तब्बल ३०० वर्षांपासून लोहारकाम करणारे वसईतील गाव | Traditional Blacksmith of Vasai

  Рет қаралды 210,838

Sunil D'Mello

Sunil D'Mello

Күн бұрын

Пікірлер
@sunildmello
@sunildmello 3 жыл бұрын
तब्बल ३०० वर्षांपासून लोहारकाम करणारे वसईतील गाव चिमाजी आप्पांनी १७३९ साली वसई दिग्विजय साकारला तेव्हा लोहारकाम करून ह्या विजयात हातभार लावणाऱ्या लोहारांच्या वंशजांना आज आपण भेटणार आहोत. श्री. राजेश चाफेकर हे वसईतील आक्टण भागात लोहारआळीत राहतात व आजही पारंपरिक पद्धतीने लोहारकाम करतात. शेती, शेतीपूरक इतर व्यवसाय, घरगुती व मासेमारीसाठी लागणारी सर्व हत्यारे व साधने पारंपरिक पद्धतीने बनवून घेण्यासाठी व डागडुजी करण्यासाठी त्यांच्याकडे केवळ वसईतूनच नव्हे तर गोराई, उरण, डहाणू ते थेट पुण्याहूनदेखील लोक येतात. आजच्या व्हिडिओत आपण खालील गोष्टी पाहणार आहोत. १. ऐतिहासिक वारसा व पार्श्वभूमी, २. पारंपरिक पद्धतीने विळी कशी बनवतात, ३. अजूनही पारंपरिक पध्दत का वापरतात, ४. लोहारकामासाठी लागणारा कच्चा माल, ५. कोणती साधने व हत्यारे बनवतात, ६. इतर बरीच रोचक माहिती हा प्रेरणादायी व्हिडीओ जरूर पहा व आपल्या मित्रमंडळींशी शेअरदेखील करा. अजूनही आमच्या चॅनलला सबस्क्राईब केलं नसेल तर आत्ताच सबस्क्राईब करा व घंटीचे बटणदेखील दाबा. धन्यवाद! नविन व्हिडीओजच्या अपडेट्ससाठी आमचं फेसबुक व इन्स्टाग्राम पेज लाईक/फॉलो करा. फेसबुक m.facebook.com/SunilDmellovideos इन्स्टाग्राम instagram.com/dmellosunny/ छायांकन व संकलन: अनिशा डि'मेलो विशेष आभार: श्री. राजेश चाफेकर व परिवार ९८२३८ ३३२०३ श्री. रिचर्ड परेरा, आक्टण चाफेकर वर्कशॉप लोकेशन Chaphekar’s workshop maps.app.goo.gl/4Xp1yHhNfTH7BkQ6A वसईतील पारंपरिक व्यवसायबाबतचे व्हिडीओ सिद्धिविनायक ते शिर्डीला वाहिल्या जाणाऱ्या वेण्या कुठे बनतात kzbin.info/www/bejne/oqaUfGp7iJubfJo वसईतील मिठागरे kzbin.info/www/bejne/aqOYdKyJeah7iNk वसईचा दूधवाला - एक माहितीपट kzbin.info/www/bejne/qWOTppignMp5sJY ६०० वर्षे जुने घर व ९० वर्षांचे सुतार kzbin.info/www/bejne/qpjLpGiQma6HfaM वसईचा केळीवाला kzbin.info/www/bejne/o6i5aYh3icd1oMk वसईची सुकेळी कशी बनवतात kzbin.info/www/bejne/bYrVgGOFZpqqjLc #lohar #blacksmith #forgedinfire #traditional #traditionalblacksmith #vasai #vasaitradition #sunildmello #sunildmellovasai #sunildmellovideos #smallscale #smallscalebusiness #smallscaleindustry #haritvasai #saveharitvasai #greenvasai
@prasadkshirsagar8107
@prasadkshirsagar8107 3 жыл бұрын
Sirji mala fishcuting knife banawun milel ka
@sunildmello
@sunildmello 3 жыл бұрын
@@prasadkshirsagar8107 जी, डिस्क्रिप्शनमध्ये दिलेल्या क्रमांकावर संपर्क साधल्यास आपल्याला माहिती मिळू शकेल. धन्यवाद
@Shri_07.07
@Shri_07.07 3 жыл бұрын
आम्ही देखील लोहार आहोत ..माझे आजोबा खूप छान छान लोखंडी वस्तू बनवायचे, आम्ही लहान पणी काम करताना जो विस्तू लागतो त्याला पाहिलें हाताने फिरवले जायचे त्याला भाता म्हणतात विस्तावला हवा घालण्याची मशीन असते ती फिरवायची हाताने...खूप मस्त व्हिडिओ ; आठवण आली आजोबाची... 🙏 खूप खूप धन्यवाद. मी काही नावे घेतो लोहार कामासाठी लागणारी वस्तू. हातोडा घन छणी एरन वाकस किक्र कानस भाता इ. धन्यवाद. 🔥☝️
@sunildmello
@sunildmello 3 жыл бұрын
@@Shri_07.07 वाह, जुन्या आठवणींना उजाळा मिळाला. धन्यवाद
@vitthalkirwe4978
@vitthalkirwe4978 Жыл бұрын
सुनिल भाऊ हया लोहार दादांचा मोबाईल नंबर प्रसिद्ध करा जेणेकरून आम्हाला काही त्यांच्या कडे काही चौकशी करायची असेल तर थेट चौकशी करू शकतो .
@vaidehikotasthane5393
@vaidehikotasthane5393 3 жыл бұрын
साधी माणसं सिनेमात काम करणाऱ्या सूर्यकांत नटानंतर प्रथमच देखणा लोहार बघितला.🙂. खूप नवीन आणि छान माहिती मिळाली 👍🙏
@sunildmello
@sunildmello 3 жыл бұрын
अगदी बरोबर बोललात, वैदेही जी. धन्यवाद
@amolsharma704
@amolsharma704 3 жыл бұрын
सूर्यकांतजी नंतर देखणा लोहार...Right....साधी माणसं...
@sunildmello
@sunildmello 3 жыл бұрын
@@amolsharma704 जी, धन्यवाद
@Wolf29977
@Wolf29977 3 жыл бұрын
Amcha lokanchya chehrya var ji aste ti garibi aste madam, pun atta barechshe evolve jhale ahet, time anusaar. Kaahi janan kade changlya positions ahet tyatun coat tails prapt ahe, kahi globetrotters he ahet, pun bahutek i daridrya gheunach jugut ahet. Amcha streeyanche haat suddha shramanmule haat jakhmi ani raat jhaleli astat, bahutek je shahrat ahet je sadke chya bajula taadpatri kiva junya sadya lavun jagat ahet.
