Panhala Fort | Ambar khana | Panhala Killa | पन्हाळा किल्ला | कोल्हापूर | Kolhapur | Part 9

  Рет қаралды 3,164

Sahyadri Nature Trails

Sahyadri Nature Trails

Күн бұрын

सह्याद्री नेचर ट्रेल्स च्या ह्या नवीन भागातून आम्ही आमच्या इतिहासप्रेमी रसिकांसाठी घेऊन येत आहोत किल्ले पन्हाळा. हा किल्ला महाराष्ट्राच्या इतिहासातील एक मानाचा मानकरी आहे. छत्रपती शिवाजी महाराजांच्या खास आवडीच्या किल्ल्यांपैकी एक असणाऱ्या ह्या किल्ल्याला प्रचंड इतिहासाची पार्श्वभूमी आहे.
आजच्या नवव्या व अखेरच्या भागात आपण पाहूया पन्हाळा किल्ल्यावरील अपरिचित असे वारे बुरुज , तीन कमानींचा चोर दरवाजा आणि सर्वात सुप्रसिद्ध अश्या गंगा यमुना सरस्वती धान्यकोठ्या,ह्याचंबरोबर पन्हाळ्याच्या दीर्घ इतिहासातील करवीर छत्रपतींच्या राजवटीचा भारत स्वतंत्र होईपर्यंतचा पुराव्यांवर आधारित विलक्षण इतिहास
===========================================================
संदर्भ -
राजा शिवछत्रपती - शिवशाहीर बाबा साहेब पुरंदरे
कोल्हापूर जिल्हा गॅझेट - 1882 ब्रिटिश आवृत्ती
मोगल दरबारची बतमीपत्रे खंड 3
मराठा दफतर
samagrarajwade...
durgwedh.blogs...
www.discovermh...
www.discovermh...
itihaskatta.blo...
=======================
Music Credits -
Song : SOUTH INDIAN LOVE TABLA BELLS - By Flute
/ by-flute
Music Promoted By Music Restored - Music For Content Creators
• ( No Copyright Music) ...
========≠========≠===≠====≠≠=====

Пікірлер: 34
@sunildmello
@sunildmello 11 ай бұрын
पन्हाळा किल्ल्याची मालिका अप्रतिम होती. धन्यवाद
@sahyadrinaturetrails
@sahyadrinaturetrails 11 ай бұрын
आपली प्रतिक्रिया आल्यावर फारच छान वाटते सर !! आपण आवर्जून प्रत्येक व्हिडीओ पहाता व आपली प्रतिक्रिया देत असता. ही आमच्यासारख्या युट्युबर टीम साठी खूपच मोठी व मोलाची गोष्ट आहे
@gabbar_jan_blossom4834
@gabbar_jan_blossom4834 2 ай бұрын
जबरदस्त माहिती आणि इतिहास विवेचन ओ सर... 👍🏽👍🏽👌🏽👌🏽👌🏽
@sahyadrinaturetrails
@sahyadrinaturetrails 2 ай бұрын
आपल्याला आमचा हा प्रयत्न आवडल्यास आपल्या मित्रांना ,परिवाराला हे व्हिडिओ जरूर फॉरवर्ड करा व अधिकाधिक लोकांपर्यँत ही माहिती पोचवण्याचा कामी आमची सहायता करा.
@ProperGAMING234
@ProperGAMING234 8 ай бұрын
Khup chhan mahiti milali Aabhari aahot
@sahyadrinaturetrails
@sahyadrinaturetrails 8 ай бұрын
आमचा व्हिडीओ पाहून आपुलकीने प्रतिक्रिया दिल्याबद्दल आम्ही सर्व टीम आपले आभारी आहोत. पन्हाळा हा विस्ताराने व इतिहासाच्या नोंदीने देखील प्रचंड मोठा किल्ला आहे. त्यामुळे ह्या किल्ल्याचा कालानुक्रमे इतिहास व किल्ल्यावरील 44 हुन अधिक स्थळे 10 भागातून दाखवायचा प्रयत्न आम्ही केला आहे. सर्व भाग आपण नक्की बघा आपल्याला आवडल्यास आपल्या इतिहासप्रेमी मित्रांना नक्की फॉरवर्ड करा ही विनंती.
