रंगपंढरी Face-to-Face: Kumar Sohoni - Part 3

  Рет қаралды 2,427

रंगपंढरी / Rang Pandhari

रंगपंढरी / Rang Pandhari

Күн бұрын

"मी 'ट्रायल आणि एरर' पद्धतीने नाटक बसवत नाही. कारण संहिता संस्करण, नेपथ्य, नटांच्या हालचाली, संगीत, प्रकाशयोजना, वेशभूषा ह्यांतील प्रत्येक अंगाबद्दल दिग्दर्शक जोवर सांगोपांग विचार, तयारी आणि १००% नियोजन करत नाही तोवर नाटक बसवण्याच्या प्रक्रियेत स्पष्टता, गती, आणि दर्जा येऊ शकत नाही असं मला वाटतं."
- कुमार सोहोनी
नॅशनल स्कूल ऑफ ड्रामा (NSD) सारख्या नामांकित संस्थेत नाटकाचं शास्त्रशुद्ध शिक्षण घेतलेला, ४५ वर्षाहून अधिक काळ चित्रपट, मालिका आणि नाटकं अशा १०० हून अधिक कलाकृती हाताळलेला, निरनिराळे प्रतिष्ठित पुरस्कार लाभलेला, अनेक नवे कलाकार घडवलेला आणि कलाक्षेत्रातील अनुभवांवर आधारित दोन अभ्यासपूर्ण पुस्तकं लिहिलेला कुमार सोहोनींसारखा ज्येष्ठ आणि श्रेष्ठ दिग्दर्शक विरळाच.
कुमार सरांनी दिग्दर्शित केलेल्या ७० हून अधिक नाटकांपैकी 'अथं मनुस जगन हं', 'रातराणी', 'वासूची सासू', 'अग्निपंख', 'सुखांशी भांडतो आम्ही', 'देहभान', 'कुणीतरी आहे तिथे', 'मी रेवती देशपांडे', 'अर्धसत्य', 'उलट सुलट', 'जन्मरहस्य', 'याच दिवशी याच वेळी' ह्या काही विशेष कलाकृती.
नाटकांची संहिता स्वतःच्या हाताने का लिहून काढावी, नेपथ्य आणि हालचालींचे चित्रमय आराखडे बनवण्याचे फायदे काय असतात, मालिकांमध्ये व्यस्त असलेल्या नटांना घेऊन तालमींचं काटेकोर नियोजन कसं करावं, स्वगतं सादर करण्यातील नव्या शक्यता काय आहेत, अशा अनेक रोचक विषयांवर आज कुमार सरांकडून ऐकायला मिळणार आहे. नाटकाच्या विविध अंगाबद्दलच्या शास्त्रीय ज्ञानाचा वापर करत असतानाच ह्या चौकटीबाहेर जाऊन सादरीकरणात नावीन्यपूर्ण प्रयोग कसे करावेत हे सुद्धा कुमार सर सांगताहेत रंगपंढरीच्या ह्या भागात.