@gajananchapole1607
@gajananchapole1607 3 жыл бұрын
Me pn lohar ahe from Nanded district
@mangeshpimple9184
@mangeshpimple9184 2 жыл бұрын
खुप छान माहिती आणि चाफेकर दांदाची प्रचंड मेहनत आपल्या द्वारे लोकांपर्यंत पोहचवली आणि प्रतेक अवजारची उत्तम माहिती दिली 👍🙏
@sunildmello
@sunildmello 2 жыл бұрын
खूप खूप धन्यवाद, मंगेश जी
@sanjaysawant232
@sanjaysawant232 3 жыл бұрын
धन्यवाद, पारंपरिक वारसा जतन करणाऱ्यांना उदंड आयुष्य लाभाे हीच आई भवानी चरणी प्रार्थना. धन्यवाद धन्यवाद.
@sunildmello
@sunildmello 3 жыл бұрын
खूप खूप धन्यवाद
@vilassawant8286
@vilassawant8286 Жыл бұрын
लोहार सुंदर व कामही सुंदर. डेमोलो you great
@sunildmello
@sunildmello Жыл бұрын
धन्यवाद, विलास जी
@vijaypatil7745
@vijaypatil7745 3 жыл бұрын
यांत्रीकरणाच्या युगात देखील आपल्या हस्त कलेची जपणूक करून राहीलेल्या कलाकारांना आपण प्रसिद्धीच्या झोतात आणल्या बद्दल आपले आभार !
@sunildmello
@sunildmello 3 жыл бұрын
धन्यवाद, विजय जी
@sabypereira264
@sabypereira264 3 жыл бұрын
बऱ्याच वर्षाने हे काम जवळून पाहायला मिळालं. सुंदर एपिसोड.
@sunildmello
@sunildmello 3 жыл бұрын
खूब आबारी, सॅबी
@udaychandradhuri8087
@udaychandradhuri8087 Жыл бұрын
मजा आली, राजेश फारच गमतीदार व्यक्ती आहेत. Music मुळे आणखी आनंद मिळाला.
@sunildmello
@sunildmello Жыл бұрын
धन्यवाद, उदयचंद्र जी
@mangeshkhot1785
@mangeshkhot1785 3 жыл бұрын
सुनिलजी आपण अपलोड केलेले व्हिडीओ फारच विलक्षण असतात. समोरच्या व्यक्तीं कडुन प्रभाविपणे संवाद साधुन घेतलेली माहिती अभ्यासपुर्ण असते. आपल्या मेहनतीला सलाम. आपले संवाद- कौशल्य अप्रतिम आहे. आमच्या ज्ञानात भर पडते. धन्यवाद🙏
@sunildmello
@sunildmello 3 жыл бұрын
आपल्या प्रोत्साहनपर प्रतिक्रियेसाठी खूप खूप धन्यवाद, मंगेश जी
@gopinathpatil7555
@gopinathpatil7555 11 ай бұрын
सुनिलभाऊ तुमची कमाल आहे किती जणांची ओळख करून देता खूप खूप छान.V.nice
@sunildmello
@sunildmello 11 ай бұрын
खूप खूप धन्यवाद, गोपीनाथ जी
@pramodkhandagalethetraditi9091
@pramodkhandagalethetraditi9091 3 жыл бұрын
सुनीलजी आपले खूप खूप आभार. मी सुद्धा लोहार आहे. मी निमगाव तालुका नांदुरा जिल्हा बुलडाणा येथे राहतो. दुर्लक्षित पारंपारिक लोहार कौशल्यास व्यापक प्रसिद्धी दिल्याबद्दल आपले आभार मानावे तितके थोडेच आहेत. लोहार समाज हा कष्टप्रिय आणि स्वाभिमानी जीवन जगणारा आहे याकडे आपण जगाचे लक्ष वेधले आहे. माझा लोहार कामासोबत वेल्डिंग व्यवसाय आहे पण माझा रेल्वे प्रवासात अपघात झाल्यानंतर मला माझ्या पारंपारिक लोहार व्यवसायानेच जीवन जगण्याची नवी उमेद दिली. पुन्हा धन्यवाद.
@sunildmello
@sunildmello 3 жыл бұрын
धन्यवाद, प्रमोद जी. आपल्याला खूप खूप शुभेच्छा
@aniljadhav9285
@aniljadhav9285 3 жыл бұрын
सुनिल साहेब आपला लोहारकाम यावरचा हा व्हिडीओ फार आवडला.आपले कौतुक करावे वाटते ते यासाठी की आपण राजेशजीची मुलाखत हसत खेळत मोकळेपणाने घेतली .तसेच राजेश हे सुशिक्षित असूनही त्यांनी आपला पारंपरिक व्यवसाय निष्ठेने करत आहे त्यांचे आपल्या व्यवसायावर प्रेम दिसून येते. कारण असे पारंपरिक व्यवसाय लोप होताना दिसत आहेत. पश्चिम महाराष्ट्रात हा लोहार समाज खूप आहे. आमच्या गावात माझे घर सुध्दा लोहार आळीत आहेत.त्यामुळे लोहार काम जवळून पाहिले आहे आमच्या कडील लोहार विळा खूरपी व नांगराचे फाळ ,पास इ.कामे करत असत परंतु शैक्षणिक प्रगती मुळे आता हे व्यवसाय कोणी करीत नाहीत. असो आपण एका बलुतेदाराची लोकांना माहिती करून दिली आहे त्याबद्दल आपले पुन्हा एकदा धन्यवाद आणि असेच व्हिडिओ बनविण्यासाठी खूप खूप शुभेच्छा धन्यवाद
@sunildmello
@sunildmello 3 жыл бұрын
आपल्या प्रेमळ व प्रोत्साहनपर प्रतिक्रियेसाठी खूप खूप धन्यवाद, अनिल जी
@gururajraichur3677
@gururajraichur3677 3 жыл бұрын
उत्कृष्ट!! एक पारंपारिक पण सध्या लयाला चाललेल्या उद्योगाची उत्तम माहिती. आपण व चाफेकर दोघांचे आभार.
@sunildmello
@sunildmello 3 жыл бұрын
खूप खूप धन्यवाद, गुरुराज जी
@shrikantsalvi9400
@shrikantsalvi9400 3 жыл бұрын
एखाद्या लघुपटाचे चित्रीकरण सुरू आहे असं वाटतं. श्री.राजेश यांनी ज्या पद्धतीने अवजारे, त्यांची नांवे व उपयोग सांगितले त्याने ज्ञानात भर पडली. कौशल्य म्हणजे काय? हे कळलं. दोघांचं ही अभिनंदन, असेच व्हिडिओ येत रहावेत. धन्यवाद 🙏
@sunildmello
@sunildmello 3 жыл бұрын
खूप खूप धन्यवाद, श्रीकांत जी
@vmcontent
@vmcontent 3 жыл бұрын
वसईचा इतिहास, संस्कृती, परंपरा आणि व्यवसाय खरोखर किती प्राचीन आहे. आता मला कळलं, माझी आई तिच्या मरणदिवसापर्यंत वसई आणि विरार बद्दल का बोलत होती. आज सुनील दादा तुमच्यामुळे मला सर्व बघायला मिळत आहे. तुमचा खूप खूप धन्यवाद.