@ajmoddinsayyad9287
@ajmoddinsayyad9287 Жыл бұрын
9भाग पाहिले खूप छान वाटले.
@sahyadrinaturetrails
@sahyadrinaturetrails 11 ай бұрын
आमचा व्हिडिओ पाहून प्रतिक्रिया व्यक्त केल्याबद्दल आम्ही सर्व टीम आपले आभारी आहोत सर!! महाराष्ट्राच्या इतिहास जाणून घेण्यासाठी आपण आमच्या चॅनेलवर रायगड ,सिंहगड, सिंधुदुर्ग, परांडा असे सुमारे 35 किल्ले त्याचसोबत वेरूळ लेणी पाहू शकता.छत्रपती शिवाजी महाराजांच्या स्वराज्यापासून ते छत्रपती शाहू महाराजांच्या साम्राज्यापर्यंत ह्या भूमीतील सर्व ऐतिहासिक स्थळे दाखवायचा आमचा प्रयत्न राहील. आपण जास्तीतजास्त मित्रपरिवाराला हे व्हिडीओ शेयर करून ही ऐतिहासिक माहिती सर्वत्र पोहोचवायला आम्हाला मदत करा ही विनंती.
@dipakpatel5524
@dipakpatel5524 11 ай бұрын
Very nice video ❤❤❤❤
@sahyadrinaturetrails
@sahyadrinaturetrails 11 ай бұрын
Thank you Sir !!
@sanjeevpatil4346
@sanjeevpatil4346 Жыл бұрын
श्री छत्रपती शिवाजी महाराज यांचा विजय असो। आपण सादर केलेली किल्ले पन्हाळा ऐतिहासिक , पराक्रम, व स्थलदर्शनाचे 1 ते 9 भाग हे अत्यन्त आवडले, एवढे विस्तृत सादरीकरण आजपर्यत दुर्मिळच राहिले होते, आपण व आपल्या टीम ने ही समाजातील कमतरता दूर करून सर्व घरा घरात किल्ले पन्हाळा व त्याचा इतिहास मानाने पोचवला या करिता आवले धन्यवाद व विशेष कौतुक।। एक सुचवावेसे वाटते की, स्थलदर्शन करताना चित्रफीत स्थिर राहील याची काळजी घेऊन चित्रण केले गेल्यास अश्या स्थिर चित्रणाचा आनंद सर्व शिवप्रेमींना घेता येईल, आता उत्कंठा आपल्या पुढील अश्यास समृद्ध इतिहासाच्या हिंदवी साम्राज्याच्या पराक्रमाची।
@sahyadrinaturetrails
@sahyadrinaturetrails 11 ай бұрын
आपल्या ह्या स्फूर्तिदायक अश्या प्रतिक्रियेसाठी आम्ही सर्व टीम आपले मनापासुन आभारी आहोत सर!! पहिल्याप्रथम संपूर्ण चित्रफितीमध्ये चित्रीकरण हलले आहे व बघताना बराच त्रास होतो आहे त्याबद्दल मनापासून माफी मागतो. Camera stabilizer चे नवीन features नीट वापरता न आल्यामुळे थोडा घोळ झाला. पुढील व्हिडीओ मध्ये असे घडणार नाही ह्याची नक्कीच दक्षता घेऊ. आपल्या मातीमधील हर एक किल्ल्यावर अतिशय पराक्रमी इतिहास घडला आहे आपण दुर्दैवाने त्याची माहिती जड जाड ग्रंथात अडकून रहाते. ती माहिती सादर करण्याचा आमचा प्रयत्न असतो त्यामुळेच आम्ही रायगड ,सिंहगड, देवगिरी अश्या दीर्घ इतिहास असणाऱ्या महत्वाच्या किल्ल्यांच्या महितीपटांची मालिका करतो जेणेकरून जास्तीतजास्त स्थलदर्शन व इतिहास मांडता येईल.
