अक्कलकोट ते हत्तरसंग प्रवास कसा करावा I संगमेश्वर मंदिर माहिती I Sangameshwar Mandir I

  Рет қаралды 2,748

Explore With Carlekar

Explore With Carlekar

Күн бұрын

Пікірлер: 29
@shrutisatawalekar
@shrutisatawalekar 3 ай бұрын
महाराष्ट्रातील वेगवेगळ्या भागात असलेली अनोखी मंदिरे आपल्यामुळे घरबसल्या बघायला मिळतायत आम्हाला..संगमेश्वर आणि हरिहरेश्वर मंदिर खूप सुरेख दाखवले आहे..तसेच चित्रीकरण आणि प्रस्तुती पण खूप छान झाली आहे.
@explorewithcarlekar
@explorewithcarlekar 3 ай бұрын
नमस्कार संगमेश्वर मंदिर खरेच खूप सुंदर आहे .. आपण जर प्रत्यक्षात तिथे गेल्यावर त्याचा अनुभव येतो.. खासकरून ते अनोखे शिवलिंग तर खूपच सुंदर आहे आपण केलेल्या सूचना कमेंट साठी आपले मनापासून धन्यवाद 🙏🏻
@k.anuradha07
@k.anuradha07 4 ай бұрын
अक्कलकोट ते हत्तरसंग प्रवास वर्णन व रस्त्यांची माहिती खुप छान दिलीत.संगमेश्वर मंदिर व नंदिची मुर्ती पाहिली.तिथेच एक छोटा नंदि त्याच्या डाव्या बाजूला एक शिवलींग व उजव्या बाजूला एक शिवलींग ते काशी रामेश्वराचे दर्शन होते. हरिहरेश्वर मंदिर व सीना व भिमा नदिचा संगम हे पहायला मिळाले.आपले सादरीकरण व चीत्रीकरण खुप छान वस्पष्ट असते त्यामुळे पाहताना वेगळाच आनंद मिळतो.जगप्रसिद्ध तिनशे एकोणसाठ मुख असलेले शिवलिंग पाहण्याचे भाग्य तुमच्यामुळे लाभले. शुभाशीर्वाद.
@explorewithcarlekar
@explorewithcarlekar 3 ай бұрын
नमस्कार.. आपण माझ्या कामाचे कौतुक ज्या प्रकारे करता त्यामुळे मला अजून जास्त आणि छान काम करण्याची ऊर्जा प्राप्त होते.. आपले असेच मार्गदर्शन मिळत रहावे Stay Connected 👍🏻
@surekhabobade123
@surekhabobade123 4 ай бұрын
Sir तुमचे व्हिडिओ खूप छान आहे 🎉
@explorewithcarlekar
@explorewithcarlekar 4 ай бұрын
नमस्कार.. आपले मनापासून धन्यवाद Stay Connected 👍🏻
@balasahebmoze4872
@balasahebmoze4872 4 ай бұрын
खूप छान माहिती दिली आहे 📷 मी तुमचे व्हिडिओ पाहण्यासाठी ऊत्तम व मार्गदर्शक आहे
@explorewithcarlekar
@explorewithcarlekar 4 ай бұрын
नमस्कार साहेब.. आपल्या सुंदर कॉमेंट साठी आपले मनापासून धन्यवाद..
@crv328
@crv328 4 ай бұрын
🙏🙏🙏
@explorewithcarlekar
@explorewithcarlekar 4 ай бұрын
🙏🏻🙏🏻
@SachinPawar-ke4df
@SachinPawar-ke4df 4 ай бұрын
मी शक्यतो कोणत्याही व्हिडिओ वर कमेंट टाकत नाही, पण तुमचे व्हिडिओ खूप सुंदर, आणि माहितीपूर्ण असल्याकारणाने मला राहवले नाही. मागील चार-पाच दिवसात मी तुमचे जवळजवळ 20 ते 25 व्हिडिओ बघितले. भारतातील वेगवेगळ्या ठिकाणांची माहिती तुमच्या व्हिडिओ मधून बघताना खूप चांगले वाटते. भविष्यात जर संधी मिळाली आणि तुम्हाला काही प्रॉब्लेम नसेल तर मला तुमच्याबरोबर प्रवास करायला आवडेल... शक्य असेल तर कळवावे..
@explorewithcarlekar
@explorewithcarlekar 4 ай бұрын