@sunildmello
@sunildmello 3 жыл бұрын
खूप खूप धन्यवाद, विकी जी
@mangeshraut2209
@mangeshraut2209 3 жыл бұрын
हा व्हिडीओ बघून लहानपण आठवले. आम्हीही आमच्या वडिलांबरोबर पालघर- उमरोळी येथे विळे, कोयते, कुऱ्हाड बनवून घेणे तसेच बैल गाडीच्या वाटा (धावपट्टी) चढविणे,मोळे चढविणे, आस(excel) बडविणे,आमण ठोकणे ,दरवाजाच्या बिजागरी बनविणे,दरवाजाचे डामरे (कडी कोयंडे)बनविणे या कामी जात असू. अतिशय छान व्हिडीओ. तरुण पिढीला बोध घेण्या सारखा व्हिडीओ.👍
@sunildmello
@sunildmello 3 жыл бұрын
वाह, बालपणीची खूप सुंदर आठवण, मंगेश जी. धन्यवाद
@nitin14mar
@nitin14mar 3 жыл бұрын
Ho mi pan sarv karat hoto he sarv shalet asatana pan
@sunildmello
@sunildmello 3 жыл бұрын
@@nitin14mar जी, खूप छान धन्यवाद
@Hemantlokhande214
@Hemantlokhande214 3 жыл бұрын
धन्यवाद.. तुम्हाला की तुम्ही लोहारकामाची दखल घेतलीत.. आमचा लोप होत चाललेल्या व्यावसायाला या माध्यमातून सर्वांसमोर आणण्याचा प्रयत्न केला.. आमची सुद्धा ५वी पिढी या व्यावसायात आज आहे. याचा अभिमान आहे. (मंचर पुणे जिल्हा )
@sunildmello
@sunildmello 3 жыл бұрын
वाह, खूप छान, हेमंत जी. धन्यवाद
@Worldofgame-x4b
@Worldofgame-x4b 3 жыл бұрын
आपले म्हणणे अगदी बरोबर .मी विदर्भातील ,गडचिरोली जिल्ह्यातील .माझे आजोबा हा व्यवसाय करायचे .👏
@sumitshivganss3274
@sumitshivganss3274 2 жыл бұрын
दाते न बघता पाडण्याचे कौशल्य अद्भुत आहे काकांच.👌🏻
@sunildmello
@sunildmello 2 жыл бұрын
अगदी बरोबर बोललात, सुमित जी. धन्यवाद
@amolsharma704
@amolsharma704 3 жыл бұрын
तुमचा बोलण्याचा अंदाज फार सुंदर आहे.आणि स्मिथ हास्य शिवाय मराठी फारच गोड.एक नंबर...
@sunildmello
@sunildmello 3 жыл бұрын
खूप खूप धन्यवाद, अमोल जी
@DnyaneshwarMhatre-x5b
@DnyaneshwarMhatre-x5b Жыл бұрын
सुनील भाऊ खूपखूप मस्त व्हिडिओ जुन्या आठ वणीला उजाळा बर वाटल हा व्हिडिओ बघून आणि तुझी बोली भाष्या आमच्या सारखीच आहे मस्त गोड व्हिडिओ सुंदर अप्रतिम आहे असेच व्हिडिओ पाहण्यासाठी मन वाट बघत आणि ह्या लोहार भाऊ चे पण खूप आभार धन्यवाद गॉड ब्लेस ❤❤
@sunildmello
@sunildmello Жыл бұрын
ह्या सुंदर प्रतिक्रियेसाठी खूप खूप धन्यवाद
@desaibandhu
@desaibandhu 3 жыл бұрын
सुनिल डिमेलो, आपले खुप खुप आभार, आपण आतिशय चांगले काम करत आहात.
@sunildmello
@sunildmello 3 жыл бұрын
खूप खूप धन्यवाद, अनिल जी
@sadhanagarje1285
@sadhanagarje1285 11 ай бұрын
खरोखर जुने कारागीर सगळे बंद व्हायला लागलेले आहेत तर ते जुने कारागीर लोक आतुरतेने वाट पाहत होते ते पण तुमच्या व्हिडिओच्या माध्यमातून पूर्ण झाले काय करायचे खरोखर खूप गरज आहे पुढच्या पिढीला त्यांनी ते वारसा चालू ठेवला पाहिजे पुढे
@sunildmello
@sunildmello 11 ай бұрын
खूप खूप धन्यवाद, साधना जी
@itssagarjagtap
@itssagarjagtap 3 жыл бұрын
अत्यंत सुंदर मुलाखत होती ही.👌👌 व्यवस्थित चर्चा मुद्देसूद प्रश्न, प्रामाणिक उत्तर आणि निखळ मनाने एकत्र आल्यावर असा व्यवस्थित संवाद घडतो याचं मस्त उदाहरण आहे
@sunildmello
@sunildmello 3 жыл бұрын
खूप खूप धन्यवाद, सागर जी
@sunildmello
@sunildmello 3 жыл бұрын
@@itssagarjagtap जी, राजेश जींचा संपर्क क्रमांक व लोकेशन व्हिडीओच्या डिस्क्रिप्शमध्ये दिलेलं आहे. धन्यवाद
@jairjabhairane
@jairjabhairane 3 жыл бұрын
अप्रतीम माहीती..आम्ही कोकणात सावंतवाडीजवळ धवडकी या गावी असे पारंपरिक व्यवसाय पाहतो.आज तुमच्यामुळे हाकेच्या अंतरावरील हा ठेवा मिळाला.मी व्यवसाया निमीत्त गेली 20/22 वर्षे विरारमधे असूनही याची माहीती नव्हती.परत धन्यवाद.माझ्या सर्वच ग्रुपवर पठवतोय.
@sunildmello
@sunildmello 3 жыл бұрын
खूप खूप धन्यवाद, जयराज जी
@malinisawant2181
@malinisawant2181 3 жыл бұрын
🙏सुनीलजी खूप चांगले काम करत आहात तुम्ही.सुंदर विडीओ.
@sunildmello
@sunildmello 3 жыл бұрын
खूप खूप धन्यवाद, मालिनी जी
@helendmello8995
@helendmello8995 Жыл бұрын
अभिनंदन राजेश चाफेकर. अनुभवी व्यक्ती. मानाचा मुजरा .