@sanjeevpatil4346
@sanjeevpatil4346 11 ай бұрын
@@sahyadrinaturetrails आपण दिलेल्या तत्पर प्रतिक्रियेबद्दल आपले खूप खूप धन्यवाद।। पुढील दुर्ग मालिकेची नम्रतेने प्रतीक्षा।।
@ajmoddinsayyad9287
@ajmoddinsayyad9287 Жыл бұрын
किल्ल्याचा इतिहास खूप मोठा आहे. पण आज पडझड व घान बघून खूप वाईट वाटते.
@sahyadrinaturetrails
@sahyadrinaturetrails 11 ай бұрын
इतका इतिहास प्रसिद्ध किल्ला असून देखील पन्हाळ्याची पडझड झालेली आपल्याला दिसते. बाकी कमी महत्वाच्या छोट्या किल्ल्यांचा तर कोणीही वाली नाही. फारच दुरावस्था झाली आहे.
@ajmoddinsayyad9287
@ajmoddinsayyad9287 Жыл бұрын
तुम्ही खूप चांगली. माहिती सांगीतली आहे. धन्यवाद. छत्रपतींचा इतिहास सर्वापर्यंत असेच पोहचवण्याचा प्रयत्न चालू ठेवा. हीच अपेक्षा आहे. धन्यवाद.,,,🙏🙏
@sahyadrinaturetrails
@sahyadrinaturetrails 11 ай бұрын
आपल्या ह्या मनापासून केलेल्या छानश्या प्रतिक्रियेसाठी आम्ही सर्व टीम आपले आभारी आहोत सर पन्हाळा किल्ल्याची पूर्ण मालिका नक्की बघा, आपल्याला अवडल्यास आपल्या मित्रांना पण फॉरवर्ड करा ही विनंती महाराष्ट्राच्या इतिहास जाणून घेण्यासाठी आपण आमच्या चॅनेलवर रायगड ,सिंहगड, सिंधुदुर्ग, परांडा असे सुमारे 35 किल्ले त्याचसोबत वेरूळ , गोंदेश्वर ,कुकडेश्वर ,नागेश्वर अशी विविध प्राचीन मंदिर लेणी पाहू शकता. आपल्या सारख्या इतिहासप्रेमी रसिक प्रेक्षकांना प्रत्येक किल्ल्याच्या निर्मिती पासून ते 1947 साला पर्यँत सर्व माहिती एकाच ठिकाणी मिळावी ह्याच साठी आधुनिक युगाची डिजिटल किल्ले लायब्ररी बनवण्याचे आमचे उद्दिष्ट आहे छत्रपती शिवाजी महाराजांच्या स्वराज्यापासून ते छत्रपती शाहू महाराजांच्या साम्राज्यापर्यंत ह्या भूमीतील सर्व ऐतिहासिक स्थळे दाखवायचा आमचा प्रयत्न राहील
@gabbar_jan_blossom4834
@gabbar_jan_blossom4834 2 ай бұрын
मी... पन्हाळा 3 वेळा कुटूंबातील लोकांना सोबत पहिला गाईड पण केला होता पण त्याने पैसे घेतले पण तुमी जि माहिती दिली ती ठिकाण नाय दाखवली ओ सर... धन्यवाद ओ सर... 👍🏽👍🏽👌🏽🙏🏽🙏🏽🙏🏽
@sahyadrinaturetrails
@sahyadrinaturetrails 2 ай бұрын
आपल्या प्रत्येक किल्ल्यात खूप मोठा इतिहास आहे केवळ तो जड जाड क्लिष्ट ग्रंथात अडकून पडल्याने सर्वसामान्य लोकांपर्यंत पोहोचत नाही तोच इतिहास सर्वत्र पोचवण्याचा आम्ही लहानसा प्रयत्न करत आहोत. बर्याच वेळा स्थानिक जनता इतिहासाच्या नावाखाली लोककथा, अनैतिहासिक माहिती काय वाट्टेल ते रेटून खोट सांगते. दुर्दैवाने येणारे पर्यटक त्यालाच खरे मानून चालतात. ह्याचसाठी आमच्या चॅनेलवर आम्ही सर्वमान्य विद्वान इतिहाससंशोधकांनी लिहिलेल्या पुस्तकांचा अभ्यास करून किल्याच्या सुरवाती पासून ते भारत स्वतंत्र होईपर्यंत चा इतिहास गोळा करून सादर करण्याचा प्रयत्न करतो जेणेकरून आपल्या सारख्या इतिहास प्रेमी रसिकांना किल्ला पहायला जाताना स्थलदर्शन करता करता हे व्हिडीओ चालवून पूर्ण माहिती समजू शकेल. आपल्याला आमचा हा प्रयत्न आवडल्यास आपल्या मित्रांना ,परिवाराला हे व्हिडिओ जरूर फॉरवर्ड करा व अधिकाधिक लोकांपर्यँत ही माहिती पोचवण्याचा कामी आमची सहायता करा.
