Рет қаралды 2,078
SHORT NEWS 20 | मारकडवाडीत टांगा पलटी घोडा फरार..आमदार म्हणाले ईव्हीएम ओके..!
#solapurNews #YesNewsMarathi #SharadPawar #UttamraoJankar
Subscribe Channel :- bit.ly/3mEVBUT
मुन्नी पेक्षा जास्त बदनाम झालेल्या ईव्हीएमला दोष देणारे माळशिरस तालुक्यातील मारकडवाडी हे गाव भारताच्या नकाशावर पोहोचले. मतमोजणी झाल्यानंतर विजयी झालेले शरद पवार गटाचे आमदार उत्तम जानकर यांनीच मारकवाडी मध्ये बॅलेट पेपरवर फेर मतदान करण्याची मागणी केली होती. शिवाय गावकऱ्यांनी मिळून मतदान चाचणी घेण्याची तयारी केली होती मात्र प्रशासनाने इथला डाव उधळून लावला. राजकीय नेत्यांची रीग लागल्यामुळे देशभराचे नेते आणि पत्रकार मारकवाडीकडे लाईव्ह साठी पळत होते. इथे शरद पवार, नाना पटोले, आदींचे दौरे झाले. पराभूत झालेले आमदार राम सातपुते यांनी या निमित्ताने मोहिते पाटलांना ओपन चॅलेंज दिले. आता पाच जानेवारीला उद्धव ठाकरे पिता-पुत्र तर 10 जानेवारीला राहुल गांधी मारकडवाडीत येणार आहेत. हे असं असताना आता माळशिरसचे विद्यमान आमदार ज्यांची तक्रार ईव्हीएम विरोधात होती त्यांनीच ईव्हीएम एकदम ओके आमची तक्रार नाही असं वक्तव्य केलं आहे. प्रत्येक मशीन वरील व्हीव्हीपॅट आमच्या हातांनी पेटीत टाकता आलं पाहिजे एवढीच आमची मागणी आहे असं मत येस न्यूज मराठी कडे व्यक्त केलं. त्यामुळे मारकडवाडीत राजकीय पर्यटन करून प्रसिद्धी मिळवणाऱ्या नेत्यांना आता टांगा पलटी घोडा फरार अशी अवस्था होणार आहे.
भाजप नेते नारायण राणे म्हणाले कपड्याचा रंग निळा असला म्हणजे तो आंबेडकरवादी होत नाही
मार्च 2023 च्या लेखापरीक्षण अहवालानुसार महाराष्ट्रात मंजूर असलेल्या पदांपैकी तज्ञ डॉक्टरांची अद्याप 1 हजार 522 पदे रिक्तच
डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर यांच्या बद्दल अवमान करणारे वक्तव्य केल्याबद्दल प्रकरणी अमित शहा यांच्या विरोधात सोलापुरात खासदार प्रणिती शिंदे यांच्या नेतृत्वाखाली काढण्यात आला निषेध मोर्चा
प्रत्येक जिल्ह्याला आता पालकमंत्री कोण होणार याची उत्सुकता... सोलापूरसाठी पुन्हा चंद्रकांत दादा पाटील की नवे कोणीतरी याची चर्चा
सोलापुरात सुरू झाले अखिल भारतीय विद्यार्थी परिषदेचे अधिवेशन
निलंबित वादग्रस्त आयएस अधिकारी पूजा खेडकरला अटक होण्याची शक्यता, दिल्ली उच्च न्यायालयाने फेटाळला अटकपूर्व जामीन अर्ज
छगन भुजबळ म्हणाले... मुख्यमंत्री फडणवीसांनी ओबीसी समाजाची नाराजी दूर करण्यासाठी ८ ते १० दिवसांचा कालावधी मागितला असून लवकरच आपली नाराजी दूर करण्याचे दिले आश्वासन
सोमनाथ सूर्यवंशीची हत्या पोलिसांनीच केली, मुख्यमंत्र्यांनी पोलिसांना पाठिशी घातलं आणि विधानसभेत खोटं बोलले; परभणीतून राहुल गांधींचा देवेंद्र फडणवीसांवर आरोप
★Follow us, Share, Support★
Website:- yesnewsmarathi.com
Facebook:- / yesnewsmarathi
DailyHunt News:- m.dailyhunt.in...
Twitter:- / yesnewsmarathi
Shivaji Survase 9881748329
★Contact us★
Mobile- 9881748329
Email:- yesnewsmarathi@gmail.com
★★★Watch our channel's popular playlists★★★
Social News:
• Playlist
TOP 20:
• Playlist
Crime News:
• Playlist
Headlines:
• Playlist
Ads:
• Playlist
Special Stories:
• Playlist
Political News:
• Playlist
Sports:
• Playlist
PRESS:
• Playlist
येस न्यूज मराठी युट्युब चॅनेल मध्ये आपल्या सगळ्यांचे स्वागत आहे. आम्ही १९ फेब्रुवारी २०१८ या शिवजयंतीच्या दिवशी पत्रकारितेच्या नव्या पर्वाला सुरूवात केलीय. मराठी भाषेला प्राधान्य देत संपूर्ण महाराष्ट्राच्या, देशाच्या तसेच जगाच्या बातम्या आम्ही आपणास या युट्युब चॅनेल द्वारे देत आहोत.