@sunildmello
@sunildmello Жыл бұрын
अगदी बरोबर बोललात, हेलन जी. धन्यवाद
@rohidasveer6144
@rohidasveer6144 3 жыл бұрын
सुनिल सर तुमचे सगळे वीडियो खुप माहितीपूर्ण असतात , आणि तुमची मराठी सुद्धा अगदी सुस्पष्ठ आहे. खुप खुप शुभेच्छा 🌹💐
@sunildmello
@sunildmello 3 жыл бұрын
खूप खूप धन्यवाद, रोहिदास जी
@suvarnabhosale2624
@suvarnabhosale2624 3 жыл бұрын
👌👍 छान व्हिडिओ आहे...कधी काही काम निघालं तर तिथे जाता येईल...काम करणारे लोहार पण देखणे आणि उमदे आहेत.. इतकं कष्टाचं काम आणि अंगावर लोखंडाच्या गरम ठिणग्या पण उडू शकतात..पण ते एकदम सहज आणि मजेत काम करत आहेत असं वाटत होतं..त्यांची अशीच प्रगती होत राहो..🙌
@sunildmello
@sunildmello 3 жыл бұрын
आपल्या सुंदर प्रतिक्रियेसाठी खूप खूप धन्यवाद, सुवर्णा जी
@suvarnabhosale2624
@suvarnabhosale2624 3 жыл бұрын
👍😁😁
@manishapotdar7665
@manishapotdar7665 3 жыл бұрын
खुप ‌सुंदर माहिती दिली सुनिल जी तुमचे खुप खुप आभारी आहोत दर शनीवारी आणि रविवारी तुमच्या व्हिडीओ ची वाट पाहत असते👍👍👌👌🙏
@sunildmello
@sunildmello 3 жыл бұрын
खूप खूप धन्यवाद,मनीषा जी
@Jadhav603
@Jadhav603 3 жыл бұрын
🙏💐नमौ बुध्दाय जय शिवराय जय भिम 💐🙏 खूप छान माहिती दिली दादा आपण आणि चाफेकर काका यांनी आपणांस खूप खूप शुभेच्छा आनंदी रहा सुरक्षित रहा 💐💐💐🙏🙏🙏
@sunildmello
@sunildmello 3 жыл бұрын
खूप खूप धन्यवाद, जाधव जी
@harshhhhh1437
@harshhhhh1437 3 жыл бұрын
Me suddha ek Lohar aahe... khup chaan vatl tumcha ha video pahun... khup changlya prakare sangitl...
@sunildmello
@sunildmello 3 жыл бұрын
वाह, खूप छान, हर्षल जी. धन्यवाद
@rajeshvichare5407
@rajeshvichare5407 3 жыл бұрын
अतिशय सुंदर व्हिडिओ आहे मित्रा तुझा. अशा प्रकारचे पारंपरिक काम करणारी माणसं आज-काल कमी बघायला मिळतात. त्या कारागिराला तर सालाम. आणि तुझं बोलणं फार सुंदर आहे. परमेश्वर तुझे भले करो.
@sunildmello
@sunildmello 3 жыл бұрын
खूप खूप धन्यवाद, राजेश जी
@asmitajadhav4681
@asmitajadhav4681 3 жыл бұрын
Thanks ,Sunil ji tumhi aaplya vasaichi khup chhan mahiti sagta.
@sunildmello
@sunildmello 3 жыл бұрын
धन्यवाद, अस्मिता जी
@asmitajadhav4681
@asmitajadhav4681 3 жыл бұрын
🙏
@Sanjoo_Mumbai
@Sanjoo_Mumbai 3 жыл бұрын
राजेशजींचा साधेपणा, सच्चे पणा, मेहनती स्वभाव त्यांच्या व्यक्तीमत्वामधुन आणि घामाने भिजलेल्या कपडयांवरुन लक्षात येतो. वडिलांच्या मदतीसाठी या कठिण व्यवसायात आलेल्या राजेशजींना सलाम ! बैलगाडीचे चाक किती आकर्षक सुबक आहे! एवढी सुंदर माहिती दिल्या बद्दल सुनील जी आणि सर्वांना धन्यवाद!
@sunildmello
@sunildmello 3 жыл бұрын
खूप खूप धन्यवाद, संजय जी
@sunilpanchal1343
@sunilpanchal1343 3 жыл бұрын
Very well presented, informative & intersting video, it makes us proud for Rajesh bhai to keep this old skill alive, keep it up
@sunildmello
@sunildmello 3 жыл бұрын
Thanks a lot, Sunil Ji
@jayant6034
@jayant6034 3 жыл бұрын
आपण नेहमी सारखं छान मुलाखतीतून लोहार कामातील कौशल्य दाखवून देण्याचा प्रयत्न केलाय. मुलाखत घेताना राजेश यांच्या येथे बनणाऱ्या ईतर विकाऊ, घरकामाला,बाग कामाला, शेतीला ईतर उपयोगि सामानाची माहिती सांगितली असती तर बर झाल असत. एकंदर छान video बनविला आहे.