Пікірлер: 21
@milindpatwardhan4733
@milindpatwardhan4733 2 жыл бұрын
खूपच उपयोगी
@umeshsidhaye1396
@umeshsidhaye1396 2 жыл бұрын
अप्रतिम मुलाखत 👌👌
@alpanaabhyankar8652
@alpanaabhyankar8652 2 жыл бұрын
अतिशय अभ्यासू,चिकित्सक,आणि तांत्रिक दृष्ट्या परिपूर्ण दिग्दर्शक
@satyamedhnandedkar9617
@satyamedhnandedkar9617 2 жыл бұрын
Superb in-depth analysis!! So rare
@deepagosavi8183
@deepagosavi8183 Жыл бұрын
रंगपढरी मुळे अशा ग्रेट लोकांचे अनुभव ऐकायला खरंच खुप छान वाटते! मधुराणी तुम्ही खुपच छान संवाद साधता.
@anaghavahalkar5379
@anaghavahalkar5379 2 жыл бұрын
Superb Interview
@vinitamarathe5317
@vinitamarathe5317 2 жыл бұрын
कुमार सोहनी हे विद्यापीठ आहे. नवीन येणाऱ्या दिग्दर्शकानं परत परत ऐकायला पाहिजे ही मुलाखत. खूप काही शिकायला मिळेल .
@kalakarrao
@kalakarrao 2 жыл бұрын
Great interview 😍😍🙌
@mrunalpitkar4722
@mrunalpitkar4722 2 жыл бұрын
Salute to Madhurani for the in-depth study required to interview these dignitaries. It's not easy, considering the time constraints 👌👌👌👌
@snehaketkar8571
@snehaketkar8571 2 жыл бұрын
फारच चांगली, अभ्यासपूर्ण मुलाखत
@rangler68
@rangler68 2 жыл бұрын
मराठी रंभूमीवरील सध्याच्या शीर्षस्थ नाट्यदिग्दर्शकांमध्ये सोहोनींची गणना का होते हे या मुलाखतीतून कळले. अगदी नवे नाटक लिहिणाऱ्यासाठी सुध्दा ही मुलाखत फार महत्त्वाची आहे असे वाटते. आधीच्या भागात दाखवलेली संहितांची हस्तलिखिते आणि आकृतीबंध ही अभिनव पद्धति आहे.... ..... हस्ताक्षर (ते श्री.सोहोनींचे असावे असे मी गृहित धरतोय) तर नितांत सुंदर आहे....!! एकूण छान अनुभव !!
@RangPandhari
@RangPandhari 2 жыл бұрын
हो, ते अक्षर कुमार सरांचंच. तुमच्या प्रतिक्रियेबद्दल खूप आभार.
@sandhyakapadi4112
@sandhyakapadi4112 2 жыл бұрын
विजय केंकरेंच्या मुलाखतीप्रमाणेच परत परत ऐकण्यासारखी मुलाखत!! धन्यवाद कुमारजी आणि रंगपंढरी
@shriharikilledar3548
@shriharikilledar3548 2 жыл бұрын
please bring Makarand Anaspure and nana Patekar on this "UPKRAM"
@amitap2945
@amitap2945 2 жыл бұрын
मधुराणी आणि पूर्ण तुमच्या रंग पंढरीच्या संचा ला खूप शुभेच्छा आणि आभार मधुराणी विशेष कौतुक तुमच्या मुलाखत घेण्याच्या कौशल्या साठी आपल्याकडेही management degree घेतात company manage करण्या साठी मला वाटले सोहोनी यांची ही मुलाखत म्हणजे नाटकाच्या बाबतीत असलेली विषेश management degree आहे त्यांनी श्रीराम लागू सोबत सांगितलेला अनुभव ऐकून खरच धन्य वाटले आणि त्यांना लागू बाबत किती gratitude आहे हे अगदी स्पष्ट जाणवले अतिशय अभ्यासपूर्ण मुलाखत नक्कीच आधी कोणी लिहिले आहे तसे पुन्हा पून्हा ऐकावी अशी मुलखात खुप आभार या मुलाखती ने श्रीमंत केल्या बाबत
@anaghamarathe3405
@anaghamarathe3405 2 жыл бұрын
खूपच छान मुलाखत दिली कुमार सोहोनी यांनी
@aparnasarang2412
@aparnasarang2412 2 жыл бұрын
Great personality
@priyankssawant9576
@priyankssawant9576 2 жыл бұрын
THE ONE AND ONLY !🙏🙏
@sameerpatankar
@sameerpatankar 2 жыл бұрын
संदीप पाठक यांची मुलाखत पहायला आवडेल, धन्यवाद!
@RangPandhari
@RangPandhari 2 жыл бұрын
Thanks for your suggestion
@kavitadjoshi
@kavitadjoshi 2 жыл бұрын
अत्यंत सखोल, अभ्यासपूर्ण विवेचन. नाटकाच्या क्षेत्रातही बुद्धिमत्ता, कष्ट घेऊन काम कसे करावे याचा आदर्श घ्यावा अशी ही मुलाखत. मधुराणी , आपले प्रश्न उत्तम! शिवाय वक्त्याला बोलके करण्याचे कौशल्य कौतुकास्पद आहे.
रंगपंढरी Face-to-Face: Kumar Sohoni - Part 1
41:48
रंगपंढरी / Rang Pandhari
Рет қаралды 6 М.
रंगपंढरी Face-to-Face: Pratima Kulkarni - Part 1
49:01
रंगपंढरी / Rang Pandhari
Рет қаралды 16 М.
Minecraft Creeper Family is back! #minecraft #funny #memes
00:26
Фейковый воришка 😂
00:51
КАРЕНА МАКАРЕНА
Рет қаралды 7 МЛН
Пришёл к другу на ночёвку 😂
01:00
Cadrol&Fatich
Рет қаралды 9 МЛН
रंगपंढरी Face-to-Face: Pradeep Vaiddya - Part 2
43:33
रंगपंढरी / Rang Pandhari
Рет қаралды 2,5 М.
रंगपंढरी Face-to-Face: Vijay Kenkre - Part 1
54:16
रंगपंढरी / Rang Pandhari
Рет қаралды 15 М.
रंगपंढरी Face-to-Face: Chandrakant Kulkarni - Part 3
46:08
रंगपंढरी / Rang Pandhari
Рет қаралды 11 М.
रंगपंढरी Face-to-Face: Vijay Kenkre - Part 3
47:22
रंगपंढरी / Rang Pandhari
Рет қаралды 6 М.
रंगपंढरी Face-to-Face: Vijay Kenkre - Part 2
58:07
रंगपंढरी / Rang Pandhari
Рет қаралды 10 М.
रंगपंढरी Face-to-Face: Satish Alekar - Part 1
44:17
रंगपंढरी / Rang Pandhari
Рет қаралды 10 М.
रंगपंढरी Face-to-Face: Girish Joshi - Part 2
41:16
रंगपंढरी / Rang Pandhari
Рет қаралды 6 М.
रंगपंढरी Face-to-Face: Chandrakant Kulkarni - Part 2
49:55
रंगपंढरी / Rang Pandhari
Рет қаралды 12 М.
रंगपंढरी Face-to-Face: Satish Alekar - Part 2
50:27
रंगपंढरी / Rang Pandhari
Рет қаралды 5 М.
Minecraft Creeper Family is back! #minecraft #funny #memes
00:26