бұрын
Go virous anticicode immunity booster
@ramkisanshinde605
@ramkisanshinde605 Жыл бұрын
🎉
@bharatagrimarathi
@bharatagrimarathi Жыл бұрын
धन्यवाद
@संतकृपादेवदर्शन
@संतकृपादेवदर्शन Жыл бұрын
वायरस साठी काय करावे
@bharatagrimarathi
@bharatagrimarathi Жыл бұрын
वायरस बद्दल सविस्तर माहिती जाणून घेण्यासाठी आमच्या BharatAgri App ला भेट द्या
@Vijaypatil44227
@Vijaypatil44227 Жыл бұрын
Go virous anticicode immunity booster
@hiralalpardeshi3287
@hiralalpardeshi3287 6 ай бұрын
पपई लागवड मला आता करायची आहे . कोणती जात लागवड करावी माहिती द्या
@bharatagrimarathi
@bharatagrimarathi 6 ай бұрын
आपण 15 नंबर पपई लागवड करू शकता.
@shirishkumarchavan4523
@shirishkumarchavan4523 Жыл бұрын
Thrips & mandhri mashi virus
@PradipHonrao
@PradipHonrao Жыл бұрын
शंखी गोगलगाय चा उपाय
@bharatagrimarathi
@bharatagrimarathi Жыл бұрын
ओके. लवकरच बनयू
@pappupatil3165
@pappupatil3165 10 ай бұрын
तन नाशक जमीन किंवा नाही झाड वायरस फ्री राहो असा उपाय सांगा
@bharatagrimarathi
@bharatagrimarathi 9 ай бұрын
नमस्कार सर, भारत ऍग्री मध्ये आपले स्वागत आहे. कृपया Bharat Agri एपद्वारे आमच्याशी चॅट करु शकता , तसेच कृषी दुकानात औषध पाहू शकता, व्हिडिओ कॉल करू शकता, चॅट करण्यासाठी किंवा एप्लिकेशन डाउनलोड करण्यासाठी खालील लिंकवर क्लिक करा - app.bharatagri.co/chat
@AdityaKhomane-sy2ek
@AdityaKhomane-sy2ek 2 ай бұрын
पपई फळ फुगवून साठी काय वापरवे
@bharatagrimarathi
@bharatagrimarathi 2 ай бұрын
आपण 00:48:47 - 5 किलो/ प्रति एकर सोडू शकता
@pikeltevikelagricalcharproduct
@pikeltevikelagricalcharproduct 9 ай бұрын
आम्ही मिरची लावली आहे अंतर्पिक म्हणून
@bharatagrimarathi
@bharatagrimarathi 9 ай бұрын
आपण दिलेला अभिप्राय आमच्या साठी खूप महत्वचा आहे , धन्यवाद सर !
@personaluse1895
@personaluse1895 Жыл бұрын
पपई पिकावरती डिटेलमध्ये व्हिडिओ बनवा.
@bharatagrimarathi
@bharatagrimarathi Жыл бұрын
नक्की प्रयत्न करू. कमेन्ट बद्दल धन्यवाद
@atulshinde9663
@atulshinde9663 Жыл бұрын
Sir पपई ला मुई सळ खूप होत आहे
@आमचीमातीअनंआमचीमाणसं
@आमचीमातीअनंआमचीमाणसं Жыл бұрын
कोणती veriety योग्य आहे
@bharatagrimarathi
@bharatagrimarathi Жыл бұрын
रेड लेडी 786
@KhanderaoHakke-zu4ne
@KhanderaoHakke-zu4ne 3 ай бұрын
Papai +Kanda
@bharatagrimarathi
@bharatagrimarathi 3 ай бұрын
नमस्कार सर, कृपया समजू शकेल का आपणास कोणती माहिती आवश्यक आहे ?
I thought one thing and the truth is something else 😂
00:34
عائلة ابو رعد Abo Raad family
Рет қаралды 17 МЛН
Don't underestimate anyone
00:47
奇軒Tricking
Рет қаралды 29 МЛН