Рет қаралды 193
भारतीय शेतीच्या पद्धतीत काळाच्या ओघात मोठा बदल झालाय...शेतकरी आधुनिक शेतीकडे मोठ्या प्रमाणात वळतायेत...तरीही काही भागात पारंपरिक शेती टिकून आहे...सांगली जिल्ह्यातील खानापूर हा दुष्काळी पट्टा म्हणून ओळखला जातो...मात्र खानापूरच्या घाटमाथ्यावर चक्क हवेवरचा गहू पिकवला जातोय...विशेष म्हणजे लागवडीपासून काढणीपर्यंत गव्हाला एकदाही पाणी दिले जात नाही...दुर्मिळ होत चाललेले हे वाण शेतगहू म्हणून ओळखले जाते...खानापूर घाट माथ्यावर ८ ते १० गावांत मिळून किमान १२५ ते १५० एकरात शेत गव्हाचे उत्पादन घेतले जाते...त्याला हवेवरचा गहू असही म्हणतात...घाटमाथ्यावरचे हवामान आणि जमिनीच्या ओलसरपणाच्या आधारे हा गहू पिकवला जातो...या भागात गव्हाला पेरणीपासून ते काढणीपर्यंत पाणी दिले जात नाही...या बिनपाण्याची गव्हाला शेत गहू किंवा हवेवरचा गहू म्हणतात...खानापूरच्या घाटमाथ्यावरच्या या गव्हाचे वैशिष्ट्य म्हणजे हा केवळ जमिनीत असणाऱ्या ओलाव्यावर येतो...यामुळेच हा वैशिष्ट्यपूर्ण गहू मानला जातो...विशेष म्हणजे दुष्काळी आणि इतर कुठल्याही पट्ट्यापेक्षा खानापूर घाटमाथ्यावर या गव्हाचे उत्पादन मोठ्या प्रमाणावर घेतले जाते...एक तर या पिकाला मध्यम स्वरूपाची जमीन लागते आणि वातावरण कोरडे असले तरी गारवा आवश्यक असतो...या दोन्ही गोष्टी खानापूर घाटमाथ्यावरील रेणावी, रेवणगाव, घोटीखुर्द, घोटी बुद्रुक, घोडेवाडी, ऐनवाडी, पोसेवाडी, जाधववाडी, तामखडी आणि अडसरवाडी घाटमाथ्यावरील गावाच्या शेतामध्ये मिळतात...
द कॉलम अॅग्रीकल्चर ही मराठी वाहिनी आहे. या वाहिनीचा शुभारंभ ऑगस्ट २०२१ पासून झाला असून त्याचे मालकी हक्क द कॉलम मीडिया ग्रुपकडे आहेत. द कॉलम वाहिनीनं अद्यावत तंत्रज्ञानाचा वापर करून डिजिटल माध्यम क्षेत्रात पाऊल टाकलं आहे. यात शेती आणि शेतकऱ्यांसंबंधित म्हणजेच शेतकऱ्यांसाठी हितकारक योजना, शेती संबंधीत सल्ले त्यासाठी शेतकऱ्यांनी काय करायला हवं या संबंधीत कार्यक्रमांचा समावेश आहे.
आम्हाला सोशल प्लॅटफॉर्म्सवर फॉलो करण्यासाठी खालील लिंकवर क्लिक करा:
Facebook: / dcolumnnews
Instagram: / dcolumnnews
Twitter: / dcolumnnews
Website : www.thecolumnn...