पस्तीस लोकांचे जेवण - चिकन सुक्का 😍 | गटाच्या जेवणाचा बेत - Ambavali, Mandangad (Konkan)

  Рет қаралды 301,949

S FOR SATISH

S FOR SATISH

Күн бұрын

पस्तीस लोकांचे जेवण - चिकन सुक्का 😍 | गटाच्या जेवणाचा बेत - Ambavali, Mandangad (Konkan) पावसात दरवर्षी शेतीची कामे झाल्यावर गटाचे जेवण असते. बचत गटातील महिला आणि त्यांच्या घरातील सर्व माणसे एकत्र येऊन जेवण तयार करतात. आज पस्तीस लोकांसाठी आम्ही जेवण तयार केले आहे. चिकन सुक्का आणि चिकन रस्सा सोबत कोंबडी वडे आणि भात असणार आहे. पंगतीने असे चुलीवर जेवण तयार करण्याची मजा वेगळीच असते. चुलीवर चिकन सुक्का कसा घालतात ते बघायला मिळणार आहे. गावाकडे चुलीवर चिकन सुक्का गोडा मसाला घालून तयार करतात. गोडा मसाला बनवायला कांदा खोबरा भाजून घेतात. कोंबडी वडे तयार करायला खास वड्यांचे पीठ आंबत ठेवतात. सर्व महिला एकत्र जमून हे जेवण तयार करतात. प्रत्येक महिलांना कामे वाटलेली असतात. कोणी वडे तयार करतो तर कोणी भात बनवतं तर कोणी चिकन शिजवतात. आम्ही सकाळी चिकन बारीक करून घेतले. चिकन बऱ्यापैकी बारीक करून घेऊन ते स्वच्छ धुवुन घेतले. कांदा खोबऱ्याचे वाटण घालून चिकन सुक्का बनवला. गावरान पद्धतीने चुलीवर चिकन सुक्का तयार केला. कोंबडी वडे बनवायला आई बसली होती. प्रांजू आजीसोबत खास जेवण बघायला आली होती. पाऊस बाहेर पडत होता. सर्व जेवण तयार झाल्यावर आम्ही सगळे पंगतीने जेवायला बसलो. चिकन सुक्का एकदम भारी झाला होता. चिकन रस्सा तर आणखीन जबरदस्त झाला होता. आम्ही सर्वजण पोटभर जेवलो. महिलांनी बचत गटाची गाणी म्हटली. वर्षा आणि प्रदनु सुद्धा जेवायला आले होते. जेवण झाल्यावर सर्वांनी बसून गप्पा केल्या. एकदंत दिवस एकदम मजेत गेला. तुम्हाला या व्हिडिओमध्ये गटाचे जेवण चिकन सुक्का दाखवले आहे. चुलीवर गावरान पद्धतीने चिकन सुक्का कसे बनवतात ते दाखवले आहे. हा व्हिडीओ आवडल्यास लाईक, शेअर आणि कमेंट करायला विसरू नका. #ChickenSukka #GatacheJevanChickenSukka #ChickenSukkaRecipe #sforsatish
मला संपर्क करण्यासाठी फेसबुक आणि इन्स्टाग्रामवर फॉलो करा.
/ koknatlamumbaikar
/ koknatlamumbaikar

Пікірлер: 345
大家都拉出了什么#小丑 #shorts
00:35
好人小丑
Рет қаралды 81 МЛН
هذه الحلوى قد تقتلني 😱🍬
00:22
Cool Tool SHORTS Arabic
Рет қаралды 95 МЛН