@rohitmungse4632
@rohitmungse4632 11 ай бұрын
एकदम माहितीपूर्ण विडिओ.. 9 च्या 9 एपिसोड पाहिले..
@sahyadrinaturetrails
@sahyadrinaturetrails 11 ай бұрын
आमचा व्हिडीओ पाहून मनापासून छानशी प्रतिक्रिया दिल्याबद्दल खूप खूप धन्यवाद सर 😊😊 तुम्ही आमच्या चॅनेलच्या अतिशय जुन्या जाणत्या दर्दी रसिकप्रेक्षकांपैकी आहात आपला पाठिंबा असाच सदैव आमच्या टीम सोबत ठेवा, आपल्याला हा व्हिडीओ आवडला असल्यास आपल्या मित्रांना व परिचिताना नक्की फॉरवर्ड करून ऐतिहासिक माहिती जास्तीतजास्त लोकांपर्यंत पोहचविण्यासाठी आम्हाला मदत करा ही विनंती.
@deepakkamble1817
@deepakkamble1817 11 ай бұрын
Thank you उत्कृष्ट माहिती सांगितली आणि आता जंजिरा किल्ल्याच्या विषयी विडिओ तयार करा ही विनंती 🙏
@sahyadrinaturetrails
@sahyadrinaturetrails 11 ай бұрын
आमचा व्हिडीओ पाहून छानशी प्रतिक्रिया व्यक्त केल्याबद्दल आम्ही सर्व टीम आपले आभारी आहोत सर !! महाराष्ट्रातील एकूण एक किल्ले आमच्या चॅनेलवर दाखवायचा आमचा प्रयत्न आहे. लवकरात लवकर आम्ही जंजिरा किल्ल्यावर व्हिडीओ आणण्याचा प्रयत्न करू
@dastageermulla430
@dastageermulla430 11 ай бұрын
Very good series sir all episodes are very good and informative. your hard work deserve 🫡🫡🫡
@sahyadrinaturetrails
@sahyadrinaturetrails 11 ай бұрын
Thank you for watching our video, please forward this video to all your friends !!
@shitalnathtaskar9559
@shitalnathtaskar9559 9 ай бұрын
दादा तुमचं कौतुक करावं तेवढं कमीच आहे खूप खूप म्हणजे खूपच छान माहिती सांगितली तुमचे खूप खूप आभार आणि येणाऱ्या प्रत्येक स्थळ दर्शना साठी तुम्हाला खुप सार्या शुभेच्छा
@sahyadrinaturetrails
@sahyadrinaturetrails 9 ай бұрын
धन्यवाद सर, आपल्यासारख्या इतिहासप्रेमी प्रेक्षकांसाठी अचूक माहिती गोळा करण्याचा प्रयत्न करत असतो. मराठ्यांच्या घोड्यांच्या टापा जिथपर्यंत पोहोचल्या तेथपर्यंतचे सर्व किल्ले , मंदिरे ,लेणी इतर ऐतिहासिक स्थळे त्यांच्या पुराव्यांवर आधारित संदर्भासहित माहिती सकट दाखवण्याचे ध्येय आम्ही ठेवले आहे. आपल्याला व्हिडीओ आवडला की आमची सेवा छत्रपतींच्या चरणी रुजू होते असे आम्ही मानतो. ही माहिती जास्तीतजास्त लोकांपर्यंत पोहोचविण्यासाठी आपल्या मित्रांना फॉरवर्ड करून आम्हाला मदत करा ही विनंती. छत्रपती शिवाजी महाराजांचा विजय असो 🚩🚩🚩🚩
@ajmoddinsayyad9287
@ajmoddinsayyad9287 Жыл бұрын
खूप ठिकाणी किल्ल्याची तटबंदी पडलेली आहे. लवकरच शासनाने दुरुस्ती करावी लागेल. नाहीतर काही वर्षांनी किल्ल्याचा इतिहास फक्त वाचता येईल. किल्ला पाहता येणार नाही.
