रंगपंढरी Face-to-Face: Sanjay Mone - Part 1

  Рет қаралды 47,708

रंगपंढरी / Rang Pandhari

रंगपंढरी / Rang Pandhari

Күн бұрын

"आपल्या बहुतांश संहितांमधले संघर्ष थिटे असतात. मोठे संघर्ष असलेल्या संहिता लिहिल्या जात नाहीत म्हणून मोठे नट निर्माण होत नाहीत."
संजय मोने
'ऑथेल्लो', 'पूर्णावतार', 'सविता दामोदर परांजपे', 'दीपस्तंभ', 'रमले मी', 'श्रीमंत', 'लग्नाची बेडी', 'आम्ही जगतो बेफाम', 'कुसुम मनोहर लेले', 'शेवग्याच्या शेंगा', 'तो मी नव्हेच', 'डिअर आजो' अशा ५० हून अधिक नाटकांतून प्रेक्षकांचं निखळ मनोरंजन करणारे सुविख्यात नट संजय मोने जगभरातील मराठी रसिकांचे लाडके कलाकार आहेत.
संहिता निवडताना त्यातील संघर्ष आणि नाट्य एका विशिष्ट उंचीचं असावं ह्याचा आग्रह धरणारे संजय सर गेली ३५ वर्षं रंगभूमीवर डोळसपणे कार्यरत आहेत. रोजच्या निरीक्षणातून टिपलेले क्षण, संगती-विसंगती आणि व्यक्तिविशेष मिळालेल्या भूमिकेसाठी वापरून घेण्यात त्यांचा हातखंडा आहे. ह्याचा प्रत्यय त्यांनी बारकाव्याने साकार केलेल्या गंभीर आणि विनोदी दोन्ही प्रकारच्या, विविधतापूर्ण व्यक्तिरेखांतून नेहेमी येत राहतो.
आपल्या अभिनप्रक्रियेबरोबरच मराठी रंगभूमीवरील नाटक निर्मितीच्या, लिखाणाच्या, आणि बसवण्याच्या कार्यपद्धतीबद्दल संजय सरांना कळकळ आहे. आणि म्हणूनच रंगभूमीशी निगडित काही ढिसाळ आणि बेजबाबदार प्रवृत्तींबद्दल ते सडेतोडपणे बोलतात. आजच्या भागात ऐकूया संजय सरांचे ह्या सगळ्याबद्दलचे मनोगत.

Пікірлер: 78
@nandinidhopatkar2401
@nandinidhopatkar2401 3 жыл бұрын
एकदम honest person is Shri Sanjay Mone. Best best best👌👌👌👌🙏🙏
@omalane3826
@omalane3826 3 жыл бұрын
मस्त.
@cheetababar4263
@cheetababar4263 Жыл бұрын
रामराम, श्री संजय मोने यांच्यासारख मनमौजी दिलखुलासपणे जगावे चांगले विचार समजता आले त्याबद्दल आभार धन्यवाद
@rrkelkar2556
@rrkelkar2556 4 жыл бұрын
नाटकांशी माझा फारसा संबंध नसतानाही मी रंगपंढरी नियमितपणे बघत असतो. आजची मुलाखत थोडीशी लहान असली तरी छान होती. ती प्रामाणिक तर होतीच, पण शिवाय संजयचा स्पष्टवक्तेपणा विशेष जाणवला. माझं वय ७६ वर्षं आहे, पण मुलाखतीच्या समारोपात मला संजयकडून शिकण्यासारखं असं बरंच काही मिळालं. संजय आणि मधुराणी दोघांनाही धन्यवाद.
@krupakulkarni4908
@krupakulkarni4908 4 жыл бұрын
व्वा! अस्खलित मराठी! उत्कृष्ट उच्चार! भाषेवरील प्रभुत्व........ अजोड! मधुराणी, तुमचा हेवा वाटतो. Unedited version ती ही live पाहायला मिळते. पहिला भाग फारच अप्रतिम जमला आहे, बरं का!
@pankajkotalwar
@pankajkotalwar 4 жыл бұрын
संजय मोने हे माझे आवडते कलाकार, त्यांचा नाट्यसृष्टीतील प्रवास, त्यांचे अंतरंग आम्हाला उलगडून दाखवल्याबद्दल रंगपंढरीचे मनापासुन आभार!...
