Рет қаралды 362,031
#BolBhidu #ManojJarangePatil #MaharashtraVidhanSabhaElection2024
'मागच्या दीड वर्षापासून दादा, दादा, दादा, दादा, शेतकरी बाजूला ठेवले, सगळे प्रश्न समाजाचे बाजूला ठेवले आणि आता दादाचा आदेश येतोय याला पाडा, विधानसभेला पुन्हा तोच आदेश येतोय, याला पाडा, नेमकं आमची काय चूक ? आम्ही पैसा कमवला नाही, आम्ही मॅनेज झालो नाही हीच आमची चूक आहे असं कुठंतरी वाटायला लागलंय. म्हणून प्रचाराचा नारळ फोडणं आम्ही या ठिकाणी थांबवलं आहे. या इलेक्शनमधून आम्ही माघार घेतोय.' फुलंब्री विधानसभा मतदारसंघातुन अपक्ष अर्ज भरणाऱ्या मंगेश साबळे यांनी आपण माघार घेत असल्याची घोषणा करणारा व्हिडीओ व्हायरल झाला आणि त्यात टार्गेट केलं मराठा आंदोलक मनोज जरांगे पाटील यांना.
आधी कुठं उमेदवार देणार, कुठं पाडणार आणि कुठं पाठिंबा देणार अशी घोषणा करणाऱ्या मनोज जरांगे पाटील यांनी बैठका घेऊन ज्या जागांवर उमेदवार देणार आहे, जिथं पाडणार आहे त्या जागांची घोषणा केली, पण सकाळीच त्यांनी या भूमिकेवरुन युटर्न घेतला आणि उमेदवार देणार नाही, तुमच्या हिशोबानं पाडा असं सांगितलं. त्यानंतर अनेक अपक्ष उमेदवारांनी अर्ज माघारी घेतले, तर अनेक जणांनी ठेवले. पण उभे रहा, पाडा, माघार घ्या या गणितात मनोज जरांगे पाटील फसले का ? जरांगेंच्या हातून मराठा पॉवर गेली, असं का म्हणलं जातंय ? पाहुयात या व्हिडीओमधून.
चॅनेलला सबस्क्राईब करायला विसरू नका. नोटिफिकेशन चालू ठेवा म्हणजे लेटेस्ट व्हिडीओचे नोटिफिकेशन तुम्हाला मिळत राहतील.
bit.ly/Subscrib...
✒️ आपणही आपले लेख, विषय व इतर माहिती आम्हाला bolbhidu1@gmail.com या मेल आयडीवर पाठवू शकता.
Connect With Us On🔎
➡️ Facebook : / bolbhiducom
➡️ Twitter : / bolbhidu
➡️ Instagram : / bolbhidu.com
➡️Website: bolbhidu.com/