@sunildmello
@sunildmello 3 жыл бұрын
खूप खूप धन्यवाद, जयंत जी
@gautam160485
@gautam160485 3 жыл бұрын
👌👌👌खूप छान आणि माहितीपूर्ण व्हिडीओ🙏🙏🙏 सुतार आळीच्या व्हिडिओ ची वाट पाहतोय
@sunildmello
@sunildmello 3 жыл бұрын
नक्की प्रयत्न करू. धन्यवाद
@mukundjambhalikar7874
@mukundjambhalikar7874 Жыл бұрын
सुनिल भाऊ , छान माहिती. उत्कृष्ट कारागिर व कारागिरी. आपले उत्तम कथन . धन्यवाद 🙏
@sunildmello
@sunildmello Жыл бұрын
खूप खूप धन्यवाद, मुकुंद जी
@nihalpatil5583
@nihalpatil5583 3 жыл бұрын
येकच नंबर दादा 🙏👌👌😊
@sunildmello
@sunildmello 3 жыл бұрын
धन्यवाद, निहाल जी
@chintanbhatawadekar2773
@chintanbhatawadekar2773 3 жыл бұрын
सुनील जी,एकदम मस्त व माहितीपुर्ण विडिओ.आपले विषय हे नेहेमीच चाकोरी बाहेरचे आणि रंजक असतात.आपली मांडणी,निवेदनशैली,व सांगोपांग माहिती देण्याची पद्धत प्रशंसनीय आहे.आपल्या व्हिडिओतून कालबाह्य होत असलेल्या अनेक सांस्कृतिक गोष्टींची माहिती तर होतेच पण,आमची जिज्ञासा सुध्दा वाढते.लोहार दादा राजेश चाफेकर हे कसबी कलाकार आहेत.त्यांना आणि तुम्हाला मनापासून धन्यवाद.👌👍💐
@sunildmello
@sunildmello 3 жыл бұрын
आपल्या प्रोत्साहनपर प्रतिक्रियेसाठी खूप खूप धन्यवाद, चिंतन जी
@kanchansrecipies5120
@kanchansrecipies5120 3 жыл бұрын
नमस्कार सर 🙏 आपल्या मुळे लोप होत चाललेलं लोहार काम पहायला मिळाले , वेगवेगळ्या विषयांवरील आपले व्हिडिओ कधी येतात ह्याची वाट पहात असते हटके असे व्हिडिओ असतात आपले आपले बोलणे ऐकत रहावे असे आहे आत्मियतेने बोलता आपण मनाला खूप भावते आपल्याला अगणित शुभेच्छा 🙏🌹🌹 कांचन रानडे डोंबिवली
@sunildmello
@sunildmello 3 жыл бұрын
आपल्या ह्या प्रेमळ प्रतिक्रियेसाठी खूप खूप धन्यवाद, कांचन जी
@radhikadiksha1507
@radhikadiksha1507 3 жыл бұрын
सुनिल Thank you तुझ्या मुळे जुन्या आठवणी जाग्या होतात तुला खुप आशीर्वाद
@sunildmello
@sunildmello 3 жыл бұрын
खूप खूप धन्यवाद, राधिका जी
@rajeshmhatre9432
@rajeshmhatre9432 3 жыл бұрын
आपण खूप छान माहिती देत आहेत वसई गावातील, आपल्याला शनिवारी संध्याकाळी शूट करत असताना पाहीलं आणि आवाज दिला होता, अर्थात आपण शूटिंग मध्ये वेस्त busy होतात🙏
@sunildmello
@sunildmello 3 жыл бұрын
ओह्ह माफ करा राजेश जी माझ्या लक्षात आलं नाही. आपल्या प्रोत्साहनाबद्दल खूप खूप धन्यवाद
@shardulmore2817
@shardulmore2817 3 жыл бұрын
ani tya rajeshji yana suddha khup khup shubhecchya
@sunildmello
@sunildmello 3 жыл бұрын
धन्यवाद, शार्दूल जी
@AstleCorreia
@AstleCorreia 3 жыл бұрын
Nice information about blacksmith
@sunildmello
@sunildmello 3 жыл бұрын
खूब आबारी, ऍस्टल
@sujitwarkari7108
@sujitwarkari7108 3 жыл бұрын
खरोखर अप्रतिम माहीती आहे मराठी असल्याचा अभिमान आहे.
@sunildmello
@sunildmello 3 жыл бұрын
धन्यवाद, सुजीत जी
@think_green
@think_green 3 жыл бұрын
परत एकदा आगळावेगळा व्हिडिओ व एका लुप्त होत चाललेल्या व्यवसायाबद्दल छान माहिती सुनील! पुढील पिढीसाठी उत्तम ठेवा! 👍👌💐😇 राजेशजीचा फोन नंबर टाकायला हवा होता! 😊
@sunildmello
@sunildmello 3 жыл бұрын
खूब खूब आबारी, दादा
@kalgondapatil1806
@kalgondapatil1806 Жыл бұрын
अतिशय सुंदर मुलाखत खूप काही शिकायला मिळाले
@sunildmello
@sunildmello Жыл бұрын
खूप खूप धन्यवाद, पाटील जी
@ShivprasadVengurlekar
@ShivprasadVengurlekar 3 жыл бұрын
It's great experience! Thanks for bringing it in public and giving justice to the vanishing skills of these only few survivors of blacksmith...
@sunildmello
@sunildmello 3 жыл бұрын
Thanks a lot for the kind words, Shivprasad Ji
@jitendramayekar8477
@jitendramayekar8477 3 жыл бұрын
खुप नियमीत मर्दानी मेहनतीचा व्यवसाय ! राजेशजी दिलखुलास, ऊमेदी व्यक्तिमत्व!
@sunildmello
@sunildmello 3 жыл бұрын
अगदी बरोबर बोललात, जितेंद्र जी. धन्यवाद
@ravik2801
@ravik2801 3 жыл бұрын
Very good and informative video. Mr Rajesh Chafekar is rocking. I hope that he use his rich knowledge to form a great company manufacturing agro hand tools and other equipment. Government and bank should support such great craftsmen.
@sunildmello
@sunildmello 3 жыл бұрын
Thanks a lot, Ravi Ji
@Sanjoo_Mumbai
@Sanjoo_Mumbai 3 жыл бұрын
सध्याच्या आधुनिक काळात कमी वेळात जास्त उत्पादन देणारी अनेक यंत्रे उपलब्ध असताना केवळ पारंपरिक पद्धतीने लोखंडी वस्तु बनविण्यासाठी एवढी मेहनत घेणारे राजेशजी यांची कमाल वाटते. तापलेल्या लोखंडावर घाव घालताना होणारया आवाजाला राजेशजी यांनी किती सहजपणे संगीताची उपमा दिली आहे! मला वाटतं आपल्या लोकसंगीताचा उगम निरनिराळी कामे करताना उमटणारया नादमधुर ध्वनी लहरींमधुन झाला असावा.
@sunildmello
@sunildmello 3 жыл бұрын
अगदी बरोबर बोललात, संजय जी. धन्यवाद
@DrBrunoRecipes
@DrBrunoRecipes 3 жыл бұрын
Excellent 👌🏻 Greetings from Scotland 😊 Have a wonderful day everyone 🌻
@shashankdeshmukh6879
@shashankdeshmukh6879 3 жыл бұрын
Land of the misty cloud land of the tempest loud land of the brave and proud land of the free. Victorious in battlefield Scotland the brave.
@sunildmello
@sunildmello 3 жыл бұрын
Thanks a lot, Doctor Ji
@sunildmello
@sunildmello 3 жыл бұрын
Thank you for the beautiful words, Shashank Ji
@shashankdeshmukh6879
@shashankdeshmukh6879 3 жыл бұрын
@@sunildmelloNot my words Sunil Ji, it's a Scottish ballad which is played on the bagpipe as a marshal tune by the army bands of the entire British Commonwealth.