@bhaktinagwekar7151
@bhaktinagwekar7151 4 жыл бұрын
Khup diwsa pasun vaat baghat hote. My favourite actor. Thanks team
@sujatajoshi4355
@sujatajoshi4355 4 жыл бұрын
Khup chan asatat mulakhati
@VirendraMadhura
@VirendraMadhura 4 жыл бұрын
खूप धन्यवाद रंगपंढरी,खूप दिवस संजय मोनेंची वाट पाहत होतो.👌 एकदा नाना पाटेकर ह्यांनाही बोलवा
@aratiganacharya1695
@aratiganacharya1695 2 жыл бұрын
Best episode of Rang pandhari...
@swaradaranade8713
@swaradaranade8713 4 жыл бұрын
❤❤❤❤❤. Wa wa wa ...me " Sanjay Mone " yanchi me jabardast fan aahe.. Great...👏👏👏👏👏👌👌👌ek " वल्ली , हुशार हरहुन्नरी व्यक्तीमत्व"
@kamaljadhav5612
@kamaljadhav5612 4 жыл бұрын
रंग पंढरी चे बरेच भाग पाहिले. अफलातून अनु भव ऐकायला मिळाले. छान वाटलं. आभारी आहे.
@jayendragr8
@jayendragr8 4 жыл бұрын
संजय, तूझ्या परखड भाष्याचे करावं तेवढं कौतुक थोडंच.....!! छानच बोललायस.
@sandeep90166
@sandeep90166 3 жыл бұрын
हा खरा माणूस आहे. कुठलाही अभिनिवेश नाही
@nileshnimhan2265
@nileshnimhan2265 4 жыл бұрын
मोने साहेबां पुढे तुमचे नेहमीचे प्रश्न चालणारचं नव्हते....वो जानते हैं जन्नत कि हकीगत....
@nileshnimhan2265
@nileshnimhan2265 4 жыл бұрын
एकदम परखड...
@giridharshetty2778
@giridharshetty2778 4 жыл бұрын
Very straightforward. He must have had some bitter experience.
@dhondiramshedge9220
@dhondiramshedge9220 4 жыл бұрын
Very good interview
@neelamlute6040
@neelamlute6040 4 жыл бұрын
finally.... most awaited episode....
@vijayghosalkar316
@vijayghosalkar316 3 жыл бұрын
Sanjay mone sir ,phar sundar ani parkhad mat vyakt kelat, konich khar bolat naahi,tumhi bollat, kahina patel,kahina nahi,pan mala tumchi mulakhat khoop aavadli, Keep it up,,
@sachinpachgade9482
@sachinpachgade9482 3 жыл бұрын
खुप सुंदर आहे, या पार्ट मधे पहिले 7 मिनट्स मोने साहेबांचा आवाज दबालेला येतो, नंतर व्यवस्तित होता.
@dhananjaygangal
@dhananjaygangal 4 жыл бұрын
छान
@swaradaranade8713
@swaradaranade8713 4 жыл бұрын
मुलाखत एकदम भारी झाली .....👏👏👏👏👏👏👏👏👏
@sadanandmarathe4490
@sadanandmarathe4490 Жыл бұрын
पोटतीडकीने बोलणारा एक हुशार नट म्हणजे संजय मोने त्यांना शुभेच्छा
@cadiwan
@cadiwan 4 жыл бұрын
प्रांजळ मुलाखत !
@vrushalic3389
@vrushalic3389 3 жыл бұрын
आजकल चांगले लेखक पण नाही त्यामुळे नाटक चांगली येत नाहीत .तुमची नाटके आवडतात.
@ajinkyagijare
@ajinkyagijare 4 жыл бұрын
..... Sarcastic bhasha kiti sarcastic asu shakate tyachya hi palikade yancha sarcasm ahe ... ya aspect la dharun ekhada natak ala tar maja ch yeil....Great ahe hi vinodbuddhi ani sagala ch...🙏
@RangPandhari
@RangPandhari 4 жыл бұрын
:-) :-)
@rupalikarnik7574
@rupalikarnik7574 4 жыл бұрын
Superb!
@ssm8058
@ssm8058 3 жыл бұрын
So much gap, when will we get to see new episode?
@RangPandhari
@RangPandhari 3 жыл бұрын
आता लवकरच दिग्दर्शन season सुरू होईल! Thanks for waiting.
