Рет қаралды 64,246
#BolBhidu #AjitPawar #SambhajiZende
तुला यंदा दाखवतो तू कसा आमदार होतो ते, आख्ख्या महाराष्ट्राला माहितीये मी जर एखाद्याला ठरवलं आमदार नाही करायचं तर कुणाच्या बापाला ऐकत नाही, अक्ख्या महाराष्ट्रानं ऐकलेला हा डायलॉग आणि अख्ख्या महाराष्ट्रानं पाहिलेला हा कलगीतुरा. २०१९ च्या निवडणुकीत अजित पवारांनी विजय शिवतारेंना हे चॅलेंज दिलं आणि विजय शिवतारे पडले. थोड्या नाही ३१ हजार मतांच्या फरकानं पडले. मग दादा विरुद्ध बापू या संघर्षाचा दुसरा अंक यंदाच्या लोकसभेला पाहायला मिळाला. ही जागा आपल्याला सुटावी, ते बंडखोरी, ते सुनेत्रा पवारांना पाठिंबा, ते मी अपक्ष असतो तर एक हजार टक्के निवडून आलो असतो, अशी विधानं बाप्पू शिवतारेंनी केली. या सगळ्यात सुनेत्रा पवार पुरंदरमधून ३५ हजारानं पिछाडीवर गेल्या. साहजिकच दादा विरुद्ध बाप्पू या सामन्याच्या तिसऱ्या अंकासाठी ग्राऊंड सेट झालं, विधानसभा निवडणूक २०२४.स्टँडिंग जागा काँग्रेसची संजय जगताप यांची, दुसऱ्या नंबरला शिंदे गटाचे विजय शिवतारे, त्यामुळं महायुतीमध्ये दावा शिंदे गटाचा होता.
पुणे जिल्हा बँकेचे दिगंबर दुर्गाडे अजित पवारांच्या राष्ट्रवादीकडून इच्छुक होते, तर माजी सनदी अधिकारी संभाजी झेंडेंनी इथून आधी शरद पवार गट आणि मग अपक्ष तयारी सुरु केली होती. काँग्रेसनं संजय जगताप यांना तिकीट दिलं, शिंदे गटाने विजय शिवतारे यांना तिकीट दिलं आणि अजितदादांनी चाल खेळत संभाजी झेंडेंना आपल्या पक्षाचा एबी फॉर्म दिला. पुरंदरमध्ये तिरंगी लढतीचं, मैत्रीपूर्ण लढतीचं चित्र निर्माण झालं, पण विषय एवढ्या पुरता मर्यादित नाहीये, संभाजी झेंडे प्लस पवार हे समीकरण दोन जणांना शह देणारं आहे आणि लॉंग टर्मचं राजकारण साध्य करणारंही. झेंडेंच्या उमेदवारीमधून अजित पवारांनी नेमकी कोणती समीकरणं साधली आहेत ? झेंडे पुरंदरमध्ये कसा डाव फिरवू शकतात, पाहुयात या व्हिडीओमधून.
चॅनेलला सबस्क्राईब करायला विसरू नका. नोटिफिकेशन चालू ठेवा म्हणजे लेटेस्ट व्हिडीओचे नोटिफिकेशन तुम्हाला मिळत राहतील.
bit.ly/Subscrib...
✒️ आपणही आपले लेख, विषय व इतर माहिती आम्हाला bolbhidu1@gmail.com या मेल आयडीवर पाठवू शकता.
Connect With Us On🔎
➡️ Facebook : / bolbhiducom
➡️ Twitter : / bolbhidu
➡️ Instagram : / bolbhidu.com
➡️Website: bolbhidu.com/