@sunildmello
@sunildmello 3 жыл бұрын
@@shashankdeshmukh6879 ohh..That's amazing. Thank you, Sharing
@gajanansawant5197
@gajanansawant5197 3 жыл бұрын
छान माहिती दिली आहे.... हल्ली गावी असं बघायला मिळत नाही... मेहनत आणि त्यातून निर्माण होणारे अवजारे एक कला आहे
@sunildmello
@sunildmello 3 жыл бұрын
धन्यवाद, गजानन जी
@vidyapai494
@vidyapai494 3 жыл бұрын
Sunilji 👌👌👌👍👍👍your videos are really appreciable ,you always share something different from other vlogs.You are not only educating us all through this but aslo you are encouraging these craftsmen and many others. 👏👏👏👏 for the efforts you take to show 💐💐💐💐💐👌👌👌👌
@sunildmello
@sunildmello 3 жыл бұрын
Thanks a lot for your kind words, Vidya Ji
@shilpaj0076
@shilpaj0076 3 жыл бұрын
तुमच्या चॅनल मुळे नेहमीच काहीतरी वेगळं पाहायला मिळतं, धन्यवाद
@sunildmello
@sunildmello 3 жыл бұрын
धन्यवाद, शिल्पा जी
@rahultungare9835
@rahultungare9835 3 жыл бұрын
Awesome video Sunil hats off to you. No word to describe Mr Rajesh Chapekher's skills & his simplicity. Would love to see more such videos wherein artisans like Mr Chapekher and their skills ,work get's highlighted , appreciated. Can you please share Mr Rajesh's number.
@sunildmello
@sunildmello 3 жыл бұрын
Rajesh Ji's number is provided in the video description. Thank you, Rahul Ji
@satishchaudhari8638
@satishchaudhari8638 3 жыл бұрын
वाह काय छान माहतीपूर्ण व्हिडिओ थेट इतिहासा पर्यंत नेलं🙏
@sunildmello
@sunildmello 3 жыл бұрын
खूप खूप धन्यवाद, सतीश जी
@Behappy33318
@Behappy33318 3 жыл бұрын
खूप छान माहिती. मी कल्पना करू शकत नाही की लोहारला किती उष्णता सहन करावी लागेल !!
@sunildmello
@sunildmello 3 жыл бұрын
अगदी बरोबर बोललात, समी जी. खूपच मेहनतीचे काम आहे. धन्यवाद
@ashishkulkarni2315
@ashishkulkarni2315 3 жыл бұрын
नमस्कार सुनील.. मी पहिल्यांदाच आपल्या चॅनलला भेट दिली आणि हा व्हिडिओ पहिला.सर्वप्रथम हा व्हिडिओ फार छान झाला आहे आणि आपलं निवेदन उत्तम झालं आहे. आपण सांगितलं त्या प्रमाणे चाफेकर साहेबांच्या वयाचा अंदाज खरंच करणं कठीण होतं.त्यांना बघून कोणीही म्हणणार नाही की त्यांचं वय ५० च्या आसपास आहे. आपल्या उत्तम आरोग्य साठी आणि पुढील वाटचालीसाठी अनेक शुभेच्छा. आशिष कुलकर्णी पुणे.
@sunildmello
@sunildmello 3 жыл бұрын
नमस्कार आशिष जी, आपल्या प्रोत्साहनपर प्रतिक्रियेसाठी खूप खूप धन्यवाद.
@jopsonpereira1272
@jopsonpereira1272 3 жыл бұрын
ज्या लोकांनी अशा ऐतिहासिक माहितीवर सुध्दा dislike केल आहे. त्यांना काय शब्द वापरावे तेच सुचत नाही.
@sunildmello
@sunildmello 3 жыл бұрын
खूप खूप धन्यवाद, जॉप्सन जी
@mangeshraut2209
@mangeshraut2209 3 жыл бұрын
Dis like करणारे एकतर बिनडोक असतील किंवा आधुनिक तकलादू यंत्रसामुग्रीचे मतलबी पुरस्कर्ते असावेत.
@sunildmello
@sunildmello 3 жыл бұрын
@@mangeshraut2209 जी, धन्यवाद
@balaramfalke3242
@balaramfalke3242 3 жыл бұрын
खुप मेहनती च काम आहे लोहाराचे खुप छान विडिओ 👌👍
@sunildmello
@sunildmello 3 жыл бұрын
धन्यवाद, बलराम जी
@sameerghogale1905
@sameerghogale1905 3 жыл бұрын
HELLO SUNIL.. I ENJOYED YOUR ALL VLOGS ALWAYS 👍👍 YOUR VLOGS IS ALWAYS IMPROVING GENERAL KNOWLEDGE ON VARIOUS ASPECTS
@sunildmello
@sunildmello 3 жыл бұрын
Thanks a lot for your kind words, Sameer Ji
@sudhakarpatil4218
@sudhakarpatil4218 3 жыл бұрын
दोघांचा संवाद छान जमलाय, अतिशय सुरेख व्हिडीओ
@sunildmello
@sunildmello 3 жыл бұрын
धन्यवाद, सुधाकर जी
@हपिएम्
@हपिएम् 3 жыл бұрын
Once again a beautiful video in great detail. Just imagine if our thinkers (Brahmins and Kshatriyas) and our bankers (Vaishyas) would have discussed and interacted with these tradesmen / masons od yesteryears, India could have equalled or even surpassed the industrial economies of Europe, Japan etc. But thinking about it in hindsight now, there probably was that sort of interaction as you mentioned that these tradesmen came to the Vasai coast under the patronage of Chimajiappa. Was there a conspiracy later to disrupt that hegemony into what would evolve later as the infamous Hindu caste system is something we will never find out.
@sunildmello
@sunildmello 3 жыл бұрын
You have certainly raised a valid point...Thank you
@bharatikelkar159
@bharatikelkar159 3 жыл бұрын
फारच अप्रतिम व्हिडिओ! ग्रेटच लोहार आहे. पारंपरिक व्यवसाय इतका मनापासून करणाऱ्या राजेश चाफेकरांना सलाम.