@ssm8058
@ssm8058 3 жыл бұрын
@@RangPandhari gr8.❤️
@kavitaphadnis9606
@kavitaphadnis9606 4 жыл бұрын
संजय मोने अत्यंत आवडीचे आहेत. त्यांचा विनोदाचा sense आणि timing जबरदस्त आहे पण तरीही त्यांचा as usual तक्रारीचाच सूर आहे. नवे लोक, लेखक, अभिनेते सर्वांवरच नाखुशी... कदाचित काही प्रमाणात खरं आहे की पूर्वी सारखी नाटकं आणि अभिनय आता नाही पण ते प्रत्येकच क्षेत्रातील सत्य आहे. त्यापेक्षा मापदंड म्हणून किंवा तुमच्याकडून पुढच्या कलाकारांनी शिकावं ह्याच हेतूने जर रंगपंढरीची संकल्पना आहे तर हेच कित्ती उत्तम व्यासपीठ आहे तुमची कार्यपद्धती सांगायची. कोणालाच काहीच कशातलच कळतं नाही असा सूर आहे. असो. रंगपंढरीचे सारेच भाग खूप उत्तम आहेत. Objective ia truly great!!
@RangPandhari
@RangPandhari 4 жыл бұрын
Thanks for your honest feedback!
@champof64
@champof64 3 жыл бұрын
What's the meaning of ढोबळ?
@RangPandhari
@RangPandhari 3 жыл бұрын
'Gross' or 'on the whole'.
@jagrutishah6732
@jagrutishah6732 2 жыл бұрын
main points or sort of a rough outline
@sujatajoshi4355
@sujatajoshi4355 4 жыл бұрын
Khoop mast
@nileshnimhan2265
@nileshnimhan2265 4 жыл бұрын
तुमच्या ह्या अाधीच्या सगळ्या मुलाखतींची पुर्ण ....... लावली...रंगभुमीचं भयाण वास्तव समोर अाणल.
@umeshjoshi5838
@umeshjoshi5838 4 жыл бұрын
वा......
@krupakulkarni4908
@krupakulkarni4908 4 жыл бұрын
श्रावण मासी, हर्ष मानसी.......... आम्हाला हर्ष देण्यासाठी - श्रावण भेट म्हणून - कोणाला आणताय? उत्सुकतेने वाट पाहत आहोत.
@RangPandhari
@RangPandhari 4 жыл бұрын
सुनील बर्वे, सुकन्या कुलकर्णी, उमेश कामत!
@krupakulkarni4908
@krupakulkarni4908 4 жыл бұрын
@@RangPandhari अरे व्वा, पर्वणी आहे तर!
@snehaketkar8571
@snehaketkar8571 4 жыл бұрын
चांगले झाले. आता काही दिग्दर्शक येणे गरजेचे आहे.
@RangPandhari
@RangPandhari 4 жыл бұрын
दिग्दर्शक लवकरच!
@anupamanaik3759
@anupamanaik3759 4 жыл бұрын
He is very difficult person he was from my school very abstract person
@swatisane5264
@swatisane5264 3 жыл бұрын
Ok Ok
@oldsongclassic7417
@oldsongclassic7417 4 жыл бұрын
जुने अभिनेता अभिनेत्री यांची सुद्धा मुलाखात घावी हे आवडेल बघायला
@ushadravid1765
@ushadravid1765 4 жыл бұрын
मला एक प्रश्न सर्व हिंदू कलाकारांना, विशेषतः महिलांना, विचारावासा वाटतो. तुम्हा सर्वांना कुंकू लावायची लाज कां वाटते? आपण जास्त आधुनिक दिसतो असे तुम्हा सर्वांना वाटते कां? कुंकू लावल्याने माझ्या मते चेहरा खुलून दिसतो! मी अर्थात ७७ वर्षांची असल्या मुळे माझी मते बुरसटलेली असू शकतील, पण पांढरे फटट कपाळ बघून बरे वाटत नाही. जीन्स किंवा pant घातल्यावर एकवेळ लाऊ नका, पण भारतीय पेहराव कुंकू लावल्याने जास्त छान दिसतो असे माझे मत आहे! एखादा अलिखित नियम असल्याप्रमाणे सर्व महिलांनी कुंकू कां बरे वर्ज्य केले आहे? मला समजून घ्यावेसे वाटते! कदाचित माझ्यावर टीकेची झोड उठेल, पण मी कुणाची टीका करत नाही, माझा हा प्रामाणिक प्रश्न आहे!
@vasuraj
@vasuraj 4 жыл бұрын
एकच 'न आवडल्याची' खूण आहे... त्यांना का आवडलं नाही, हे सांगतील का?
@purushottamapte6768
@purushottamapte6768 4 жыл бұрын
स्पष्टवक्ते
@deepalikadam4912
@deepalikadam4912 4 жыл бұрын
Finalllyyyy
@gayatrijoshi2112
@gayatrijoshi2112 4 жыл бұрын
Hi 👋🏻 It was good
@santoshkelkar2076
@santoshkelkar2076 4 жыл бұрын
Sarcasm at its best.