@sahyadrinaturetrails
@sahyadrinaturetrails 11 ай бұрын
आपली भीती वास्तवात न उतरो हीच ईश्वरचरणी प्रार्थना खरोखर सरकारने ह्या किल्ल्याच्या खऱ्या विकासासाठी व संवर्धनासाठी पावले उचलली पाहिजेत. व जनतेने देखील केवळ अंधारबाव ,तिनदरवजा, सज्जाकोठी, अंबरखाना इतकेच पाहून निव्वळ मौजमजा करायला न येता किल्ल्यातील शक्य असणाऱ्या सर्व ऐतिहासिक ठिकाणी जावे जेणेकरून छत्रपती शिवाजी महाराजांच्या इतिहासाची आठवण तेथे जाऊन जागृत करता येईल व दर एक ठिकाणाचा विकास करण्याचे दडपण सरकारवर आणता येईल
@shitalnathtaskar9559
@shitalnathtaskar9559 9 ай бұрын
दादा हा किल्ला एका दिवसात बघून पूर्ण होतो का
@sahyadrinaturetrails
@sahyadrinaturetrails 9 ай бұрын
पन्हाळा किल्ल्याचा हा नववा भाग पाहून आपण उत्सुकतेने प्रश्न विचारला त्याबद्दल आम्ही सर्व टीम आपले आभारी आहोत सर !! आम्ही सकाळी 8 ते संध्याकाळी 6/6.30 पर्यँत हा किल्ला पूर्ण पहाण्याचा प्रयत्न केला, मी प्रयत्न ह्या साठी म्हणालो की येथे येण्याआधी किल्ल्यावरील 44 स्थळांची यादी तयार केली होती त्यातही एक स्थळ पहायचे राहून गेले ह्याव्यतिरिक्त देखील नंतर माझ्या वाचनात अजून 3-4 स्थळे आली ती तर राहूनच गेली पर्यटक म्हणून किल्ला पाहायचा असेल तर 3 तासात देखील किल्ला पाहून होतो पण इतिहासप्रेमी म्हणून पाहायचा असेल तर पूर्ण एक दिवस नक्कीच लागतो पन्हाळा किल्लायच्या 9 भागांमधून आम्ही 43 स्थळे दाखवली आहेत ती आपण नक्कीच पाहू शकता पन्हाळ्याचे सर्व 9 भाग पाहून आपली प्रतिक्रिया आम्हाला नक्की कळवा ही नम्र विनंती 🙏🏼🙏🏼
Girl, dig gently, or it will leak out soon.#funny #cute #comedy
00:17
Funny daughter's daily life
Рет қаралды 27 МЛН
Самое неинтересное видео
00:32
Miracle
Рет қаралды 2,6 МЛН
How A Poor Boy Built Oberoi Hotels
17:18
Shivanshu Agrawal
Рет қаралды 1,3 МЛН
घोडा पाय धरून उचलणाऱ्या एका वीराचा दुर्दैवी अंत
18:47
मराठेशाही-प्रवीण भोसले
Рет қаралды 2,5 МЛН
Girl, dig gently, or it will leak out soon.#funny #cute #comedy
00:17
Funny daughter's daily life
Рет қаралды 27 МЛН