Рет қаралды 289,397
काही काही रेस्तराँमध्ये खरंच खूप छान जेवण मिळते. ही रेस्तराँ फार प्रसिद्धीच्या मागे लागत नाहीत. ग्राहकांच्या क्षुधाशांतीचे काम प्रामाणिकपणे आणि नित्यनेमाने ते करीत असतात. पुण्यात टिळक रस्त्यावर असलेले सिद्धिविनायक डायनिंग हॉल हे अशाच रेस्तराँपैकी एक. गेल्या अनेक वर्षांपासून इथे थाळी पद्धतीने सुंदर चवीचे शाकाहारी जेवण ग्राहकांना दिले जात आहे. एकीकडे थाळी पद्धतीच्या जेवणाचे महानगरांमध्ये पीक आलेले असताना आणि जेवण कमी आणि फरसाण जास्त अशी गत झालेली असताना सिद्धिविनायक डायनिंग हॉल या सगळ्यांमध्ये एकदम वेगळे आहे. इथल्या जेवणाची चव जिभेवर रेंगाळत राहते. फूडी आशिष अनेक वर्षांपासून या रेस्तराँमध्ये जातोय. आता याच रेस्तराँवरचा हा व्हिडिओ तुमच्यासाठी घेऊन आलो आहोत.
veg thali,unlimited thali,indian thali,pune food,food vlog,best thali in pune,best thali,veg restaurant,pune thali,maharashtrian food,vegetarian thali,best vegetarian thali in pune,indian food review,maharashtrian thali,indian thali reaction,veg thali recipes indian,indian street food veg,pure veg thali restaurants,best thali veg,pune thali hotel,maharashtrian thali in pune