Рет қаралды 32,341
येत्या विधानसभेत या ३ चाली खेळून जरांगे पाटील किंगमेकर ठरणार ?| Manoj Jarange Patil | Vishaych Bhari
मंडळी लोकसभा निवडणुक निकालानंतर मनोज जरांगे पाटील हे पुन्हा एकदा चर्चेत आले आहेत. लोकसभा निवडणुकीत मराठवाड्यासह पश्चिम महाराष्ट्र, खान्देशमधील काही जागांवर जरांगे पाटलांच्या आंदोलनाचा चांगला प्रभाव पडल्याचं जाणवलं. मराठवाड्यात तर महाविकास आघाडीचे ७ खासदार निवडून येण्यात मराठा आरक्षण आंदोलनाचा मोठा वाटा राहिला. कुठलाही उमेदवार उभा न करता फक्त पाडायचं कुणाला याची जरांगे पाटलांनी आखलेली रणनीती यशस्वी ठरल्याने महाराष्ट्राच्या सत्ताकारणात आता जरांगे पाटलांना हलक्यात घेता येणार नाही याची जाणीव प्रस्थापित नेत्यांना झालेली आहे. गत लोकसभेत २३ जागा जिंकलेला भाजपसारखा पक्ष यंदा केवळ एक आकडी संख्येवर येत असेल तर त्या पराभूत झालेल्या १४ जागांपैकी ५ ते ६ जागांचं डॅमेज हे फक्त जरांगे पाटलांमुळे झालंय असं आकडेवारीच्या आधारे स्पष्टपणे सांगता येतं. भाजपने घेतलेली ओबीसीपूरक भूमिका, मराठ्यांना ओबीसींविरुद्ध व्हीलन करण्याचे चालवलेले प्रयत्न, गृहमंत्री म्हणून मराठा आंदोलकांवरील गुन्हे मागे घेण्यात केलेला विलंब किंवा दिलेला नकार, आंदोलनस्थळी निष्पाप माता-भगिनींवर झालेला लाठीहल्ला या सर्व गोष्टी भाजपविरोधात गेलेल्या असून याचीच पुनरावृत्ती येत्या विधानसभा निवडणुकीत होऊ शकते. दरम्यान मनोज जरांगे पाटलांनी १३ तारखेला आपलं आंदोलन महिनाभरासाठी स्थगित करून पुढील १३ तारखेपर्यंत सगेसोयरे अंमलबजावणी झाली नाही किंवा आंदोलकांवरील गुन्हे मागे घेतले गेले नाहीत तर विधानसभेला उमेदवार देण्याचा किंवा नाव घेऊन उमेदवार पाडण्याचा कार्यक्रम मराठा बांधव हातात घेतील असा सज्जड इशारा राज्य सरकारला दिला आहे. जरांगे पाटलांच्या या इशाऱ्याचा अर्थ नेमका कसा घ्यायचा? जरांगे पाटील खरोखर विधानसभा निवडणुकीच्या माध्यमातून लोकांसमोर जातील का? अशा परिस्थितीत महाविकास आघाडी नेमकी काय भूमिका घेणार? कुणाच्या किती जागांना फटका बसणार या सर्वाचा आढावा आपण आजच्या या व्हिडीओतून घेणार आहोत.
Images in this Video used for representation purpose only
Connect With Us -
facebook link :
/ %e0%a4%b5%e0. .
instagram link :
/ vishayachbh. .
Our Website :
vishaychbhari.in
COPYRIGHT DISCLAIMER :
Under section 107 of the Copyright Act 1976, allowance is made for 'fair use' for purposes such as criticism, comment, news reporting, teaching, scholarship and research, fair use is permitted by copyright statutes that might otherwise be infringing, non-profit, educational or personal use tips the balance in favor of fair use.
Thank You
#vishaychbhari
#विषयचभारी
#manojjarangepatil
#manojjarangepatilspeech
#manojjarangepatilnews
#manojjarangepatil live
#manojjarange
#manojjarangepatilmarathaaarakshan
#manojjarangepatilstatus
#manojjarangelive
#manojjarangepatilprotest
#manojjarangepatilsong
#manojjarangepatilmovie
#manojjarangepatillivenews
#manojjarangepatiltodaylive
#manojjarangepatilhungerstrike
#manojjarangpatil
#manojjarangepatilfamily
#manojjarangepatillivesabha