नमस्कार.. सर्वप्रथम आपले मनापासून आभार,आपण वेळ काढून माझे व्हिडिओ आपण पाहिलेत आणि त्यावर इतकी सुंदर कॉमेंट केले आहे त्या साठी.. फक्त ऐक छोटी विनंती आहे ती म्हणजे आपण माझ्या प्रत्येक व्हिडिओ वर कॉमेंट केली तरी मला आवडले असते कारण माझ्या कामात मी कुठे कमी पडतो का,किंवा माझ्या कडून काही चुकत असेल तर ते आपण मला हक्कने सांगू शकता,जेणेकरून मला माझ्या कामात सदर चुका पुन्हा होणार नाहीत ह्याची दक्षता घेता येते..🙏🏻 आपण म्हणता त्याप्रमाणे भविष्यात मला पण आपल्याला भेटायला आवडेल आणि त्यावेळी प्रवासाचे ही ठरवता येईल.. फक्त ही भेट कधी होईल हे आज मला ही नेमके सांगता येणार नाही.....पण आपण नक्की भेटू ही खात्री आहे मला .. Till Then Stay Connected 👍🏻
@makarandkulkarni8311
@makarandkulkarni8311 4 ай бұрын
नमस्कार सर.... श्री संगमेश्वर देवस्थान ची माहिती खूप उत्तम दिलीत. सोलापूरकर मंडळी नियमित येथे येतं असतात.आपल्याला वाटेत हे श्री गजानन महाराज मंदिर लागले ते सुध्दा शांत आणि रम्य आहे. तुळजापूर येथे सोयी आता छान झाल्या आहेत.सोलापूर च्या आसपास आता रस्ते खूपच छान झाले आहेत. पुण्यालां परत जाताना हॉटेल सुनील मध्ये कुंदा चहा किंवा जेवणात दही चटणी भाकरी घ्यायला विसरू नका.(मी सोलापूर चाच आहे पण सध्या बाहेर असतो .आपली भेट घ्यायला आवडली असती) धन्यवाद मकरंद कुलकर्णी
@explorewithcarlekar
@explorewithcarlekar 4 ай бұрын
नमस्कार साहेब.. सर्वात आधी आपले मनापासुन आभार. खरेच सांगतो सोलापूरकर नशीबवान आहेत कारण त्यांच्या एकाबाजूला श्री विठ्ठल उभे आहेत,तर दुसऱ्या बाजूला आई तुळजाभवानी रक्षण करत आहे तर एकीकडे श्री स्वामी समर्थ आशीर्वाद देत आहेत आणि आता श्री संगमेश्वर पण सोबतीला आहेत..ह्या सर्व शक्ती स्थळांमुळेन, आता इथे रस्त्यांचे जाळे पण आता खूप मोठे आणि छान झाले आहे, जेणेकरून आपण ह्या सर्व ठिकाणी खूप आरामात जाऊन येऊ शकतो,खास करून पुण्या मुंबई वरून ह्या ठिकाणी येणाऱ्या साठी आता खूप सोयी सुविधा उपलब्ध करून देण्यात आलेल्या आहेत, तुळजापूर मधे पण आता जे भक्त निवास झाले आहे ते ही खूप स्वच्छ आणि सुंदर ठेवले आहे..खरेच अमुलाग्र बदल होताना दिसत आहे सगळीकडेच.. आपण सुचविलेल्या ठिकाणी पुढील काळात जेव्हा सोलापूर मधे येणे होईल तेव्हा नक्की जातो.. पण ह्यावेळी मी सोलापूरात जेवणासाठी थांबलो होतो ते ठिकाण पण खूप सुरेख होते..त्या ठिकाणची माहिती पुढील भागात देत आहे..आपण पुढील भाग अवश्य बघावा.. तसेच आपली भेट घ्यायला मला ही आवडेल..आयुष्य नक्की भेटू👍🏻 Till Then Stay Connected 👍🏻
@nileshpalkar7648
@nileshpalkar7648 4 ай бұрын
अतिशय सुंदर प्रस्तावना आणी मांडणी
@explorewithcarlekar
@explorewithcarlekar 4 ай бұрын
नमस्कार.. आपले मनापासून आभार..🙏🏻 Stay Connected..👍🏻
@praveenmarne793
@praveenmarne793 4 ай бұрын
कार्लेकर, तुमच्याच व्हिडिओची वाट बघत होतो😊
@explorewithcarlekar
@explorewithcarlekar 4 ай бұрын
नमस्कार साहेब.. खूप छान वाटले आपण हे म्हणल्या मुळे.. आपले स्नेह कायम मिळत राहो हीच प्रार्थना Stay Connected 👍🏻
@dhanorilohegaon3472
@dhanorilohegaon3472 4 ай бұрын
He Sangameshwar mandir majhe kuldaiwat mandir ahe
@explorewithcarlekar
@explorewithcarlekar 4 ай бұрын
नमस्कार.. आपल्या कुलदैवतचे मंदिर खरेच खूप सुंदर आहे,त्याच्या सभोवतालचा परिसर पण खूप सुरेख आहे..भाग्यवान आहात🙏🏻
@dhanorilohegaon3472
