Рет қаралды 8,285
#PurandarFort #ShivajiMaharaj #SambhajiMaharaj
चला जाणून घेऊयात 'दुर्ग पुरंदर'वर घडलेल्या परिचित अपरिचित घटना अगदी थोडक्यात. पुरंदर किल्ला प्रसिद्ध आहे तो संभाजी महाराजांचे जन्मस्थान म्हणून. मुरारबाजी देशपांडेंच्या लढ्याचा साक्षीदार म्हणून. सवाई माधवरावांचे जन्मस्थळ म्हणून. यासोबतच किल्ल्यावर अनेक महत्त्वाच्या घटना घडल्या ज्या जास्त प्रसिद्ध नाहीत. अगदी इंग्रजांनीही दुसऱ्या महायुध्दात या किल्ल्याचा वापर करून घेतला. अश्या प्रसंगांबद्दल जाणून घेऊयात दुर्गअभ्यासक श्री. प्र. के. घाणेकर सर यांच्या सहसंदर्भ भाषणातून...
श्री. सतीशराव शिंदे(सह्याद्रीवेडा) यांनी 'दुर्गभ्रमणगाथा' समूहातर्फे आयोजित केलेल्या 'पुरंदर अभ्यास मोहिमे'मुळे ही अमूल्य माहिती आपणास उपलब्ध झाली. त्यांचे मनःपूर्वक आभार.
माहिती आवडल्यास शेयर करायला विसरू नका तसेच आपले 'दख्खन देश dakhkhan desh' यु tube चॅनेल नक्की subscribe करा.