Рет қаралды 17,100
'स्वराज्याचे तोरण' तोरणागड कुणी जिंकला? 'पहिली राजधानी' राजगड कुणी बांधला?:पहा कोण आहेत हे वीर
शिवरायांच्या स्वराज्याच्या ऐन गाभ्यातील दोन महत्त्वाचे गड म्हणजे राजगड आणि तोरणा! एक स्वराज्याचे तोरण तर दुसरा २४ वर्षे स्वराज्याची राजधानी! प्रत्येकी ७-८ किलोमीटर घेराचे आणि ९०-१०० एकराचे हे प्रचंड आणि तितकेच दुर्गम गड! दुर्गभक्तांचे अत्यंत आवडती अशी ही दुर्गजोडी! या गडांचा इतिहास सर्वांनाच हवा असतो. त्यात तो नवीन आणि महत्वाचा असेल तर मग सोन्याची झळाळीसुध्दा यापुढे फिकी पडते.
तोरणा सर्वप्रथम स्वराज्यात दाखल करणारे आणि पाठोपाठ राजगड बांधणारे एक जिगरबाज पण अपरिचित वीर इतिहासाच्या पानांत दडलेले होते. या वीराची अज्ञात राहिलेली शौर्यगाथा नावागावासह आणि मौल्यवान स्वराज्यकार्यासह प्रथमच तुमच्यासमोर येत आहे.
कुणामुळे हे वीर शिवरायांना सामील झाले? यांना कोणते वतन होते? या वीराने केव्हा आणि कसा जिंकला तोरणा? राजगडाच्या बांधकामाला पैसा कुठून आला? पुढे स्वराज्याचे पेशवे झालेले कोणते वीर यावेळी राजगडावर टिपणीस होते? जरूर पहा आणि शेअरही करा.
आधी तोरणा जिंकला! लगेच राजधानी राजगड बांधला! कोण हा शिवरायांचा इंजिनीयर योध्दा?
इतिहासाच्या पानात दडलेला अपरिचित स्वराज्यवीर!
शिवरायांचे तब्बल २४ वर्षे वास्तव्य असलेला गड 'राजगड'! स्वराज्याची पहिली राजधानी 'राजगड'! स्वराज्याचे तोरण 'तोरणा गड'!
हा तोरणा पहिल्यांदा स्वराज्यात घेणारा हा वीर! राजगडाची आखणी करून शिवरायांच्या कल्पनेतील अभेद्य राजधानी प्रत्यक्षात बांधणारा हा इंजिनीयर! तोरण्याचा पहिला किल्लेदार हाच लढवय्या वीर!
तोरणा गड कुणी, केव्हा, कसा घेतला? अफाट विस्ताराचा, उत्तुंग, दुर्गम असा राजधानी राजगड कुणी, केव्हा बांधला?
सादर आहे आजवर दुर्लक्षितच राहिलेल्या एका जबरदस्त कर्तबगार 'इंजिनीयर' वीराचा अपरिचित इतिहास! अर्थात नेहमीप्रमाणेच पुराव्यानिशी!