@RangPandhari
@RangPandhari 4 жыл бұрын
:-)
@satishvhanmane5935
@satishvhanmane5935 4 жыл бұрын
Sukanya mone,savita malpe,Sachin khedekar,faiyyaz...yanna aikayla avdel..
@RangPandhari
@RangPandhari 4 жыл бұрын
Thanks for your suggestions!
@prittamj236
@prittamj236 2 жыл бұрын
Sanjay sir's mic was off. While the host's mic was working. That's unprofessional and sad
@RangPandhari
@RangPandhari 2 жыл бұрын
Thanks for your feedback.
@vrushalic3389
@vrushalic3389 3 жыл бұрын
ते सगळे खरे काय ते सांग तात .ते निगेटीव्ह नाही .आपलयाला त्यामुळे आपलयाला कळते काय चालले आहे .उगीच गोङगोङ बोलायचे मनात एक बाहेर एक असे नाही.
@सुश्राव्य
@सुश्राव्य 4 жыл бұрын
नाना पाटेकर यांचा अनुभव ऐकायला आवडेल
@abhijeetkamble6346
@abhijeetkamble6346 4 жыл бұрын
Attur te ne vaat baghat hoto ...vidoe chi .....hya kalakarana ...javlun pahnyat khoop anand hoto...asech marathi rang mancha varil hey thor kalakaranchi kahani baghnayat khoop anand hoto
@pinakbhende5058
@pinakbhende5058 4 жыл бұрын
Madhurani struggling to get him to speak. Mone doesn't appear to have a process / thinking to begin with. Didn't he know what this programme was about?
@RangPandhari
@RangPandhari 4 жыл бұрын
Thanks for your honest feedback!
@satyajitkotwal1509
@satyajitkotwal1509 4 жыл бұрын
Very true.....she tried her best to get him on valid discussions
@sujatajoshi4355
@sujatajoshi4355 4 жыл бұрын
Usha Nadkarni cha interview avadel
@RangPandhari
@RangPandhari 4 жыл бұрын
Thanks for your suggestion!
@kaustubhk8648
@kaustubhk8648 4 жыл бұрын
Long awaited interview!!!!
@satyajitkotwal1509
@satyajitkotwal1509 4 жыл бұрын
Why is he so negative ? First time amonsgt so many guests.....this gent seems to express only complaints
@sudhirpatil3706
@sudhirpatil3706 4 жыл бұрын
बरोबर निरीक्षण आहे
@RangPandhari
@RangPandhari 4 жыл бұрын
Thanks for your honest feedback!
@satyajitkotwal1509
@satyajitkotwal1509 4 жыл бұрын
@@sudhirpatil3706 thank you Kaka
@praslele
@praslele 3 жыл бұрын
खर बोलले आहेत मोने
@demopresent4739
@demopresent4739 4 жыл бұрын
ज़र योग्य पैसा आणि मान मिळाला तर लोक वेळ देतील ना.... ऑफिसमध्ये नाही देत सलग ८ तास?
@tejabandal3880
@tejabandal3880 4 жыл бұрын
Far far kammal manus
@k_k_347
@k_k_347 4 жыл бұрын
Bakwas,,, don't go down. Waste of time
रंगपंढरी Face-to-Face: Sanjay Mone - Part 2
41:33
रंगपंढरी / Rang Pandhari
Рет қаралды 28 М.
Миллионер | 2 - серия
16:04
Million Show
Рет қаралды 1,4 МЛН
Cool Parenting Gadget Against Mosquitos! 🦟👶
00:21
TheSoul Music Family
Рет қаралды 18 МЛН
How I Turned a Lolipop Into A New One 🤯🍭
00:19
Wian
Рет қаралды 10 МЛН
रंगपंढरी Face-to-Face: Pratima Kulkarni - Part 1
49:01
रंगपंढरी / Rang Pandhari
Рет қаралды 16 М.
रंगपंढरी Face-to-Face: Chandrakant Kulkarni - Part 1
48:46
रंगपंढरी / Rang Pandhari
Рет қаралды 17 М.
रंगपंढरी Face-to-Face: Jyoti Subhash - Part 1
36:13
रंगपंढरी / Rang Pandhari
Рет қаралды 33 М.
Миллионер | 2 - серия
16:04
Million Show
Рет қаралды 1,4 МЛН