@sunildmello
@sunildmello 3 жыл бұрын
खूप खूप धन्यवाद, भारती जी
@sandeepp7686
@sandeepp7686 Жыл бұрын
खूप छान माहितीपर व्हिडिओ, मी लहानपणी सोपारा गावात राहत असे तिथे मी लोहार, सुतार, कासार असे अनेक व्यवसाय पाहिले आहेत त्याची आठवण झाली तुम्हा दोघांचे आभार आणि अभिनंदन 💐
@sunildmello
@sunildmello Жыл бұрын
खूप खूप धन्यवाद, संदीप जी
@sandeepp7686
@sandeepp7686 Жыл бұрын
सुनिल जी आपले अनेक व्हिडिओ मी नेहमी पाहत असतो आणि मला ते आवडतात. आणि एक माझे बालपण नालासोपारा येथे गेले असल्या मुळे मला वसई, सोपारा, विरार, अर्नाळा, वसईचा किल्ला, निर्मल ची जत्रा, तेथील समुद्र किनारे या आणि इतर जसे की सर्व जाती धर्माचे रीती रिवाज या खूपच आवड आहे कारण ते माझ्या आठवणीतले सुंदक्षण आहे
@नादबैलगाडाशर्यत-ख7थ
@नादबैलगाडाशर्यत-ख7थ 3 жыл бұрын
जुन ते सोनच,🤷‍♂️🙏 त्यांनी जुनी परंपरा टिकवून ठेवली त्याबद्दल खरच मनापासून आभार व सलाम, 🙏व असे व्हिडिओ बनवुन जुनी माहिती तुम्ही दिलीत त्याबद्दल सुद्धा तुमचे मनापासून आभार, 🙏👍
@sunildmello
@sunildmello 3 жыл бұрын
खूप खूप धन्यवाद
@vilasparab2256
@vilasparab2256 Жыл бұрын
सुनिल साहेब तुम्हाला मानल काय माहिती देता खरोखर खूप छान काम करता त्यामुळे लोकांना. बरीच माहिती मिळते तुमचे बरेचसे व्हिडीओ मी बघतो मला खूप आनंद होतो धन्यवाद
@sunildmello
@sunildmello Жыл бұрын
ह्या प्रोत्साहनपर प्रतिक्रियेसाठी खूप खूप धन्यवाद, विलास जी
@norbancoelho2060
@norbancoelho2060 3 жыл бұрын
सुनील भाऊंचे मी बरेच व्हीडीओ बघतो त्यामधील हा फार चांगला व्हीडीओ आहे. लोहाराची कला आणि मेहनत ह्यामधे बघायला मिळाली. राजेश ह्यांच्या कलेला आणि मेहनतीला माझा सलाम. स्वप्नील डीमेलो ह्यांनी चांगला व्हीडीओ बनविल्याबद्दल त्यांचे आभार.
@sunildmello
@sunildmello 3 жыл бұрын
खूप खूप धन्यवाद, नॉर्बन जी
@vinodsalvi2896
@vinodsalvi2896 3 жыл бұрын
राजेश जी चे अभिनंदन आणि आभार आणि आपल्याला धन्यवाद
@sunildmello
@sunildmello 3 жыл бұрын
धन्यवाद, विनोद जी
@vijayjosh5895
@vijayjosh5895 3 жыл бұрын
सुनील, झकास!
@sunildmello
@sunildmello 3 жыл бұрын
धन्यवाद, विजय जी
@rajanikntchipat4606
@rajanikntchipat4606 3 жыл бұрын
Khup chan mast khup mehnatiche kam aahe.
@sunildmello
@sunildmello 3 жыл бұрын
धन्यवाद, रजनीकांत जी
@vasantilawar8645
@vasantilawar8645 3 жыл бұрын
Rajeshji tumhala salam 👍👍👍👌👌👌🤛🤛🤛
@sunildmello
@sunildmello 3 жыл бұрын
धन्यवाद, वासंती जी
@madhusudanphatak5763
@madhusudanphatak5763 Жыл бұрын
अनमोल प्रात्यक्षिक धन्यवाद अभिनंदन
@sunildmello
@sunildmello Жыл бұрын
खूप खूप धन्यवाद, मधुसूदन जी
@bhanudaslohar9887
@bhanudaslohar9887 3 жыл бұрын
सुनिलजी आमच्या पारंपारीक व्यवसायाची माहिती प्रसारित केली धन्यवाद... विश्वकर्मा पुत्र समाज बंधु चाफेकर भाऊचेही आभार. 🙏🙏🙏
@sunildmello
@sunildmello 3 жыл бұрын
धन्यवाद, भानुदास जी
@mohansherpekar469
@mohansherpekar469 3 жыл бұрын
नमस्कार खुप खुप सुंदर वीडियो, मस्त, हा वीडियो बघून खुप काही शिकायला मीळाल. कारण आपन अवजार/ हत्यार फ़क्त बघतो. पण ते हत्यार प्रत्याक्ष्यात कस बनत हे आज तुमच्या मुळे बघायला मीळाल/ समजल वीडियो पाहून मन समाधानी झाल. खुप सुंदर वीडियो अशीच उपयुक्त माहितीचा वीडियो बनवा आता सुतार कामाच वीडियो बनवा. तुमच्या कामाला यश येवो.. धन्यवाद
@sunildmello
@sunildmello 3 жыл бұрын
खूप खूप धन्यवाद, मोहन जी
@saeedbaig7296
@saeedbaig7296 3 жыл бұрын
सुनीलजी शब्द कमी पडतात तुमची तारीफ करायला, व्हिडियो वाटच नाही, स्वतः आपणच उपस्थित आहोत असं वाटतं. चाफेकर सरांना सलाम, या आधुनिक आणि जलदगती जगात हसतमुखाने आपला पारंपरिक वारसा जपत आहेत.👌
@sunildmello
@sunildmello 3 жыл бұрын
खूप खूप धन्यवाद, सईद जी
@shashankdeshmukh6879
@shashankdeshmukh6879 3 жыл бұрын
अस्खलित मराठी, बेग साहेब.
@jitendramayekar8477
@jitendramayekar8477 3 жыл бұрын
असे कसब , कौशल्ये पुढच्या पिढीला तयार करायला हवे! समाजातील महत्वाचे घटक ! हार्दिक अभिनंदन व शुभेच्छा सुनीलजी!
@sunildmello
@sunildmello 3 жыл бұрын
धन्यवाद, जितेंद्र जी
@hydra1095
@hydra1095 3 жыл бұрын
सुनीलजी तुम्हि खरोखर आपले वरच्या कोकणातले पारंपरिक जीवन शैलीचे आम्हाला ओळख करून देता, आमची सांगण्याची पद्धत, नवं समोरच्या वाक्तीशी एकरूप होऊन माहिती घेणे, मला खूप भावली, धन्यवाद, असेच चांगले चांगले व्हिडिओ आम्हाला दाखवत रहा
@sunildmello
@sunildmello 3 жыл бұрын
खूप खूप धन्यवाद, धर्मराज जी
@gorakhsangle5788
@gorakhsangle5788 3 жыл бұрын
मस्त व्हिडीओ
@sunildmello
@sunildmello 3 жыл бұрын
धन्यवाद, गोरख जी
@rasikapednekar7423
@rasikapednekar7423 2 жыл бұрын
खूप छान विडिओ साधी मानस साधी राहणी लुप्त होत चाललेला व्यवसाय म्हणण्या पेक्षा कला असेच छान छान विडिओ आमच्या पर्यंत पोचवत राहा 👌💐
@sunildmello
@sunildmello 2 жыл бұрын
खूप खूप धन्यवाद, रसिका जी
@chandrakantmane2327
@chandrakantmane2327 3 жыл бұрын
खूप छान माहिती ! जय विश्वकर्मा !
