हे महालक्ष्मीचे स्तवन नसून सूर्यदेवतेला उद्देशून आहे. केवळ "चपळ चरण" सोडले तर अन्य कुठलेही वर्णन लक्ष्मीला लागू होत नाही. आणि सर्वात महत्त्वाचे म्हणजे बोरकरांच्या ह्या कवितेचे शीर्षक "तेजोदेवतेस" असे आहे, त्यामुळे ही कविता कोणाला उद्देशून आहे हे अगदी स्पष्ट होते.