Рет қаралды 365,333
#BolBhidu #BabanGitteParaliFiring #BapuAndhaleParali
१८ ऑगस्ट २०२३ राष्ट्रवादी काँग्रेसमध्ये फूट पडल्यानंतर शरद पवारांनी बीड जिल्ह्यात सभा घेतली. या सभेवेळी परळीतल्या एका नेत्यानं सगळ्यांचं लक्ष वेधून घेतलं. तब्बल ७०० गाड्यांच्या ताफ्यासह या नेत्यानं शरद पवार गटात प्रवेश केला. त्यानंतर काहीच दिवसांत शरद पवार गटाच्या प्रदेश उपाध्यक्षपदी निवड करत पवारांनी त्या नेत्याला बळ दिलं. त्या नेत्याचं नाव बबन गिते. याच बबन गितेंवर आता परळीत एका सरपंचाची गोळ्या झाडून हत्या केल्याप्रकरणी गुन्हा दाखल करण्यात आला आहे. २९ जूनच्या रात्री परळीतल्या बँक कॉलनीत मरळवाडी गावचे सरपंच बापूराव आंधळे यांच्यावर बबन गिते यांनी गोळ्या झाडल्याचे आरोप होत आहेत.
या गोळीबारात बापूराव आंधळे यांचा जागीच मृत्यू झाला आणि परळीसह संपूर्ण बीड जिल्हा हादरला. पैशांच्या वादातून ही हत्या झाल्याची प्राथमिक माहिती पोलिसांकडून देण्यात आली आहे. पण ज्यांच्यावर गोळ्या झाडण्यात आल्या ते बापूराव आंधळे हे धनंजय मुंडे समर्थक असल्यामुळं या हत्येमागं राजकीय वॉर असल्याचे आरोप होत आहेत. नक्की हे प्रकरण आहे काय, बबन गिते यांचा आजवरचा इतिहास काय? या घटनेनंतर काय आरोप होत आहेत ? हेच या व्हिडिओमधून जाणून घेऊया
चॅनेलला सबस्क्राईब करायला विसरू नका. नोटिफिकेशन चालू ठेवा म्हणजे लेटेस्ट व्हिडीओचे नोटिफिकेशन तुम्हाला मिळत राहतील.
bit.ly/Subscrib...
✒️ आपणही आपले लेख, विषय व इतर माहिती आम्हाला bolbhidu1@gmail.com या मेल आयडीवर पाठवू शकता.
Connect With Us On🔎
➡️ Facebook : / bolbhiducom
➡️ Twitter : / bolbhidu
➡️ Instagram : / bolbhidu.com
➡️Website: bolbhidu.com/