@sunildmello
@sunildmello 3 жыл бұрын
धन्यवाद, चंद्रकांत जी
@maniklalpardeshi5573
@maniklalpardeshi5573 Жыл бұрын
भारीच...👍
@sunildmello
@sunildmello Жыл бұрын
धन्यवाद, माणिकलाल जी
@smitapatil2648
@smitapatil2648 3 жыл бұрын
अप्रतिम ..!! पारंपरिक कला जोपासली आहे. खूप परिश्रम आहेत. राजेशजींना खूप खूप शुभेच्छा.
@sunildmello
@sunildmello 3 жыл бұрын
अगदी बरोबर बोललात, स्मिता जी. धन्यवाद
@gaurirane6810
@gaurirane6810 3 жыл бұрын
Sunilji khup khup chan Mahiti milali Lohar kamachi dhanyawad
@sunildmello
@sunildmello 3 жыл бұрын
धन्यवाद, गौरी जी
@prakashspanchal3321
@prakashspanchal3321 3 жыл бұрын
सुंदर अतिसुंदर
@sunildmello
@sunildmello 3 жыл бұрын
धन्यवाद, प्रकाश जी
@vijayalaxmiverma4884
@vijayalaxmiverma4884 3 жыл бұрын
राजेश आप को सलाम करते हैं
@sunildmello
@sunildmello 3 жыл бұрын
धन्यवाद, विजयालक्ष्मी जी
@laxmikantparkar4053
@laxmikantparkar4053 3 жыл бұрын
फारच माहितीपूर्ण व्हिडियो बनविला आहे. आणि राजेशजी पण मजेदारपणे आपणास माहिती देत आहेत. त्यांनी ऐरणीच्या देवा तुला ठिणगी ठिणगी वाहू दे हे गाणे छान म्हटले. त्यांचा आवाजही छान आहे. प्रत्येक लोहाराला हे गाणे माहीतच असणार. सुनीलजी, मनापासून धन्यवाद. असेच माहितीपूर्ण व्हिडियो बनवित जा.
@sunildmello
@sunildmello 3 жыл бұрын
खूप खूप धन्यवाद, लक्ष्मीकांत जी
@rashmidanait2938
@rashmidanait2938 3 жыл бұрын
इतके वेगवेगळे पारंपारिक व्यवसाय व ते उत्साह ने व आनंदाने चालू ठेवणारे व्यावसायिक...आणि तितक्याच औत्चुक्याने त्यांना शोधून ती सर्वांपुढे आणणारे सुनीलजी तुम्ही...दोहोंचही अभिनंदन...फारच छान माहितीपटासारखे पण तरीही आपुलकीने दर्शवलेले असे videos असतात तुमचे..keep it up...really nice👍👏👏
@sunildmello
@sunildmello 3 жыл бұрын
खूप खूप धन्यवाद, रश्मी जी
@arvindrane7569
@arvindrane7569 3 жыл бұрын
खुप सुंदर, विडिओ...👍
@sunildmello
@sunildmello 3 жыл бұрын
धन्यवाद, अरविंद जी
@ajitsadrekar4510
@ajitsadrekar4510 3 жыл бұрын
भारतीय बलुतेदार भारीच, अभिमान आहे.कौशल्य अभिनंदनीय. 👌🏾👍
@sunildmello
@sunildmello 3 жыл бұрын
धन्यवाद, अजित जी
@Krishnabharatthakur
@Krishnabharatthakur 3 жыл бұрын
He skill transfer zale पाहीजे
@sunildmello
@sunildmello 3 жыл бұрын
@@Krishnabharatthakur जी, अगदी बरोबर बोललात. धन्यवाद
@vivekpawar1387
@vivekpawar1387 11 ай бұрын
Atishay mahatvapurn mahiti apan dilit dhanyawad . Rajesh sarkhe karagir aatahi vasai madhe aahet aani vasaichya vaibhavat bhar ghalatat tyamule tyanche v aaple dhanyawad! Asech barabalutedaranchya babatit mahiti Det raha
@sunildmello
@sunildmello 11 ай бұрын
खूप खूप धन्यवाद, विवेक जी
@nihalpatil5583
@nihalpatil5583 3 жыл бұрын
खरंच खूपच सुंदर 👌👌पारंपरिक पद्धत आहे.
@sunildmello
@sunildmello 3 жыл бұрын
धन्यवाद, निहाल जी
@KiranPatil-ch7um
@KiranPatil-ch7um 3 жыл бұрын
सलाम राजेश जी
@sunildmello
@sunildmello 3 жыл бұрын
धन्यवाद, किरण जी
@smitakorlekar8714
@smitakorlekar8714 2 жыл бұрын
Nakki kup avdte pratek videos mi bagte farch sunder astat 👌👍🙏
@sunildmello
@sunildmello 2 жыл бұрын
खूप खूप धन्यवाद, स्मिता जी
@ssatam09
@ssatam09 3 жыл бұрын
अभिनंदन विडिओ चे views 1 लाख वर गेल्या बद्दल
@sunildmello
@sunildmello 3 жыл бұрын
धन्यवाद, सचिन जी
@smitanaik3792
@smitanaik3792 3 жыл бұрын
Very nice and navin mahiti milali thanks
@sunildmello
@sunildmello 3 жыл бұрын
खूप खूप धन्यवाद, स्मिता जी
@humanbeing5871
@humanbeing5871 3 жыл бұрын
Khup chan video sunil. .
@sunildmello
@sunildmello 3 жыл бұрын
धन्यवाद
@shivangijoshi6075
@shivangijoshi6075 3 жыл бұрын
मस्त व्हिडिओ नेहमीप्रमाणेच नवीन विषय छान सादरीकरण सुंदर
@sunildmello
@sunildmello 3 жыл бұрын
खूप खूप धन्यवाद, शिवांगी जी
It’s all not real
00:15
V.A. show / Магика
Рет қаралды 20 МЛН
When you have a very capricious child 😂😘👍
00:16
Like Asiya
Рет қаралды 18 МЛН
The Best Band 😅 #toshleh #viralshort
00:11
Toshleh
Рет қаралды 22 МЛН
Blacksmith India (Lohar) (भारत के लौहार) Part-2
13:52
Badár Sándor a szoknyaviselés veszélyeiről
3:26
vdszsz
Рет қаралды 29 М.
Many Moving Magnets Melting Metal
20:21
Cody'sLab
Рет қаралды 3 МЛН
Inside the V3 Nazi Super Gun
19:52
Blue Paw Print
Рет қаралды 2,6 МЛН
It’s all not real
00:15
V.A. show / Магика
Рет қаралды 20 МЛН