Рет қаралды 582
श्री क्षेत्र अक्कलकोट
येथील महत्त्वाचे दर्शन स्थळे
श्री वटवृक्ष मंदिर
श्री गुरूमंदिर /बाळाप्पा महाराज मठ
श्री चोळप्पा महाराज वाडा आणि स्वामी समाधी स्थान
हाक्याचा मारुती मंदिर
श्री खंडोबा मंदिर
अक्कलकोट (सोलापूर, महाराष्ट्र)-
अक्कलकोटचे वटवृक्ष श्री स्वामी समर्थ महाराज हे दत्तावतारी सिध्दपुरुष होते. पंजाब राज्यात पानिपत जवळ छेलीया खेडेगावी गणेश मंदिराजवळ जमीन दुभंगून अष्ट वर्षाची मूर्ती प्रकट झाली. त्या मूर्तीने लगेच स्वामी समर्थ हा मनुष्यरूपी देह धारण केला. त्यानंतर त्यांनी कर्दळीवनात जाऊन ३०० वर्षे तपश्चर्या केली. ३००वर्षे तप करतांना त्यांच्या अंगावर वारुळ निर्माण झाले. एका लाकूड तोड्याने झाडतोडतांना त्याच्या कुरहाडीचा घाव स्वामींच्या मांडीला लागला. त्यामूळे त्यांची तपश्चर्या भंग होऊन स्वामी लोक कल्याणासाठी कर्दळीवनातून बाहेर पडले. फिरत फिरत स्वामी १८४४ साली मंगळ्वेढ्यास आले. तेथे बारा वर्षे राहून चैत्र शुध्द द्वितीया १८५६ साली अक्कलकोटला आले. अक्कलकोटला त्यांचे वास्तव्य २२ वर्षे म्हणजे त्यांचे समाधी काळपर्यंत होते. त्यांचे चरित्र चमत्काराच्या कृतीने भरलेले आहे. त्यांचे वास्तव्य नेहमी वटवृक्षाच्या खालीच असे.
स्वामींनी चैत्र शुध्द त्रयोदशी सन १८७८ मध्ये अक्कलकोट इथे दुपारी १२ वाजता समाधी घेतली.
श्री चोळाप्पा महाराज मठ
पूर्व जन्मसुकृतामुळे श्रींनी ज्याच्या घरी बरीच वर्षे वास्तव्य केले त्या भक्त चोळप्पाच्या इच्छेप्रमाणे श्रीची समाधी या मठात आहे. चोळप्पाच्या घराजवळ समाधी मंदिर असून, त्यात श्रींनी दिलेल्या पादुका आहेत.
चोळप्पाचे निवासस्थान व नंतरचे समाधी स्थान हे बुधवार पेठेत आहे हा जुने खानी वाडा सध्या नूतनीकरण चालू आहे. जवळच स्वामींनी पुनर्जीवित केलेली विहीर, स्वयंभू गणपती, स्वामींचा दंड, पादुका या प्रासादिक वस्तू येथे दर्शनास उपलब्ध आहेत
महाराजांच्या चर्मपादुका
समाधी मठच्या शेजारीच शिष्य चोळप्पा यांच्या घरात आजही महाराजांच्या चर्मपादुका आहेत.
श्री गुरूमंदिर /बाळाप्पा महाराज मठ अक्कलकोट, ता. अक्कलकोट, जि. सोलापूर
स्वामींच्याच काळात स्वामींनी माळ चरण पादुका व दंड देऊन त्यास स्वतंत्र मठ काढण्यास सांगितले. तोच बाळप्पा मठ किंवा गुरूमंदिर होय.
येथेही मोफत भोजन प्रसादाची व्यवस्था आहे.
हाक्याचा मारुती
स्वामींनी सत् शिष्य बाळाप्पा यांना नामजप करण्यास सांगितले ते हे मंदिर. तळघरत आजही जाता येते.
श्री खंडोबा मंदिर
श्री स्वामी समर्थ महाराज यांचे आगमन स्थान म्हणून ओळखले जाते. एसटी स्टँड च्या समोरील बाजूस हे आहे.
या क्षेत्री असे जावे
अक्कलकोट हे सोलापूर पासून ४० कि. मी. अंतरावर आहे. सोलापूरहून अक्कलकोट साठी नियमीत बससेवा आहे. इथे राहण्यासाठी भक्त-निवास आहे व अन्नछत्र मंडळातर्फे दुपारी १२ व रात्री ८ वाजता महाप्रसादाची सोय आहे.
जवळील रेल्वे स्टेशन - सोलापूर जंक्शन
वटवृक्षस्वामी महाराज ट्रस्ट,
अक्कलकोट, जि. सोलापूर
फोन- (०२१८१) २२०३२१, भक्त निवास-२२१९०९.
पुणे ते अक्कलकोट अंतर 292 km
पुणे ते तुळजापूर 294 km
तुळजापूर ते अक्कलकोट 81 km
तुळजापूर ते सोलापूर 46 km
सोलापूर ते अक्कलकोट 40 km
अक्कलकोट ते गाणगापूर 70 km
________________________________
श्री क्षेत्र तुळजापूर व्हिडिओ लिंक:
• ३ दिवसात श्री क्षेत्र ...
@KhauPiyuvlog
_____________________________________
Music used:
Audio File URL:
pixabay.com/mu...