@dhanorilohegaon3472 4 ай бұрын
@@explorewithcarlekar he mandir jast lokana mahiti nahi...gardi naste..mi pan Tamilnadu aani Gujrat cover kele ahe..tumche vdo 👌👌1 no. Astat...mi sadhya Bangalore madhe ahe...tumche sarv vdo baghitale last week😄😀
@explorewithcarlekar
@explorewithcarlekar 4 ай бұрын
खरे तर महाराष्ट्र राज्य पर्यटन विभागाने ह्या मंदिराच्या प्रसारासाठी अजून प्रयत्न करायला हवा असे वाटते,सोलापूर पासून जसे लोक अक्कलकोट तुळजापूर पंढरपूर ला जातात तसे त्यांना ह्या मंदीरात पण जाण्यासाठी ह्या मंदिराची माहिती जास्तीत जास्त लोकांना मिळाली पाहिजे असे माझे प्रामाणिक मत आहे.. Secondly thanks for watching my videos and I hope you enjoyed them Stay Connected 👍🏻
@neelkanthumbargikar5393
@neelkanthumbargikar5393 4 ай бұрын
मराठीतील पहिला शिलालेख कोरलेला आहे येथे, आपण विसरलात 😊
@explorewithcarlekar
@explorewithcarlekar 4 ай бұрын
नमस्कार.. आपण म्हणत आहत ते अगदी बरोबर आहे.. मी सदर शिलालेख संदर्भात माहिती दिली नाही कारण सदर शिलालेख मला तिथे पाहता आला नाही.. मी न पाहिलेल्या वस्तूंची/ठिकाणांची माहिती देणे मला योग्य वाटले नाही.. पण भविष्यात पुन्हा जाणे झाल्यास हा शिलालेख नक्की बघून सर्वांना त्याची माहिती देण्याचा प्रयत्न करेन Till Then Stay Connected 👍🏻
@neelkanthumbargikar5393
@neelkanthumbargikar5393 4 ай бұрын
Google सर्च करा
@neelkanthumbargikar5393
@neelkanthumbargikar5393 4 ай бұрын
मराठीतील पहिला शिलालेख : (सहस्त्र शताब्दी = इ.स २०१८) "वाछि तो विजया होईवा” = "वाचणाऱ्यांचा विजय असतो” सोलापूरजवळील ‘हत्तरसंगकुडल’ येथील संगमेश्वर मंदिराच्या सभामंडपाच्या तुळईवर एक शिलालेख आहे त्यावर अडीच ओळी लिहिल्या आहेत…… पहिली ओळ ‘स्वस्ति श्री शके ९४० कालयुक्त संवत्सरे माघ कधनुळिकाळ छेळा’. [शके ९४० (इ.स १०१८) मध्ये हा शिला लेख कोरला असल्याची नोंद आहे.] तर दुसरी ओळ ‘पंडित गछतो आयाता मछ मि छिमळ नि १०००’ अशी संस्कृतमधील आहे. [दानशूराने त्याकाळी चलनात असलेले हजार निष्क देणगी दिल्याचा उल्लेख आहे]. शेवटच्या तिसऱ्या ओळीत ‘यवाछि तो विजेया हो ऐवा’ असे स्पष्ट मराठीत कोरले आहे. .....अर्थात “वाचेल त्याचा विजय होईल”, (वाचाल तर वाचाल आणि वाचणाऱ्यांचा विजय असतो). साक्षरतेचा महान संदेश देणारा मराठी भाषेतील पहिला शिलालेख येथील संगमेश्वर मंदिराच्या सभामंडपाच्या तुळईवर इ.स १०१८ (शक ९४० ) मध्ये कोरला असल्याची नोंद आहे. इतिहास संशोधक श्री आनंद कुंभार यांनी हा मराठीतील पहिला शिलालेख (१००० वर्षांपूर्वीचा) शोधला आहे. [**
@anilchavan7573
@anilchavan7573 3 ай бұрын
कुंडल संगम येथुन जवळच असलेल्या अलमट्टी धरण हॉसपेट बदामी हंपी मी या सर्व ठिकाणी नेहमी जात असतो आपणही इतर स्थळांना भेट द्यावी
@explorewithcarlekar
@explorewithcarlekar 3 ай бұрын
नमस्कार .. ह्या सर्व ठिकाणी पूर्वी माझे जाणे झाले आहे .तरी पण भविष्यात पुन्हा जाण्याचा योग आल्यास नक्की जाऊन येईन..🙏🏻
The evil clown plays a prank on the angel
00:39
超人夫妇
Рет қаралды 53 МЛН